शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलोचना चव्हाण .

त्या हिंदीत के सुलोचना (कदम - माहेरचे नाव) नावाने प्रसिद्ध होत्या.

दुर्दैवाने त्यांचं हे एकच हिंदी गाणं रेडियोवर ऐकायला मिळतं

त्यांची हिंदी गीते

काठा पदराची साडी, केसांत वेणी या पेहरावामुळे आणि के सुलोचना या नावामुळे एका मराठी संगीतकाराला त्या दाक्षिनात्य गायिका वाटल्या. पुढे त्याच संगीतकाराशी त्यांचं लग्न झालं. एस चव्हाण. यांनीच त्यांना लावण्या शिकवल्या.

घ्या सोपी गूढ शब्दकोडी.
स्पष्टीकरणासहीत उत्तरे अपेक्षीत.

१. नक्की रवाना हो असे म्हणत केलेल छळ. (२)
२. सूरांची झळ. (२)
३. दोन दशकात सुराभोवती या ना फिरुन सहज. (५)
४. सुस्पष्ट सुराभोवती लाल करत फिरा. (६)
५, पृथ्वी पकडा. (२)
६. भरपूर चोळ (३)
७. बरोबरीत आवड असेल तर खार झाडावर अशी चढते. (४)
८. छातीत घोडा फिरवण्याचा इलाज. (४)
९. कमीत कमी रोग कोणता हे सांगा. (३)
१०. पित्याजवळ असलेले बसण्याचे साधन. (३)

Pages