आवरण : 1 वाटी बारीक रवा, सवा वाटी पाणी, 1 चमचा तूप, पाव चमचा मीठ
सारण : 1चमचा तूप, खवलेला नारळ 2 वाटी, गूळ 1 वाटी, 2 चमचे खसखस किंवा पांढरे तीळ(यापैकी एक), आवडी नुसार काजू, बदाम, पिस्ता यांची जाडसर भरड
"आळस ही शोधाची जननी आहे ( said by someone like me)
मला विकतची तांदूळ पिठी वापरायला risky वाटते (मोदक नाही वटले तर), तसेच तांदूळ धुवून सुकवून पिठी करायचा कंटाळा व आळस
मी नेहमी कारण सांगायचे सासूबाईंना कि तांदूळ पिठी नाहीये वगैरे. त्या म्हणायच्या कि अग रव्याचे कर चांगले होतात, पण कधी केले नव्हते. काल नैवेद्याला मोदकचं हवे होते, त्यात जिकडे तिकडे मोदकाचे फोटो.. मग घेतला मनावर"
कृती अगदी तांदूळ उकडी प्रमाणे आहे फक्त तांदूळ पीठी ऐवजी रवा.
कृती:
1. सवा वाटी पाणी उकळत ठेवावे, त्यात तूप मीठ घाला. पाण्याला चांगला उकळा आला कि गॅस फ्लेम लो करा.
2. हळूहळू रवा सोडा व कलथ्याने हलवत राहा.
3. गॅस बंद करून झाकण ठेवा. 15-20 मिनिट सेट होऊ द्या.
4. तोपर्यंत सारण करून घ्या. कढई मध्ये चमचाभर तुपात ड्रायफ्रूटस भरड परतून घ्या, तीळ किंवा खसखस घाला, त्यातच गूळ घाला.
5. गूळ विरघळला कि खवलेला खोबरं घाला.
6. खोबऱ्याचा पाणी सुके पर्यंत परतत राहा.
7. वेलची जायफळ पूड घालून गॅस बंद करा.
8. रव्याची उकड जरासा पाण्याचा हात लावून मळून घ्या. अगदी मऊ शिजलेली असते अजिबात वेळ नाही लागतं मळायला.
9. आता हवे तसें मोदक वळा.
10. 5 मिनिट वाफवून घ्या.
चवीला अगदी तांदुळासारखे लागतात. कळणारही नाही खाऊन कि रव्याचे आहेत.
कलर किंचित पिवळसर येतो रव्यामुळे
मापात पाप करु नका.. रवा आणि पाणी प्रमाण
वाह छान
वाह छान
Try करून पाहते
कालच उकडीचे मोदक करून पाहिले, त्याचे काय झाले हे सांगायला वेगळा धागा काढावा लागेल
(No subject)
नक्की करा, अजिबात नाही बिघडणार.
आम्ही नेहमी रव्याचेच मोदक
आम्ही नेहमी रव्याचेच मोदक करतो. कारण सेम. तांदळाचे पीठ करता येत नाही आणि बाहेरुन आणलेले रुचत नाही.
रव्याचे मोदक चवीलाही खूप छान लागतात. आणि फुटण्याचे प्रमाण कमी असते.
मोदक वाफवायचे नाहीत का?
मोदक वाफवायचे नाहीत का?
आम्ही अगदी ५ मिनीटेच वाफवतो.
आम्ही अगदी ५ मिनीटेच वाफवतो. रवा ऑलरेडी चांगला वाफलेला असतोच. काही लोक नाही वाफवत पुन्हा.
मी वाफवते रव्याची पारी असली
मी वाफवते रव्याची पारी असली तरी मोजून २-३ मिनिटेच फक्त.
हि माझी पद्धत आहे,
https://www.maayboli.com/node/55554
पण, नाही उकडले तरी चालतात जर उकड शिजवून घेतली असेल तर.
वाफवायचे 5मिनिट.
वाफवायचे 5मिनिट.
गव्हाचा रवा की इडली रवा?
गव्हाचा रवा की इडली रवा?
साधा रवा हो. . शिरा उपमा
साधा रवा ... शिरा उपमा करायला वापरतो तो
छान दिसतायेत
छान दिसतायेत
आम्ही पण रव्याचेच करतो नेहमी
आम्ही पण रव्याचेच करतो नेहमी . मस्त होतात . यावर्षी त्यात कोका पावडर घालून नवीन वेरीएशन केले
करून बघावी वाटते आहे सोपी
करून बघावी वाटते आहे सोपी असल्याने. धन्यवाद
नियती मस्तच कोको मोदक.
नियती छानच, सरणामध्ये काय
नियती छानच, सरणामध्ये काय वापरला?
अस्मिता, करून बघा आणि इथे
अस्मिता, करून बघा आणि इथे फोटो टाका
छान दिसतायत मोदक आणि सोपे
छान दिसतायत मोदक आणि सोपे सुद्धा आहेत.. करून बघेन..
नियती छानच, सरणामध्ये काय
नियती छानच, सरणामध्ये काय वापरला?>>>> नेहमीच्या गुळ खोबऱ्याच्या सारणात थंड झाल्यावर डेअरी मिल्क चॉकलेट किसून घातले. थोडेच केले होते चॉकलेट मोदक . बाकीचे साधेच होते.
हे वाचून मी केले असे मोदक.
हे वाचून मी केले असे मोदक. रव्यात फक्त थोडा केशरी रंग घातला. मस्त झाले आणि आवडले सुद्धा. पहिल्यांदाच वाचले पण रव्याची उकड हा प्रकार.
मस्त रेसिपी आणि फोटो - ट्राय
मस्त रेसिपी आणि फोटो - ट्राय करायला हवी अशी उकड.
@वर्णिता अरे वाह! फोटो टाका न
@वर्णिता अरे वाह! फोटो टाका न..
स्वाती नक्की करा.. फोटो share करा.
छान
छान
धन्यवाद BLACKCAT
धन्यवाद BLACKCAT
करून बघणार नक्कीच. धन्यवाद
करून बघणार नक्कीच. धन्यवाद सुटसुटीत ऑप्शन दिल्याबद्दल.
शैलजा.. धन्यवाद करून पहा
शैलजा.. धन्यवाद करून पहा
पहिल्यांदाच रव्याची उकड हा
पहिल्यांदाच रव्याची उकड हा प्रकार पाहिलां. मस्त प्रकार
छान झाले आहेत.
छान झाले आहेत.
मी आधी Easy recipe for Engineers वाचले.
धन्यवाद वेका
धन्यवाद वेका
धन्यवाद मानव, Easy recipe for Engineers असं पण चालतंय कि
आज केले. मस्तच झालेत.
आज केले. मस्तच झालेत.
(No subject)
वाह सुंदर झालेत.. सुबक
वाह सुंदर झालेत.. सुबक दिसताहेत
परत केले संकष्टीला. सोपे
परत केले संकष्टीला. सोपे असल्याने हिट लिस्ट वर आहेत.
Pages