Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
“ हे तर आपण घरीही करू शकतो” -
“ हे तर आपण घरीही करू शकतो” -
हे तर आपण घरीही करू शकतो
हे तर आपण घरीही करू शकतो
पाणीपुरी लंडनमधे चित्रीत नाही
पाणीपुरी लंडनमधे चित्रीत नाही का?
काही जोडप्यांना अभिनय मुळीच जमलेला नाही. उगाच वाटू लागले. भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी वगैरे चांगले कलाकारही आहेत पण त्यांच्याही भांडणांत दम नव्हता.
>>> मी जेवढा पाहिलाय तेवढ्यात तरी कुणीही "चलो लंडन" म्हणून ट्रिपचा उल्लेखही केलेला दिसला नाही. मकरंद देशपांडेला कोणी का नेईल लंडनला, तो काही सिद्धार्थ चांदेकर आहे का ? ही पाणीपुरी सबसिडाईज्ड वाटली नाही, पाणचट वाटली. किरकोळ कारणावरून घटस्फोट होऊ शकतात असंच दाखवायचं होतं त्यांना, चित्रपट गंभीर नाही. बहुतेक विनोदी आहे.
“ हे तर आपण घरीही करू शकतो”>>
“ हे तर आपण घरीही करू शकतो”>>>>>
काय??? पाणीपुरी की उगीचच कारणाशिवाय भांडण???
मराठी चित्रपटांना जे २५ लाख
मराठी चित्रपटांना जे २५ लाख मिळतात (म्हणे) ते बंद केले तर हे असले चित्रपट बंद होतील.
जुन्या काळी माझे कुंकु, मंगळसुत्र, हिरवा चुडा, साडी, धोतर, जोडवी वगैरे होते.
आता जिलबी पाणीपुरी गुलाबजाम…
पुढे चप्पल, मोजे, बुट, झाडु, कचरा येतील.. फर्निचर आलाय बहुतेक..
असेच सुरु राहिले तर म चि कधी घराबाहेर पडुन उड्डाणे घेणार???
काहीतरी १०-१५ लाखात बनवुन गुंडाळायचे आणि फुकट २५ लाख खिशात घालायचे असे सुरु आहे झाले.
स्वजो च्या ओठवरची
स्वजो च्या ओठावरची सुरवंटासारखी मिशी
जिलबी जशी पाकात टाकली तरच तिची गोडी! नाहीतर नुसतं तळलेलं पीठ!! जीवनाचे. करमरकरांचे, आणि यातील व्हिलनचे ही असेच आहे>>
हे तर आपण घरीही करू शकतो>>
भारत गणेशपुरे आनी हृषिकेश जोशी हे कपल आहे?
>> हे तर आपण घरीही करू शकतो >
>> हे तर आपण घरीही करू शकतो >>
मी दोन तीन वर्षांपूर्वी मकरंद देशपांडेचं एक नाटक बघून त्याचा धसका घेतला आहे. लोक टाळ्या काय वाजवत होते, हसत काय होते एकेक मजाच चालू होती. मला काहीच झेपत न्हवत.
भारत गणेशपुरे आनी हृषिकेश
भारत गणेशपुरे आनी हृषिकेश जोशी हे कपल आहे? >>>
नाही अनघा. त्यांच्या बायकांची नावं मला माहिती नाहीत.
ह्या गोष्टीला नाव नाही- शेवटी
ह्या गोष्टीला नाव नाही- शेवटी चित्रपट पाहिला, खूप छान चित्रिकरण केलं आहे. पहिला हाफ खासच चांगला आहे, विशेषतः 1.03 वाजता असलेला सीन – जिथे ती मुलगी विचारते, “तू मेसेजेस चेक करत नाहीस का?” तो प्रसंग अगदी मनाला भिडतो!
पण दुसरा हाफ खूपच संथ वाटला, बराच एडिटिंग करायला हवा होता. मला काही भाग फास्ट फॉरवर्ड करूनच बघावा लागला. एकूण चित्रपट चांगला आहे, पण थोडा लहान केला असता तर अजून प्रभावी झाला असता.
हे तर आपण घरीही करू शकतो
हे तर आपण घरीही करू शकतो म्हणून मी बंद केला >>> पाणीपुरी घरी करू शकतोच
पाणीपुरी >>>
पाणीपुरी >>>
मग ती वेडी होते. खरंच.
हे तर आपण घरीही करू शकतो
>>>
नंतर उगाच भांडत बसणारे नवरा
नंतर उगाच भांडत बसणारे नवरा-बायको दाखवले. हे तर आपण घरीही करू शकतो म्हणून मी बंद केला.
