दृश्यावरून गाणे ओळखा-2

Submitted by mrunali.samad on 21 October, 2020 - 05:04

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसाद पूर्ण झाल्यामुळे हा नवीन धागा.

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अभ्यास सोडून वर तोंडं करून आई बाबा ऑफिस ला गेलेले असताना पिक्चर बघायचे
मग इंजिनिअरिंग ला पी एल मध्ये अभ्यास करून कंटाळा आला म्हणून पिक्चर बघायचे Happy
मग परीक्षा झाल्यावर आनंद म्हणून पिक्चर बघायचे.

अभ्यास सोडून वर तोंडं करून आई बाबा ऑफिस ला गेलेले असताना पिक्चर बघाय>>>

मला वाटले हे पण कोडे आहे - डॅडी मम्मी है नही घर पे... हे गाणे आठवले.

D-T-B.jpg

ये दिल तुम बिन कही लगता नही हम क्या करे -इज्जत

त्या पूल आणि त्यावर चालणाऱ्या हिरॉईनीच्या शॉटने सोपे केले कोडे. Proud सोनी मिक्सवर रात्री 9 ते 12 जुनी गाणी लागतात त्याच्या जाहिरातीत हे गाणे आणि हा शॉट नेहमी असे.

सहीच! याला म्हणतात दृश्यावरुन गाणे ओळखणे.

@ कारवी , नाही दसर्‍याची तयारी आज सन्ध्याकाळी केलि. मुलीची झोपेत चुळबुळ सुरु झाली मग लगेच बंद मोबाईल आणि माबो Happy

@ कारवी , नाही दसर्‍याची तयारी आज सन्ध्याकाळी केलि. मुलीची झोपेत चुळबुळ सुरु झाली मग लगेच बंद मोबाईल आणि माबो Happy
नवीन Submitted by लंपन on 24 October, 2020 - 22:12 >>>>
अरे देवा, किती सिरीअसली प्रतिसाद देताय....
Happy अहो कोड्याचे उत्तर होते ते. (मधली ओळ, मुखडा, सिनेमा नाव)
दुसरे कोणी ट्राय करत असेल इतक्या उशीरा तर विरस नको.... म्हणून कोडेकर्त्याला कळेल असे दिले.
आम्ही आद्याक्षरावरून गाणे ओळखा धाग्यावर असे करायचो.... ते आठवले अचानक.

भारीच सीमंतिनी. विम्मी पाठमोरीही लगेच ओळखु येइल म्हणुन मी तिला कापली फ़ोटो टाकताना.

@ कारवी मला वाटलेच होते की तुम्ही गाणे ओळखलेय आणि बरोबर का असे विचारलेय, पण खात्री नव्हती, मला त्या क्लु वरुन गाणे कळले नाही .

पाठमोर्‍या विम्मीपेक्षा ही हिंदी सिनेमात हिरो हिरॉईन रेल्वेला टाईमटेबल नसते किंवा असले तरी ते वाचायचे नसते किंवा वाचले तरी आपण पंकच्यौल रहायचे नसते असे करत करत कायम ट्रेन स्टेशनवर लेट असतात... सुनील दत्त-विम्मी जरा निवांत प्रकार होते... म्हणून लक्षात राहिले Happy

लोल कारवी.. विम्मी..किती ठोकळी पण गाणी किती चांगली मिळाली .. अन्नू कपुरच्या एका रेदिओ प्रोग्राममध्ये त्याने सांगित्ले होते की विम्मीला खुप वाईट मरण आले, एकाकी , अत्यंत गरिबित. र्प्रिया राजवंश पण गाण्याबाबतीत लकी.

विम्मी पाठमोरीही लगेच ओळखु येइल >>>> कोणाला ते? मला चेहरा माहिती होता... नाव नाही.
आणि बरोबर का असे विचारलेय, पण खात्री नव्हती, >>>> तुमच्या उत्तरावरून ध्यानात आले ते...

हिंदी सिनेमात हिरो हिरॉईन .....कायम ट्रेन स्टेशनवर लेट असतात... >>>>
मग हो, त्यांना सवय असते का ८:०२ च्या लोकलला उडी मारून विंडो सीट घ्यायची?

दुसरे कोणी ट्राय करत असेल इतक्या उशीरा तर विरस नको.... म्हणून कोडेकर्त्याला कळेल असे दिले.<<<<<
कारवी, हे वाचून पुन्हा तुमचा प्रतिसाद वाचला. आलेली झोप उडाली (नींद लिये जाता है), दसरा पूजेची फुलं (पूजा के फूल)... एकदम सॉलिड भारी! Happy

Happy श्रद्धा -- आणि पहिली ओळ = बात जो उनसे चली वो इधर आके रुकी

बरोबर, सीमंतिनी, लंपन -- विभागून

शुभा खोटे बरोबर.. संगीतकार मदन मोहन. हे गाणं लताने तिच्या श्रद्धांजली अलबम मध्ये घेतलंय.

गाणं बाप्याचं आहे. >>> हे वाचलच नाही. मोकळे केस + बाई क्लोजप मग दिलं ठोकून
१ रंगीत १ काळं घेऊया आलटून पालटून.... श्रवु, अनु, मृणाली तशाच राहिल्यात....

Pages