चूकीची उत्तरे द्या

Submitted by म्हाळसा on 17 February, 2021 - 16:37

तो, ‘दृश्यावरून गाणं ओळखा’ असा धागा आहे बघा.. ज्यात आपल्याला दृश्य बघून अचूक गाणं ओळखायचं असतं.. अगदी तसंच..पण इथे दृश्य बघून सगळ्यांना चित्रपटाचं नाव सांगायचं आहे.. तेही फक्त आणि फक्त चूकीचच.. म्हणजे, त्या दृश्याला शोभेल असं, पण भलत्याच चित्रपटाचं नाव द्यायचं आहे..
हो हो..अगदी बिनधास्त चूकीची उत्तरं द्यायची .. कोणीही मार्क्स कापणार नाहीत..
बरं..त्याच बरोबर एखाद्या दृश्यासाठी किती चूकीची उत्तरे द्यायची ह्यावर बंधनं नाहीत.. त्यामुळे हवी तितकी पण दृश्याला साजेशी अशी नावं सुसाट लिहीत सुटा.. त्यात अजून जर चार चांद लावायचे असतील तर चित्रपटाच्या नावासोबत एखादा डायलॅाग चिकटवलात तहीही चालेल..

तो गुरू, हो जाओ शुरू..

पहिलं दृश्य,
A23A151C-9A61-4E1F-ADA4-4A0C27B33122.jpeg

सुरूवात माझ्यापासून करते -
How to train a dragon

“हम तो मासूम पंछी है डाल के, पंछी..आसमान मे उडनेवाले मासूम पंछी”

चला चला.. पटापट तुमचेही चाराणे येऊद्यात

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

आर्ची : जाती हु मै..
परश्या: जल्दी है क्या?
आर्ची: पेट्रोल संपलय..
परश्या : (गप्पच)
आर्ची : अये रत्ताळ्या , माहितह्य तुझ्याकडे पैसे नसणारच..मी आणलेत बैग भरून..आनी बसलीय बैग घेऊन मागं !

माहेरची बुलेट

गाणं:
डुग डुग, डुग डुग बुलेट गाडी
धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
(प्रिन्स) मामाच्या गावाला जाऊया

मानव, रानभुली: धन्स!

किल्ली: ऐकलं आत्ता, छान आहे गाणं.
अग्गोबाई ढगोबाई मध्ये खरंतर फक्त बालगीते नसून ती मोठ्यांना जास्त विचार करायला लावणारी गाणी आहेत!
संगीत पण अप्रतिम.

Aggobai dhaggobai माझं आणि आता लेकीचं आवडतं गाण्यांचं collection आहे
कविता म्हणजे गाण्यांचे शब्द अप्रतिम आहेत

चलती है गाडी
उड्ती है धुल,
.
.
.
हट जाओ बाजु को,
वरना दांडी होगी गुल

चलती है गाडी
उड्ती है धुल,
.
.
.
हट जाओ बाजु को,
वरना दांडी होगी गुल

बघा!
सेल्फी काढायला काही नटून थटून केस विंचरून बसायची गरज नाही.

कौन है ये बबुआ
Submitted by आबा. >> अहो आपला नीरज चोप्रा आहे..
ह्सा फोटोत गश्मीरसारखा दिसतोय.. काही महिन्यांपूर्वी हा पण वर्ल्ड क्रश होता.

कोणे हा चंपू? पन्नाशी जवळ आल्यापासून, ही लहान पोरं आवडतच नाहीत. अक्षरक्षः बालकं वाटतात. तसेही तरुण वयातही मॅचोर नटच आवडत नाहीतर मग प्रोफेसर्स.

कोणे हा चंपू? >>> ऑलिंपिक गोल्ड medalist आहे, कसला सॉलिड भाला फेकतो, जबरदस्त. मी live बघितलं होतं. आपले मराठे पानिपत युद्धासाठी गेलेले तेव्हा त्यातले काही हरयाणातच राहिले, त्यांना रोड मराठा म्हणतात, असं त्याचं महाराष्ट्राशी कनेक्शन आहे (अवांतर माहिती).

खरंतर चुकीची उत्तरं द्या यावर अचूक लिहिणं चूक आहे म्हणा, हाहाहा.

चित्रासाठी वाक्य
#कितीफेकतोसरेपोरा !!! >>> सही.

आपले मराठे पानिपत युद्धासाठी गेलेले तेव्हा त्यातले काही हरयाणातच राहिले, त्यांना रोड मराठा म्हणतात, असं त्याचं महाराष्ट्राशी कनेक्शन आहे (अवांतर माहिती).>> हायला.. हे माहितच नव्हतं.. वर नकळतंच ‘आपला’ बोलून गेले..पण हा तर खरच आपला नीघाला

Pages