देणं सीझन २ – (अंतिम)भाग १०

Submitted by jpradnya on 25 May, 2020 - 15:21

देणं सीझन २ – भाग १
https://www.maayboli.com/node/73996
देणं सीझन २ – भाग २
https://www.maayboli.com/node/74043
देणं सीझन २ – भाग 3
https://www.maayboli.com/node/74080
देणं सीझन २ – भाग ४
https://www.maayboli.com/node/74117
देणं सीझन २ – भाग ५
https://www.maayboli.com/node/74153
देणं सीझन २ – भाग ६
https://www.maayboli.com/node/74194
देणं सीझन २ – भाग ७
https://www.maayboli.com/node/74308
देणं सीझन २ – भाग ८
https://www.maayboli.com/node/74407
देणं सीझन २ – भाग ९
https://www.maayboli.com/node/74625
आता पुढे..
देणं सीझन २ – (अंतिम)भाग १०
“नॉट ईवन अ सिंगल ग्लास? हाऊ कम? ” के एल ने आश्चर्याने विचारलं
“नको अजिबात नको. डोन्ट फील लाइक इट.“
“आय सी !” यश च्या नकारातून के एल बरंच काही समजून गेले. एका महत्त्वाच्या कॉंट्रॅक्ट संबंधी चर्चा करण्यासाठी यश म्हात्रे हाऊसला आला होता. चर्चा वॉज ओवर ड्रिंक्स अँड डिनर. पण पहिल्यांदाच यशने एकही ड्रिंक घ्यायला नकार दिला आणि तो ही ठामपणे.
“सो हाऊ इज द किड डूइंग? व्हॉट इज हिज नेम? आदित्य? “ स्वतःच्या व्हिस्कि चा घोंट शांतपणे घेत के एल ने विषयाला हात घातला
“ही इज डूइंग गुड. क्रिकेट पण छान खेळायला लागलाय. आय टेक हिम टु शिवाजी पार्क फॉर द ट्रेनिंग. आणि तिथेच मी सुद्धा हात साफ करून घेतो. गुड स्टफ” स्वतःशीच खूश होत यश म्हणाला
“त्याच्या बॉम्बे स्कॉटिश मध्ये अॅडमिशनसाठी जॅक लावला होता मी त्याचं काय झालं पुढे?”
“दीप्तीला नको होतं बॉम्बे स्कॉटिश. म्हणे टू मच हायफाय आहे. फिल्मस्टार्स च्या मुलांबरोबर शिकायचं नाही आदी नी. .. काहीतरी विचित्र कन्सेप्टस् घेऊन बसली आहे ...” पटकन यशचं हसू मावळून गेलं
“हम्म ... “ वाटलंच मला हे पुढलं वाक्य गिळत केएल म्हणाले
“आणि हाऊ अबाऊट यू बोथ? हाऊ इज द लिविंग इन कमिंग अलॉन्ग?”
“आपण कॉंट्रॅक्ट बद्दल बोलूया का के एल? आय अॅम मोअर इंटेरेसटेड इन दॅट.”
“कॉंट्रॅक्ट बद्दल आपण ऑफिस मध्ये सुद्धा बोलू शकलो असतो यश. तुला इथे मी पर्सनल गोष्टी बोलायला बोलावलं आहे. ”
“तुम्ही कधीपासून माझ्या पर्सनल गोष्टींमध्ये लक्ष घालायला लागलात?” यशचा स्वर जरा बोचणाराच होता
“मागच्या वर्षीपासून. व्हेन थिंग्ज गॉट सिरियस बिटविन यू अँड दीप्ती” न चिडता के एल म्हणाले
“आय प्रेफर नॉट टु टॉक अबाऊट इट”
“आय नो दॅट. वी मेन नेवर वॉन्ट टु टॉक अबाऊट सच थिंग्ज. वी फील इट्स ं साइन ऑफ वीकनेस ईफ वी डू सो. “
“के एल ..” यश ला हातानेच थांबवत के एल पुढे बोलू लागले
“मी तुला आज माझ्याबद्दल काही सांगणार आहे. आय अॅम गोइंग टु ब्रेक द आइस टूडे. ऐकशील थोडं?”
“शुअर ..?” ह्या संभाषणाचा रोख यश च्या लक्षात आला नव्हता
