बेल बोटम परीक्षण ,बुद्धिबळाचा अव्वल खेळ

Submitted by हस्तर on 29 September, 2021 - 04:52

बेल बोटम परीक्षण ,बुद्धिबळाचा अव्वल खेळ
देव आनंद साहेबांचा चा अव्वल नंबर आठवतो ? त्यात देव आनंद क्रिकेट टीम चा अध्यक्ष पण असतात,पोलीस कंमीनेर पण असतो(dig ) ,बोर्ड प्रेसिडेंट पण असतो ,हेलिकॉप्टर मध्ये बसून जमिनीवरच्या लोकांशी बोलू शकता आणि चक्क cindy crowferd च्या पोटी जन्म घेतात

अक्षय कुमार इंटरनॅशनल चेस प्लेअर असतो ,upsc चा अभ्यास पण करतो ,जर्मन आणि फ्रेंच पण येते ,चित्रपटात सगळे हिरो गाणे गातात पण हा ऑफिसिअल्ली गाणे गातो आणि ते पण आई बायको ह्यांची जबाबदारी सांभाळून
(आणि जसा बायकांचा समाधान होत नसते ,टिपिकल बायकांसारखे त्याची बायको म्हणते फुटबॉल खेळ,स्टॅमिना वाढेल )
आणि हो ,इंदिरा गांधी ह्यांना डायरेक्ट सल्ला देतो ना विचारता
वाणी कपूर ने ह्या आधी फक्त ३ रोले केले होते आणि ह्यात पण छोटा रोल आहे ,पण पण पण चित्रपटाच्या शेवटी २ जबरदस्त ट्विस्ट आहे ज्यामुळे तमाम महिलामंडळाला हा चित्रपट खास आवडेल ,वाणी कपूर आणि हुमा दोघींचे रोल खास आहेत

मध्यंतराआधीच भाग तास कंटाळवाणा आहे ,पण नंतर मजा येते
बुद्धिबळासारखे डाव प्रतिदाव, जे लोग बुद्धिबळ खेळात नाहीत त्यांना समजणार नाही पण बरेच कन्सेप्ट इथे टाकण्यात आले आहे

कंटाळवाणा भुज बघून वैतागलेअसाल तर नक्की बघा ,
अक्षय कुमार सहसा पाकिस्तान विरोध भूमिका घेत नाही पण बहुतेक पहिल्यांदा त्याने असा रोल ,केलाय बेबी मध्ये पण सरळ सरळ पाकिस्तान विरोधी नव्हता
सगळ्यात जास्त कमाल मेकअप आर्टिस्ट्स ची,लारा दत्ता ला इंदिरा गांधी हुबे हब केले ,दुसरिकोनी असती तरी फरक नसता पडला ,तिचा बहुतेक अक्षय बरोबर १३ वा चित्रपट आहे

पण बाकी चित्रपट बघतात मजा येते ,बघूनच घ्यावा ,महाराष्ट्रात चित्रपट गृहे खुलेहोते आहे ,किंवा ऍमेझॉन prime वर पण आला आहे

बाकी जास्त परीक्षण देता येते नाही ,स्पॉईलर्स येतील,प्रतिसाद देतानां पण स्पॉईलर्स चे ध्यान ठेवावे हि माफक अपेक्षा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

लाराचा एक स्पॉईलर टाकलात की ओ... मलाही बायकोने मध्येच सांगितले तेव्हा कळले.

पण पण पण चित्रपटाच्या शेवटी २ जबरदस्त ट्विस्ट आहे ज्यामुळे तमाम महिलामंडळाला हा चित्रपट खास आवडेल
>>>>>>
मला नाही वाटत त्या ट्विस्ट मध्ये खास महिलांना आवडावे असे काही आहे.
त्यातही दुसरा म्हणजे अगदी शेवटचा म्हणत असाल तर तो आपलं बस गंमत म्हणून आहे

ओवरऑल पिक्चर बघायला काही हरकत नाही. टिपिकल अक्षय कुमार छाप आहे. मला तरी वन टाईम बघायला आवडला.

पूर्वार्ध भयानक कंटाळवाणा आहे. One time watch आहे.
बेबी कधीही पाहू शकते , हा परत अजिबात बघणार नाही.
वाणी कपूर यात बरी दिसतेय , पण तिच्या ऐवजी कोणीही चालली असते.

