दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

महान आहात सर्व! सही उत्तर श्रद्धा.
शेवटच चक्क १ मिनिटात कोणी
ओळखले नाही धन्य झाले!

क्लु द्या निलिमा..
>>
नॉन हिन्दी. १ बिलियन प्लस व्ह्युड

स्क्रीनशॉट असा द्या की गुगल इमेज सर्च मध्ये तो कळणार नाही.
>>
कठीण आहे. मला कळायच्या आधि गुगलला माहित असते Happy

नॉन हिन्दी. १ बिलियन प्लस व्ह्युड<<<<<
यावरून एक गेस. 'व्हाय दिस कोलावेरी डी?' आहे का गाणे? ते प्रचंड व्हायरल झाले होते.

बाकी इमेज गुगल सर्च करण्यात आणि उत्तर देण्यात काही मजा नाही, याला अनुमोदन.

नॉन हिंदी असेल तर माझा पास! गुगल इमेज सर्च करत नाही बरं. आयुष्य सिनेमावर वाया घालवलेलं आहे आणि इथे येवून बघावं तर अर्र नाय गेलं की वाया हे लक्षात येत आहे Wink Happy

अबाबा.मला हे गाणे माहिती नाहीय. सरड्याची धाव ९०ज आणि २०००ज बॉलीवूड मूव्हिज पर्यंत Happy

झूम मध्ये असताना फिल्मी भुंगे सोडणार्‍यांवर सक्त कारवाई केली जाईल.... Wink क्ल्यू दे ... पकवणार्‍यांपेक्षा हे बरं...

म्हणूनच म्हटलं इथे काहीतरी टाकावं Happy लहान मुलगी म्हणते हे गाणं.. आपल्या दादा मला एक वहिनी आण सारखं आहे ... आणि एका शहराच नाव आहे

मस्त गाण आहे.. आणि यातल्या मुलीचा डान्स पण भारी आहे
Submitted by ए_श्रद्धा >>>>
बडे भैया लाये है लंदन से छोरी
दिला दो हमें भी दुल्हन गोरी गोरी

दोन स्टार किड्स चा चित्रपट
यातल्या एका स्टार कीड चा बाबा लोकांना 'बायकांना काय आवडतं' याच्या शिकवण्या द्यायचा
यातल्या एका स्टार कीड ची आई वरवंटा सदृश आंबाडा आणि काही खाली पडले तर वाकता येणार नाही इतके टाईट पंजाबी सूट घालायची.
IMG_20201023_095403.jpg

आज खंगरी नको देऊ. ते ए_श्रद्धाने घातलेलं कोडं अजिबात सुटलं नाही. Happy वैफल्याच्या चांद्ण्याला भुकेला चटोर झालं माझं... Wink

Happy

मी एक देते --- नायकाचा माईल्डसा विनयभंग करणारे स्त्रीपात्र. गळ्यात स्टेथो घातलेला नायक बाहेर जायला दरवाजे उघडायच्या प्रयत्नात

Pages