“फ्रेनी कावसवाला. तिचं नाव.”
“तिचं?”
“द लव ऑफ माय लाईफ”
“मी समजलो नाही..” यश ला काहीच कळेना
“मी ग्रॅजुएट झाल्यावर आपल्या कंपनी मध्ये जॉइन झालो तेव्हा तुझ्या पणजोबांची नवीन सेक्रेटरी मला सुद्धा पार्टली मदत करत असे. ओह शी वॉज ब्यूटीफूल, स्मार्ट, डॅशिंग, वेल रेड. त्या ही काळात ड्राइव करणारी एकंच पोरगी आमच्या ऑफिस मध्ये होती. यू कॅन् इमाजिन अश्या मुलीच्या प्रेमात मी आणि इतर असंख्य जण त्यावेळी पडले नाहीत तरंच नवंल. शी वॉज अ गर्ल ऑफ माय ड्रीम्स “ के एल भूतकाळात रममाण झाले होते.
“धिस इज इंट्रेस्टिंग ..” यशला धक्काच होता हा.
“नॉट एक्साकटली व्हॉट बिकेम ऑफ इट. त्या काळात .. आय अॅम टॉकिंग अबाऊट नाईनटीन फिफ्टीस... प्रेम विवाह म्हणजेच मोठं पाप होतं. आणि त्यातून पारसी मुलीशी .. केवळ अशक्य.”
“ओह .. हम्म “ यश ला पुढची कल्पना आली
“तर माझं लग्न जबरदस्तीने आपल्याच धर्माच्या जातीच्या सोशल स्टेटसच्या आणि ओळखीच्या फॅमिली मधून असलेल्या तुझ्या आजीशी लावून दिलं गेलं. मी त्यावेळी फार दुबळा होतो. घर सोडून जाण्याची, कुटुंबातून बेदाखल करण्याची तुझ्या पणजोबांची धमकी मला घाबरवून गेली. त्यातून तुझ्या आजीच्या फॅमिलीने प्रचंड हुंडा दिला जो आपल्या बिझनेसला गरजेचाच होता“
“आणि फ्रेनी? “
“फ्रेनी लेफ्ट मुंबई फॉरेवेर द डे आय गॉट मॅरीड. मला तिचं पुढे काय झालं काहीच माहीत नव्हतं. पांच वर्षांपूर्वी एक पत्र आलं. त्यात शेवटपर्यंत अविवाहित राहिलेल्या फ्रेनीची इस्टेट तिने माझ्या नावावर केली होती. डेहराडूनला तिने एकटीच्या जिवावर स्वतःचं फार्महाऊस वाढवून अत्यंत यशस्वी अशी कॉटेज इंडस्ट्री उभी केली होती. त्या दिवशी माझ्या मनाची काय अवस्था झाली ते मी वर्णन करू शकत नाही “
“आय हॅड नो आयडिया”
“डोन्ट गेट मी रॉन्ग. आय वॉज नेवर अनफेथफुल टु कावेरी. बट आय कुड नेवर लव्ह हर. नेवर रीयलि कनेक्ट विथ हर. तिला मी देऊन सुद्धा स्वातंत्र्य नको होतं. मी संधी द्यायला उत्सुक होतो पण तिने घराबाहेर पडण्याची हिम्मतच केली नाही कधी. सौ. कमलाकर म्हात्रे हीच ओळख तिला हवी होती. चूल आणि मूल सोडून तिला साधा पेपर वाचवा असं ही कधी वाटलं नाही. मुलं झाल्यानंतर तर फक्त कर्तव्य म्हणून ती माझी सहचारिणी होती. तो काळही तसाच होता पण तिच्या पाठीशी मी खंबीर पणे उभा राहायला तयार असताना तिने मात्र तिचं विश्व वाढवायचा साधा प्रयत्न सुद्धा केला नाही.सहवासातून निर्माण होणारी एकमेकांची सवय सोडून आमच्या दोघांमध्ये काहीही नातं नव्हतं. माझं संसारातून लक्षच उडालं आणि मी कामालाच वाहून घेतलं. पुन्हा कधी घराशी नातंच निर्माण झालं नाही. नंतर पुढे तुझ्या बाबाने तुझ्या आईशी प्रेमविवाह करण्याचं ठरवलं तेव्हा मी कावेरी आणि इतर सर्वांशी भांडून त्याला पूर्ण पाठिंबा आणि स्वातंत्र्य दिलं. आपल्या घराचा दबाव त्यांच्यावर पडू नये म्हणून लग्नानंतर ताबडतोप वेगळा घरोबा करून दिला. सुधीर आणि नलिनी चा अवघा ३ वर्षांचा संसार मी मनापासून एंजॉय केला. नलिनीने सुद्धा माझ्या पाठिंब्याची कदर करून मला माया लावली. अँड देन द रेस्ट इज हिस्टरी.”