त्या वरच्या लिंकमधील परीक्षणात नुसती टिकाच भरून ठेवली आहे. पुर्वग्रहदिषित नजरेने पिक्चर बघून जे लिहायचे होते तेच लिहिलेय असे वाटते. एका कलाकृतीचे परीक्षण नाही तर नुसते आपला अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेले वाटतेय.

सखीयांनी मैनू मेहने मार दिया गाणेही छान आहे नाचायला. मी गणपतीतच संगीत खुर्चीत पहिल्यांदा ऐकले होते.
https://www.youtube.com/watch?v=PO6nynliE0Q

परीक्षणात संगीताबद्दल कोणी काही लिहिणार नाही तर गाणी समजणार कशी आम्हाला..

आपने कहा गांधी के देस से आये है, लेकीन हम बोस के देस के भी है... एक रॉ एजंट संयुक्त अरब एमिरेट्सच्या अरबाला, ज्याने विमान उतरवण्याची परवानगी दिली. त्याला सुनावतो हे मनोरंजक होतं. बाकी अक्षयकुमारचे अजून दोन चित्रपट आहेत ज्यात पाकिस्तानचे नाव आहे. एक हॉलिडे आणि दुसरा अजून एक आहे. देशभक्तीचा डोस पाजता पाजता संघाची ट्यून वाजायला लागली की मज्जा येते. भूज मधे अहिंसा म्हणजे काय हे अजय देवगण गावक-यांना सांगतो. धमाल.

रामनाथ काव हे त्या काळातले गाजलेले रॉ अधिकारी. ते पहिले री चीफ. ही संस्था इंदिरा गांधी यांच्या काळातली होती. राव यांना या पदावर त्यांनीच आणले. त्यांच्यावर इंदिरा गांधीचा विश्वास होता. या अपहरणाच्या वेळी इंदिरा गांधी यांनी काव यांना को ऑर्डिनेटर बनवले होते. एक रॉ एजंट सल्ले देतो वगैरे हिरोगिरी साठी ओके.
एक भन्नाट सत्यकथा अनावश्यक हिरोगिरी मुळे वाया गेली. शेवटच्या ऑपरेशनच्या वेळी हिरोगिरी दाखवायला फुल्ल स्कोप होताच की.

यात पण रिमेक गाणे आहेच का, प्रत्येक नवीन बॉलिवूड चित्रपटात असते तसे.
गीतकारांना काही सुचतच नाही वाटत.

अक्षरनामा मध्ये ज्याने लिहिले आहे इंग्लिश रिव्हिव्ह आणि युट्युब वरून घेतले आहे
चित्रपट मध्ये खूप मोठी चूक AM चे PM करताना आहे ,त्यातच ३ ४ चुका होत्या पण कोणालाच कळाले नाही

रामनाथ काव वगैरे सिनिअर लोक ,ग्राउंड टीम ला नेहमी जास्त माहिती असते
core टीम एका वेळी एकाच विषय हाताळत नसते ,त्यामुळे हाताखालच्या माणूस जास्त माहित ठेऊ शकतो ,नोकरी करणारे लोक समजू शकतील

३इडियट च्या कादंबरीत ३ हि मित्र हुशार होते ,पण चित्रपट मध्ये फक्त अमीर खान हुशार दाखवला तसेच चित्रपट अक्षय कुमारची फक्तमार्केट value असल्याने त्यालाच हुशार दाखवणार
आणि नशिबाने हेर सापडू शकतो ,बेबी मध्ये पण तसेच दाखवले होते

टोलवा टोलवी तर सगळेच सरकारी खाते करतात ,एका पण सरकारी नोकरी करणार्याने माझे म्हणणे खोडून दाखवावे

इंदिरा गांधी ह्यांचे एक वाक्य प्रोप्या गंडा नक्की आहे पण त्यांच्या
व्यक्ती मत्त्वाला साजेसे आहे

अजेंडा डोळ्यासमोर ठेऊन बनवलेला चित्रपट चालतो मग परिक्षणानेच काय घोडे मारले आहे?
>>>

