कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य

Submitted by कुमार१ on 1 August, 2020 - 00:55

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

या नव्या धाग्यावर सर्व वाचकांचे स्वागत !

एव्हाना गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर्स ,आरोग्य सेवक आणि बराच जनसंपर्क असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, ते बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. गेल्या काही महिन्यांत आपल्या माबोपरिवारातील १-२ लोकांना हा आजार गंभीर होऊन मरण आले. त्यांना भावपूर्ण आदरांजली. सध्या आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !

अन्य सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली, मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

करोना महामारी संपेल - WHO >>>

चांगली इच्छा व्यक्त केली आहे त्यांनी.
पण अमेरिकेत मात्र अजून प्रकरण वाढतच चाललेले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांची एका दिवसाची कोविड- मृत्युसंख्या विक्रमी ३१५७ एवढी होती

हो, कॅलिफोर्निया मध्ये लॉकडाऊन सुरू झाला आहे. कॅलिफोर्निया राज्य असले तरी सर्व राष्ट्रात पाचवा नंबर लागेल इतकी मोठी इकॉनॉमी आहे. बंद करणे हा निर्णय फार विचारपूर्वक घ्यावा लागतो. त्यावरून किती लागण पसरत आहे ह्याचा अंदाज येतो. नाताळाच्या सुमारास सर्व हॉस्पिटले भरतील असा अंदाज आहे.

तज्ञहो, आता इतक्या दिवसांनी विषाणूच्या प्रसाराविषयी आणि घ्यायच्या काळजीविषयी काही ठोस माहिती कुठे उपलब्ध आहे का?
म्हणजे मास्क, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग वगैरे आहे पण तरी काही प्रश्न हे उरतातच जसे की:
रोजचे दूध, भाजीपाला वगैरे सॅनिटाईझ करुन घेण्याची गरज आहे का?
बाहेरुन आणलेले सामान, ऑनलाईन मागवलेली पार्सल्स वापरण्याआधी दोनचार तास बाल्कनीत ठेवणे पुरेसे आहे का?
कधीमधी फूड पार्सल/पिझ्झा/केक वगैरे मागवणे सेफ आहे का?
प्रवासात एखाद्या ठिकाणी (अर्थात फूडमॉल किंवा एखादे बरे रेस्टॉरंट) वगैरे थांबून खाणे ठीक आहे का?
प्रवासात टपरीवर थांबून चहा घ्यावा का?
रोजचा पेपर घ्यावा का?
कपडे बाहेर इस्त्रीला द्यावेत का?
स्वतंत्र रिक्षा/कॅबने वगैरे कितपत सुरक्षित आहे.

याची मोघम उत्तरे माहित आहेत... टाळता येईल तेव्हढे टाळावे वगैरेही कळते.
पण काही लोक या गोष्टी अगदी बिनधास्त करताना दिसतात तर काही लोक पूर्णपणे टाळताना आणि आम्ही करतो बिनधास्त आजपर्यंत काहीही झालेले नाही किंवा काळजी घेतलेली बरी यापेक्षा जास्त वेगळी किंवा शास्त्रीय स्पष्टीकरणे यापैकी कुणाहीकडून ऐकायला मिळत नाहीत.

तेंव्हा याबद्दल कुणा तज्ञ लोकांची मते किंवा ठाम शास्त्रीय स्पष्टीकरणे असल्यास इथे द्याल का?

स्वरूप, तुम्ही या कोविड धाग्यांवर बहुधा प्रथमच आले असावेत. तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्यांवर आतापर्यंत मी बरेच वेळा उत्तरे दिलेली आहेत. आपण पूर्वीचे सर्व धागे नजरेखालून घालावेत असे सुचवतो.
तूर्त मागे मी दिलेल्या एका उत्तराचा प्रतिसाद पुन्हा एकदा डकवतो :

निर्जीव वस्तूंतून होऊ शकणारा संसर्ग क्षीण आहे, हे अद्याप बऱ्याच लोकांना पटत नाही.
ठीक आहे. एक चांगला संदर्भ देतो.
https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/prevent-getting-sick/how-covid...
त्याचा सारांश :
१. जरी हा विषाणू काही पृष्ठभागांवर काही काळ टिकत असला तरी हा काही या आजाराच्या फैलावाचा मुख्य मार्ग नव्हे.
२. व्यक्ती ते व्यक्ती संपर्काशी तुलना करता वस्तूंशी संपर्क हा मुद्दा गौण आहे.
आता गम्मत काय होते पाहा.
वरील मार्ग २ अत्यंत महत्वाचा असूनही त्यात लोक चालढकल करतात, आणि मार्ग १ गौण आहे त्याचा बाऊ करत बसतात !
Submitted by कुमार१ on 29 September, 2020 - 09:06

अजून एक मुद्दा :
ह्या रोगाचा संसर्ग श्वसनमार्गाद्वारे होतो. त्यामुळे टपरी किंवा अन्य ठिकाणचे बाहेरचे खाऊन करोना २ चे जंतू पोटात जाऊन संसर्ग होणे, असे होत नाही. त्यामुळे बाहेरचे खाताना जी आपण नेहमी जी काळजी घेतो तेवढी घ्यावी. खाण्यातून कोविड होण्याचा धोका नाही.

