Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797
..........................................
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)
३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)
५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)
७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे परिच्छेद तुम्ही कुठून घेता
हे परिच्छेद तुम्ही कुठून घेता , म्हणजे पुस्तकातून का ?
कारण मीही तयार करू शकते , भरपूर पुस्तकं आहेत.
अस्मिता
अस्मिता
हे मीच काही वर्षांपूर्वी लिहिलेले आहे !
यातले क्र ७ चे वाक्य जसपाल भट्टी यांच्या टीव्ही मालिकेतील आहे.
स्वतः तयार केलेत तर करताना पण मजा येते.
ओके, छान होते.
ओके, छान होते.
तुम्ही एक जरूर द्या तसे .
तुम्ही एक जरूर द्या तसे .
मला आता सोडवायचा अनुभव हवा आहे !
तयार करायचा भरपूर झाला आहे....
Copyright ची शंका आली , दुसरं
पुस्तकातून उतारे देण्यात Copyright ची शंका आली , दुसरं काही बघते. नाटकाचे स्वगत वगैरे....
मला करायचे कसे यावर सुचना/कल्पना द्या
उतारा जर ऑनलाईन निवडला तर
उतारा जर ऑनलाईन निवडला तर जसाच्या तसा अजिबात घेऊ नका. त्याची पुरेशी मोडतोड करून स्वतःच्या शब्दात मांडा. किंवा सरळ एखाद्या कलाकृतीचे आपणच छोटेसे परीक्षण करायचे. मजकुरातून एखादा विषय किंवा आशय वाचकांना दिसेल इतके बघायचे.
बाकी त्यात अवघड असं काही नाही.
आता अक्षरे मिटायची कुठली आणि द्यायची कुठली, हेच थोडे अनुभवांनी कळेल.
उघड जोडाक्षरे किंवा खास अक्षरे (ज्ञ...) देऊ नका. ती मिटा.
आभार .
आभार
.
मला करायचे कसे यावर सुचना
मला करायचे कसे यावर सुचना/कल्पना द्या Happy
Submitted by अस्मिता >>>
५-६ वाक्ये ती ही खेळ म्हणून घेतली तर Copyright ची शंका नको.
वाटल्यास Copyright २००२, १९९६ प्रकाशनाचे नाव असे देऊ शकता खाली.
लेखक / पुस्तक नाव Copyright दिल्यास लोक टेम्प्ट होतील मूळ स्रोत बघायला.
नेटवरून घेतलेले नको. एक वाक्य जमल्यावर ctrl F मारावेसे वाटेल
स्वत:ची वाक्ये किंवा छापील पुस्तकातून, बातमी, पेपर पुरवणीतील लेख, कशातूनही घेता येईल.
बाकी 'घुमवता' तुम्हाला येत नाही हे आपल्याला माहिती आहे
सॉरी
तेव्हा पहिली २-३ पटकनच सुटणार.
बाकी 'घुमवता' तुम्हाला येत
बाकी 'घुमवता' तुम्हाला येत नाही हे आपल्याला माहिती आहे सॉरी >>>>
किंवा जनरलीच!
)
दुर्गुण आहे गं तो कोड्यांबाबत
( ऐवढे ओळखलेच आहे तर जमल्यास अगं तुगं कर म्हणजे मलाही करता येईल
छापील पुस्तकातून घ्यायचेच मनात आहे. अधूनमधून करत जाईन. आभार कारवी.
नुकत्याच संपलेल्या खेळांमध्ये
नुकत्याच संपलेल्या खेळामध्ये वाक्य क्रमांक ६ ची मजा आली हे नमूद करतो.
दोन्ही स्पर्धकांनी वाक्यात काही वेगळे शब्दही बसवल्याने एक वेगळ्या धर्तीचे वाक्य तयार झाले.
इथून पुढे अशा खेळामध्ये असे काही मजेदार करण्याचा जरूर प्रयत्न करा.
तीच खेळाची मजा राहील !
आजचे कोडे :
आजचे कोडे :
तुम्ही साखरझोपेत असताना तयार केले.