अश्या व्यावसायिक चित्रपटांचा मुख्य अजेंडा एकच असतो - लोकांचे मनोरंजन करणे आणि पैसा कमावणे
त्यावर भाष्यच नसेल तर काय अर्थ आहे चित्रपटाच्या परीक्षणाला.
आम्ही चित्रपटप्रेमी वाचक काहीतरी अपेक्षेने परीक्षण वाचतो की त्यात चित्रपट एक कलाकृती म्हणून कसा आहे हे समजावे. तर यांचे आपले भलतेच.
आणि अजेंडा ठेवून लेख म्हणून लिहायचे असतील तर खुशाल लिहावेत, फक्त त्यांना परीक्षण म्हणून नये वा चित्रपट विभागात टाकू नये. राजकारणात लिहावे ईतकेच Happy
(ती लिंक माबोची नाहीये हे माहीत आहे. तरी हे चित्रपट विभाग आणि राजकारण विभाग हे उदाहरण मुद्दा क्लीअर व्हायला लिहिले आहे)

ऋन्मेष , हस्तर हा तुझाच आयडी आहे असे त्या दुस-या धाग्यावर म्हणत होते ना ? चित्रपट पाहिला का ? तिकडे विषयांतर झाले असते. इथे उत्तर देऊ शक्तो.

ऋन्मेष , हस्तर हा तुझाच आयडी आहे असे त्या दुस-या धाग्यावर म्हणत होते ना? >>>>>> म्हणू दे की, मला आवडते अशी चर्चा झालेली.

चित्रपट पाहिला का? >>> हो, प्राईंमवर आला तसा लगेच. फार आवडला नाही. पण झोडावे असेही काही वाटले नाही.

ऋन्मेष , हस्तर हा तुझाच आयडी आहे>>>
ओह असे आहे होय
चला मग कल्टी मारावी आता इथे याचा कलगीतुरा कोण बघत बसणार

शांत माणूस ---- ऋन्मेष , हस्तर हा तुझाच आयडी आहे असे त्या दुस-या धाग्यावर म्हणत होते ना?

आशूचँप ----- ऋन्मेष , हस्तर हा तुझाच आयडी आहे >>> ओह असे आहे होय

ऋन्मेष ------ मला आवडते अशी चर्चा झालेली Happy

पण तरी अवांतर टाळूया हि विनंती Happy

ऋन्मेष, तो धागा चित्रपट कसा वाटला किंवा चित्रपट यापैकी एक होता. तिथे ती चर्चा चालू होती. मी तिथे मला वाटते हा चित्रपटविषयक धागा आहे अशी कमेण्ट केली होती. त्यानंतर ती चर्चा थांबली. आता त्या पोस्टी उडवताना माझीही कमेण्ट उडाली आहे. पण ती चर्चा हस्तर बद्दल नसून कटप्पा बद्दल होती हे आत्ता आठवले. त्यामुळे संपादीत करता येत नाही. बाकी अवांतराबद्दल सहमत.

शांत माणूस ओके आणि गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद
कटप्पा मीच आहे
अश्या चर्चा वरचेवर रंगत असतात
अहो आशूचँप परत या, हस्तर वेगळेच आहेत Happy

अक्षरनामा मध्ये ज्याने लिहिले आहे इंग्लिश रिव्हिव्ह आणि युट्युब वरून घेतले आहे

त्या वरच्या लिंकमधील परीक्षणात नुसती टिकाच भरून ठेवली आहे. पुर्वग्रहदिषित नजरेने पिक्चर बघून जे लिहायचे होते तेच लिहिलेय असे वाटते.

>>>

रवि आमलेंनी, ज्यांनी अक्षरनामातील परिक्षण लिहिले आहे, मराठीत "रॉ" या संस्थेच्या इतिहासावरील पुस्तक लिहिले आहे. हे बहुतेक पत्रकार असावेत. मी पुस्तक वाचलेले नाही. पण पुस्तकाबद्दल चांगले रिव्युज वाचले आहेत. पण त्यांना रॉ या गुप्तचर संस्थेबद्दल चांगल्यापैकी माहिती असणार. तेव्हा त्यांनी लिहिलेले हे सिनेमाचे परिक्षण त्या परिप्रेक्षातून पाहायला हवे.

बी रमन या ज्येष्ठ रॉ अधिकार्‍याचे 'काओ-बॉइज ऑफ रॉ' हे पुस्तक वाचले आहे (The Kaoboys of R&AW). रॉ या संस्थेत काम करणार्‍या अधिकार्‍याने लिहिलेले हे पहिले पुस्तक. नंतर ए एस दुलत यांनी एक दोन पुस्तके प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके वाचली असल्याने अक्षरनामात लिहिलेल्या रवि आमलेंचा लेखातील तगमग जाणवली.

