शब्दखेळ (२)

Submitted by हेमंतकुमार on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३ गरगरीत
४ रीतरवेस
हे दोन बरोबर.
बाकी चूक.

५ व ६ राहिले. ( कलावंतीण मिश्रण यातून निवडणे )
..................
१ नट
२ नटनागर
३ गरगरीत
४ रीतरवेस

भरत,
छान !
दोन्ही बरोबर .
सर्वांचे छान प्रयत्न.

गूढ शब्दकोडी:

१. विषम हवामानामध्ये दिसणारा उखळ (३)
२. मोठा महिना. (२)
३. अगडबंब असून हा कायम गोंधळतो. (४)
४. मादक शस्त्र? (२)
५. चांगले अंत:करण असणारे फुल. (३)
६. दणकट हातात उलटा खण. (४)
७. हो ला हो देण्यापूर्वी सूर घेउन वागणुक बदल (५)
८. मायबोलीवरील लोकप्रीय विभाग हे आपल्या शत्रु देशाचे कार्य? (४)
९. पाण्याला कुंकू लावून लोक याने ओवळतात. (४)

९ निरांजन
नीर पाणी
ओवळण्यास वापर

७ सुरातसूर >>> चूक.

बाकी बरोबर.

९. निरंजन निर कुंकू लावणे = अनुस्वार देणे: निरं
लोक: जन

१ खळगा = उखळ
खगा -वळवाचा पाऊस
>> चूक.

खरोखरीचे विषम हवामान शोधू नका, गूढ कोडे आहे.

नाही. गज - सळई याला शस्त्र म्हणता येणार नाही.
आणि हत्तीला मादक म्हणता येणार नाही.

---------
इथे मादक हा सेवनाचा पदार्थ आहे.

१ -विषम हवामानामध्ये दिसणारा उखळ (३) - हमाम

हवामानामध्ये या शब्दा तील विषमस्थानीची अक्षरे ह मा म.

हमाम म्हणजे उखळ

१. बिंगो भरत. Happy

४. गोळी नाही. गोळी मादक नाही, त्यात काहीतरी मादक घातले तर मादक.

Pages