कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य

Submitted by कुमार१ on 1 August, 2020 - 00:55

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

या नव्या धाग्यावर सर्व वाचकांचे स्वागत !

एव्हाना गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर्स ,आरोग्य सेवक आणि बराच जनसंपर्क असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, ते बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. गेल्या काही महिन्यांत आपल्या माबोपरिवारातील १-२ लोकांना हा आजार गंभीर होऊन मरण आले. त्यांना भावपूर्ण आदरांजली. सध्या आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !

अन्य सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली, मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मास्क चा इतका त्रास होत नाही.होजियरी 2 किंवा 3 प्लाय चा असेल तर आपण घरी कप्रि पॅन्ट घालतो तसेच वाटते
एन95 किंवा हल्ली क्लॉथ बॅग म्हणून मिळतात मूळ प्लास्टिक च्या त्याने त्रास होतो.

तमिळनाडूमध्ये कोविड निदानासाठी फक्त RTPCR वापरतात (rapid AT नाही ). त्यांनी नुकताच या एक कोटी चाचण्यांचा टप्पा पार केला :

(https://www.thehindu.com/news/national/tamil-nadu/coronavirus-tamil-nadu...)

नाक - तोंड झाकणारे मास्क लावल्यावर त्याला अनेकदा बाहेरुन हात लावत जागेवर ठेवण्ञाची कवायत करावी लागत असेल तर आपण मास्क लावण्ञाचा उद्देशाला तिलांजली देत आहोत......

सोन्याचा मास्क!

हा खरा मास्कच्या उद्देशाला हरताळ आहे!

सवय लागलेली असते.
अनेक वर्ष मास्क हा प्रकार तोंडावर झाकण म्हणून कोणीच लावला नाही.
Dr आणि नर्स सोडून त्या मुळे बाकी लोकांना त्याची सवय नाही
तो मास्क लावला की uncomfortable होणारच.
साध्या स्त्री ला हाय हील ची चप्पल दिली तर तिची अवस्था कशी होईल तसेच आहे हे.
रोज सुटात राहणाऱ्या व्यक्ती ला धोतर दिले तर तो uncomfortable होणारच.

कोविडवरील प्रभावी औषधाचा शोध चालूच आहे. आज अखेर सुमारे तीनशे औषधांचे शास्त्रीय रुग्ण प्रयोग चालू आहेत. त्यापैकी एक रोचक असल्याने लिहितो.

या औषधाचे नाव आहे cannabidiol (CBD).
मुळात ते Cannabis sativa या वनस्पतीपासून मिळवले जाते. शुद्ध मराठीत ही आहे भांग !

Cannabis_sativa_2.jpg

या औषधाला विषाणू विरोधी आणि दाहप्रतिबंधक गुणधर्म आहेत. हे औषध विशिष्ट मेंदूविकारांसाठी याआधीच वापरात आहे.
सध्याचे त्याचे प्रयोग आता शेवटच्या टप्प्यात आहेत

कपाळ भिंतीवर धडकले की 4 गोष्टी होतात

लाल होते
सूज येते
गरम होते
दुखते
( आणि त्या भागाचे काम थांबते)

कुठेही कोणत्याहो कारणाने दाह झाला की ही 5 लक्षणे येतात , दाह म्हणजे ह्या 5 लक्षणांचा समूह

https://www.cnn.com/2020/11/03/health/covid-test-negative-contagious-wel...
हे एक वाचण्यात आले. याचा अर्थ तुम्ही गावभर फिरत असाल तर त्या निगेटिव टेस्टच्या भरोशावर आजी-आजोबांना भेटायला जाणे धोक्याचे ना? बरीच तरुणाई टेस्ट निगेटिव तेव्हा पार्टीला येणे सेफ असे ऑलरेडी करतही आहेत. ते कितपत सेफ धरावे? आता इथे महिन्याच्या अखेरीस थॅक्स गिविंग, मग ख्रिसमस निमित्ताने मुलांचे घरी परतणे, भेटी-गाठी सुरु होईल तेव्हा काय काळजी घ्यावी?

तेव्हा काय काळजी घ्यावी? >>>

नेहमीचीच.
अंतरभान, मुखपट्टी व हातस्वच्छता.
एकत्रित जमताना ५-६ लोकांची मर्यादा असावी.
आणि अजून एक......
विशेष काळजी घ्यायची आहे ती गरोदर स्त्रीची. घराबाहेरील कुठल्याही व्यक्तीने तिला जवळ जाऊन भेटणे टाळलेले उत्तम.
केवळ चाचणी नकारात्मक म्हणून कोणी सुरक्षित नाही.

