मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
बरोबर.
बरोबर.
धन्यवाद.
Anagram ला मराठी शब्द सुचवा. अक्षरविपर्यय?
Anagram = विपर्ययी नवशब्द, (
Anagram = विपर्ययी नवशब्द, ( भाषा अभ्यासकांच्या लेखातून )
? (वर्णपालट ) सोपा
अक्षरपालट , अजून सोपा पण स्वरचित
८. न टिकण्यार्या
८. न टिकण्यार्या बुद्धीकौशल्याभोवती संदेशवाहक फिरतो. (४)
बुद्धिकौशल्य - कला
संदेशवाहक - दूत. फिरवून तदू.
त(कला)दू - न टिकणारे
४. म्हातार्याला काठी देउन
४. म्हातार्याला काठी देउन टोपी घालून वाढ.(२)
म्हातारा - वृद्ध
काठी - काना
टोपी - वेलांटी
वृद्धी - वाढ
१. प्रथम श्रेणी आणि गुच्छ
१. प्रथम श्रेणी आणि गुच्छ देणे कठीणच. (४)
अ व घड
छान! सगळे बरोबर.
छान! सगळे बरोबर.
१. प्रथम श्रेणी आणि गुच्छ देणे कठीणच. (४) अवघड२. नवर्या मुला भोवती आले तेव्हा आटोपले. (४ )आवरले३. हो ला हो देण्यापूर्वी खाट देणारे धान्य. (३)
४.म्हातार्याला काठी देउन टोपी घालून वाढ.(२)वृद्धी५. संपत्तीच्या मागे सूर लावल्यास येणारे मरण. (३)निधन६. धिप्पाड यम हाका चुकवतो. (४)
७. पुष्कळ न बोलणारा मध्येच जोर लावतो. (४)
८. न टिकण्यार्या बुद्धीकौशल्याभोवती संदेशवाहक फिरतो. (४)तकलादू९. जळणारा कोळसा सूर मीठ घातलेला. (३)निखारा१०. कुणी इंग्रजी सून हिंदीत नाचली तर मध्येच दोन ठेवून द्या एकसारख्या. (४)
३ नाचणी किंवा नागली आहे का?
३ नाचणी किंवा नागली आहे का?
नाही.
नाही.
३ आलंय पण थांबलोय
३ आलंय
पण
थांबलोय
३ बाजरी
३ बाजरी
हो ला हो = 'री' ओढणे
खाट = बाज
बरोब्बर अवनी!
बरोब्बर अवनी!
७. मुबलक
७. मुबलक
मूक =न बोलणारा
जोर =बल
पुष्कळ= मुबलक
मस्त!
मस्त!
आता दोनच उरलेत.
१. प्रथम श्रेणी आणि गुच्छ देणे कठीणच. (४)अवघड२. नवर्या मुला भोवती आले तेव्हा आटोपले. (४ )आवरले३. हो ला हो देण्यापूर्वी खाट देणारे धान्य. (३)बाजरी४.म्हातार्याला काठी देउन टोपी घालून वाढ.(२)वृद्धी५. संपत्तीच्या मागे सूर लावल्यास येणारे मरण. (३)निधन६. धिप्पाड यम हाका चुकवतो. (४)
७. पुष्कळ न बोलणारा मध्येच जोर लावतो. (४)मुबलक.८. न टिकण्यार्या बुद्धीकौशल्याभोवती संदेशवाहक फिरतो.(४) तकलादू९. जळणारा कोळसा सूर मीठ घातलेला. (३)निखारा१०. कुणी इंग्रजी सून हिंदीत नाचली तर मध्येच दोन ठेवून द्या एकसारख्या. (४)
६. महाकाय
६.
महाकाय
यम चुकला = म **य
यामध्ये हाका
महाकाय
अरे व्वा!
अरे व्वा!
अवनी, मस्त.
कोडी नेहमीप्रमाणे छान
अरे वा अवनी, एकामागून एक
अरे वा अवनी, एकामागून एक फडशा पाडताय.
चुकवणे - अक्षरपालट दर्शक शब्द. "यम हाका" चे अक्षरपालट करुन: महाकाय - धिप्पाड.
१. प्रथम श्रेणी आणि गुच्छ देणे कठीणच. (४)अवघड२. नवर्या मुला भोवती आले तेव्हा आटोपले. (४ )आवरले३. हो ला हो देण्यापूर्वी खाट देणारे धान्य. (३)बाजरी४.म्हातार्याला काठी देउन टोपी घालून वाढ.(२)वृद्धी५. संपत्तीच्या मागे सूर लावल्यास येणारे मरण. (३)निधन६.धिप्पाड यम हाका चुकवतो. (४)महाकाय७. पुष्कळ न बोलणारा मध्येच जोर लावतो. (४)मुबलक.८. न टिकण्यार्या बुद्धीकौशल्याभोवती संदेशवाहक फिरतो.(४) तकलादू९. जळणारा कोळसा सूर मीठ घातलेला. (३)निखारा१०. कुणी इंग्रजी सून हिंदीत नाचली तर मध्येच दोन ठेवून द्या एकसारख्या. (४)
१० soon लवकर चा समानार्थी
१० soon लवकर चा समानार्थी शब्द?
१० सुनसान ?
१० सुनसान ?
दोन्ही: नाही.
दोन्ही: नाही.
