शब्दखेळ (२)

Submitted by हेमंतकुमार on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ पोपटलाड >>> कोडे परिवारात स्वागत
वामांगी ---- बरोबर पण स्रोत चुकला

अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा आहे ते.... वामांगी नाही

साकार >>> नाही पण सा वरून सुरूवात आहे... क्ल्यू धान्य आठवा
सप्तक --- नाही पण जवळ आहे ==== सप्त?

राधा गवळण करिते मंथन?
Submitted by मानव >>>> तसे बरोबर पण .....

पारंपरिक रचनेतील म्हणजे आरती घेऊ या.
नाहीतर शब्द नाही जुळणार. मी आरती मधून घेतलेत.

ठीक आहे.
राधा गवळण करिते मंथन घेऊ या म्हणजे अक्षरे तरी कमी होतील शोधायची.
अपेक्षित स्रोत --- शंकराची आरती --- देवी दैत्यी सागर मंथन पै केले

आरत्या असतील तर जास्त जणांना भाग घेता येईल, माहिती असतात जनरली, म्हणून सोपे वाटून रचले होते.
खूप जणांना हा टाईप नको असेल तर सांगा काढून टाकते. दुसरं कोडं देता येईल सोयीचे......

स्त्रोत सांगणे अवघड
पण इतरांना येत असतील ना! सोडवतील, >>>>
नेहमीच्या अग्रक्रमाने म्हटल्या जाणार्‍या ५-६ पैकीच आहेत. २-३ क्वचित / नैमित्तीक म्हटल्या जाणार्‍या आरत्या आहेत.
भाप्रवे २ वाजेपर्यंत बघते काय रिस्पॉन्स ते, नाहीतर दुसरे कोडे सुरू करू कोणाचे तयार असेल तर.....

वामांगी रखुमाई >>> बरोबर
वरच्या आरतीतलाच कैवारी ---- गरूडावरून येतो
उंदरावरी बैसोनी कैवारी आला
स्त्रोत --- आरती विठ्ठलाची -- गरूडावरी बैसोनी माझा कैवारी आला

उंदरावरी बैसोनी येणार्‍या कैवार्‍याच्या पण २ आहेत.

पारंपरिक रचनेतील ( आरती) --- ३ अक्षरी १५ शब्द आहेत.
कशातले आहेत ते ओळखून, तो शब्द असलेली ओळ लिहायची आहे.
ळी शि म ध बि ळे वी
धू भ चे र न द ता वे ती
सा क सृ वि र ला
का वा गो नु सं

( झालेले शब्द --- गोमटी, कैवारी, वामांगी, मंथन, सत्राणे, सप्तही)
ही अक्षरे वजा केली आहेत

@ कुमार सर,
साकार >>> नाही पण सा वरून सुरूवात आहे... क्ल्यू धान्य आठवा
(धान्य नेहमीचेच, शब्द जुना; पण ही आरती तुम्ही म्हणण्याची शक्यता नगण्य)
सप्तक --- नाही पण जवळ आहे ==== सप्त?

@ मानव -- संसार >>>> नाही पण याचा समानार्थी आहे सं ने सुरू होणारा

@ पोपटलाड
वामांगी रखुमाई काही केल्या आठवेना, >>> Happy निसटते कधी तरी स्मरणातून
सादर? >>> नाही पण सा वरून सुरूवात आहे...
क्ल्यू धान्य आठवा (धान्य नेहमीचेच, शब्द जुना; पुरूष ही आरती म्हणण्याची शक्यता नगण्य)

संसार? >>>> >>>> नाही पण याचा समानार्थी आहे सं ने सुरू होणारा

सत्राणे - सत्राणे उड्डाणे असे काही तरी हनुमान स्तोत्रात आहे बुवा. >>>>>
बरोबर
हनुमान आरती --- सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी | करी डळमळ भूमंडळ सिंधु जळ गगनी

सवाही >>>>> नाही
साधणे >>>>> नाही
सा वरून सुरू होणारा शब्द धान्य आहे
क्ल्यू धान्य आठवा (धान्य नेहमीचेच, शब्द जुना; पुरूष ही आरती म्हणण्याची शक्यता नगण्य)

सप्तम ? >>> नाही
सवाही >>> नाही
पण दोन्ही मिळून आहे

सकला, भरती, मधूर ..
माझा पास. फार अवघड आहे.

सप्तही
नवीन Submitted by कुमार१ >>> बरोबर
आरती दशावताराची --- मत्स्यरूपी नारायण सप्तही सागर धुंडीसी

सकला, भरती, मधूर .. >>>> यापैकी नाही
माझा पास. फार अवघड आहे. >>>>> अक्षरे कमी होतायत... बघा नंतर वाटल्यास

उंदरावरी बैसोनी येणार्‍या कैवार्‍याच्या पण २ आहेत की --->> हेही बघा कुणीतरी

Pages