चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेटस मोटेल …… चांगली आहे ती मालिका.
फ्रेडी हायमोर अतिशय गुणी कलाकार आहे.आणि आईचं काम करणारी व्हेरा फार्मिगा पण>>+१

भूतपोलीस वरून आठवले. भ वरून भूमिका पाहिला. पण नाव बूमिका आहे. बरा वाटला. थ्रिलर आहे. दक्षिणेकडे समस्या मांडताना खूपच चटपटीत पद्धतीने मांडतात. पर्यावरण विषयक प्रश्न पहिल्यांदाच इतक्या वेगळ्या पद्धतीने मांडलेला पाहिला. चित्रपट व्यावसायिक आहे. पण काही काळ प्रचारकी होतो. पण विषयच असा आहे कि टाळता येणे शक्य नाही.
( प्रतिसाद पोस्ट केल्यावर वरचे प्रतिसाद बघून माझी तर गल्ली चुकली नाही ना अशी शंका आली. कधी कधी चुकून दुस-या धाग्यावर क्लिक होतं).

Netflix : The Platform (2019) मूळ स्पॅनीश चित्रपट. पाहिला. आवडला.
गोरॅंगचे डोळे उघडतात तेव्हा तो एका ४८ नंबंरच्या खोलीत असतो. खोलीच्या मधोमध मोठा आयताकृती खड्डा असतो व त्याच्या दुसऱ्या बाजूस त्रिमागासी नावाचा रूममेट बसलेला असतो. त्याच्याकडून कळते कि ते एका सेल्फ मॅनेजमेंट सेंटरमधे आहेत. ४८ नंबंरची खोली म्हणजे ४८ वा मजला आणि खड्ड्यातून खाली पाहिले तर असंख्य मजले.
थोड्याच वेळात वरून प्लॅटफॅार्म येतो व त्यांच्या खोलीत थांबतो. त्यावर भरपूर जेवण ठेवलेले असते. रोज शून्य मजल्यावर विविध पदार्थांनी भरलेला हा प्लॅटफॅार्म, प्रत्येक मजल्यावर काही मिनिटे थांबतो. तिथल्या दोघांनी खाऊन उरलेले अन्न खालच्या मजल्यावर नेतो.
त्यावर त्रिमागासी तूटून पडतो. गोरॅंगला त्याचे वसावसा खाणे किळसवाणे वाटते. तो त्यातले एक फळ उचलतो आणि नंतर खावे म्हणून खिश्यात ठेवतो. तेव्हढ्यात प्लॅटफॅार्म खालच्या मजल्यावर जातो. तसे खोलीतले तापमान वाढायला लागते. त्रिमागासी त्याला ते फळ खाली फेकायला सांगतो. प्लॅटफॅार्मवरचा कोणताही पदार्थ जवळ ठेवायचा नाही. नाहीतर खोलीचे तापमान अतिशय वाढेल किंवा कमी होईल.
दर ३० दिवसांनी तिथल्या रहीवाश्याचा मजला तसेच रूममेटही बदलणार. ते तेथे का आहेत याची वेगवेगळी कारणे आहेत…..
सिनेमा रोचक आहे पण मारामारी, रक्तपात, आपल्यापेक्षा खालच्या थराला दिलेली वाईट वागणूक तसेच किळसवाणे प्रकार बरेच आहेत. रूपकेही भरपूर आहेत. त्यातली मला काही कळलीही नसतील.
कोणी पाहिलाय का हा चित्रपट? त्यावर इथे चर्चा झाली असेल तर लिंक द्या. वाचायला आवडेल. नसेल झाली तर कृपया बघा आणि परिक्षण लिहा कोणीतरी.

नेटफ्लिक्स वर अन्कही कहानियां बघितला.. छान आहे. ३ वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

पहिली मस्त हलकीफुलकी आहे. रेडीमेड कपड्यांच्या दुकानात काम करणारा हा एक मुलगा असतो. रोजच्या त्याच त्याच कंटाळवाण्या रुटीनमधे त्या दुकानात एक गर्ल मॅनेक्वीन आल्यावर त्याच्या आयुष्यात काय बदल घडतो याची कथा आहे. त्या हिरोने छान काम केलेय. ओ स्त्री मधला तो मोठे दातवाला, नाव माहित नाही.

दुसर्‍या गोष्टीत रिंकु राजगुरू आहे. तिच्या घरची परिस्थिती यथातथाच. तरी मैत्रिणीबरोबर सिनेमा बघायला जाते बहुतेक रोजच. तिथे काम करणार्‍या मुलाशी तिची ओळख होते. तोही हलाखीच्या परिस्थितीतलाच. दोघं त्यातून कशी बाहेर पडतात याची कहाणी.

तिसर्‍यात दोन कपलची गोष्ट आहे. त्यातल्या दोघांमधे एक्स्ट्रामॅरिटल अफेअर चालू असतं. त्या दोघांचे पार्टनर शोध घेतात कसं आणि का झालं असेल अफेअर, काय गोष्टी घडल्या असतील, आपण आपल्या पार्टनरला किती चांगलं ओळखतो वगैरे.
ही पण छान आहे वेगळा अँगल असलेली.

. त्या हिरोने छान काम केलेय. ओ स्त्री मधला तो मोठे दातवाला,>>> हो. मिर्झापूर मधला कंपाऊंडर- अभिषेक बॅनर्जी. छान आहे ती कथा. पुढच्या बघायच्या आहेत.