याची हिंट दिली की लगेच सुटेल म्हणुन वाट बघून हिंट देइन.
10 नाचानाची ?
10 नाचानाची ?
नाही.
नाही.
नाचणे हा अक्षरपालट दर्शक शब्द आहे.
इथे इंग्रजीत गूढ कोड्यांबद्दल
इथे इंग्रजीत गूढ शब्दकोड्यांबद्दल विस्तृत माहिती आहे, कसे बनवतात, त्यांचे प्रकार (श्लेष, अक्षरपालट (anagram), अक्षरजोडणी (charade) इत्यादि), उदाहरणांसह.
१० हुबेहूब
१० हुबेहूब -- बहू, बेब, बे आहेत पण स्पष्टीकरण येत नाही
हुबेहूब बे= दोन
हुबेहूब
बे= दोन
सून= बहू
कुणी =हू
हू हु.. दोन वेळा
बरोबर!
बरोबर!
बघा पूर्ण अक्षरांंचे स्पष्टीकरण येते का.
बरोबर अवनी. दोघींनी मिळुन मारलेल्या षटकाराबरोबर कोड्याची सांगता झाली.
सगळ्यांना धन्यवाद!
१. प्रथम श्रेणी आणि गुच्छ देणे कठीणच. (४) अवघड
प्रथम श्रेणी = अ
आणि = व
गुच्छ = घड
(देणे: वाक्य पूर्ण करण्यास घेतलेला अनावश्यक शब्द)
अवघड : कठीण
२. नवर्या मुला भोवती आले तेव्हा आटोपले. (४ ) आवरले
नवरा मुलगा = वर.
त्याच्या भोवती ’आले’ = आ{वर}ले : आटोपले
(तेव्हा: वाक्य पूर्ण करण्यास घेतलेला अनावश्यक शब्द)
३ हो ला हो देण्यापूर्वी खाट देणारे धान्य. (३)
हो ला हो देणे - री ओढणे = री
खाट = बाज
(देणारे: वाक्य पूर्ण करण्यास घेतलेला अनावश्यक शब्द)
री पूर्वी बाज - बाजरी: धान्य
४.म्हातार्याला काठी देउन टोपी घालून वाढ.(२) वृद्धी
म्हातारा: वृद्ध
काठी देउन- काना : वृद्धा
टोपी घालून - वेलांटी : वृद्धी: वाढ
५. संपत्तीच्या मागे सूर लावल्यास येणारे मरण. (३) निधन
संपत्ती = धन
त्याच्या मागे सूर - नि = निधन : मरण
६. धिप्पाड यम हाका चुकवतो. (४)
चुकवतो: अक्षरपालट दर्शक शब्द
"यम हाका" चे अक्षरपालट करुन: महाकाय: धिप्पाड
७. पुष्कळ न बोलणारा मध्येच जोर लावतो. (४)
न बोलणारा = मूक
जोर = बल
मुक मध्ये बल = मु(बल)क: पुष्कळ
(लावतो: वाक्य पूर्ण करण्यास घेतलेला अनावश्यक शब्द)
(इथे मू दीर्घाचा मु र्हस्व होतो ही मुभा घेतली आहे)
८. न टिकण्यार्या बुद्धीकौशल्याभोवती संदेशवाहक फिरतो. (४) तकलादू
बुद्धीकौशल्य = कला
संदेशवाहक = दूत, फ़िरवून : तदू
कला भोवती तदू = त{कला}दू: न टिकणारे/रा/री/र्या
९. जळणारा कोळसा सूर मीठ घातलेला. (३) निखारा
सूर = नि
मीठ घतलेला = खारा, निखारा: जळणारा कोळसा
१०. कुणी इंग्रजी सून हिंदीत नाचली तर मध्येच दोन ठेवून द्या एकसारख्या. (४) हुबेहुब
कुणी इंग्रजी = who = हु
सून हिंदीत = बहु,
नाचली - अक्षरपालट दर्शक शब्द, बहु चे अक्षरपालट करुन: हुब
(तर: वाक्य पूर्ण करण्यास घेतलेला अनावश्यक शब्द)
दोन = बे
हुहुब मध्ये बे ठेवून देउन हु(बे)हुब: एकसारखा/खी/खे/ख्या
बराच वेळ नाच भोवतीच नाचत होते
बराच वेळ नाच भोवतीच नाचत होते.
क्लू मिळाल्यावर त्या 'झाडानी ' सोडलं'
छान कोडे मानव !!
छान कोडे मानव !!
नाचली - अक्षरपालट दर्शक शब्द:
नाचली - अक्षरपालट दर्शक शब्द: हुब
याचं स्पष्टीकरण द्याल का ?...
ओके....सम ज ले
मजा आ ली
नाचली - अक्षरपालट दर्शक शब्द:
नाचली - अक्षरपालट दर्शक शब्द: हुब
याचं स्पष्टीकरण द्याल का ?
बहु चे अक्षरपालट करुन: हुब
अच्छा who हु..... मी
अच्छा who हु..... मी इंग्रजी नाच आठवतेय.....
कुणी इंग्रजी // सून हिंदीत (नाचली ) // तर मध्येच दोन ठेवून द्या = एकसारख्या.
तासाभरात सुटले होते ऑल्मोस्ट....२-३ शब्दांनीच वेळ घेतला...
मस्त होते
Pages