काहीही ना बोलता यश के एल चं मनोगत एकाग्रतेने ऐकत होता. आयुष्यात पहिल्यांदाच के एल त्याच्याशी असे मन मोकळे करत होते. का ते त्याला कळत नव्हतं पण कुठेतरी हरवलेला एक सूक्ष्म धागा सापडल्यासारखा वाटत होता
“माझ्या हातून खूप चुका झाल्या आहेत यश. तुला इतक्या लहान वयात दूर करणं. तुझ्याशी कधी संवाद साधण्याचा प्रयत्न न करणं. तुझा आई बाप होता आलं नाही तरी तुझा आजोबा होण्याचा प्रयत्न न करणं. आपला अहंकार बाजूला ठेवून इतर नातेवाईकांशी संबंध जोडून तुला कुटुंब व्यवस्थेशी थोडीतरी तोंडओळख करून न देणं. तुझ्या पैशाच्या वापरावर अंकुश न ठेवणं. ह्या सगळ्या गोष्टी कळून सुद्धा त्याकडे काणा डोळा करणं असे कित्येक गुन्हे माझ्या नावावर आहेत. त्याची शिक्षा मला मिळते आहे आणि पुढेही मिळेल. पण आज निदान मला तुझी माफी मागून एक कर्ज चुकवू दे बाळा ..”
कधी नव्हे ते के एल भावनाविवंश झाले होते आणि ही व्हिस्कीच्या पेगची करामत नव्हती निश्चित. पटकन उठून यश के एल च्या मागे गेला आणि त्यांच्या खांद्यावर हलकेच थोपटू लागला
“इट्स ओके के एल. इतकं लोड नका घेऊ तुम्ही. यू डिड यॉर बेस्ट. “
दोन मिनीटांमद्धे केएल शांत झाले आणि म्हणाले
“आता तू विचारशील की मी ही सगळं आत्ताच तुला का सांगतो आहे. बरोबर ना ?”
हसून यश ने मान डोलावली
“एकतर तू आता तेवढा मोठा झाला आहेस की माझी बाजू एका मॅच्युरिटी ने ऐकू शकशील. आणि दुसरं म्हणजे त्यातून तुला तुझ्या आयुष्यातले चॅलेंजेस हॅंडल करायला कदाचित काही कयूस मिळतील...
“म्हणजे ? “
“तुला येत्या २-३ महिन्यांमध्ये जो निर्णय घ्यायचा आहे तो सोपा नाहीये यश. मला पूर्ण कल्पना आहे. आय अॅम प्राउड ऑफ यू फॉर स्टँडिंग फर्मली बिहाइंड दॅट पूर चाइल्ड. व्हॉट आय सेड अर्लियर इज नॉट समथिंग दॅट आय मीन ट्रूली. “
“आय अॅम सर्प्राइजड अँड ग्लॅड टु हियर दॅट..” आज यशला खरंच धककयांवर धक्के मिळत होते
“बट आय अॅम नॉट ग्लॅड टु सेन्स दॅट इट इज नॉट गोइंग वेल.. अॅम आय राइट ऑर अॅम आय राइट?”
“आय डोन्ट नो व्हॉट टु से अबाऊट इट के एल “
“मला माहितीए बेटा. ह्या गोष्टी एखाद्या बिझनेस डीलपेक्षा किंवा कॉंट्रॅक्ट नेगोसीएशन्स पेक्षा खूप जास्त कॉम्प्लेक्स असतात. मी तुला कोणत्याही बाजूला झुकून सल्ला देणार नाहीये. फक्त माझ्या चुकांमधून मला समजलेले काही फंडामेंटल्स तुझ्याशी शेअर करणार आहे. आत्तापर्यन्त कधीही तुझ्या आयुष्यात दखल दिली नाही पण आत्ता तुला कुणाची तरी गरज आहे असं मला जाणवतं आहे सो मी आता मागे हटणार नाहीये. “
