रव्याच्या उकडीचे मोदक (Easy Recipe for beginners)

Submitted by ShitalKrishna on 23 August, 2020 - 15:44
ravyachya ukadiche modak
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आवरण : 1 वाटी बारीक रवा, सवा वाटी पाणी, 1 चमचा तूप, पाव चमचा मीठ

सारण : 1चमचा तूप, खवलेला नारळ 2 वाटी, गूळ 1 वाटी, 2 चमचे खसखस किंवा पांढरे तीळ(यापैकी एक), आवडी नुसार काजू, बदाम, पिस्ता यांची जाडसर भरड

क्रमवार पाककृती: 

"आळस ही शोधाची जननी आहे ( said by someone like me)
मला विकतची तांदूळ पिठी वापरायला risky वाटते (मोदक नाही वटले तर), तसेच तांदूळ धुवून सुकवून पिठी करायचा कंटाळा व आळस
मी नेहमी कारण सांगायचे सासूबाईंना कि तांदूळ पिठी नाहीये वगैरे. त्या म्हणायच्या कि अग रव्याचे कर चांगले होतात, पण कधी केले नव्हते. काल नैवेद्याला मोदकचं हवे होते, त्यात जिकडे तिकडे मोदकाचे फोटो.. मग घेतला मनावर"

कृती अगदी तांदूळ उकडी प्रमाणे आहे फक्त तांदूळ पीठी ऐवजी रवा.

कृती:
1. सवा वाटी पाणी उकळत ठेवावे, त्यात तूप मीठ घाला. पाण्याला चांगला उकळा आला कि गॅस फ्लेम लो करा.
2. हळूहळू रवा सोडा व कलथ्याने हलवत राहा.
3. गॅस बंद करून झाकण ठेवा. 15-20 मिनिट सेट होऊ द्या.
4. तोपर्यंत सारण करून घ्या. कढई मध्ये चमचाभर तुपात ड्रायफ्रूटस भरड परतून घ्या, तीळ किंवा खसखस घाला, त्यातच गूळ घाला.
5. गूळ विरघळला कि खवलेला खोबरं घाला.
6. खोबऱ्याचा पाणी सुके पर्यंत परतत राहा.
7. वेलची जायफळ पूड घालून गॅस बंद करा.
8. रव्याची उकड जरासा पाण्याचा हात लावून मळून घ्या. अगदी मऊ शिजलेली असते अजिबात वेळ नाही लागतं मळायला.
9. आता हवे तसें मोदक वळा.
10. 5 मिनिट वाफवून घ्या.

IMG_20200823_112541.jpg

चवीला अगदी तांदुळासारखे लागतात. कळणारही नाही खाऊन कि रव्याचे आहेत.

IMG20200822210616_0.jpg

कलर किंचित पिवळसर येतो रव्यामुळे

IMG-20200822-WA0022_0.jpg

वाढणी/प्रमाण: 
11 होतील मेडीयम साईझ
अधिक टिपा: 

मापात पाप करु नका.. रवा आणि पाणी प्रमाण

प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages