चूकीची उत्तरे द्या

Submitted by म्हाळसा on 17 February, 2021 - 16:37

तो, ‘दृश्यावरून गाणं ओळखा’ असा धागा आहे बघा.. ज्यात आपल्याला दृश्य बघून अचूक गाणं ओळखायचं असतं.. अगदी तसंच..पण इथे दृश्य बघून सगळ्यांना चित्रपटाचं नाव सांगायचं आहे.. तेही फक्त आणि फक्त चूकीचच.. म्हणजे, त्या दृश्याला शोभेल असं, पण भलत्याच चित्रपटाचं नाव द्यायचं आहे..
हो हो..अगदी बिनधास्त चूकीची उत्तरं द्यायची .. कोणीही मार्क्स कापणार नाहीत..
बरं..त्याच बरोबर एखाद्या दृश्यासाठी किती चूकीची उत्तरे द्यायची ह्यावर बंधनं नाहीत.. त्यामुळे हवी तितकी पण दृश्याला साजेशी अशी नावं सुसाट लिहीत सुटा.. त्यात अजून जर चार चांद लावायचे असतील तर चित्रपटाच्या नावासोबत एखादा डायलॅाग चिकटवलात तहीही चालेल..

तो गुरू, हो जाओ शुरू..

पहिलं दृश्य,
A23A151C-9A61-4E1F-ADA4-4A0C27B33122.jpeg

सुरूवात माझ्यापासून करते -
How to train a dragon

“हम तो मासूम पंछी है डाल के, पंछी..आसमान मे उडनेवाले मासूम पंछी”

चला चला.. पटापट तुमचेही चाराणे येऊद्यात

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

टेस्ला काय म्हणतायं , आमच्याकडे प्रेस्ला आहे.
(प्रेताच्या हातात स्टिअरिंग देऊन बघा)

आधीचा सीन बघितल्यावर पहिलं वाक्य बघतोस काय रागाने आलं मनात आणि पुढे अस्मिताने ते लिहिलेलं वाचलं आणि तिने छान कम्प्लिट केलं, त्यामुळे ते जास्त आवडलं.

Pret-a-porter.
आमचे दुकानी सर्व प्रकारच्या प्रेतांसाठी इंदुरी, महेश्वरी इ. कफन मिळतील.
अरे नसिर यांना परवा तो नागपुरी स्टॉक आलाय तो दाखव.

मी १०० नंबर
रात को सोओगे ऐसे वैसे मॅट्रेस पर तो सुबह होगा ये हाल
इसिलिये अपनाओ स्लीपवेल और पाओ सुबह प्रेत बनने से मुक्ति

अरे हे तर ते गाणे आहे ना?

थोडी सी जो पी ली है, चोरी तो नही की है
ओ नसीर ओ रवी कोई हमे रोको कोई तो सम्हालो

आया रे आया सिम्बा आया
किंवा
न्या कार्ट्याला रात्रभर शीशु , झोपू दिलं तर शपथयं , नाही तर फेकून देईन

मोटापेके लिये ...
घरच्या रिकामटेकड्या बाळाला घेऊन तुम्ही तिकोणासन करू शकता ,इससे पेट बिलकुल अंदर चला जाता है
मंकीदेव जंगलीबाबा

का कुणास ठाऊक, पण 'बाळा गाऊ कशी अंगाई' ह्या सिनेमाची आठवण झाली ह्या चित्रावरून. त्यात आशा काळेच्या हातून गॅलरीतून बाळ खाली पडतं.

हरचंद पालव, नका टेंशन घेऊ, मार्जार वंशातील आहे हे बाळ. पडलं तरी चार पायावर पडतंय....त्या मंकीला आशा काळे व्हायचा काही स्कोपच नाही!

बघा तर वैज्ञानिक प्रगतीमुळे मी माकड असूनही छावा माझ्या पोटी आला !

किंवा

सिम्बा जन्मला गं सखे सिम्बा जन्मला !

किंवा

छावा , छावा , माहिया /मंकिया से छावा छावा !

किंवा

छावा , छावा डरकाळतो नवा आआआआ
संदर्भ:
https://youtu.be/6zoKKPTzWUE

>>> छावा , छावा , माहिया से छावा छावा !
Lol
से... छा वा
अवांतर:
(बाय द वे, मूळ शब्द नक्की काय आहेत? Proud असो, "चूकीची ऐकायला आलेली गाणी" धाग्यावर मला काय ऐकायला येतात ते लिहितो)

Pages