Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गलगले निघाले
गलगले निघाले
अनु अगं ... महान आहेस
अनु अगं ... महान आहेस त्या अॅक्चुअल प्रॉब्लेम पेक्षा या कमेंटनेच गडबडा लोळले
गलगले बद्दल काहीतरी अफाट चपखल
गलगले बद्दल काहीतरी अफाट चपखल कॉमेण्ट आहे इतके समजले. पण पूर्ण झेपायला ते भरत जाधवचे नाटक बघायला हवे असे दिसते - ते पात्र असलेले
तो गलगले माणूस सही रे सही रे
तो गलगले माणूस सही रे सही नाटकात असतो.तो स्वतःच्या प्रत्येक हालचालींची रनिंग कमेंट्री सतत करत असतो.
युट्युबवर मिळेल बहुतेक.
गलगले निघाले नावाचा चित्रपट
गलगले निघाले नावाचा चित्रपट सुद्धा आहे.
ऑह गॉड, म्हणजे निट दिसत
ऑह गॉड, म्हणजे निट दिसत नसलेल्या लोकाना हे असले काही झेलावे लागते?आपले सगळे अवयव निर्धारीत कामे निट करतात हे किती मोठे वरदान आहे हे माहितच नाहिये..
Faltu comment
Faltu comment
Faltu comment+ १००
Faltu comment+ १००
ऑह गॉड, म्हणजे निट दिसत
ऑह गॉड, म्हणजे निट दिसत नसलेल्या लोकाना हे असले काही झेलावे लागते?>>> मग त्यांनी चित्रपट कसा बघावा असे तुम्हाला वाटते? फक्त ऐकून सगळेच कसे समजेल?
गब्रू जवान कि जय नावाचा
गब्रू जवान कि जय नावाचा चित्रपट आला का?
माझ्या प्रतिसादात फाल्तु काय
माझ्या प्रतिसादात फाल्तु काय हे कळले नाही...
डोळस लोकान्ना बघताना कानान्वर जे पडतेय त्याचा त्रास होतो तर तो इम्पेअर्ड लोकान्नाही होणार ना? ईम्पेअर्डसाठी जे काही टेक्निक वापरले आहे त्याने इम्पेअर्डनाही चित्रपटाचा तितकाच आनन्द मिळायला हवा.. त्याना चुकीचे झेलावे लागत आसेल तर वाइट वाटणार...
फारेण्ड, तुम्ही सही रे सही
फारेण्ड, तुम्ही सही रे सही नाटक पाहिलं नाहीये???
मला वाटतं त्यांना मदत होईल,
मला वाटतं त्यांना मदत होईल, पडद्यावर काय घडतंय ते डोळ्यासमोर उभं करायला. डोळे मिटून एकदा ऐकून बघा.
ओके.
ओके.
मी अजुन हा ऑप्शन बघितलेला नाही..
सस्मित - नाही पाहिले अजून.
सस्मित - नाही पाहिले अजून. खूप ऐकले आहे त्याबद्दल, धमाल आहे वगैरे.
ए के हंगल साहेब जर तुमचे वकील
ए के हंगल साहेब जर तुमचे वकील असतील तर तुम्हाला फाशीपासून कुणीच रोखू शकत नाही या ठिकाणी.
या ठिकाणी एका निर्दोष व्यक्तीवर खूनाचा आरोप आहे आणि ती व्यक्ती गिरीश कर्नाड आहे यावरूनच लहान लेकरू पण सांगू शकेल की ही व्यक्ती निर्दोष आहे या ठिकाणी अध्यक्ष महोदय.
सरकारी वकील अमरीश पुरी असल्याने राष्ट्रवादी आणि भाजपचे गृहमंत्री त्यांच्या खिशात असणार हे या ठिकाणी आपल्या सर्वांना माहीत असायला पायजेल. अमरीश पुरी म्हणजेच ठकराल वकील यांना फाशी फाशी खेळण्याची दांडगी हौस होती या ठिकाणी. आपल्या राजकारणाचा पायाच आहे कि जो नडला त्यास गाडला. याच पुरोगामी तत्त्वावर आपण मंत्रालय जाळले, ताजमहाल हॉटेल जाळले, दंगली घडवल्या, आदर्श घोटाळे केले पण कुठेही सापडलो नाही. अगदी जस्टीस श्रीकृष्ण यांनी लिवलेल्या अहवालाला पण आपण अत्यंत आदराने केराची टोपली दाखवलेली आहे या ठिकाणी.
आमचे मित्रही कमी नाहीत. त्यांच्या कारकिर्दीत एक जज्जच हृदयविकाराने गेले. तर केव्हढा प्रचंड कालवा झाला या ठिकाणी. आमचेच सहकारी पक्षाचे लोक होते ते. आमचे तळ्यात मळ्यात असे पहाटेचे पुरोगामी धोरण असल्याने आम्ही काय त्यात भाग घेतला नाही. म्हटलं गावात काही काही लोक पाटलाच्या घरासमोर कालवा करतात. पाटील बघतो किती लोकांचा मोर्चा आहे. जास्त असेल तर गच्चीवर जाऊन बाजल्यावर पडून घोरत बसतो. थोडे असतील तर दोघा चौघांना बोलावून हाग्या दम देतो मग परत मोर्चा निघत नाही. म्हटलं ही अशीच मंडळी आहेत, शांत होतील, तेव्हड्या वेळात काही जमिनींचे सातबारे वेळ न दवडता आपण नावावर करून घेऊ शकतो.