“थॅंक्स के एल” थकलेल्या सुरात यश म्हणाला. आत्ता खरंच त्याला गरज होती एका अनुभवी सलल्याची. त्याचं काय चुकतं आहे हेच त्याला कळत नव्हतं पण काहीतरी मोठी दानं चुकीची पडत होती हे निश्चित.
वर्ष पूर्ण व्हायला काहीच महीने बाकी होते आणि सुषमाताईंशी झालेल्या अलिखित करारानुसार दीप्ती आणि यश वेगळ्या वाटांनी जायचे संकेत जास्त दिसत होते. एकीकडे आदीची ओढ स्वस्थ बसू देत नव्हती आणि एकीकडे दीप्तीशी पटत नव्हतं. कित्येकदा तिचं म्हणणं पटत असलं तरी तिचा अधिकारी स्वभाव सहन होत नव्हता. तिच्या विषयी असणारा आदर तिने केलेल्या अपमानांमुळे कमी कमी हॉट होता. आणि कितीही नाही म्हटलं तरी आशुतोष बद्दल वाटणारी इनसेकयूरिटी वाढत चालली होती.
“मागे वळून पाहताना असं वाटतं की मी त्या वेळी हिम्मत करून फ्रेनीशी लग्न केलं असतं तर पुढचं सगळं आयुष्य कदाचित खूप अर्थपूर्ण, परिपूर्ण झालं असतं. माय रिग्रेट इज दॅट आय डिड नॉट फाईट फॉर व्हॉट आय वॉन्टेड. फ्रेनी आणि माझ्या मध्ये कदाचित प्रचंड इगो टस्स्ल्स झाली असती कारण शी वॉज नॉट अ येस वुमन. आय हॅड अ येस वुमन अॅट माय होम अँड ट्रस्ट मी व्हेन आय से धिस दॅट इट वॉज नो फन. आय मिस्सड एनी इंटेलेक्चुवल कॉन्वरसेशन, आय मिस्सड द सपोर्ट फ्रॉम होम फ्रंट ड्यूरिंग बिझनेस क्रायसिस. आय मिस्सड कॉमपॅनियनशिप. नुसता कर्तव्य म्हणून मी संसार केला. नाही सुख दिलं...नाही सुख घेतलं. कावेरी सुद्धा कदाचित दुसऱ्या एखाद्या अश्या माणसाची सहचारिणी झाली असती की तिच्या घरेलूपणाची, बाळबोधपणाची कदर आणि कौतुक झालं असतं. ह्या ईफ अँड बट्स ना तुमच्या स्वतःच्या आयुष्यात काही स्थान नसलं तरी दुसऱ्यांच्या आयुष्यातल्या इफस् आणि बट्स मधून शिकावं नक्की.
मला तुला बघितलं की स्वतःची आठवण होते. आज तू ड्रिंक्स मध्ये स्वतःला बुडवून टाकायचा चॉइस घेतला असतास तर मी समजलो असतो की यू आर इन रॉन्ग कंपनी. आणि मी तुला त्या कंपनी बरोबर राहण्याला विरोध केला असता. बट आय अॅम ग्लॅड दॅट यू डिनाइड अ ड्रिंक व्हिच मीन्स यू आर नॉट फ्रस्ट्रेटेड बट कनफ्यूज्ड. तुझे बरेचसे ट्रेट्स माझ्यासारखे दिसतात. म्हणून मी केलेल्या चुका आणि माझ्या वाट्याला आलेले रीग्रेट्स तुझ्या वाट्याला येऊ नये आणि तू लॉन्ग टर्म बेनेफिशियल निर्णय घ्यावास असं मला वाटलं म्हणून माझ्याकडून हा प्रयत्न केला. बाकी तू जे काही ठरवशील त्याला माझा पूर्ण सपोर्ट राहील. अँड अॅज लॉन्ग अॅज आय ब्रीद आय विल ऑल्वेज बी देअर फॉर यू माय सन ..”
सांगायचं ते सांगून झालं होतं. समजायचं ते समजलं होतं. आता वेळ आली होती निर्णयाची! यश च्या कपाटात एक कोपऱ्यात पडलेल्या हॅरोड्सच्या बॉक्स मधला हिरा मात्र कधीचा निर्वाणाची वाट पहात होता.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

