शब्दखेळ (3)

Submitted by कुमार१ on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा मूळ उतारा.....

पुढे पुढे तत्वज्ञानाकडे -- ऐहिक सुखापेक्षा पारमार्थिक वा आध्यात्मिक सुखाकडे -- तुझ्या मनाचा वाढता कल मला आढळला, अनुभवास आला, तेव्हा तर माझी फार फार निराशा झाली. माझे अवलोकन जर खरे असेल तर, का नि कसे न कळे, मला असे वाटते की ह्रदयस्थ भावनांपेक्षा तू बुद्धीला जास्त प्राधान्य देतोस. त्या निकषावर तू आपली जीवनमूल्ये घासून पहात असतोस.
माझी जीवनाकडे पाहाण्याची दृष्टी भावभधुर असल्याने मला तुझी ही वृत्ती भयप्रद वाटते. मी तर अक्षरशः हादरून गेले. कुठला तो काळाकुट्ट दिवस उगवला, नि तुझी त्या स्वामीजींशी गाठ पडली असे मला वाटते. कारण त्या दिवसापासून तू साफ बदललास !

तू वृत्तीने शुष्क, व्यवहारी नि आता तर तुझ्यात संन्यासी प्रवृत्तीचाच प्रभाव दिसतो. तुझी वृत्तीही अरेरावीची आहे नि कुटुंबजीवनात तू कुठेही नमते घेणारा नाहीस. मीही कुणापुढे मान वाकवू इच्छित नाही ; आणि साहजिकपणे माझा नवरा माझ्या मुठीत असावा अशी माझी महत्त्वाकांक्षा आहे नि तसे माझे प्रयत्नही असतील. मी कुणाच्या मार्गात लोढणे होऊ शकत नाही. ती कल्पनाच मला असह्य आहे.
मद्रासहून तू आलास तेव्हा तर मला आढळून आले की तुझ्यात केवढा मोठा बदल झाला आहे. तारुण्यसुलभ वृत्ती की ज्यामुळे वैवाहिक जीवन सुखी व्हायचे ती वृत्तीच नव्हे; तर तरुण वयात हवीहवीशी असणारी जीवनमूल्येच तू गमावून बसला आहेस. तुझ्या कर्तृत्वाबद्दल मला किती किती वाटायचे, तुझी रुबाबदार मूर्ती बघून मी हरखून जायची ; नि जीवनात तू जे हवे ते मिळवशील अशा तुझ्याबद्दल मला मोठा विश्वास होता आणि आहेही.
मुद्द्याची गोष्ट इतकीच की, आपण जर विवाहबंधनांनी निगडित होऊन एकत्र आलो, तर आपले जीवन यशस्वी होणार नाही या निर्णयाप्रत मी आले आहे. माझा आदर्श पती तू होशील असे तुझ्यात आताशा काही उरलेलेच नाही, असे दुर्दैवाने मला म्हणावे लागत आहे.
आपले वैवाहिक जीवन बदसूरत होईल, अयशस्वी होईल आणि ही घटना उभयतांनाही सुखप्रद होणारी नव्हे.

छान आहे उतारा अस्मिता. ५-६-७ अक्षरी शब्द मुळातून पूर्ण शोधायला कठीण तर गेले पण मजाही आली.
एखादे अजून द्या दुसर्‍या पुस्तकातून.

हो देत जाईन कारवी.
दुसरे कोडे येऊ द्या कुणाकडे तयार असेल तर.

दिवाळीनिमित्त एक खुराक !
८ अक्षरी शब्द ओळखा.

त्यामध्ये:
३ जोडाक्षरे
२ मुळाक्षरे
३ उकारयुक्त अक्षरे
आणि.....
१ अक्षरजोडी दोनदा आली आहे.

शोधसूत्र : उच्च उर्जायुक्त चविष्ट पदार्थांची रेलचेल.

(फराळ चाखत सावकाश प्रयत्न करा. त्यानुसार माहिती वाढवेन). Bw

हा खुराक कसा आहे?
घटक पदार्थ नुसते एकत्र मिसळलेले आहेत? सुकामेवा प्रमाणे
की
घटक पदार्थ शिजवून घोटून एकजीव केलेत? च्यवनप्राशप्रमाणे

१ अक्षरजोडी दोनदा -- जशीच्या तशी दोनदा आली आहे की काना/मात्रा/वेलांटीचा फरक असू शकतो?

हा एक पदार्थ नाही. अशा पदार्थांची घरात रेलचेल असणे हा अर्थ.

जशीच्या तशी दोनदा आली आहे >>> होय.

शब्द नेहमीच्या वापरातला नाही. खास दिवाळीसाठी म्हणून हुडकून काढला आहे ! पण तो रंजक आहे. गरज लागेल तशी अधूनमधून शोधसूत्रात भर घालेनच.

जरूर विचारा

मिष्टान्नभोजन / सुग्रासभोजन >>> नाही.
एक पदार्थ/ भोजन नाही.
३ उकार आणि १ अक्षरजोडी दोनदा पाहिजे !

'गोड' वरुन विचार चालू ठेवा

एकच पदार्थ... आठ अक्षरी आणि गोड व स्निग्ध ..
बघते.

मधू
मधुर
शर्करा
हे शब्द कुठे आहेत का त्या नावात किंवा आठ अक्षरात ...

एक अक्षरजोडी दोनदा आली आहे
ती मधु आहे काय?
(मधुमधुरेमधुकैटभ भंजिनी ह्या महिषासुरमर्दिनी स्तोत्रातल्या ओळीच मनात यायला लागल्यात)
स्निग्ध आहे तर स्नेह आहे का कुठे

पुन्हा पाहा:

गोड व स्निग्ध पदार्थांची विपुलता.
>>>> पैकी गोड (मधु) जमले.
आता दुसरेही बघा !

स्निग्ध पदार्थासाठी
दूध / दुग्ध
साय / मलई / लोणी ( यासाठी जोडाक्षरेयुक्त / उकार असलेला बघावा लागेल)
तूप / घृत / आज्य

मधु; + तूप / घृत / आज्य
+
वैपुल्य लयलूट बाहुल्य
उकार / जोडाक्षरे घेतली तर १ अक्षर कमी पडते; ४ अक्षरे घेतली तर जोडाक्षरे नाही

मधुपूर्ण घृतपूर्ण आहे का?

३ जोडाक्षरे, २ मुळाक्षरे,३ उकारयुक्त अक्षरे
१ अक्षरजोडी दोनदा
सगळे आहे

मधुकुंड घृतकुंड ?
कुंड = हौद याअर्थी ;
हौद भरून मधु / घृत असण्याइतकी ऐपत...

घृतयुक्तमधुयुक्त >>> नाही
चांगला प्र.
हे जर 'एखादा पदार्थ' असता तर योग्य असते.
तसे नाही.
विपुलता ...

घृतकुल्यामधुकुल्या
अग्दी बरोबर !
दिवाळी संपायच्या आत उत्तर आले.
सर्वांचेच छान प्रयत्न.
धन्यवाद !

अस्मिता
नक्की कल्पना नाही.
शब्दरत्नाकर मधून घेतलाय.

Pages