साद देती हिमशिखरे (पुस्तक)
लेखक गो. खं. प्रधान
Towards the silver crest of Himalayas
अनुवाद रामचंद्र ज. जोशी
मालतीचे माधवास पत्र (थोडा भाग /आशय)
वाग्दत्त वधूचे वरास पत्र
सगळे शब्दं मोठे, अर्थपूर्ण व सुंदर आहेत. जोडाक्षर आहेत बहुतेकांत. हे माझे आवडते पत्र आहे. त्यातून नायिकेचा आत्मविश्वास व वैचारिक स्पष्टता दिसते. करा सुरु. तुमच्या रात्री दहापर्यंत उत्तर देईन.
******
पुढे पुढे (६) -- ऐहिक सुखापेक्षा पारमार्थिक वा (४) सुखाकडे -- तुझ्या मनाचा वाढता (२) मला आढळला, अनुभवास आला, तेव्हा तर माझी फार फार निराशा झाली. माझे (५) जर खरे असेल तर, का नि कसे न कळे, मला असे वाटते की(३) भावनांपेक्षा तू बुद्धीला जास्त प्राधान्य देतोस. त्या( ५) तू आपली(५) जीवनमूल्ये घासून पहात असतोस.
माझी जीवनाकडे पाहाण्याची दृष्टी(५) असल्याने मला तुझी ही वृत्ती (४) वाटते. मी तर अक्षरशः (४) गेले. कुठला तो काळाकुट्ट दिवस उगवला, नि तुझी त्या स्वामीजींशी (२) पडली असे मला वाटते. कारण त्या दिवसापासून तू (२) बदललास !
तू वृत्तीने(२) , व्यवहारी नि आता तर तुझ्यात(३) प्रवृत्तीचाच प्रभाव दिसतो. तुझी वृत्तीही अरेरावीची आहे नि (७) तू कुठेही नमते घेणारा नाहीस. मीही कुणापुढे मान वाकवू इच्छित नाही ; आणि साहजिकपणे माझा नवरा माझ्या मुठीत असावा अशी माझी (५) आहे नि तसे माझे प्रयत्नही असतील. मी कुणाच्या मार्गात (३) होऊ शकत नाही. ती कल्पनाच मला असह्य आहे. मद्रासहून तू आलास तेव्हा तर मला आढळून आले की तुझ्यात केवढा मोठा बदल झाला आहे. (६) वृत्ती की ज्यामुळे वैवाहिक जीवन सुखी व्हायचे ती वृत्तीच नव्हे; तर तरुण वयात हवीहवीशी असणारी (६) तू गमावून बसला आहेस. तुझ्या (६) मला किती किती वाटायचे, तुझी(५) मूर्ती बघून मी हरखून जायची ; नि जीवनात तू जे हवे ते मिळवशील अशा तुझ्याबद्दल मला मोठा विश्वास होता आणि आहेही. मुद्द्याची गोष्ट इतकीच की, आपण जर(७) निगडित होऊन एकत्र आलो, तर आपले जीवन यशस्वी होणार नाही या (५) मी आले आहे. माझा (३) पती तू होशील असे तुझ्यात आताशा काही उरलेलेच नाही, असे (४) मला म्हणावे लागत आहे. आपले वैवाहिक जीवन(५) होईल, अयशस्वी होईल आणि ही घटना (६) सुखप्रद होणारी नव्हे.
धन्यवाद !
छान आहे उतारा अस्मिता. शब्द
छान आहे उतारा अस्मिता. शब्द मोठे ६-७ अक्षरी.... पटकन सुचत नाहीयेत. वेळ लागेल.
पण मुलगी प्रामाणिक आणि स्पष्टवक्ती आहे.
लग्न करून untuned संसार करण्यापेक्षा किंवा नवर्याला मोल्ड करण्यात शक्ती वाया घालवण्यापेक्षा, जा बाबा आपल्या वाटेने म्हणून सोडून द्यावे.
मी सोडवतो आहे.
मी सोडवतो आहे.
यात संपूर्ण शब्दच अपेक्षित आहेत .
बरोबर ?
उत्तर तयार आहे. कधी लिहायचे ?
उत्तर तयार आहे. कधी लिहायचे ?
लिहू शकता. दुसरे कुणी आहे का
लिहू शकता. दुसरे कुणी आहे का खेळात.
