दृष्यावरून गाणे ओळखा- ४

Submitted by Barcelona on 11 January, 2021 - 22:25

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे. अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विचित्र दृष्य देऊन जसे हिरॉईनच्या नाकपुड्या, हिरोचे पाय, पडलेली अंगठी इ कोडे खंगरी करण्याचा प्रयत्न करू शकता. शेंदूर फासूनही चित्र खंगरी करू शकता. आपल्या आजीच्या जन्माआधीची गाणी देवूनही खंगरी करू शकता. खंगरी नसलेले कोडे भलतेच क्ल्यू देऊन खंगरी करू शकता. उदा: हिरोच्या सावत्र बायकोचा आजी नवरा... Uhoh कधी कधी कुणी चकली इ बक्षीस देते. वाटून घ्यावे कारण उत्तर एकाला आले तरी दहाजणांनी विचारलेले प्रश्न उपयोगी पडलेले असतात. तीन-चार दिवस कोडे अडकले तरी दयाळू होण्याची गरज नाही. दिग्गज लोक आहेत. शोधतात बरोबर उत्तरे, पेशंस ठेवायचा.

आधीचा धागा
त्या आधीचा धागा

वरील चित्र एका रखडलेल्या सिनेमातील आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला किती खंगरी वाटलं होतं कोडं<<<<<<
आता तो उर्मिलाला पिझ्झा पोचवून आलेला आफताब शिवदासानी इतका स्पष्ट दिसत असताना कसं राहील कोडं खंगरी? Lol

चोरी चोरी मधलं ये रात भिगी भिगी आहे का हे?
खूप चंद्र वाली गाणी गुगल केली.सगळीकडे ढोले ढोले चंद्र आहेत. हा फारच पिटुकला आहे.

तू कहाँ, ये बता
इस नशीली रात में
माने ना मेरा दिल दीवाना…

ओह ते सुबह का तारा शुक्राबद्दल आहे काय? मी इतके दिवस सूर्याबद्दल समजत होतो.

हा १९५५-६० च्या दरम्यानचा सिनेमा आहे. टोपीवरून राजकपूर वाटला तरी शर्टावरून किशोरकुमार असावा. एक क्ल्यू द्या तर बहुतेक ओळखू शकेन.

इतना सन्नाटा क्यों है भाई ?

अजून एक क्लू घ्या: राज कपूरच्या हिरॉइनची मुलगी एका पिक्चर मध्ये सैफची हिरॉइन झालेली आहे.

प्रेम कैदी मधला "आय लिव्ह फॉर यू, आय डाय फॉर यू" वाला "browmance" आहे असे वाटले होते. कारण त्यात असेच झक्कीपक्की ड्रेसेस आहेत. पण हे ते दिसत नाही.

बाय द वे ते आय डाय फॉर यू हे त्या टाय डाय केलेया शर्टाकरता असावे.

हा पिक्चर खूप ओळखीचा आहे
ही करिष्मा आणि तो शाहरुख वाटतो आहे.
पण माझे मन अजून वेगळ्या कोम्बो चाही विचार करते आहे.

Pages