कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य

Submitted by कुमार१ on 1 August, 2020 - 00:55

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

या नव्या धाग्यावर सर्व वाचकांचे स्वागत !

एव्हाना गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर्स ,आरोग्य सेवक आणि बराच जनसंपर्क असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, ते बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. गेल्या काही महिन्यांत आपल्या माबोपरिवारातील १-२ लोकांना हा आजार गंभीर होऊन मरण आले. त्यांना भावपूर्ण आदरांजली. सध्या आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !

अन्य सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली, मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहमत.
एक मुद्दा ध्यानात घ्यावा.
महासाथ कधी एकदम जात नाही. सुरवातीस खूप जोर असतो. >> ओसरतो. >> पुन्हा डोके वर काढते >> पुन्हा ओसरते .
हे चक्र किमान २ वर्षे चालते. >>>> तो आजार सामान्य होतो.

संयम ठेवावा लागेल.

महासाथ कधी एकदम जात नाही. सुरवातीस खूप जोर असतो. >> ओसरतो. >> पुन्हा डोके वर काढते >> पुन्हा ओसरते .
हे चक्र किमान २ वर्षे चालते. >>>>>
हो, हे कोविड प्रकरण सुरू होतहोता मायबोलीवर १९१८ च्या स्पॅनिश फ्ल्यू साथीवर लेख आला होता. त्यातही हा पॅटर्न दिसला होता. तेव्हाही शंका आली होती की हे दीर्घकाळ चालू शकेल? सावध रहाणे आणि नियमपालन याला पर्याय नाही.

सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील करोना रुग्णांची एका दिवसांतील संख्या कमी झाली आहे. मंगळवारी १,३२५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. २,३५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधीही ७१ दिवसांवर आला आहे.

सप्टेंबरपासून वाढलेली रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा वेगही एक टक्कय़ापेक्षा खाली आला आहे. एकूण बाधितांची संख्या २,३२,३९५ वर गेलेली असली तरी त्यापैकी १,९८,१२७ म्हणजेच तब्बल ८५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या २१,८४१ रुग्ण उपचाराधीन असून उपचाराधीन रुग्णांची संख्याही घटू लागली आहे.

मंगळवारी ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात २८ पुरुष व १० महिला होत्या. गेल्या महिन्याभरापासून दर दिवशी ४० च्या पुढे मृत्यू होत असताना मृतांची संख्याही कमी झाल्यामुळे मृत्यूदर कमी झाला आहे. मृतांची एकूण संख्या आतापर्यंत ९५०४ झाली आहे.

मुंबईतील चाचण्यांची संख्या २० हजारापर्यंत वाढवण्याचे पालिका आयुक्तांनी निर्देश दिलेले असले तरी गेल्या दोन दिवसांपासून फक्त नऊ हजार चाचण्या होत आहेत. त्यामुळेही रुग्णांची एका दिवसातील संख्या कमी नोंदली गेल्याची शक्यता आहे.

https://www.loksatta.com/mumbai-news/in-mumbai-the-duration-of-patient-d...

केंद्र व राज्य सरकारचे अभिनंदन

मुंबईतील चाचण्यांची संख्या २० हजारापर्यंत वाढवण्याचे पालिका आयुक्तांनी निर्देश दिलेले असले तरी गेल्या दोन दिवसांपासून फक्त नऊ हजार चाचण्या होत आहेत. >>
@ बातमी: हे आधी लिहायचं ना. आधी सगळा आनंदी आनंद दाखवून शेवटी ही कलाटणी.

तेलंगणामध्ये ऑगस्ट अखेरीस दोन जणांना पुनर्संसर्ग झाल्याची बातमी झळकली होती. वरील बातमीत या दोन केसेसचा समावेश नाही.

याच बातमीत

{दरम्यान, आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, “४५ ते ६० वयोगट असणाऱ्यांमध्ये करोनाच्या संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण ३५ टक्के आहे.}

आणि
{या वयोगटात गंभीर आजार असलेल्या रुग्णांच्या करोनाच्या संसर्गाने मृत्यूचे प्रमाण १३.९ टक्के आहे, तर गंभीर आजार नसणाऱ्यांचे प्रमाण १.५ टक्के आहे}

ही दोन्ही वाक्ये गोंधळ निर्माण करतात.

दोन्ही ठिकाणी नक्की कशाची टक्केवारी घेतली हे लिहिलेले नाही आपला आपण अंदाज लावायचा.