संपूर्ण शब्द.... हो.
कारवी , वेळ लागू दे. तुम्ही म्हणालं तेव्हा देईन उत्तर
पुढे पुढे (अधिभौतिक /
पुढे पुढे (अधिभौतिक / ऐश्वर्यसंपन्न) -- ऐहिक सुखापेक्षा पारमार्थिक वा (अध्यात्मिक ) सुखाकडे -- तुझ्या मनाचा वाढता (कल ) मला आढळला, अनुभवास आला, तेव्हा तर माझी फार फार निराशा झाली. माझे (पर्यालोचन/ अवलोकन) जर खरे असेल तर, का नि कसे न कळे, मला असे वाटते की(तरल/ निव्वळ) भावनांपेक्षा तू बुद्धीला जास्त प्राधान्य देतोस. त्या( निकषावर) तू आपली(तत्वाधिष्ठीत) जीवनमूल्ये घासून पहात असतोस.
माझी जीवनाकडे पाहाण्याची दृष्टी(मनमोकळी) असल्याने मला तुझी ही वृत्ती (मतलबी) वाटते. मी तर अक्षरशः (वाहवत) गेले. कुठला तो काळाकुट्ट दिवस उगवला, नि तुझी त्या स्वामीजींशी (गाठ) पडली असे मला वाटते. कारण त्या दिवसापासून तू (पूर्ण ) बदललास !
तू वृत्तीने(द्वाड) , व्यवहारी नि आता तर तुझ्यात(हेकट/ तार्किक ) प्रवृत्तीचाच प्रभाव दिसतो. तुझी वृत्तीही अरेरावीची आहे नि ( समंजसपणाने/ नतमस्तकतेने) तू कुठेही नमते घेणारा नाहीस. मीही कुणापुढे मान वाकवू इच्छित नाही ; आणि साहजिकपणे माझा नवरा माझ्या मुठीत असावा अशी माझी (मनोकामना/ महत्वाकांक्षा) आहे नि तसे माझे प्रयत्नही असतील. मी कुणाच्या मार्गात (अडळ/ अडत/ लचांड) होऊ शकत नाही. ती कल्पनाच मला असह्य आहे.
मद्रासहून तू आलास तेव्हा तर मला आढळून आले की तुझ्यात केवढा मोठा बदल झाला आहे. (तारुण्यसुलभ ) वृत्ती की ज्यामुळे वैवाहिक जीवन सुखी व्हायचे ती वृत्तीच नव्हे; तर तरुण वयात हवीहवीशी असणारी (विषयवासना) तू गमावून बसला आहेस. तुझ्या (स्वप्नरंजनात) मला किती किती वाटायचे, तुझी(आत्मविश्वासी/आत्मनिर्भर ) मूर्ती बघून मी हरखून जायची ; नि जीवनात तू जे हवे ते मिळवशील अशा तुझ्याबद्दल मला मोठा विश्वास होता आणि आहेही.
मुद्द्याची गोष्ट इतकीच की, आपण जर(भावविवशतेशी) निगडित होऊन एकत्र आलो, तर आपले जीवन यशस्वी होणार नाही या (निष्कर्षाप्रत) मी आले आहे. माझा (हवासा/ लाडका) पती तू होशील असे तुझ्यात आताशा काही उरलेलेच नाही, असे (खेदास्तव) मला म्हणावे लागत आहे.
आपले वैवाहिक जीवन(नकोनकोसे) होईल, अयशस्वी होईल आणि ही घटना (निखालसपणे/ निर्विवादपणे) सुखप्रद होणारी नव्हे.
छान लिहिले आहे कुमारसर , पण
छान लिहिले आहे कुमारसर , पण मूळ बरेच वेगळे आहे.
इतरांची वाट पाहू.
पर्यालोचन शब्द माझ्यासाठी नवीन आहे.
काही ठिकाणी मूळ शब्दाला -च, -मुळे वगैरे लागले आहे. (ते मोजले आहे )याची नोंद घ्यावी.
छान वाटतोय उतारा. आवडलं असतं
छान वाटतोय उतारा. आवडलं असतं प्रयत्न करायला पण गडबडीत आहे.
