शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.(7, व) --- वातावरण शास्त्रज्ञ >>>
हा ८ अक्षरी झाला हो.
नाय....

१. आमच्या अंगणात खूप गारा पडल्या. ( 5, तिसरे का )
२. दिवसा समुद्रावरील चमक पाहून खलाशांचे डोळे दिपले.(4, श )

३. माझ्या कोटावर बर्फाचे कण पडले.( 3, न)

६. या तंत्रामुळे सर्व हवामान केंद्रांना नकाशे वेळेत मिळतात.(9, चि )

७. या घटनेमुळे वनस्पतीत प्रकाश संश्लेषण होते.( 5, प्रा )

८. नवी दिल्लीत दुपारच्या अंधाऱ्या हवेमुळे वाहन चालवता येईना. ( 3, का ).

९. वातावरणीय आविष्कारांच्या दीर्घकालीन अभ्यासाला ....... असे म्हणतात. ( 7, वा ).

वावे,
तो वायू नको. “त्या” तिघांपैकी एक पकडा

वातावरण शास्त्रज्ञ >>>
हा ८ अक्षरी झाला हो.
नाय....

मोजलीच नाहीत
७. वातावरण तज्ज्ञ

ओके.... विज्ञ --- वातावरणाचे शास्त्र / विद्या जाणणारा म्हणून का?

८. नवी दिल्लीत दुपारच्या अंधाऱ्या हवेमुळे वाहन चालवता येईना. ( 3, का ). ----
भुरका
हवेतील धूळ / प्रदूषण कण ( suspended particulate matter) यामुळे उजेड + दृष्यमानता कमी होणे

माझा पास.

There are two types of photosynthetic processes: oxygenic photosynthesis and anoxygenic photosynthesis.
५ साठी मदत.

५ साठी मदत.
नवीन Submitted by भरत. >>>>> प्रकाश संश्लेषण म्हणजे दिवसा म्हणजे CO2 आत O2 बाहेर = anoxygenic photosynthesis

७. या घटनेमुळे वनस्पतीत प्रकाश संश्लेषण होते.( 5, प्रा ) ---- उर्जाप्राशन

भुरका >>> नाही. या शास्त्रात हा शब्द नाही. तो सामान्य शब्द आणि विशेषण आहे.
प्रयत्न करा. नाम हवे.
७ >> नाही. सूर्य महत्वाचाच.
उर्जा कुठलीही असू शकते.

प्राशन = पिणें;
हा प्राण्यांच्या संदर्भात असतो. वनस्पती ‘पित’ नाहीत.
विशिष्ट शब्द आहे त्या रासायनिक घटनेला.
वावे,
*** ऊर्जाप्रारण >>> खूप जवळ आलात.
मागचे २-३ प्रतिसाद पाहिलेत की फक्त योग्य जुळवणी करायची.

Ha shabd mahita hota.मैत्रिणीच्या मुलीचे नाव होते.तिने himakan म्हणून.सांगितले होते.आता गुगलची मदत घेतली.त्यात दंव,fog vagaire arth dile hote.

२ Bioluminescence ला मराठी शब्द का? >>
नाही म्हणता येणार. हे पदार्थविज्ञान असते.
आपला शब्द हवामानविज्ञानात येतो. ती 'नैसर्गिक चमक' अविस्मरणीय असते.

देवकी,
मिहिका >>> त्यात दंव,fog >> बरोबर.
तेच धुरातून निर्माण झालेले धुके >>> खास वेगळा शब्द आहे. तो गोड आहे, पण ते मुलीचे नाव कोणी ठेवणार नाही !

सुरवात चांगली झालीय.
आता मधल्या फळीत दमदार भागीदारी व्हायला हवी.
उद्या सकाळपर्यंत बरेचसे संपले असेल, या सदिच्छेसह
शुभरात्री !

Pages