यश रात्री घरी येणार नव्हता त्यामुळे दीप्तीला आदीला पिकअप करायचं होतं. आज ऑफिस मधून लवकर निघून दीप्ती हिंदू कॉलनीमध्ये आली होती. खूप दिवसांनी. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीसारखी. सुशमताईंनी दार उघडताच आदी त्यांना बिलगला. दीप्ती येऊन सोफ्यावर तिच्या नेहमीच्या जागी विसावली. इकडे तिकडे बघताना तिला जाणवलं की सगळं काही तसंच आहे. टापटीप, सजावट, गोष्टींची मांडणी काही काही बदललेलं नव्हतं. परडीतली फुलं, स्वयंपाकघरातून येणारा फोडणीचा वास, देवघरातली उदबत्ती, बाबांच्या औषधांचा संमिश्र वास तासाच्या तसा. म्हणजे इतकी वर्ष ह्या सगळ्यात माझा काहीच हात नव्हता. मी इथे नसण्याने कशात काहीच फरक पडला नाही. दीप्तीला क्षणभर कसंतरीच झालं. पण तिने स्वतःला सावरलं. मूड घालवून तिला आजची रात्र खराब करायची नव्हती. बाबाला आज जेवण दीप्ती ने आणि आदीला सुषमाताईंनी भरवलं. ते दोघं झोपल्यावर आवरा आवरी करून मायलेकी कॉफी घेऊन सोफ्यावर टेकल्या. न राहवून दीप्तीने पंडित रवीशंकरांचा मालकौंस सीडीप्लेयरवर लावला. तो ऐकत दीप्ती ऐसपैस अंग सैलावून बसली.
“सो? कसं चाललंय?” सुषमाताईंचा प्रश्न दीप्तीला अपेक्षितच होता
“ठीक आहे ” थातुर मातुर उत्तर देऊन चालणार नाहीये माहीत असूनही दीप्तीला कंटाळा आला होता
“दीप्ती ... “
“अगं खरंच ठीक आहे आई. नथिंग टू बाद नथिंग टू गुड. बाबाची तब्येत कशी आहे आता”
“ठीक आहे .. नथिंग टू बॅड नथिंग टू गुड “ बसल्या जागेवरून उठत सुषमाताई खिडकीजवंळ गेल्या आणि खिडकीबाहेर शून्यात बघत म्हणाल्या
“परवा डॉ भारती येऊन गेले घरी बाबाला बघायला. आता हळूहळू अजून डेटीरिओरेशन होणार म्हणाले”
दीप्ती च्या डोळ्यात साहजिकच चिंता उमटली. आई कसं मॅनेज करत असेल ह्या विचाराने ती पुढे काही बोलणार इतक्यात
“पण तू काळजी करू नकोस. इथे नीट मॅनेज होतंय सगळं. छोटूराव येतात बाबाकडे बघायला दिवसभर आणि लताबाई आहेतच माझ्या हाताशी. आदी नसल्यामुळे मला आराम आणि वेळ भरपूर मिळतोय.”
दीप्तीच्या चेहेऱ्यावरची काळजी ची झालर थोडी उतरली तेव्हा सुषमाताई तिच्या जवळ सरकल्या
“तिथे कसं चालू आहे बाळा? खूप दमणूक होतेय का तुझी? थकलेली दिसते आहेस. त्या मिसेस व्हेरगिस आहेत ना? आदी खूप त्रास देतो का? की ऑफिस मध्ये जास्त काम आहे? अगं काहीतरी बोल?”
“काम नेहमीसारखाच आहे पण जाण्या येण्यात जास्त वेळ मोडतो आणि ड्राइव करताना दमायला होतं. आदी म्हणशील तर जास्त यशकडेच असतो. मला फक्त वीकएंड मिळतो त्याच्या बरोबर.” जरा तक्रारीच्या सुरात दीप्ती म्हणाली
“मग तक्रार का तुझी? आदी काही वेडेपणा नाही न करत? यश नीट वागतो न आदी शी?”
“नाही गं तसं काही नाही. यश आदीशी जरा जास्तच नीट वागतो. खूप प्रोटेक्टिव आहे तो आदी च्या बाबतीत. त्याच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायचं असतं त्याला. दोघे क्रिकेट खेळायला जातात, ड्राइव वर जातात, होम थिएटर वर अॅनिमेशन मूवीज बघतात, रात्री आइस क्रीम खायला जातात, पावसात चिखलात फूटबॉल खेळतात. शरलॉक तर आदीचा बेस्ट फ्रेंड झालाय. रात्री पण शरलॉकला घेऊन झोपायचं असतं. आदोबा मजेत आहेत एकदम! “ दीप्ती हळुवार हसत म्हणाली
“आणि तू?”
“मी? खरं सांगू की तुला जे ऐकायला बरं वाटेल ते सांगू?”
“ऑफ कोर्स खरं सांग ... “
“मी मजेत नाहीये. आणि माझं आणि यशचं अजिबात पटत नाहीये.” दीप्तीने सांगून टाकलं
