शब्दखेळ (२)

Submitted by हेमंतकुमार on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तारक
सुर वर ईश्वर वर दे तारक संजिवनी

दुर्गे दुर्घट भारी

जास्तीचे क्ल्यूज पुन्हा एकत्र देतेय ---

उंदरावरी बैसोनी येणार्‍या कैवार्‍याच्या पण २ आहेत की --->> हेही बघा कुणीतरी

सा वरून सुरू होणारा शब्द धान्य आहे
क्ल्यू धान्य आठवा (धान्य नेहमीचेच, शब्द जुना; पुरूष ही आरती म्हणण्याची शक्यता नगण्य)

संसार? >>>> >>>> नाही पण याचा समानार्थी आहे सं ने सुरू होणारा

@ नुरवी --- बरोबर

@ दुर्गे दुर्घट भारी --- आरती बरोबर पण शब्द वेगळा
तारक >>>> ता, र ही अक्षरे आहेत. क नाहीये तुम्हाला फारच जवळचा शब्द आहे भरत

पारंपरिक रचनेतील ( आरती) --- ३ अक्षरी १५ शब्द आहेत.
कशातले आहेत ते ओळखून, तो शब्द असलेली ओळ लिहायची आहे.
ळी शि म ध बि ळे
धू भ चे र न द ता वे ती
सा क सृ वि ला
का वा गो सं

( झालेले शब्द --- गोमटी, कैवारी, वामांगी, मंथन, सत्राणे, सप्तही, नुरवी)
ही अक्षरे वजा केली आहेत

शेषाचल अवतार तारक तू देवा >>>>> अरे दुसर्‍या आरतीत आहे का तारक? ही मला नाही माहिती.

तारक नाही आपल्या शब्दात

शि बि का
वा जी वा र ण शिबिका सेवक युत युवती

नाना परिमळ दुर्वा - गणपतीची आरती.
याचा अर्थ काय?

सागोळे ? (साबुदाणे) >>>>> नाही , आरतीत कुठे साबुदाणा.
क्ल्यू धान्य आठवा (धान्य नेहमीचेच, शब्द जुना; पुरूष ही आरती म्हणण्याची शक्यता नगण्य)

शि बि का >>>> बरोबर
शि बि का म्हणजे पालखी // व्यापक अर्थाने वाहनसौख्य
वाजी ( घोडा) वारण ( हत्ती) शिबिका ( पालखी) सेवक सुत युवती

विवाद
साही विवाद करिता पडिले प्रवाही

दुर्गे दुर्घट भारी

यांचाही अर्थ कळत नाही.

माबो गणेशोत्सवात आरत्यांचे अर्थ सांगणारा लेख लिहून द्या

धूताचे
साकळे
Submitted by कुमार१ >>>> नाही ..... पण ?कळे आहे

साधती, संभवे
Submitted by पोपटलाड >>>>> ना ही

जुने क्ल्यू बघा
सा वरून सुरू होणारा शब्द धान्य आहे
क्ल्यू धान्य आठवा (धान्य नेहमीचेच, शब्द जुना; पुरूष ही आरती म्हणण्याची शक्यता नगण्य)

संसार? >>>> >>>> नाही पण याचा समानार्थी आहे सं ने सुरू होणारा

पारंपरिक रचनेतील ( आरती) --- ३ अक्षरी १५ शब्द आहेत.
कशातले आहेत ते ओळखून, तो शब्द असलेली ओळ लिहायची आहे.
ळी म ध ळे सा क सृ ला
धू भ चे र न ता वे ती गो सं

( झालेले शब्द --- गोमटी, कैवारी, वामांगी, मंथन, सत्राणे, सप्तही, नुरवी, विवाद, शिबिका)
ही अक्षरे वजा केली आहेत

म ध ळे
धू भ र
न ता वे
ती क सृ
ला गो सं

नकळे. पुढचे शब्द खरंच नकळे.
नवीन Submitted by पोपटलाड. >>>> बरोबर
नो प्रॉब्लेम, त्या नैमित्तीक आरत्या आहेत, रोजच्या सरावाच्या नाहीत.

कम्प्यूटर मध्ये असा काही अल्गोरिदम असतो का? सॉर्ट सारखी कमांड दिली की अनेक उत्तरं तयार होतात.

पारंपरिक रचनेतील ( आरती) --- ३ अक्षरी १५ शब्द आहेत.
कशातले आहेत ते ओळखून, तो शब्द असलेली ओळ लिहायची आहे.
म सृ धू भ र ता ती गो सं

( झालेले शब्द --- गोमटी, कैवारी, वामांगी, मंथन, सत्राणे, सप्तही, नुरवी, विवाद, शिबिका, नकळे, साळीचे, वेधला)
ही अक्षरे वजा केली आहेत

Pages