* साद,
त्या बातमीमागचा शास्त्रीय मुद्दा सांगतो. कोविडने जे बऱ्यापैकी आजारी होते, ते बरे झाल्यानंतर त्यांच्या रक्तातील अँटीबॉडीजचे प्रमाण काही महिने मोजण्यात आले. या विषाणूला मारक असलेल्या एंटीबॉडी रक्तामध्ये सुमारे शंभर दिवस ( म्हणजे संसर्ग दिनापासून मोजून) टिकून राहिलेल्या दोन अभ्यासांमध्ये आढळल्या.
अर्थात पुनर्संसर्ग हा तसा संदिग्ध विषय आहे. त्याबद्दल आताच काही बोलणे योग्य नाही. बघूया पुरेसा अभ्यास झाल्यावर त्यातून काय बाहेर पडते ते.

* मानव,
सहमत. या आजारासंबंधी क्षणोक्षणी असंख्य बातम्या माध्यमांतून येऊन आदळत आहेत. मराठी बातम्याच्या बाबतीत काही वेळेला असे जाणवले, की मूळ इंग्लिशचे भाषांतर करताना बर्‍यापैकी गडबड झालेली असते. आकडेवारीच्या बातम्यांमध्ये तर अजूनही गोंधळाची स्थिती असते. प्रत्येक पत्रकार त्यांच्या सोयीनुसार योग्य ती आकडेवारी ठळक दर्शवतात आणि काही आकडेवारी देत नाहीत.

ओके सर.
मार्च २०२१ पर्यंत भारताला करोनावरील लस मिळू शकते, असं ‘सिरम इन्स्टिट्यूट (Serum Institute)चे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी ‘इंडियन एक्सप्रेस’ला सांगितलं आहे.
https://www.loksatta.com/pune-news/india-may-get-covid-vaccine-by-march-...

https://indianexpress.com/article/india/solidarity-findings-unpromising-...
कठीण आहे.
भारतातल्या बहुतांश राज्यांत आणि महाराष्ट्रा तल्या बहुतांश जिल्ह्यांत रुग्णवाढीचे प्रमाण सप्टेंबरच्या मध्यानंतर अचानक कमी कसे होऊ लागले?

कर्नाटक आणि केरळ आणि महाराष्ट्रात विदर्भातल्या जिल्ह्यांत हे वाढते आहे किंवा इतरत्र आहे त्यापेक्षा अधिक आहे.

भारतात ग्रंथालये उघडली असं (व्हॉट्सअपवर) कळलं. इथे अमेरिकेतही लायब्ररी उघडल्या आहेत. पुस्तकं मिळत आहेत.
पण ते सेफ आहे का?
डॉक्टर, कागदी सरफेसवर हा विषाणू अनेक दिवस जिवंत राहू शकतो असं वाचलंय. मग लायब्ररीतून पुस्तकं आणावी का?
अर्थात इतर प्रॉब्लेमच्या तुलनेत हा अगदी फालतू प्रश्न आहे याची कल्पना आहे.

<strong>साद व भरत धन्यवाद व सहमती.
सनव

निर्जीव वस्तूंनमधून होणारा हा जंतुसंसर्ग अत्यंत गौण स्वरूपाचा आहे. यावर या आणि मागील धाग्यांवर भरपूर चर्चा झालेली आहे. तरीसुद्धा जर मनात भयगंड असेल तर एक सुचवतो.

ग्रंथालयाचे पुस्तक घरी वाचताना सुद्धा तोंडावर मुखपट्टी लावून ठेवा व नंतर हात धुवूनच ती काढा ! हाकानाका
Bw
( मी असे काहीही करत नाही)

लॉकडाउन मध्ये पेपर बंद केलाय तो अजूनही चालू केलेला नाही.... आता सवय मोडल्यासारखी वाटतीय म्हणजे पेपर नसला तरी काही अडत नाही!

Covid19 विषयी जी पहिली माहिती होती तीच आता पर्यंत आहे.
अजुन सुद्धा प्रसार,तीव्रता, सावधानता काय असावी ह्या विषयी नवीन काहीच माहिती नाही.
जी माहिती आहे ती अजुन पण प्राथमिक स्तरावर च आहे..
ती माहिती खरीच आहे ह्याची शास्वती नाही.

सनव,
अमेरीकेत आहत तर तुम्ही ज्या राज्यात आहात त्या राज्याची ऑनलाईन लायब्ररी सुविधा वापरा. मी बरीच वर्ष हिवाळ्यात वापरत होतेच, यावर्षी पँडेमिकमुळे पुढेही तेच सुरु ठेवलेय.

