मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
सशाचे डोळे गुंजांसारखे लाल
सशाचे डोळे गुंजांसारखे लाल असतात.
>>>
टाईप करेपर्यंत उत्तर आले देखील.
७.पानसुपारी?
७.पानसुपारी?
Submitted by देवकी >>>> पान बरोबर, दिशा बरोबर, ४ अक्षरी
Submitted by पाथफाईंडर >>>> एक्स्पर्ट झालेत सगळे. काही नाही उरत फार वेळ. ७ अर्धे आणि ३ राहिलेय फक्त
७.पानदान?
७.पानदान?
७.पानदान >>>>>> बरोबर
७.पानदान >>>>>> बरोबर
३ राहिले अजून सोप्या रूपात
३. प्रचंड -- पाण्यात (डोके // झाडाचे उंच // आकाशात पाय)
पाण्यात उंच झाड उलटे पडलेले
७ पिकदाणी?
३ डोके आणि झाडाचे उंच - शेंडा
झाडाचे भाग नका घेऊ. पूर्ण
झाडाचे भाग नका घेऊ. पूर्ण पाडा त्याला
ताडमाड?
ताडमाड?
पाणी कुठे?
३. प्रचंड -- पाण्यात (डोके // झाडाचे उंच // आकाशात पाय)
पाण्यात उंच झाड उलटे पडलेले
पाणी कुठे?
हो पाणी राहिलंच की!
हो पाणी राहिलंच की!
डमा बरोबर आहे का?
आडमाप
आडमाप
पाणी = आप
त्यात माड उलटवून आ(डमा<)प , प्रचंड
हो
हो
बरोबर
दोघांनाही
आडमाप बरोबर असणारे!
आडमाप बरोबर असणारे!
मजा आली कारवी!
छान होते.
छान होते.
नव्यापैकी कोणी देणार असल्यास प्राधान्य. सांगा तसे.
अन्यथा भाप्र वे १७३० ला मी देऊ शकतो
चला..... कोडे खप्पा....
चला..... कोडे खप्पा....
मला पण मजा आली क्ल्यू द्यायला.
अर्थ लावताना विसंगत / गोंधळात टाकणारे वाटले असे काही होते का?
म्हणजे पुढच्या वेळी सुधारता येईल. हे पहिल्यांदाच केले.
२. आणि ७. चे स्पष्टीकरण
२. आणि ७. चे स्पष्टीकरण कळले नाही. टकमक चा अर्थ अनवस्था प्रसंग असाही आहे का?
७. मध्ये 'नावात' आणि अंगभर लेणे याचा अर्थ लागला नाही.
नाउमेद ऐवजी नाउमेदी असायला
नाउमेद ऐवजी नाउमेदी असायला हवे होते असे वाटते.
बाकी हे कोडे व इतर चांगली रचली.
२. 'इथून' 'असे' पाहताना तोल
२. 'इथून' 'असे' पाहताना तोल गेला तर अनवस्था प्रसंगच
'असे' पाहताना -- टकमक पहाणे
'इथून' पाहताना -- टकमक टोक ( रायगड)
म्हणून तोल गेला तर अनवस्था प्रसंग. Anurag नी कडेलोट लिहीले तेव्हा म्हणाले देखील की जवळ आलात.
७. नावात हिरवे देणे राजस खातिरदारीचे अंगभर लेणे
नावात - उत्तरात
हिरवे देणे -- पान
देणे -- दान
राजस खातिरदारी -- पानसुपारी / विडे
राजस खातिरदारीचे अंगभर लेणे --- उत्तरात = पानदानात = तबकात एकत्र सजवून ठेवलेली पानसुपारी / विड्याचे साहित्य. पानदान फिरवतात मग जो तो आपल्या आवडीचे पदार्थ कमी जास्त घालून पसंतीचा विडा बनवून घेतात.
४, नाउमेद करणे / विरजण घालणे यात्ले क्रियापद टाळून वाक्य रचताना चूक झाली. कळत होते पण कसे बदलू ते सुचले नाही..
अच्छा टकमक टोक हे जागेचे नाव
अच्छा टकमक टोक हे जागेचे नाव आहे माहीत नव्हते.
छान, मजा आली. अजून कोडी देत रहा.
रायगडावरची कडेलोटाच्या
रायगडावरची कडेलोटाच्या शिक्षेची जागा
सीईटीच्या परीक्षेत स्वागत !
सीईटीच्या परीक्षेत स्वागत !
विषय: हवामानशास्त्र.
खाली ९ अर्थपूर्ण वाक्ये दिली आहेत. प्रत्येकातील एकदोन शब्द ठळक केले आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही संपूर्ण वाक्याचा मथितार्थ एकाच मराठी शास्त्रीय शब्दात सांगायचा आहे.
ओळखायच्या शब्दाची अक्षरसंख्या आणि तिसरे अक्षर कंसात दिले आहे .
...................................
१. आमच्या अंगणात खूप गारा पडल्या. ( 5, तिसरे का )
२. समुद्रावरील चमक पाहून खलाशांचे डोळे दिपले.(4, श )
३. माझ्या कोटावर बर्फाचे कण पडले.( 3, न)
४. त्या वाऱ्यांचा वेग प्रचंड होता.( 4, ज)
५. हे गृहस्थ हवामानाचे अभ्यासक आहेत .(7, व)
६. या तंत्रामुळे सर्व हवामान केंद्रांना नकाशे वेळेत मिळतात.(9, चि )
७. या घटनेमुळे वनस्पतीत प्रकाश संश्लेषण होते.( 5, प्रा )
८. नवी दिल्लीत दुपारच्या अंधाऱ्या हवेमुळे वाहन चालवता येईना. ( 3, का ).
९. वातावरणीय आविष्कारांच्या दीर्घकालीन अभ्यासाला ....... असे म्हणतात. ( 7, वा ).
8. शेवट ‘के’ चे माहित आहे.
8. शेवट ‘के’ चे माहित आहे.
का बरोबर आहे ??
Paas
Paas
धुरके वाटले होते पण का मुळे
धुरके वाटले होते पण का मुळे कळत नाही
७. साठी हरितद्रव्य आणि स्वयंपोषित वर गाडी अडलीये.
साद,
साद, अस्मिता
होय. * * का असेच आहे.
योग्य दिशा
समानार्थी शोधा.
४. त्या वाऱ्यांचा वेग प्रचंड
४. त्या वाऱ्यांचा वेग प्रचंड होता.( 4, ज) --- प्रभंजन
( 4, ज) --- प्रभंजन >>>++
( 4, ज) --- प्रभंजन >>>++ (वृत्तपत्रांच्या कोड्यातील नेहमीचा शब्द.)
सुंदर !
खाता खोला !
Va Karavi!
Va Karavi!
७. साठी हरितद्रव्य आणि
७. साठी हरितद्रव्य आणि स्वयंपोषित वर गाडी अडलीये. >>>
वातावरणातून वनस्पतीला काय मिळालेच पाहिजे ? त्या दिशेने ...
देवकी
देवकी
)
६ प्रयत्न करा. येईल.
(आज सीईटी आहे ...
५. हे गृहस्थ हवामानाचे
५. हे गृहस्थ हवामानाचे अभ्यासक आहेत .(7, व) --- वातावरण शास्त्रज्ञ
७. या घटनेमुळे वनस्पतीत प्रकाश संश्लेषण होते.( 5, प्रा ) --- तेज/सूर्य/ऊन प्राशन ---- तुक्का मारलाय..
Pages