मी कधीकधी रिकामटेकडा असतो, पण इतकाही नाही

>>>>>
फेसबुकने तुकडे दाखवले
फेसबुकने तुकडे दाखवले त्यामुळे यु ट्युबवर शोधुन आकांत हा अदिती सारण्गधर व मिलिंद शिन्दे अभिनित चित्रपट पाहिला. अन्गावर काटा आला गावाबाहेर पालावर राहणार्या लोकाण्चे आयुष्य पाहुन. चोरी दरोडे खुन करणे याव्यतिरिक्त दुसरे काहीच कौशल्य नाही, पकडले गेल्यानंतर पोलिसांपासुन वाचण्यसाठी सावकाराचे कर्ज आणि फेडायला जमले नाही तर सहा महिन्यासाठी बायकोला सावकाराकडे गहाण टाकुन कर्जमुक्ती मिळवायची. त्या समाजात बाईला असे गहाण टाकणे सर्रास, पण जातीबाहेर गहाण टाकायचे नाही हा नियम. शिक्षण कसले ते माहितच नाही, भवानी आई भगताच्या अंगात येऊन जे सांगेल तेच ब्रम्हवाक्य.
अदिती व मिलिंद दोघांनीही सुंदर अभिनय केलाय. पालावरच्या बाया पालावरच्या वाटत नाही हा बघताना एक प्रॉब्लेम आहे. बाकी छान बनवलाय.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/thecinementary/photos/jiostudios-jiostudiosmara...
दाभाडे चांगला आहे. कुणीतरी वर
दाभाडे चांगला आहे. कुणीतरी वर परफार्मन्स प्रेशर एवढ्य 2च शब्दात टिप्पणी केली, पण तेवढाच नाहीये चित्रपट. एका वरवर चांगल्या घरात फक्त सुसंवाद नसल्याने किती किती मनात साठून राहतं त्याचं मग काय काय होत राहतं हा मला तरी मूळ मुद्दा वाटला.. आणि अगदी सुरवातीपासून शेवटपर्यंत सिनेमात जागोजागी मस्त फुटणारे पंचेस आहेत, काही जागी निखळ स्माईल ही येते.. मला आवडला, पैसे वसूल
गुलाबजाम , जिलबी , कांदेपोहे
गुलाबजाम , जिलबी , कांदेपोहे , पाणीपुरी.... आणखी कोणते आहेत ? मला इतकेच आठवले
हापुस
हापुस
मुरांबा
मुरांबा
मसाला - शॉर्ट फिल्म
मसाला - शॉर्ट फिल्म
नाही अनघा. त्यांच्या बायकांची
नाही अनघा. त्यांच्या बायकांची नावं मला माहिती नाहीत>> नशीब आपलं!
भरत गणेशपुरे आणि हृषिकेश जोशी आपापल्या लहेज्यात भांडताहेत, मकरंद अनासपुरे त्यांचा वकील कोर्टात त्यांची बाजू मांडतोय... असं दृश्य माझ्या डोळ्यासमोरआलं. ))
गुलाबजाम , जिलबी , कांदेपोहे
गुलाबजाम , जिलबी , कांदेपोहे , पाणीपुरी.... आणखी कोणते आहेत ? मला इतकेच आठवले >> शेवग्याच्या शेंगा ... खूप जुना आहे, तेव्हा खूप गाजला होता. य. गो. जोशी यांची कथा आहे. शेवग्याच्या शेंगांमुळे भावंडातला दुरावा मिटतो अशी साधारण गोष्ट आहे.
खरंच की. मग 'दूधभात'ही होता
खरंच की. मग 'दूधभात'ही होता ना एक? पुलंची कथा होती.
अशोक सराफचा खिचडी नावाचा एक
अशोक सराफचा 'खिचडी' नावाचा एक आहे, झाला का मेनू.
नाय वरण भात लोणचं कोण नाही
नाय वरण भात लोणचं, कोण नाही कोणाचं.
असा एक पूर्ण मेन्यूच असलेला ही एक आहे मांजरेकरांचा
बरोबर! लोणच्या असा काही तरी
बरोबर! लोणच्या असा काही तरी आहे. ती काही तरी एक शिवी आहे म्हणे! मांजरेकरांचाच. त्यामुळे बघण्याचं धैर्य न एकवटलेला.
प्राजक्ता झापुक झुपूक पोस्टर
प्राजक्ता झापुक झुपूक पोस्टर बघितलं, दिलेला शब्द पूर्ण केला केदार शिंदे यांनी. पूर्वी शिवला घेऊन म मां पिक्चर काढणार होते तो काढलाच नाही. कदाचित कोविड वगैरे कारण असेल.
मला तो सुरज अजिबातच आवडला
मला तो सुरज अजिबातच आवडला नाही विनर म्हणून .. बी बॉस मधे त्याने काहीही छाप पडाव अस केल नाही ..ज्यानी त्याला फारच डोक्यावर घेतल ते चालवतिल..
गुलाबजाम , जिलबी , कांदेपोहे
गुलाबजाम , जिलबी , कांदेपोहे , पाणीपुरी.... आणखी कोणते आहेत ? मला इतकेच आठवले >> सुदाम्याचे पोहे. खूप जुना सिनेमा आहे बहुतेक
दुधाचे उपकार....दूध का कर्ज...
मग 'दूधभात'ही होता ना एक?
मग 'दूधभात'ही होता ना एक? पुलंची कथा होती. >>> हो
त्यातच कोठेतरी "गच्ची" बसवायची होती ना, उजळली प्राचीला यमक म्हणून? 
येस येस!
येस येस!
Pages