शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२. सूरांची झळ. ------ धग ( ध आणि ग हे सूर)

वरील सर्व उत्तरे बरोबर. जिथे दोन द्व्यर्थी शब्द / अर्थ दिले आहेत त्याला स्पष्टीकरण म्हणुन भरत यांनी लिहिल्या प्रमाणे श्लेष अथवा द्व्यर्थी लिहु शकता.

७. चे स्पष्टीकरण अर्धवट आहे.

१. नक्की रवाना हो असे म्हणत केलेल छळ. (२)..जाच
२. सूरांची झळ. (२)... धग
३. दोन दशकात सुराभोवती या ना फिरुन सहज. (५)
४. सुस्पष्ट सुराभोवती लाल करत फिरा.
५, पृथ्वी पकडा. (२)...धरा
६. भरपूर चोळ (३)...रगड
७. बरोबरीत आवड असेल तर खार झाडावर अशी चढते. (४)...सरसर
८. छातीत घोडा फिरवण्याचा इलाज. (४)
९. कमीत कमी रोग कोणता हे सांगा. (३)...निदान
१०. पित्याजवळ असलेले बसण्याचे साधन. (३

८ ८. छातीत घोडा फिरवण्याचा इलाज. (४)
उपचार

छाती - उर
घोडा - चाप. फिरवून -पचा
छातीत घोडा फि रवून उ(पचा)र

इलाज - उपचार

३. दोन दशकात सुराभोवती या ना फिरुन सहज. (५)
विनासायास = सहज
अ ) दोन दशकात = वि *** स
आ ) सुराभोवती = ** सा ** हा सूर
इ ) सुराभोवती या ना फिरुन = * ना सा या *
अ) + इ) = विनासायास

१० बाकडे
बा पिता , त्याच्याकडे असलेले बसायचे साधन

बरोबर! खूप छान सर्वजण!

एकच राहीलं:
४. सुस्पष्ट सुराभोवती लाल करत फिरा. (६)

घोडा
पु. १ खूर असलेला एक चतुष्पाद प्राणिविशेष. ह्याचा उपयोग ओझे वाहण्याच्या, गाडी ओढण्याच्या व बसण्याच्या कामीं करतात. ह्याच्या जाती अनेक आहेत. अरबी घोडे जग- प्रसिद्ध आहेत. लहान घोड्यास तट्टू व घोड्याच्या पोरास शिंगरूं म्हणतात. घोड्याच्या आकृतीवरून, गतीवरून, उपयोगा- वरून व लक्षणेनें हा शब्द अनेक वस्तूंस लावतात. २ बुद्धिबळाच्या खेळांतील एक मोहरा. हा सर्व बाजूंनीं दोन सरळ व एक आडवें (अडीच) घर जातो. या मोहर्‍याचा विशेष हा आहे कीं हा इतर मोहर्‍यांच्या डोक्यावरून उडून जातो, तशी गति इतर मोहर्‍यांना नसते. ३ बंदुकींतील हातोडीच्या आकराचा अव- यवविशेष. हा दाबला असतां ठिणगी उत्पन्न होते व बंदूकीचा बार उडतो; चाप.

फिरवाफिरवी
रव = सुस्पष्ट आवाज
फिरा त्या भोवती
लाल करत = चुकवत / गंडवत

फिरवाफिरवी/व नाही.
योग्य दिशा भरत

उत्तरातील प्रत्येक अक्षराचा आणि शोधसूत्रातील प्रत्येक शब्दाचा हिशेब लागला पाहिजे.
हे झाले की उत्तर चूक की बरोबर विचारायची गरज रहात नाही.

एक बदल करतो:
आणि एक दुरूस्ती. सुराभोवती सूराभोवती. इतर कोड्यांतही सूर हवे होते.

४. सुस्पष्ट सूराभोवती लाल करत फिरवा. (६)

नाही.
हिंट: हा शब्द काही दिवसांपूर्वी इतर कोड्यात आला होता, पण ६ अक्षरी नाही. त्या शब्दाबद्दल चर्चा झाली होती, त्यात तो ६ अक्षरी सुद्धा आहे असेही दिसून आले होते.

४. सुस्पष्ट सूराभोवती लाल करत फिरवा. (६)
करतलामल = सुस्पष्ट
म या सूराभोवती लाल = ला म ल
लाल करत फिरवा = आधी करत घ्या मग लाल ( पोटातल्या म सह)

बिंगो कारवी. म भोवती ’लाल करत’ ही अक्षरे फिरवायची.
सांगता छान झाली.

फिरणे, नाचणे, बिथरणे, कालवणे, विचित्र, वेगळे, चूकीचे, भलते इत्यादि इत्यादि अक्षरांची अदलाबदल दर्शवण्यास वापरतात गूढ शब्दकोड्यात.

तरी आधीपेक्षा सोपी घातलीत, काल सादनी, आज कुमार सर आणि मानवनी....
हिंटमुळे आला.... आधी लख्ख / ठसठशीत / रक्त / ताम्र / आरक्त / फिरणेचे समानार्थी असा नाच चालू होता.

चला, लालीलाल ने मजा आणली !
गूढ कोड्यांचा सर्वात मोठा फायदा असा, की ती सोडवताना गूगल नामक यंत्राचा काहीही संबंध येत नाही. पूर्णपणे आपले डोके चालवायचे !

सुर/ सूर च्या अर्थात फरक असल्याने पहिल्यांदा मी सुर ला देव धरून बघत होतो.

*तरी आधीपेक्षा सोपी घातलीत, काल सादनी, आज कुमार सर आणि मानवनी....
>>>
ठीक आहे, आता हे बारावीचे पेपर झाले . यापुढील नीट/ सीईटी चे काढायला हरकत नाही. Bw

Pages