दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

संस्कृतमध्ये कुठलं गाणं भाषांतर केलंय असं विचारलं होतं.
तेवढं जुळत नाहीय हे भाषांतरातील दोष दाखवण्यास नव्हे तर कदाचित अजून वेगळं गाणे आहे का कदाचित असे वाटले.
आणि आता लक्षात आले की मीच जरा चुकीचा अर्थ काढला होता घाईत वाचुन, तो भागही जुळतोय.

तेवढं जुळत नाहीय हे भाषांतरातील दोष दाखवण्यास नव्हे >>> Happy ते आलं लक्षात... गैरसमज / वादाचा मुद्दा नव्हता.
जवळपास सारखी वाटणारी २ गाणी असूच शकतात. मग हे की ते क्लिअर करतोच आपण.
हो मूळ हिंदी आहे हे मी द्यायला पाहिजे होते. पण मराठी नसतातच इथे, त्यामुळे गृहीत धरले गेले, ही माझी चूक.

संस्कृत मध्ये दिलाशी साधर्म्य असलेला हृदय आहे शब्द. Happy मीही तिसऱ्या ओळीलाच जरा अडले होते कारण होश नसणेला 'विवश' असेल का हा विचार करत होते.

पण मस्त कोडे... अजून चालतील.

अजून चालतील.
नवीन Submitted by श्रद्धा >>>> अजून नाहीयेत. एकाचीच २ कडवी करेपर्यंत फॅ फॅ झाली. व्याकरण विसरायला झालेय आता. पुस्तके हाताशी नाहीत. पण व्याकरणाची चूक शक्यतो नाही + शब्द फार मिसमॅच नकोत + त्याच चालीत गाता येईल असे हवेत असा नियम स्वतःलाच घातला. त्यात इतकेच जमले. भावार्थ घेतलाय, शब्दार्थ कमी.

मस्त केलंय हां संस्कृत भाषांतर
यावरून चिप थ्रील्स चं संस्कृत व्हर्जनआठवलं
माझ्या भाचीला हे संस्कृत क्लास मध्ये दाखवतात, मुलांचा इंटरेस्ट वाढावा म्हणून

https://youtu.be/w1zo9HbJmWA

इंग्रजी
Screenshot_20201022-222157_YouTube.jpg

हिरोईन तुम्ही ओळखलीच
हिरोचा भाऊ, वडील,आजोबा,वहिनी,मुलगा,सुनबाई,पुतण्या,पुतणी हे सगळे फिल्म मध्ये काम करतात.
या पिक्चर ची काही गाणी लोकगीत आणि अरेबियन गाण्यावरून कॉपी पेस्ट आहेत.
गाणी हिट होती.पिक्चर उडाला की आपटला माहीत नाहीये.
IMG_20201023_220748.jpg

असा चावरा चोर
म्हणजे पहिले नाच बिच सोडून 5 इंजेक्शन घ्यावी लागणार Happy

नाही

महंगाई मार गई - मनोज भारत कुमारांचा रोटी कपडा और मकान

एकूणच फार व्यथा आहेत गाण्यात Proud

बरोबर Happy

याराना मधली बरीच गाणी कॉपी पेस्ट आहेत
पिया घर आया प्रसिध्द लोकगीतावरून आहे
लोये लोये किंवा अल्ला अल्ला दिल धडके अरेबिक गाण्यावर

माधुरीची क्रोधगीते अशी प्लेलिस्ट बनवणार आहे मी_अनुची कोडी ऐकून मी....

कोण जाणे... जुनी गाणी जास्त ऐकते...मला तो दिवेवाल्या अमिताभचा याराना माहीत. माधुरी विशेष नाही आवडत
बर एक खडूसवालं द्या... रात्रभर चालेल असं

हिंदी
Screenshot_20201023-231032_YouTube.jpg

१. चित्रपटाचे नाव वरील चित्रातुन कळु शकते.
२. चित्रपटाचा नायक पुढे प्रसिध्द खलनायक झाला.
३. गायिका सुलोचना कदम (गायकाचा थोडा आवाजही आहे, त्याचेही नाव सांगितले तर लगेच शोधून गाणे कळेल म्हणुन सांगत नाही.)

Pages