शब्दखेळ (२)

Submitted by कुमार१ on 31 July, 2020 - 05:17

मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................

विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या

खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.

सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )

२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )

३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )

४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )

५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .

६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).

७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).

८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).

९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )

10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..

येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१० गुलाब
हाक या नावाने
फूल आले कपड्यावर

५. कधीतरीच येऊनशी मधोमध पावसाळी कणसं साफ करतू

पावसाळी कणसे : मके
साफ कर = धू
तू.
धू तू च्या मधोमध मके: धूमकेतू. कधीतरीच येतो.

मला ८ आले असे वाटले होते - घडाघडा - पण ते वाचा आहे, बोला नाही म्हणजे हे उत्तर नाही.

@ कुमार सर
1 नंदादीप ? >>>> नाही .... प्रि-जाळ आयटम आहे
१० गुलाब >>>> नाही .... पण दिशा बरोबर

@ मानव
५. धूमकेतू. कधीतरीच येतो.
मला ८ आले असे वाटले होते - घडाघडा >>>> दोन्ही बरोबर.
घडाघडा = अस्खलित, पाठांतरासाठी वापरतात. वाचनासाठी नाही चालणार का? मग माझे क्रियापद चुकले... सॉरी.

१ गारगोटी
Submitted by भरत.>>>>> बरोबर.... स्पष्टीकरण ?......येतंय की....अजून बघा

३. प्रचंड पाण्यात डोके झाडाचे उंच आकाशात पाय

५. कधीतरीच येऊनशी मधोमध पावसाळी कणसं साफ करतू

७. नावात देणे राजस खातिरदारीचे अंगभर लेणे
८. घागरीवर घागर रचून निरंतर वाचा
९. बियांची हलकीशी भुणभुण

गोटी-गोल
कमी तापमान - गार

गारगोटी घासून ठिणगी म्हणजे जाळ्याचा उगम

२.टकमक >>>> बरोबर देवकी

गारगोटी >>>> स्पष्टीकरण बरोबर.

@ पायस.... स्वागत..
१०. गाजर? गाज - हाक आणि जर कपडा या अर्थाने >>>> चूक.
गाज = आवाज ( खवळलेल्या समुद्राचा वगैरे) ? हाक नव्हे ना?
जर = कपडा अपेक्षित नाही.
विशेषनाम आहे. कपड्याला हाक मारा.... फूल हजेरी लावेल

@ कुमार सर
३ जलपर्णी >>>> नाही .......इतके नाजूक काम नाहीये.... उत्तर पण आणि पाण्यात पडलेले झाड पण
१० कमळ वा कमल >>>>> नाही

१०. धोतरा >>>> बरोबर मानव

शिल्लक कोडी . सगळी ४ अक्षरी. कृपया, स्पष्टीकरणासहित उत्तरे द्या

५. कधीतरीच येऊनशी मधोमध पावसाळी कणसं साफ करतू
८. घागरीवर घागर रचून निरंतर वाचा
१०. कपड्याला मारली हाक नि फूल म्हणाले 'हजर'
( सर्वत्र क्ल्यू वाढवलाय)
३. प्रचंड -- पाण्यात (डोके // झाडाचे उंच // आकाशात पाय)
७. नावात ((हिरवे) (देणे)) -- राजस खातिरदारीचे अंगभर लेणे
९. बियांची हलकीशी भुणभुण ( ससा // कीटक)

७ पानोपानी ?
हिरवे पान
खातीरदार चे पान

९ तुरतुर / तुरुतुरु

@ श्रवु --- ३ ७ ९ --- पैकी काय आरस्पानी? स्पष्टीकरण?
पण ३ ७ ९ चे हे उत्तर नाहीये..... Happy सोपी कोडी सपल्यावर आलात. ९ बघा.

@ Submitted by कुमार१ ----
७ पानोपानी ? >>>> नाही
हिरवे पान
खातीरदार चे पान
९ तुरतुर / तुरुतुरु >>>>> नाही..... पळू नका.... बियांच्या आवाजाशीच रहा. बिया कुठल्या ? कीटक कुठला?

हिरवे पान >>> अंशतः बरोबर.
अजून काय आहे नावात? सगळे कंस / उपकंस बघा
खातिरदारी / आगतस्वागत कशाने करतात?

९ गुंजारव? ( बिया - गुंजा, भुणभुण- रव)
सशाचं काय ते कळत नाही.>>>> शब्द बरोबर असावा.सशाचे डोळे लाल म्हणून( गुंजेसारखे)

प्रयत्न करतोय पण येत नाहीये.
Submitted by मानव पृथ्वीकर >>>> तुम्ही त्या झाडाला बाहेर काढा.... सकाळपासून बिचारे उलटं पड्लंय पाण्यात.

९ गुंजारव? ( बिया - गुंजा, भुणभुण- रव)
सशाचं काय ते कळत नाही.
नवीन Submitted by वावे >>>> बरोबर !!..... (कसल्या बिया ते कळायला जास्तीचा क्ल्यू होता ससा कोड्याचा भाग नव्हता)

Pages