“तुमचं पटत नाहीये ही ठीक आहे. पण मजेत का नाहीयेस?’
“हें? हा काय प्रश्न आहे? पटत नसलं तर मजेत कसे असू आई?”
“का? आपलं कित्येक वेळा पटत नाही पण आपण मजेत असतो की.”
“ती गोष्ट वेगळी आहे “
“कशी काय?”
“तू ही दोन रीलेशन्स कम्पेअर कशी करतेस? आई आणि मुलांमध्ये मतभेद असले तरी त्यांचं नातं बदलतं थोडीच?”
“का नाही बदलत?”
“कारण ते अनकनडीशनल असतं”
“एकझॅक्टली माय पॉइंट”
“व्हॉट पॉइंट?”
“लाईफ पार्टनर्स चं सुद्धा नातं अनकनडीशनल असू शकतं ना?”
“नाही असू शकत. कारण तुम्ही स्वतः लाईफ पार्टनर्स निवडता. तुम्हाला तुमचे आईवडील किंवा मुलं चूज करता येत नाहीत..” दीप्ति ने लॉं पॉइंट सर केलं होता
“तुला अजूनही असं नाही वाटतं की लाईफ पार्टनर्स आर मेड इन हेवन? तुला वाटतं की तुला आत्ता यश बरोबर प्रॉब्लेम्स येतायत ते तुला इतर कुणाबरोबर येणार नाहीत?”
सुषमाताईंचा रोख आशुतोषकडे होता. तो ओळखून दीप्ती अंतर्मुख झाली
“तू दोन्ही बाजूंनी मला का बोलते आहेस? काही महिन्यांपूर्वी मी जेव्हा यशशी डायरेक्ट लग्न करायचं म्हणत होते तेव्हा तू मला थांबायला लावलंस. हा सगळा लिवइनचा घाट घालायला लावलास. आणि आता मी खरं काय ते बोलतीए तर तू म्हणतेस की इतर कोणबरोबरसुद्धा मला इश्यूस् आले असते.. व्हॉटस् यॉर पॉइंट यार ”
“माय पॉइंट वॉज टु गिव यू, यश अँड आदी अ फेअर चान्स टु टेस्ट यॉर प्रोबॅबल स्टाइल ऑफ लाइफ टुगेदर. आणि तुम्ही दोघांनी एकमेकांना मनापासून स्वीकारून लग्नाच्या बेडीत अडकांवंत असा माझा उद्देश होता ”
“मग सांगते आहे ना मी तुला की ते फार प्लेसन्ट नाहीये. दॅट इज द ट्रूथ!”
“नो दीप्ती दॅट इज नॉट द ट्रूथ. इट इज यॉर परस्पेकटीव्ह”
“डोन्ट प्ले यॉर वर्ड गेम्स विथ मी आई. आय अॅम ब्लडी टायर्ड..”
“मी तुला फक्त नाण्याची दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. जे नातं आपण मनापासून स्वीकारतो ना दीप्ती, तेच आपल्याला अडी अडचणींमधून निभावता येतं. याउलट जी नाती आपल्या अंगावर परिस्थितीमुळे किंवा कुणाच्या फोर्स मुळे येऊन पडतात, त्यांचं कायमंच ओझं वाटत राहतं. त्या नात्यांमध्ये आनंदाचे धबधबे असले तरी आपण कायम तहानलेलेच राहतो.”
“तुला काय म्हणायचंय ते मला स्पष्ट सांग. काय करायचंय मी? ”
“आय अॅम सॉरी दीप्ती पण मी तुझ्यासाठी निर्णय घेणार नाही. दॅट इज नॉट माय जॉब. तुझ्या पेक्षा थोडे जास्त पावसाळे पहिले असल्यामुळे आणि तुला आतून बाहेरून ओळखत असल्यामुळे तुला योग्य निर्णय घ्यायला मदत करणं एवढंच माझं काम आहे आणि मी फक्त तेवढंच करू शकते. “
अर्थातच दीप्ती वैतागलेली होती पण सुषमाताईंनी आपला पवित्रा बदलला नाही
“तुला काय वाटतं दीप्ती? माझं आणि तुझ्या बाबाचं प्रत्येक गोष्टीत पटत होतं?”
“कुठल्यातरी गोष्टीत पटत असेल ना पण?”
“इन फॅक्ट आमचं कोणत्याच गोष्टीत कधीच एकमत होत नसे. आमच्या परसनालीटीस पूर्णपणे ओपॉसिट आहेत.”
“मग?”
“मग काय? वी हॅड टु फिगर हाऊ टु मेंड अवर डिफरेन्सेस द हार्ड वे. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या संघर्षाच्या जागा कश्या कमी करायच्या ते आमचं आम्हाला शोधून त्यावर काम करायला लागलं. नाहीतर तुमच्यावर कसले संस्कार करणार होतो आम्ही? सेपरेशन वॉज नॉट ईवन अ चॉइस फॉर माय जनेरशन.”
“पण तुम्ही एकमेकांवर अन्याय तरी कुठे करत होतात एवढी सेपरेशनची वेळ यायला.. ”दीप्ती डाफरली