आमचा हाच बाणा समजणारे ठकराल वकील हे अत्यंत व्यवहारी आणि धूर्त असे वकील होते, त्यांना आमच्या पक्षात कधीही वेलकम होतं, पण आमच्या आधी आमचे मित्र हसणवीस यांनी त्यांना पवित्र करून घेतलं असतं. ठकराल वकीलांना कळत होतं की बाबा जर समोरचा नट गिरीश कर्नाड किंवा श्रीराम लागू किंवा गेला बाजार सुधीर दळवी असेल तर तो जन्मत:च निर्दोष असणार आहे. आता सुधीर दळवी आणि ए के हंगल हा असहाय्यतेचा भयंकर कॉम्बो पॅक बघून कुणी पण गलितगात्र झाल्याशिवाय़ राहणार नाही याची जाणिव दिग्दर्शकाला असतीय अध्यक्षमहोदय. कर्नाड साहेबांचे डोळे तरी बाणेदार दिसत असल्याने ए के हंगल या वकीलामुळे ते फाशी गेले ही मनाची समजूत घालता येतेय या ठिकाणी.
पण खरी गेमच वेगळी. ठकराल वकील दुष्ट असला तरी त्याला संगीत आवडतच होतं. कुणाला नाही आवडत ? करीम लाला, हाजी मस्तान यांना संगीत आवडत नव्हतं का ? दाऊदचं नाव घेतलं तर त्यांचे मित्र नाराज होतील. तर गिरीश कर्नाडच्या पाणी ठिपकणा-या पत्राच्या घरात लाखो रूपयांचा मोठासा ऑर्गन असतो पण हा माठ मनुष्य बायकोला, मुलांना एकच गाणं शिकवत असतो. शेजारपाजारच्यांचं डोकं उठणार नाही तर काय ? मग असे रंजले गांजलेले लोक जर ठकराल वकीलाकडे गेले तर तो काय म्हणणार ?
सावज टप्प्यात आलं की शिकार करणे हा आमचाच बाणा शिकलेले ठकराल साहेब मग खूनाच्या आरोपात गिरीश कर्नाड साहेबांना अडकवतात. खून तर मयताच्या भावानेच केला होता हे आपल्याला लगेच समजतं. ते शीक्रेट ठेवलं तर मग सूड घ्यायला कारण राहील का ? नव्ह नव्हं राहील का ?
वकिलीच्या क्षेत्रात रताळी जमिनीच्या खाली येतात की वरती हे माहीत नसलेले असहाय्य वकील हंगर साहेब ठकराल साहेबांनाच विनंत्या करत असतात. वाटल्यास माझे अशील आळ स्वत:वर घेईल पण फाशी नको, जन्मठेप द्या. पण पॅरोल वर सुटले किंवा दयाळू मोठे साहेब राष्ट्रपती झाले तर दयेचा अर्ज करून हा मनुष्य पुन्हा तेच गाणं पियानोवर वाजवणार नाही याची ग्यारण्टी काय ?
तूइने ई सजाईए हय, मेरे होटों के ए गीत
तेअरी प्रीत से मयरे, जीवन मे बिछिडा सन्गीत
मई हु ईक तस्स वीर तु मेरा, मेरा, मेरा रू उउप रर्यंग हय ए ए ए ए
झिंदगी हर्र्र कदम ईक इन नई झंग हय
---------------------------------------------------
असा यक पिच्चर बगितला लका.
उगीचच राजकारण घुसडल्याने एका
उगीचच राजकारण घुसडल्याने एका चांगल्या रिव्हुची वाट लागलेली आहे.
सुरुवात करताच कळ्ळं कुणी
सुरुवात करताच कळ्ळं कुणी लिहिले असेल त्यामुळे पुढं वाचलंच नाही.
मला आवडला रिव्ह्यू
मला आवडला रिव्ह्यू
आवडला रिव्ह्यू
आवडला रिव्ह्यू
मला तर कळलाच नाही
मला तर कळलाच नाही
राजकारण आपला चहाचा प्याला नाही हेच खरे..
अमेझॉन प्राईम वर The
अमेझॉन प्राईम वर The Voyeurs पाहिला . प्रौढांसाठी आहे. लैंगिक दृश्ये आहेत म्हणून मुले घरात नसतानाच बघा. स्वताच्या आयुष्यापेक्षा दुसर्याच्या आयुष्यात काय चालू आहे ह्या कडे जास्त लक्ष दिल्याचे काय परिणाम होऊ शकतात आणि काहीतरी वेगळं करण्याच्या नादात लोक किती टोकाला जाऊ शकता हे दाखवलय.
