मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
७. हो ला हो देण्यापूर्वी सूर
७. हो ला हो देण्यापूर्वी सूर घेउन वागणुक बदल (५) -
हो ला हो देणे म्हणजे मम म्हणणे . म हा सूर. यांचा संबंध आहे का?
४. सुरा >> बरोबर अतुल.
४. सुरा >> बरोबर अतुल.
हो ला हो देणे म्हणजे मम म्हणणे > इथे मम नाही.
. म हा सूर. >> वेगळा सूर हवा.
>> हमाम म्हणजे उखळ
>> हमाम म्हणजे उखळ
हे आज माहित झाले. हमाम म्हणजे साबण हे माझे ग्यान होते
अरे वा , अतुल
अरे वा , अतुल आणि भरत.
कोडे छान होते.
३. अगडबंब असून हा कायम
३. अगडबंब असून हा कायम गोंधळतो. (४)
७. हो ला हो देण्यापूर्वी सूर घेउन वागणुक बदल (५)
राहिलयं का.. धन्यवाद
राहिलयं का.. धन्यवाद
३. मदोन्मत्त
३. मदोन्मत्त
७ नागवणूक ?
७ नागवणूक ?
दोन्ही चूक
दोन्ही चूक
३. गोंधळू नका, अक्षरांचा
३. गोंधळू नका, अक्षरांचा गोंधळ घाला.
७. हो ला हो देणे या आधी पण येऊन गेलेय ते आठवा.
३ आडदांड
३ आडदांड / धटिंगण
७. सूधारगृह
७. सूधारगृह
)
(सूधार
गृह: हो ला हो देण्याचे ठिकाण
दोन्ही चूक.
दोन्ही चूक.
गोंधळणे- अक्षरपालट दर्शक आहे.
३ महाकाय
३ महाकाय
हा कायम मधल्या अक्षरांचा गोंधळ घालून
7 सा अनुनय सानुनय
7 सा अनुनय
सानुनय
७ वागणुक चा anagram + एक सूर
७ वागणुक चा anagram + एक सूर
३ महाकाय > बरोबर.
३ महाकाय > बरोबर.
7 सा अनुनय > चूक.
७ वागणुक चा anagram + एक सूर >>
इथे anagram नाही. Charade आहे.
>> हा कायम मधल्या अक्षरांचा
>> हा कायम मधल्या अक्षरांचा गोंधळ घालून
वेरी नाईस!
उत्तर शोधताना कसलाही बदल
उत्तर शोधताना कसलाही बदल करायचा नाहीय, तर त्याचा शोध घ्यायचा आहे.
हो ला हो देणे = ? ओढणे
हो ला हो देणे = ? ओढणे
री ओढणे
री ओढणे
प री ओढणे(प सूर)
परिवर्तन
बरोबर punekarp!
बरोबर punekarp!
परिवर्तन मनात काल होता पण
परिवर्तन मनात काल होता पण स्पष्टीकरण नाही आले
छान होते
ग्रेट
ग्रेट
१९९५ च्या आसपास सकाळ मध्ये
१९९५ च्या आसपास सकाळ मध्ये शब्दकोडी येत त्यात अगदी अशाच हिंट देत असत. इतक्या अवघड नव्हत्या पण प्रकार हाच.
मानव, ती शब्दकोडी तयार करणारे ते तुम्हीच तर नाहीत ना
अर्थात नाही अतुल.
अर्थात नाही अतुल.
पूर्वी मी ऑर्कुटवर द्यायचो.
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ
एकाच शब्दाचे ७ वेगळे अर्थ ओळखायचे आहेत. प्रत्येक शब्दार्थ ओळखण्यासाठी स्वतंत्र शोधसूत्र आणि अपेक्षित शब्दाची अक्षरसंख्या कंसात दिली आहे.
किमान दोन शब्दार्थ शोधल्यावर एकदम उत्तर द्या. म्हणजे परस्परसंबंध समजून येतो.
मूळ शब्द या ७ मध्ये नाही. तो सर्वात शेवटी ओळखा.
१. तुकडा (२ अक्षरी)
२. कृत्याशी निगडीत (6)
३. तब्येतीस जास्त नको (2)
४. ओढा (3)
५. समज (6)
६. सहाय्यक (5)
७. आधार (3)
१. तुकडा (२ अक्षरी) >>> भाग
१. तुकडा (२ अक्षरी) >>> भाग
३. तब्येतीस जास्त नको (2) >>> मीठ ?
४. ओढा: प्रवृत्ती / स्वारस्य?
४. ओढा: प्रवृत्ती / स्वारस्य?
१. भाग >> बरोबर.
१. भाग >> बरोबर.
३. मीठ ? >> चूक.
४. ओढा: प्रवृत्ती >> बरोबर.
Pages