“अन्याय, त्याग वगरे ना फार फार मोठ्या गोष्टी असतात दीप्ती. बॉर्डरवरचे सैनिक करतात, स्वातंत्र्य लढ्यात लोकांनी केला त्याला त्याग म्हणतात. हिटलरने ज्यूंवर केला तो अन्याय. आज माझ्या आवडीची भाजी केली नाही हा अन्याय आणि मी तुझ्या आवडीची भाजी खाल्ली हा त्याग नव्हे. आपल्या सारख्या सुसंस्कृत कुटुंबांमध्ये ही असले छोटे छोटे पॉवर स्ट्रगल्स सोडून खरंच फार मोठे त्रास देतात का गं कोणी एकमेकांना? दोन मुळात चांगल्या व्यक्ति आणि कुटुंब एकमेकांना ठरवून नाही छळंत कधी. पण तरीही आपण सुखी का होऊ शकत नाही?”
...
“मी तुला विचारते आहे... रुईया मध्ये लेक्चर नाही सुरू माझं “
“मला नाही माहीत... “ दीप्तीला कळंत होतं पण वळंत नव्हतं
“मग मी सांगते ते ऐक. इट्स ऑल अबाऊट इगो अँड परसपेकटीव्ह. शोधलंस आणि मानलंस तर सूखच सूख आहे. नाहीतर तुझ्या सारखी दु:खी तूच होशील. मग तू यश बरोबर अस, किंवा आशु बरोबर किंवा एकटी स्वतंत्र.”
“एकदा ठरंव मनाशी की आदी तुझी जबाबदारी आहे की नाही. ट्रस्ट मी तू त्याची जबाबदारी नाही घेतलीस म्हणून त्याचं आयुष्य थांबणार नाही. आज यशचं थांबलं होतं का? प्रत्येक जण आपांपलं प्राक्तन घेऊन आलेला आहे दीप्ती. पण तुझ्या नशिबाने तुझ्या समोर हे दोन रस्ते उभे ठाकले आहेत. एका रस्त्यावर आदी वर मनापासून प्रेम करणारा आणि तुझे ईगोज न सांभाळणारा, तुझा स्वभाव खटकणारा पण तरीही चांगला माणूस तुला सोबत करणार आहे. दुसऱ्या रस्त्यावर तुझ्यावर मनापासून प्रेम करणारा, तुझे ईगोज सांभाळणारा, तुझा स्वभाव आवडणारा आणि आदी ची जबाबदारी मनापासून नाही पण तुझ्यासाठी स्वीकारायची तयारी दर्शवणारा चांगलाच माणूस तुला सोबत करणार आहे. प्रश्न आता इतकाच आहे की तुला आदीची जबाबदारी एखाद्या आई सारखी स्वीकारायची आहे की नाही. स्वतःच्या मनाशी अत्यंत प्रामाणिकपणे हा संवाद कर. तुझ्यावर कोणतंही बंधन नाहीये एवढं लक्षात ठेव. आदी तुझ्यामुळे पोरका झाला नाहीये. त्याच्या नशिबात ते तसंच होतं. पण एकदा तू तो निर्णय घेतलास की तुझ्या सारख्या स्वभावाच्या व्यक्तीची घुसमट, पश्चात्ताप, घालमेल होणार आहे ही पक्की गाठ बांध आणि त्यांना बरोबर घेऊन जगण्याची तयारी ठेव. आणि जर आदीची आई म्हणून निर्णय घेणार असलीस तर आईला तिच्या मुलाचं भलं सोडून दुसरं काहीही कधीच दिसंत नसतं हे लक्षात ठेव. आणि बाळा एकदा आईपण अंगावर घेतलं, की ते शेवटच्या श्वासपर्यंत सुटत नाही.”
“तुला आयुष्यात कुठलं रिग्रेट नाहीये का गं?”
“फक्त एक! माझं लेकरू अवेळी ओढून नेलं. बाकी कित्येक अडचणी, संकटं मी झेलली, त्याबद्दल परमेश्वरकडे अवाक्षर तक्रार केली नाही. चेहेऱ्यावरचं हसू आणि मनातली कृतज्ञता कधी सोडली नाही. पण माझ्या प्रीतीला असं नेल्याबद्दल मी कधी माफ करू शकणार नाही नियतीला. ते माझं भांडण माझ्या बरोबरंच जाईल.. असो“
ऐकता ऐकता दीप्तीचं मस्तक कधी सुषमा ताईंच्या मांडीवर विसावलं आणि सुषमाताईंचा हात कधी तिच्या डोक्यावरून फिरायला लागला त्यांना कळलंच नाही. त्यांच्या स्पर्शातून त्यांचं ते विलक्षण आईपण तिच्यात कधी झिरपलं तिलाही कळलं नाही. पण तिचं मन मात्र शांत आणि निर्णय सुद्धा पक्का झाला होता.
आता रात्र सरून उद्याच्या नवीन दिवसाची सुरुवात नव्या परसपेकटीव्ह ने करण्यासाठी दीप्ती आतुर झाली होती.
आता देणं फिटलं होतं. जगणं सुरू झालं होतं.
|| समाप्त ||