धन्यवाद punekarp
धन्यवाद punekarp
प्रयत्न केला थोडा. पण एवढे ५
प्रयत्न केला थोडा. पण एवढे ५ - ६ -७ अक्षरी शब्द काही सुचत नाहीयेत. निदान आज तरी. तेव्हा पास.
जेवढे जमले तेवढे देऊन टाका ,
जेवढे जमले तेवढे देऊन टाका , हाकानाका
क्लु मागा पण पास म्हणू नका
उद्या देऊन टाकते उत्तर....
पुढे पुढे जिवनामधील ऐहिक
पुढे पुढे जिवनामधील ऐहिक सुखापेक्षा पारमार्थिक वा अध्यात्मिक सुखाकडे -- तुझ्या मनाचा वाढता रोख मला आढळला, अनुभवास आला, तेव्हा तर माझी फार फार निराशा झाली. माझे अवलोकन जर खरे असेल तर, का नि कसे न कळे, मला असे वाटते की आपल्या भावनांपेक्षा तू बुद्धीला जास्त प्राधान्य देतोस. त्या कसोटीवर तू आपली(५) जीवनमूल्ये घासून पहात असतोस.
माझी जीवनाकडे पाहाण्याची दृष्टी सर्वसामान्य असल्याने मला तुझी ही वृत्ती अतार्किक वाटते. मी तर अक्षरशः धास्तावून गेले. कुठला तो काळाकुट्ट दिवस उगवला, नि तुझी त्या स्वामीजींशी गाठ पडली असे मला वाटते. कारण त्या दिवसापासून तू पार बदललास !
तू वृत्तीने हट्टी , व्यवहारी नि आता तर तुझ्यात दांडग्या प्रवृत्तीचाच प्रभाव दिसतो. तुझी वृत्तीही अरेरावीची आहे नि आत्मसन्मानासाठी तू कुठेही नमते घेणारा नाहीस. मीही कुणापुढे मान वाकवू इच्छित नाही ; आणि साहजिकपणे माझा नवरा माझ्या मुठीत असावा अशी माझी मनोधारणा आहे नि तसे माझे प्रयत्नही असतील. मी कुणाच्या मार्गात खोळंबा होऊ शकत नाही. ती कल्पनाच मला असह्य आहे. मद्रासहून तू आलास तेव्हा तर मला आढळून आले की तुझ्यात केवढा मोठा बदल झाला आहे. (६) वृत्ती की ज्यामुळे वैवाहिक जीवन सुखी व्हायचे ती वृत्तीच नव्हे; तर तरुण वयात हवीहवीशी असणारी विषयासक्तीच तू गमावून बसला आहेस. तुझ्या रुपड्याबद्दल मला किती किती वाटायचे, तुझी हसतमुख मूर्ती बघून मी हरखून जायची ; नि जीवनात तू जे हवे ते मिळवशील अशा तुझ्याबद्दल मला मोठा विश्वास होता आणि आहेही. मुद्द्याची गोष्ट इतकीच की, आपण जर(७) निगडित होऊन एकत्र आलो, तर आपले जीवन यशस्वी होणार नाही या निर्णयाप्रत मी आले आहे. माझा आदर्श पती तू होशील असे तुझ्यात आताशा काही उरलेलेच नाही, असे ठामपणे मला म्हणावे लागत आहे. आपले वैवाहिक जीवन वैफल्यग्रस्त होईल, अयशस्वी होईल आणि ही घटना (६) सुखप्रद होणारी नव्हे.
धन्यवाद मानवदादा , छान
धन्यवाद मानवदादा , छान सोडवलतं.
मूळ उतार्याच्या प्रतीक्षेत.
मूळ उतार्याच्या प्रतीक्षेत.
सर्व शब्द प्रेमी परिवारास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !
