मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
अगदी जवळ आहात
अगदी जवळ आहात
फक्त १ अक्षर सुधारुन घ्या !
धूमिका किंवा धूम्रीका.
धूमिका किंवा धूम्रीका.
धूमिका ++ छान.
धूमिका ++
छान.
आता ...
आता ...
१. आमच्या अंगणात खूप गारा पडल्या. ( 5, तिसरे का )
२. दिवसा समुद्रावरील चमक पाहून खलाशांचे डोळे दिपले.(4, श )
३. माझ्या कोटावर बर्फाचे कण पडले.( 3, न)
६. या तंत्रामुळे सर्व हवामान केंद्रांना नकाशे वेळेत मिळतात.(9, चि )९. वातावरणीय आविष्कारांच्या दीर्घकालीन अभ्यासाला ....... असे म्हणतात. ( 7, वा ).
६ मध्ये मानचित्र आहे का?
६ मध्ये मानचित्र आहे का?
वावे
वावे
६ मध्ये चित्र आहे !
योग्य दिशा...
६ XX चित्ररेखनतंत्र?
६ XX चित्ररेखनतंत्र?
हवेत गोळीबार चालू आहे माझा
नाही, तुम्हाला थोडी मदत करतो.
नाही, तुम्हाला थोडी मदत करतो.
एकेकाळी आपल्याकडील एखादा कागदावरील मजकूर किंवा चित्र आपण एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात कुठल्या तंत्राने पाठवायचो, त्या यंत्राच्या अनुषंगाने विचार करा.
Fax ?
Fax ?
दूरचित्रमुद्रणयंत्र असा काही शब्द आहे का?
मी काल रात्रीच fax ला मराठी
मी काल रात्रीच fax ला मराठी शब्द शोधण्याचा प्रयत्न केला, सापडला नाही.
दूरचित्रमुद्रणयंत्र >>> खूप
दूरचित्रमुद्रणयंत्र >>> खूप जवळ !
ठळक अक्षरानीच सुरवात.
येईल तुम्हाला ....
फॅक्स ला प्रत असे म्हणत असतील
फॅक्स ला प्रत असे म्हणत असतील..
शेवटी 'यंत्र' पेक्षा
शेवटी 'यंत्र' पेक्षा तंत्राचे नाव.
फॅक्स >>> हे २५ वर्षे जुने
फॅक्स >>> हे २५ वर्षे जुने.
यात इ-सुधारणा होत हे तंत्र आले.
दूरचित्रसंदेशतंत्र
दूरचित्रसंदेशतंत्र
नाही.
नाही.
फॅक्स चे मराठी नाव आल्यास हे सोपे जाईल.
नुसता संदेश नाही, नकाशे पाठवतात.
........................
६ साठी छान प्रयत्न.
अर्ध्या तासाने उत्तर लिहीन; त्याच्या आत तुम्ही द्यालच !
खरच सीईटी आहे.... एकही शब्द
खरच सीईटी आहे.... एकही शब्द माहीत नाही म्हणायची वेळ पुन्हा एकदा आलीये.
१. आमच्या अंगणात खूप गारा
१. आमच्या अंगणात खूप गारा पडल्या. ( 5, तिसरे का ) --- हिमीकापात
६. या तंत्रामुळे सर्व हवामान केंद्रांना नकाशे वेळेत मिळतात.(9, चि ) --- दूरचित्रालेखनतंत्र ----> दोन्ही अंदाजपंचे
कापात >>> हा शेवट बरोबर.
कापात >>> हा शेवट बरोबर. जवळ आलात.
दूरचित्रालेखनतंत्र -- >>> नाही.
सीईटीचे विद्यार्थी नक्की आहात... आगे बढो !
६. या तंत्रामुळे सर्व हवामान
६. या तंत्रामुळे सर्व हवामान केंद्रांना नकाशे वेळेत मिळतात.(9, चि ) --- दूरचित्रानुलेखतंत्र (दूरचित्र अनुलेख तंत्र)
नाही.
नाही.
'अनुलेख' चा अर्थ वेगळा आ हे.
६. या तंत्रामुळे सर्व हवामान
दूरचित्र आणि तंत्र नक्की झालेय म्हणून उरलेल्या ३ गा जा भ करतेय..... शासकीय भाषा आठवून.
६. या तंत्रामुळे सर्व हवामान केंद्रांना नकाशे वेळेत मिळतात.(9, चि ) --- दूरचित्रवहनतंत्र
१. आमच्या अंगणात खूप गारा पडल्या. ( 5, तिसरे का ) --- गुटिकापात ( गारा गोल असतात म्हणून)
गुटिकापात >>>> नाही.
गुटिकापात >>>> नाही.
...................................................................
६ = दूरचित्रपुनर्मुद्रण
(Fax = दूरमुद्रण ).
एकेकाळी वृत्तपत्रांच्या संपूर्ण पत्त्यामध्ये शेवटी दूरभाष आणि दूरमुद्रण क्रमांक हे वेगवेगळे लिहिलेले असायचे. अजूनही असतात.
ओह म्हणजे मुद्रणपण होतं तर या
ओह म्हणजे मुद्रणपण होतं तर या शब्दात!
जागा चुकली होती!
काहीही येत नसले तरी.. ज्ञानात
काहीही येत नसले तरी.. ज्ञानात खूप भर पडतेय..
अरे, तंत्र नव्हतेच नावात, नको
अरे, तंत्र नव्हतेच नावात, नको ते पकडून बसले...... तुम्ही फक्त दूरचित्र ला मान्यता दिली होती.....
२. दिवसा समुद्रावरील चमक पाहून खलाशांचे डोळे दिपले.(4, श ) ----- प्रकाशन (उजेडात उजळून निघणे या अर्थी )
प्रकाशन >>>
प्रकाशन >>>
नाही.
सूर्यकिरण जेव्हा समुद्रावर पडतात त्यासाठी हा सुंदर शब्द आहे.
त्यावर संस्कृतचा प्रभाव दिसतो.
काहीही येत नसले तरी.. ज्ञानात
काहीही येत नसले तरी.. ज्ञानात खूप भर पडतेय.. >>>>
निरीक्षण आणि प्रयत्न हे आनंद देतात आणि तेच महत्वाचे.
आपला शोधसंवाद सुरेख होयोय.
सर्वांचे प्रयत्न दाद देण्याजोगे !
काहीही येत नसले तरी.. ज्ञानात
काहीही येत नसले तरी.. ज्ञानात खूप भर पडतेय.. >>>>> + १
२. दिवसा समुद्रावरील चमक
२. दिवसा समुद्रावरील चमक पाहून खलाशांचे डोळे दिपले.(4, श ) --- अर्कत्विश ( अर्क = सूर्य, त्विश = चमकणे) पण श तिसरा नाहीये...
उत्त्वेषन/ण सुचतेय. ( उद + त्विष )
Pages