साद,
Nitric Oxide हा कोविडचा उपचार होईल का ?
>>>>>>
नायट्रिक ऑक्साईड (NO) हा वायू श्वसनाद्वारे उपचार म्हणून पूर्वीपासून वापरात आहे. ARDS यासम आजारांत जेव्हा रुग्ण तीव्र ऑक्सीजनन्यून होतात, तेव्हा तातडीचा उपचार (rescue) म्हणून त्याचे महत्त्व प्रस्थापित आहे.
कोविड संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून त्याचे रुग्णप्रयोग चालू आहेत. हा वायू जेव्हा श्वसनाद्वारे दिला जातो तेव्हा त्याचे शरीरातील गुणधर्म असे असतात :

१. फक्त फुप्फुसातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात
२. दाह प्रतिबंधक
३. रक्तगुठळी प्रतिबंधक
४. श्वासनलिकाना मोकळ्या करणे (bronchodilator)
५. त्याच्या प्रत्यक्ष सार्स-२ विषाणूविरोधी गुणधर्मबाबत अभ्यास चालू आहे.

गेल्याच महिन्यात त्याच्या उपचाराबाबत एक मर्यादित रुग्णप्रयोग गरोदर स्त्रियांवर करण्यात आला. या सर्व स्त्रियांना तीव्र कोविड झालेला होता. त्यांना कुठलेही अन्य विषाणूविरोधी औषध दिलेले नव्हते. थेट या वायूचे उपचार 22 दिवस दिले गेले. त्यातून त्यांचा श्वसनअवरोध आणि धाप खूपच सुधारले आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाणही चांगले झाले.
अजून मोठ्या प्रमाणावरील रुग्णप्रयोग (RCT) झाल्यानंतरच याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

पुढे चालू....

सर्व कोविड रुग्णांसाठी NO हा वायू उपचार म्हणून वापरण्यात मात्र काही महत्त्वाच्या अडचणी आहेत :

१. हा वायू शरीरात अत्यल्प काळ टिकतो
२. तो नाकाद्वारे देणे हे बरेच कटकटीचे काम असते
३. तो खूप महाग आहे.

येत्या काही महिन्यात याबाबतचे अधिक संशोधन होईल अशी आशा आहे. मर्यादित रुग्णवापरासाठी त्याचा विचार करता येईल.

मला वाटतं नव नवीन दावे विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध होत आहेत.
ते अपुऱ्या अभ्यासावर घाईत सनसनाटी पसरवल्या सारखे वाटत आहेत.
जे पूर्ण अभ्यासावर सिद्ध झाले आहेत असे मास्क,हात धुणे,आणि अंतर राखणे हेच उपाय खात्री चे असावेत.

औषधाचे काही इफेकट साईड इफेक्ट्स 100 वर्षानीही माहीत होतात

उदा ऍस्पिरिन हार्ट पेशन्ट ला उपायकारक आहे हे 100 वर्षांनी समजले , कृत्रिम साखर कँसरजन्य आहे हे समजायला काही वर्षे जावी लागली , 2012 ला एच आय व्ही चे एक औषध स्टॅउडीन काही विशेष साईड इफेकत मानेवर गाठी होणे सापडल्याने काढून टाकले गेले ( आताही वापरतात , अगदी दुर्मिळ केस मध्ये)

gandhi land.jpg

हा साईड इफेक्ट मिळण्या आधी कितीतरी रुग्ण कितीतरी वर्षे हे औषध घेत होते, पण हे समजायला काही दशके जावी लागली,

आणि जरी साईड इफेक्ट वाले औषध बंद केले तरी मान पूर्ववत होत नाही,

काही लोकांना ते औषध वापरून आधीच काही इतर कारणाने बंदही केले होते , वापरताना त्रास नव्हता, पण त्यानंतर काही महिन्यांनी असा त्रास उदभवला

धन्यवाद डॉक्टर.
स्वाती हो, सध्या ओव्हरड्राइव्हच चालू आहे पण एकूणच घरात सगळ्यांचा विशेषतः ज्युनियर मेंबरचा स्क्रीन टाईम खूप वाढलाय त्यामुळे पुस्तकं आणाविशी वाटतात.

रेम्सिविडिरच्या निरुपयोगितेच्या बातमीम मागे काही रॅकेट आहे असे रिपोर्ट करण्यात येत आहे.
खरे आहे का?

>>>असल्यास काही कल्पना नाही.
डब्ल्यू एच ओ ने (निरुपयोगी) जाहीर केले आहे एवढेच समजले.>>> पण आज तर आयसीएम आर ने त्यास पाठिंबा दिला आहे......

Pages