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी तुम्हा सर्वांच्या पाठिंब्या मुळे ही कथा पूर्ण करू शकले. थोडा फार सृजनाचा का काय म्हणतात तो आनंद वाट्याला आला. भरून पावले. कळावे. लोभ असावा ही विनंती!

Mast..

मस्त!
दोन्ही seasons वाचले.
छान!

"अन्याय, त्याग वगरे ना फार फार मोठ्या गोष्टी असतात दीप्ती. बॉर्डरवरचे सैनिक करतात, स्वातंत्र्य लढ्यात लोकांनी केला त्याला त्याग म्हणतात. हिटलरने ज्यूंवर केला तो अन्याय. आज माझ्या आवडीची भाजी केली नाही हा अन्याय आणि मी तुझ्या आवडीची भाजी खाल्ली हा त्याग नव्हे. "
हे मनापासून पटलं

खूप आवडली ही कथा. तुम्ही प्रत्येक भागात गुंतवून ठेवलंत.
आता इथेच थांबून राहू नका. आम्हाला आणखी कथांची मेजवानी हवी आहे.

शेवट जरा पटकन झाल्यासारखं वाटलं. पण छान होती कथा. स्मार्ट मिलेनिअल्सना गुंगवून ठेवणारी. चटपटीत संवाद, सद्यकालीन संदर्भ आणि पार्श्वभूमी. आता पुढची कथा कधी?
जाता जाता: के एल आपल्या प्रेमासंदर्भात 'त्याकाळी म्हणजे I am talking about nineteen twenties ' म्हणतात ते जरा खटकते. त्यांचे सद्य वय 90 वर्षांचे मानले तर त्यांचा जन्म 1930 चा आणि 1950-55 ला त्यांचं प्रेम करण्याचं वय असावं. एव्हढ्या सुंदर कथेत छोटीशी खोट काढली, क्षमस्व. पण आम्ही वाचक तुमची कथा बारकाईने वाचत होतो म्हणून हे लक्षात आलं. Bw

धन्यवाद मंडळी खूप खूप धन्यवाद.
@हीरा कालमापनाचं गणित चुकलं होतं खरं. चूक सुधारून टाकली लगेच! तुमच्या बारीक लक्षा साठी विशेष धन्यवाद.
@शोधयात्री , @एस्@, @पाफा @मासटरमाइंड उत्तेजनासाठी मनापासून आभार! काही सुचलं तर मायबोलीकरांसामोर पेश केल्यावाचून चैन पडणार नाही!
परंतू देणं मात्र आता संपवते. नाहीतर बालाजी टेलीफिल्म्स होतील इथे::)) थोडक्यात गोडी. कसं?

छान !!!!!आवडली कथा ... रोज अगदी वाट पहायची पुढच्या भागाची
आता सिजन 3 ची वाट पाहत आहे.
कथानायिका नंदिनीच्या नायिके सारखी वाटली, ठाम, self confidance असलेली ....आवडली

ओह, मस्त, सुटसुटीत भाग पण चुटपुट लावणाराही!! पुढे काय घडतं ,कसं त्याची खूप उत्सुकता ...
3 रा सिझन पण येऊ दे की थोडा प्लीज Happy

खूप छान लिहिलंयत तुम्ही. आमच्यासारख्या मिलेनिअल्सना एक वेगळा पर्सपेकटीव्ह देणारं. एकाच विनंती आहे- याचा उपसंहार म्हणून तरी काहीतरी लिहा. तुमच्या कॅरॅक्टर्समध्ये इतकं गुंतायला झालंय की त्यांना सोडवत नाही.

कथा आवडली..
शेवट खासच
पुढचा सीझन येणार असं दिसतंय.. येउ द्या Happy

_/\_ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ! देणं फिटलेलं दिसत नाहीये !
ऊपसंहार लिहिण्याचा प्रयत्न नक्की करते काही दिवसांमध्ये.