प्लॅटफॉर्म इंटरेस्टिंग वाटतोय. धन्यवाद इथे लिहील्याबद्दल. बघतो.
मला ही स्टोरी ऐकल्या सारखी वाटते आहे. इथेच कोणी लिहिलेलं बहुतेक.
असाच क्यूब बघितला आहे. एकाला एक सहा ही बाजूंनी जोडलेले क्यूब असतात आणि त्यात एकाला जाग येते. जरा वेळाने समजत की ते क्यूब री स्त्रकचर होताहेत. एकातून दुसऱ्यात जाणं ही शक्य आहे. आणि इतर क्यूब मध्ये माणसं ही असू शकतात. हा किती वेळ आहे, ती माणस किती वेळ आहेत, का कोंडलय, बाहेर पडणं शक्य आहे का... फार पूर्वी बघितलेला, तेव्हा आवडलेला. नेफ्ली वरच होता.

अन्कही कहानियां>> हो पाहिली. बरी आहेत, तिसरी गोष्ट आवडली, टिपिकल न घेता कलाटणी छान दिली आहे कथे ला.

रिंकू रा. ची कथा मला जरा ओंगळ वाटली बघायला, शेवटाला काय होते ते नीट कळत नाही..

अन्कही कहानिया फारच बोर झाला. एकदम संथ आणि 'केहेना क्या चाहते हो!' असं झालं. एक-दोनदा रिपीट झालं की मोनोटोनस आहे, चाकोरी आहे इ. समजतं. अर्धा पिक्चर तेच तेच दाखवुन आणि काय वेगळा परिणाम होतो कोण जाणे.

प्लॅटफॉर्म बघितला आणि फार्फार आवडला. चिक्कार मेटॅफरंच मेटॅफरं. मजा आली बघायला, आणि मग रिव्ह्यू/ शेवट एक्सप्लेन्ड टाईप आर्टिकल वाचायला. धन्यवाद सोनाली.

प्लॅटफॉर्म इंटरेस्टिंग वाटतोय. धन्यवाद इथे लिहील्याबद्दल. बघतो.
मला ही स्टोरी ऐकल्या सारखी वाटते आहे. इथेच कोणी लिहिलेलं बहुतेक.
असाच क्यूब बघितला आहे.
+१
क्युब सारखाच वाटला पण क्युब बोरींग होता. कदाचित प्लॅट्फॉर्म चांगला असेल, पाहिन!

एक-दोनदा रिपीट झालं की मोनोटोनस आहे, चाकोरी आहे इ. समजतं. अर्धा पिक्चर तेच तेच दाखवुन आणि काय वेगळा परिणाम होतो कोण जाणे.
>>>>>>
मोनोटोनस चाकोरी अन तेच तेच जगणे कित्ती बोअर असते हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचते Happy

हो. मिर्झापूर मधला कंपाऊंडर- अभिषेक बॅनर्जी. छान आहे ती कथा. पुढच्या बघायच्या आहेत. >>> पाताल लोक मधेही जबरी रोल होता त्याचा. इथे एकदम उलटे व्यक्तिमत्त्व आहे.

प्लॅटफॉर्म बघितला. प्रचंड आवडला. फारच भारी आहे. रूपके, राजकीय भाष्य, आहे रे वर्गाकडून केला जाणारा अपव्यय सारेच भावले. ह्याचा हिंदी यावा आणि त्यात अमिताभने तो म्हातारा साकारावा Happy

पाताल लोक मधेही जबरी रोल होता त्याचा. इथे एकदम उलटे व्यक्तिमत्त्व आहे. >> +१ . कसला कसलेला वाटतो. सुरूवातीला क्रिपी असेल असे वाटत राहते मग एकदम कलाटणी मिळते. मला पहिल्या दोन्ही गोष्टी आवडल्या - संथ आहेत, बोअर आहेत पण नेहमीच्या साच्यापेक्षा वेगळ्या आहेत. दुसर्‍या मधे आवडलेला भाग म्हणजे त्या काळातला सेटप अजिबात सेट वरचा वाटत नाही नि कलाकार चक्क पूर्णपणे मराठी बोलतात. तिसरी मात्र थोडी ओढाताण झालेली वाटली.

अम्माचा थलैवी पाहिला.
कंगणा राणावत कधी इरीटेटींग वाटते तर कधी छानच बेअरींग पकडते. यात आवडली. त्यामुळे पिक्चरही आवडला.

हो हो ! अरे अगदीच पोहोचते. पिक्चर बंद केला जातो. हा ही केला. >>> हाहाहा, भारी.

अभिषेक बॅनर्जीची कुठली सिरिज (किंवा चित्रपट), कुठे आहे.

अभिषेक बॅनर्जीची कुठली सिरिज (किंवा चित्रपट), कुठे आहे.>>> अनकही कहानियां, नेटफ्लिक्स.

प्लॅटफॉर्म कुठे बघायला मिळेल?

Netflix

धन्यवाद आशु.

नेटफ्लिक्स नाहीये आमच्याकडे.

पहिली मस्त हलकीफुलकी आहे.>> ही आवडली असेल तर एक जुना "लार्स अँड दि रियल गर्ल" नावाचा सिनेमा आहे. हीच थीम आणि सुंदर आहे. बहुतेक यूट्यूबवर आहे. सापडला तर देईन लिंक.

NO TIME TO DIE लै भारी आहे...

थिएटर मधेच पहा... शक्य असल्यास IMAX 3D
कारण 65 mm फिल्म वर IMAX कॅमेर्‍यानी शूट केला आहे. डिजिटली एन्हान्स्ड कॉपी नाहिये.

Pages