BLACKCAT
धन्यवाद,

केवळ चाचणी नकारात्मक म्हणून कोणी सुरक्षित नाही. +++११ हेच अनेकजण समजत नाही,

गरम पानी व करोना, घसा, नाक ह्याबद्दल सरांनी व जाणकरांनी केलेले मार्गदर्शन ह्या बाबतीत आज लोकसत्तात अधोरेखीत झाले..

https://www.loksatta.com/mumbai-news/excessive-hot-water-and-extraction-...

केवळ चाचणी नकारात्मक म्हणून कोणी सुरक्षित नाही.>> मग जोवर vaccine येत नाही आणि त्याचे पुरेसे डोस (बहुधा vaccine चा एक डोस पुरेसा नसेल, बुस्टर डोसही घ्यावा लागेल असे वाचले) सर्वांना मिळत नाहीत तोवर हे असच चालायचं? ४-५ वर्षही लागतील सगळ्यांना लस मिळायला. तोवर हे partial lockdown चालूच रहाणार?

बहुतेक 70 % जरी टार्गेट पूर्ण झाले तरी समाजातील लोड अगदी कमी होतो , एखादं दुसरी केस राहील ती करतील हॉस्पिटलात मॅनेज

धन्यवाद डॉक्टर कुमार. ही माहिती लेकालाही देईन.
मला पण सोमवारी एक मिटिंग + पॉटलक आहे ३० जणांचे. त्याबद्दल मी फार द्विधा मनःस्थितीत होते. आता नाहीच जाणार. आमच्या इथे मास्क हा अगदीच राजकारणाचा मुद्दा होवून बसलाय. जिथे सक्ती आहे तिथे लोकं वापरतात, अगदी दारातून आत शिरता शिरता. परत बाहेर पडताना काढून खिशात ठेवतात. सोशल डिस्टंसिंगची तर ऐशी की तैशीच आहे, खूप दिवसांनी दिसलात म्हणत एकदम लव फेस्टच!

सर, माझ्या माहितीतील २ कोविड पेशंटना बरे झाल्यावर पण अजून ऍस्पिरिनची गोळी २ महिने चालू ठेवली आहे.
याचा काय उपयोग होतो ?

साद,

कोविड आणि अस्पिरीन >>>

अस्पिरीनला दाहप्रतिबंधक आणि रक्तगुठळीप्रतिबंधक असे दोन्ही गुणधर्म आहेत. सध्याच्या आजारात अनेक लोकांमध्ये रक्त गोठण्याच्या प्रक्रिया बऱ्यापैकी झालेल्या दिसून आल्या आहेत. रुग्णाचे एकंदरीत रिपोर्ट पाहून संबंधित डॉक्टर अस्पिरीनचा निर्णय घेतात. बऱ्याच प्रयोगांमध्ये असे दिसले आहे, की ज्या रुग्णांना ऍस्पिरिन चालू होती त्यांचा हा आजार नियंत्रणात राहिला व गंभीर झाला नाही. तसेच अशा एकूण रुग्णांचा मृत्यूदरही कमी राहिलेला आहे.

यावर अधिक संशोधन अभ्यास चालू आहेत.

टाटा उद्योगाने तयार केलेली ‘फेलुदा’ ही कोविड निदानाची चाचणी (RT-PCR ला समकक्ष ) आता उपलब्ध झाली आहे. तिचे वैशिष्ट्य म्हणजे 75 मिनिटात तिचा निकाल मिळतो. ती प्रयोगशाळेत करायला तुलनेने खूप सोपी आहे.
महिन्याला दहा लाख चाचण्या करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे.

बातमी
https://www.thehindu.com/news/national/tatamd-launches-new-test-for-covi...

फायझर कंपनीच्या अत्याधुनिक लशीसाठी पडद्यामागे राहून ज्यांनी काम केले ते वैज्ञानिक आहेत डॉ. उगुर साहीन व डॉ. उझ्लेम तुरेसी.

अल्प परिचय इथे :
https://www.loksatta.com/vyakhtivedh-news/dr-ugur-sahin-dr-uzlem-turesi-...

मॉडर्ना कंपनीची लस >>>>

चांगली बातमी.

या लशीचे साठवणुकीचे मुद्दे सोयीचे आहेत:
१. वाहतुकीतील व साठवणुकीतील तापमान उणे २० C लागते.
२. नंतर ते दवाखान्यात २-८ C ला ठेवता येते. ते ३० दिवस चांगले राहते.
३. एकदा फ्रीजमधून काढल्यावर १२ तासांपर्यंत ते सुयोग्य राहते.

आताच सहयाद्री वाहिनीच्या बातम्या पाहिल्या. संपूर्ण बातम्या होईपर्यंत निवेदिकेचे तोंड पूर्ण मोकळे असते. बातम्या संपताना त्या कोविड विरोधी त्रिसूत्रीचे आवाहन करतात. ते करत असतानाच त्या तोंडावर पट्टी व्यवस्थित बांधून घेतात. मगच बातम्या संपतात.

सुरेख लोकशिक्षण !
अभिनंदन !

Pages