दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<निरू - दो जासूस मधले आहे का ? पुरवैय्या ?
ते मागच्या धाग्यावर येऊन गेले आहे बहुतेक.>>
नाही, पा.आ.
काल उशीरा इथे दिलं आणि आज रविवार सकाळ त्यामुळे अजूनपर्यंत विशेष कोणी पाहिलं नसेल असं गृहीत धरुन क्ल्यू देत नाही. पण जरावेळाने वाटलं तर क्ल्यू नाहीतर अजून एक प्रचि देतो.
(तुमचं दो जासूसचं गाणं बघितल. नावां, समुद्र अगदी सेम वाटतोय.)
रच्याकने, दो जासूस तुलनेत नवा आहे.

गाणे मला माहिती नाही पण दृष्यावरून इतके अनुमान करू शकते- निरू यांनी दिलेल सिनेमा मूळ कृष्ण-धवल असावा. हे नंतर रंगवलेले आहे. १९५० च्या आसपास सिनेमा असावा. हिरॉईन साऊथ इंडियन असावी व ऐतिहासिक सिनेमा जसे रानी रूपमती इ असावा.
क्ल्यू द्या.

गाणे मला माहिती नाही पण दृष्यावरून इतके अनुमान करू शकते- निरू यांनी दिलेल सिनेमा मूळ कृष्ण-धवल असावा. हे नंतर रंगवलेले आहे. १९५० च्या आसपास सिनेमा असावा. हिरॉईन साऊथ इंडियन असावी व ऐतिहासिक सिनेमा जसे रानी रूपमती इ असावा.
क्ल्यू द्या.

सीमंतिनी, तुस्सी ग्रेट हो.
मूळ सिनेमा कृष्ण-धवल आहे. १९५० च्या आसपास आहे.
हिराॅईन दक्षिण भारतीय नाही. पण हे गाणं जिच्यावर चित्रित आहे ती द. भारतीय आहे.
सिनेमा ऐतिहासिक नाही..

ह्या गाण्यात मूळ हिराॅईन फक्त जरा वेळ दिसते. चित्रपट परदेशी चित्रपटावरुन स्फुरलेला आहे. ह्या चित्रपटाचा रिमेक झालेला आहे.

उत्तर आले का?
मी गुगलवर जाऊन 1950 बोटीवरची गाणी शोधत बसले होते Lol

same here मृणाल Lol
माझे दरवेळी असेच होते Sad शोधाशोध करेपर्यंत इथ उत्तर आलेलीच असतात..

ओह
हे जुनं वालं गल्यात साखली सोन्याची व्हर्जन Happy
मी ज्योतिका अक्षय खन्ना चं खेवा रे खेवा बघत बसले होते.
याचा मूळ चित्रपट, हा आणि आपला पूजा भट्ट बाईंचा हे सगळे अतिशय उत्तम पिक्चर आहेत.

पा. आ. तुम्ही दिलेलं चित्र एल्व्हिस प्रेस्ली च्या ‘मार्गरिटा’ चं आहे बहुतेक. तसं असेल तर त्या चालीची हिंदी कॉपी म्हणजे ‘कौन हैं जो सपनोंमें आया‘.

फेफ, मार्गरिटाच आहे ते. पाहिलं आताच. पाआ उत्तर देतील तेव्हां देतील. तोपर्यंत नवीन येऊ द्या.

मीच देते. क्ल्यु लागेल असं वाटत नाही. प्रिंटस्क्रीन दाबले जाईपर्यंत दोघांच्याही मूव्हमेंट्स बदलल्या Lol

Picture1_9.jpg

धन्यवाद! बरेच दिवस या धाग्यावर चक्कर टाकून जातेय, पहिल्यांदा ओळखता आलंय! शालूची लॉटरी अपेक्षित नव्हती Lol

Screenshot_20210606-152647~2.png हे 90 च्या दशकातील गाणं आहे. रंगोलीला कायम असायचं, बरंच गाजलेलं गाणं आहे , सगळीकडे ऐकायला मिळायचं. पिक्चर बहुदा पडेल आहे. टायटल सॉंग आहे.

नायिकचे माहेरकडून सिनेसृष्टीशी संबंध.
नायक आणि नायिका दोघेही सध्या काम करत नाहित.

Pages