शब्दखेळ (3)

Submitted by हेमंतकुमार on 5 October, 2020 - 09:23

भाग ३ मध्ये सर्वांचे स्वागत.
या आधीचा धागा : https://www.maayboli.com/node/75797

..........................................
एकाच शब्दाचे वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.

किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.

मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. शेवटाकडेचा (४)
२. धान्यावरची विशेष जागा (२)

३. ही गाद्यांवरून जाते किंवा चालते (२)
४. स्वामी (३)

५. मिळण्याची इच्छा होणारे काल्पनिक स्थान (४)
६. म्हटला तर सद्गुण, म्हटला तर दुर्गुण (४)

७. यात नीट बघायला दृष्टी निर्दोष हवी (२) नेढे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भार? नाही
जुन्या व कवितांत प्रिय असलेल्या उपकरणातील ...

७ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही शब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक म्हणजे अक्षरक्रम)

४२ कामधाम नसल्यास हा येतो
३७ हा खूप विचार करतो

३४ हा घ्यायला कोणालाही आवडेल
५२ मराठीत हा पेटतो तर संस्कृतात निर्जन होतो

६७ जुन्या उपकरणातील लोखंडी चकती

१२३४५६७ गाव प्रशासन

Submitted by कुमार१ on 18 November, 2020 - 21:54

३४. श्वास
५२. यज्ञ /अग्नि

७ अक्षरी मराठी शब्द (उपशब्दांसह) ओळखायचा आहे. त्यामध्ये समाविष्ट असलेल्या काही शब्दांची शोधसूत्रे अशी :
(अंक म्हणजे अक्षरक्रम)

४२ कामधाम नसल्यास हा येतो
३७ हा खूप विचार करतो

३४ हा घ्यायला कोणालाही आवडेल
५२ मराठीत हा पेटतो तर संस्कृतात निर्जन होतो

६७ जुन्या उपकरणातील लोखंडी चकती

१२३४५६७ गाव प्रशासन

५२. अग्नि
तो अग्निच आहे , समानार्थी शोधा, संस्कृत अर्थ जुळवून

३७ आले की फायदा होईल

37- मुनी
३४ - मुका (खरंतर हाच शब्द डोक्यात आला होता पहिल्यांदा Happy )

37- मुनी
३४ - मुका
मस्त, कोंडी फुटली Bw

आता
* * मु का * * नी

कठीण पातळी बघता सर्वांचे प्रयत्न सुंदर !

५२.वन्ही नाही
संस्कृतात अर्थ निर्जन जागा

1- गा

गावमुकादमानी
चुकुन द ला काना दिला.

मानी
स्त्री. (कों.) जात्याच्या वरच्या तळीच्या भोकांत बसविलेली लोखंडी वाटोळी चकती

गावमुकादमानी
बरोबर, छान
= वतनी ग्रामव्यवस्था
सर्वांना धन्यवाद !

Pages