सॉरी अस्मिता काल उत्तर तयार
सॉरी अस्मिता काल उत्तर तयार करून ठेवले पण संध्याकाळी इथे येता नाही आले.... लेट एन्ट्री
पुढे पुढे इंद्रियतुष्टीच्या (६) -- ऐहिक सुखापेक्षा पारमार्थिक वा अध्यात्मिक (४) सुखाकडे -- तुझ्या मनाचा वाढता कल (२) मला आढळला, अनुभवास आला, तेव्हा तर माझी फार फार निराशा झाली. माझे अंतःस्फुरण / अवलोकन / अर्थान्वयन (५) जर खरे असेल तर, का नि कसे न कळे, मला असे वाटते की केवळ / निव्वळ / मानवी (३) भावनांपेक्षा तू बुद्धीला जास्त प्राधान्य देतोस. त्या निकषांवर / कसोट्यांवर (५) तू आपली एकूणएक (५) जीवनमूल्ये घासून पहात असतोस.
माझी जीवनाकडे पाहाण्याची दृष्टी रसानुकूल / भावनापूर्ण / भावप्रचुर / भावप्रधान (५) असल्याने मला तुझी ही वृत्ती अनाठायी / अनुचित / अप्रस्तुत (४) वाटते. मी तर अक्षरशः पस्तावून / भांबावून (४) गेले. कुठला तो काळाकुट्ट दिवस उगवला, नि तुझी त्या स्वामीजींशी गाठ (२) पडली असे मला वाटते. कारण त्या दिवसापासून तू पूर्ण (२) बदललास !
तू वृत्तीने रूक्ष (२) , व्यवहारी नि आता तर तुझ्यात विरागी / स्वकेंद्री (३) प्रवृत्तीचाच प्रभाव दिसतो. तुझी वृत्तीही अरेरावीची आहे नि कारणपरत्वेही / अपवादासाठीही (७) तू कुठेही नमते घेणारा नाहीस. मीही कुणापुढे मान वाकवू इच्छित नाही ; आणि साहजिकपणे माझा नवरा माझ्या मुठीत असावा अशी माझी मनोकामना / महत्त्वाकांक्षा (५) आहे नि तसे माझे प्रयत्नही असतील. मी कुणाच्या मार्गात पायरी / अटक / विपदा (३) होऊ शकत नाही. ती कल्पनाच मला असह्य आहे. मद्रासहून तू आलास तेव्हा तर मला आढळून आले की तुझ्यात केवढा मोठा बदल झाला आहे. जीवनाभिलाषी / संसारानुकूल (६) वृत्ती की ज्यामुळे वैवाहिक जीवन सुखी व्हायचे ती वृत्तीच नव्हे; तर तरुण वयात हवीहवीशी असणारी कर्तबगारीही / कार्यक्षमताही (६) तू गमावून बसला आहेस. तुझ्या कर्तृत्वाबद्दल / हुषारीबद्दल (६) मला किती किती वाटायचे, तुझी तडफदार (५) मूर्ती बघून मी हरखून जायची ; नि जीवनात तू जे हवे ते मिळवशील अशा तुझ्याबद्दल मला मोठा विश्वास होता आणि आहेही. मुद्द्याची गोष्ट इतकीच की, आपण जर विवाहबंधनाने (७) निगडित होऊन एकत्र आलो, तर आपले जीवन यशस्वी होणार नाही या निष्कर्षाप्रत / निर्णयाप्रत (५) मी आले आहे. माझा आदर्श / ईप्सित / नेमस्त (३) पती तू होशील असे तुझ्यात आताशा काही उरलेलेच नाही, असे वैफल्याने / उद्वेगाने (४) मला म्हणावे लागत आहे. आपले वैवाहिक जीवन असंतुलित / तापदायक / असमाधानी (५) होईल, अयशस्वी होईल आणि ही घटना दोघांकरिताही / उभयतांनाही (६) सुखप्रद होणारी नव्हे.
धन्यवाद !
सार्या शब्दखेळ परिवाराला
सार्या शब्दखेळ परिवाराला स्नेहमय, तेजोमय दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

सर्वांना दीपावलीच्या हार्दिक
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व कोडीप्रेमी मित्रमंडळीस
सर्व कोडीप्रेमी मित्रमंडळीस दिवाळीच्या शुभेच्छा !!

कारवी छान सोडवलेस. अनेक
कारवी छान सोडवलेस. अनेक पर्यायी शब्द बघून टडोपाच
येउद्या मूळ परि. ....!
येउद्या मूळ परि. ....!
आणि समारोप...
Pages