काल एएमसी थेटरमधे ‘रेस्क्यु’
काल एएमसी थेटरमधे ‘रेस्क्यु’ डॉक्युमेंट्री पाहिली. थायलंडच्या गुहेत अडकलेली १३ मुलं व कोच यांच्या सुटकेवर. जबरदस्त आहे. कदाचित जगातली सर्वात अवघड सुटका असेल ही. तुमच्या गावात लागली असेल तर जरूर पहा जमल्यास.
सरदार उधम मध्ये जालियनवालाचा
सरदार उधम मध्ये जालियनवालाचा सीन जबरी शुट केला आहे. वेश भुशा आणि वातावरण निर्मिती उत्तम पण बाकी चित्रपट थोडा
लांबला गेला.
अरे, बाँड मुवि कोणि बघितला कि
अरे, लेटेस्ट बाँड मुवी कोणि बघितला कि नाहि? नो टाइम टु डाय = नो टाइम टु वॉच?
एनिवे, बाँडची ह्युमन साइड प्रथमंच दिसली या फ्रँचाय्ज मधे. डबल ओ सेवन ने आता कात टाकली आहे असं म्हणु शकतो.. लिटरली अँड फिगरेटिव्ली...
भारतात सगळेच हिरोज जेम्स
भारतात सगळेच हिरोज जेम्स बॉण्ड शाळकरी वाटेल इतके पावराफुल्ल असतात, त्यामुळे बॉण्डमूव्हीज बाळबोध वाटतात.
अरे, लेटेस्ट बाँड मुवी कोणि
अरे, लेटेस्ट बाँड मुवी कोणि बघितला कि नाहि? नो टाइम टु डाय
>> ३०. सप्टेंबरलाच... (पान नं ५६ वर शेवटची कमेंट), अन ३ ऑक्टोबरला परत...
टायटल क्रेडिट्सच्या शेवटी आलेली लाईन वाचलीत का?
अरे, लेटेस्ट बाँड मुवी कोणि
अरे, लेटेस्ट बाँड मुवी कोणि बघितला कि नाहि? नो टाइम टु डाय>> इथे २२ ला थेटरं उघडली. मी रविवार चे बुकीं ग केल्यालें पण आयत्यावेळी आळस केला उन्हे इतकी होती की घराबाहेर पडायचाच उत्साह गेला. इथे आय मॅक्स थ्रीडी उपलब्ध आहे. शनिवार को देखेंगे मूड है तो.
डायबक - प्राईम व्हिडीओ.
डायबक - प्राईम व्हिडीओ.
हॉरर असेल तर महेश भटच्या सिनेमातली अनेक दृश्ये येऊन गेली आहेत. ८० च्या दशकातल्या इंग्रजी हॉरर चित्रपटाच्या जातकुळीतला आहे. एक्झॉरसिस्ट / ओमेन सारखी हाताळणी आहे. सुरूवात संथ आहे. पण लगेचच पटकथा विषयावर येते. यहुद्यांची पार्श्वभूमी वेगळी वाटली. मॉरीशस मधे कथा घडते. पण तिथली बाहेरची दृश्ये खूप कमी आहेत.
हॉण्टिंग - शाप - मग हॉण्टिंगमागच्या मूळ कथेचा शोध आणि त्याचे उपाय यावरच्या चर्चा आणि शेवटी कर्मकांड या क्रमाने चित्रपट संपतो. इम्रान हाश्मी हा चुंबनदृश्याखेरीज हॉरर पटाचा स्पेशालिस्ट अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. बिपाशा बासू यात नाही. बरेचसे चेहरे ओळखीचे वाटतात पण नावे शेवटी पहावी लागतात.
काल अर्धा पाहिला , आज अर्धा पाहिला. त्यामुळे असेल कदाचित प्रभावी वाटला नाही.
डायबक - प्राईम व्हिडीओ.
डायबक - प्राईम व्हिडीओ.
हॉरर असेल तर महेश भटच्या सिनेमातली अनेक दृश्ये येऊन गेली आहेत. ८० च्या दशकातल्या इंग्रजी हॉरर चित्रपटाच्या जातकुळीतला आहे. एक्झॉरसिस्ट / ओमेन सारखी हाताळणी आहे. सुरूवात संथ आहे. पण लगेचच पटकथा विषयावर येते. यहुद्यांची पार्श्वभूमी वेगळी वाटली. मॉरीशस मधे कथा घडते. पण तिथली बाहेरची दृश्ये खूप कमी आहेत.
हॉण्टिंग - शाप - मग हॉण्टिंगमागच्या मूळ कथेचा शोध आणि त्याचे उपाय यावरच्या चर्चा आणि शेवटी कर्मकांड या क्रमाने चित्रपट संपतो. इम्रान हाश्मी हा चुंबनदृश्याखेरीज हॉरर पटाचा स्पेशालिस्ट अभिनेता म्हणूनही ओळखला जातो. बिपाशा बासू यात नाही. बरेचसे चेहरे ओळखीचे वाटतात पण नावे शेवटी पहावी लागतात.
काल अर्धा पाहिला , आज अर्धा पाहिला. त्यामुळे असेल कदाचित प्रभावी वाटला नाही.
Pages