धन्यवाद कुमार सर!
चक्कर मारलेली या धाग्यावर आधीही पण पूर्ण वाचला नव्हता.

बाय द वे ती संदर्भाची लिंक चालत नाहीये!

धन्यवाद कुमार सर ___/\___
तुम्ही सगळी माहिती सोप्या शब्दात सांगता आणि प्रत्येक शंकेचं निरसन करता। थँक्यु सो मच

निर्जीव वस्तूंद्वारा रोगप्रसार या विषयावर काही सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांची मते वाचली. त्याचा मथितार्थ असा :

१. यासंदर्भातील शास्त्रीय प्रयोग हे प्रयोगशाळेत एखाद्या वस्तूवर विषाणूंचा ‘मोठा डोस’ लावून केले जातात. सामान्य आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवत नाही. त्यामुळे प्रयोगशाळा आणि त्या बाहेरचे वास्तव यांची तुलना गैरलागू ठरते.

२. वस्तूद्वारा रोगप्रसार कसा होईल हे एका काल्पनिक उदाहरणाने बघू.

बाधित व्यक्ती एखाद्या वस्तूवर खोकली/ शिंकली >> त्या वस्तूस तासाभरात दुसऱ्याने हात लावला >> त्याने लगेच तो हात स्वतःच्या नाकातोंडाला चोळला (!) आणि त्याची प्रतिकारशक्ती पुरेशी दुबळी होती >> त्याला आजार होऊ शकेल.

सारासार विचार करता हा प्रकार म्हणजे बादरायण संबंध होय !

सारांश : सामान्य वातावरणात वस्तूस्पर्शाचा / संपर्काचा बाऊ नको.

मानव जातीचे नशीब थोर म्हणून हा corona व्हायरस बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर च होतो.
काळजी घेण्यास खूप वाव आहे.
प्लेग सारखा पिसवा पासून किंवा मच्छर पासून पसरत असता तर जगात हाहाकार माजला असता.
स्वतःचा बचाव करणे शक्यच झाले च नसते.
जग मध्य युगिन काळात गेले असते.
तेव्हा जसे साथी चे रोग आले की गाव च्या गाव नष्ट होत होती आता शहर च्या शहर नष्ट झाली असती.

भरत,
होय, ते धक्कादायक आहे.
mucormycosis मध्ये सायनसचा दाह थेट मेंदूत जाणे हे फार घातक .

कोविड उपचारांत Azithromycin बरेच वापरल्याने काही समस्या उद्भवत आहेत. त्यापैकी एक म्हणजे गनोरीआ या गुप्तरोगाचा नवा प्रकार. हा आजार नेहमीच्या औषधाला दाद देत नाही.

https://www-wionews-com.cdn.ampproject.org/v/s/www.wionews.com/world/sup...

gandhi land.jpg

2020 ला झाला
आता पुन्हा

ब्लँक कॅट
ह्यांना प्रतेक लाटेत covid झाला आहे.
का?
ह्याचा अभ्यास who नी करावा.

सर्व डोस घेवून,सर्व नियम पाळून.
आणि मी एक एक पण नियम पाळला नाही.
Mask, sanitizer कोणतेच नियम पाळले नाहीत.
माझ्या संपर्कात असणाऱ्या सर्वांना एकदा तरी covid होवून गेला..
आणि मला एकदा पण झाला नाही.
दहा वेळा टेस्ट केल्या असतील कधीच positive नाही.
शास्त्रीय कारण काय असेल?

ब्लँक कॅट
ह्यांना प्रतेक लाटेत covid झाला आहे.
का?

ते स्वतः डॉक्टर आहेत. रुगणांची सेवा करणाऱ्यांना जास्त धोका असतो.

चित्रविचित्र रिपोर्ट आहे

डेंगू एन एस 1 पॉझिटिव्ह आला आहे

कॅरडीएक एंझाइम्स वाढले आहेत

कोविड स्वब अजून रिपोर्ट बाकी आहेत

आज 2 डी करतील

Pages