अच्छा तरीच ते परीक्षण त्याभोवती फिरत होते. म्हणजे मला या परीक्षणातील वेगळेपण बरोबर जाणवले तर ..
अश्यावेळी लेखकाने आपल्या या विषयातील अभ्यासाबद्दलही सांगावे असे वाटते. जेणेकरून त्या माहितीची विश्वासार्हता वाढते. वाचकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचते.

अर्थात त्यातही हल्ली अतिराष्ट्रवादाचा प्रोपगंडा असतो वगैरे टाळता आले असते. हे चित्रपटसृष्टीत पूर्वापार चालत आले आहे. अतिराष्ट्रवाद असो वा सर्वधर्मसमभाव असो वा उत्कट प्रेम असो. यात काही नवीन असे नाहीये. जोपर्यंत अमुकतमुक दाखवल्यावर चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालतात तोपर्यंत दिग्दर्शक ते दाखवत राहणारच. व्यवसाय आहे हा.

ऋन्मेऽऽष +१
रॉ ची बदनामी! बापरे!!! चित्रपटात काही बाही मनचं दाखवलं की रॉची बदनामी होते हे माहित न्हवतं. अहो मनोरंजन आहे ते. बॉलिवुड हिरो पुढे पंतप्रधान, रॉ प्रमुख किस झाड की पत्ती होणारच! यात काही बदल झाला तर ती न्यूज. बाकी हे नेहेमीचंच नाही का? आणि केली रॉची बदनामी तर काय झालं? ते काय मोदी आहेत का बदनामी सहन न व्हायला. Wink
बाकी चित्रपट टिपिकल अक्षयकुमारचा असतो तस्साच आहे Proud

आता एखाद्या कुस्तीवीराला तुम्ही सुलतान हा चित्रपट दाखवाल तर तो त्याचे कुस्तीप्रेमातूनच विश्लेषण करून शंभर चुका काढेल आणि चित्रपटाला अर्धा स्टारच देईल. पण त्यावर विश्वास ठेऊन जर एखादा चित्रपटप्रेमी सुलतान बघत नसेल तर तो एका मनोरंजनाला मुकेल.

अर्थात, अश्या अभ्यासू व्यक्तीमत्वांबद्दल आणि त्यांच्या भावनांचा आदर आहे. फक्त त्यांनी चित्रपट हे असेच असतात हे समजून घ्यायला हवे.

राहिली रॉ आणि कुस्तीबद्दल चुकीची माहिती जाणे.. तर प्रेक्षकांना कळते हो अक्षय कुमार, सलमान खान, अफगाण जलेबी कतरीना कैफ सोबत नाचणारा फॅण्टम सैफ अली खान, तो एकहाती सिरीयातल्या दहशतवाद्यांना चारीमुंड्या चीत करणारा बागीचा टायगर श्रॉफ यांचे पिक्चर किती सिरीअसली घ्यायचे.

आणि तरीही बदनामीच म्हणायचे झाल्यास आपल्याकडे दर तिसऱ्या चित्रपटात पोलीस यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेची बदनामी वर्षानुवर्षे होतच आहे. तेच जवानांची बिलकुल होत नाही. त्यांचा नेहमी गौरवच होतो.

असो, पण तरीही अक्षयकुमार रॉ च्या माध्यमातूनच लढला. म्हणजे हा सत्यकथेवर आधारीत पिक्चर बघितल्यावर माझ्या बायकोचे भाव तरी असेच होते की आपली रॉ च भारी आहे Happy

प्रॉब्लेम हा नाही की चुका आहेत पिक्चरमध्ये , प्रॉब्लेम हा आहे की माणसाचे (खर्‍या) नाव घेऊन त्यात खोट्या गोष्टी दाखवल्या आहेत. जर का खोटी नावे घेतली असती तर काहीच प्रॉब्लेम नव्हता ना.

टणाटण वाल्यांनी २०२१ मधे तिसरे महायुद्ध होऊन ५०% लोकसंख्या कमी होणार असे सांगितले आहे. ही माहिती सूक्ष्म ज्ञानाद्वारे मिळाल्याचे म्हटले आहे. रॉ ने त्या वेळी त्यांची मदत घेतली असेल का ? सिनेमात काहीच उल्लेख नाही.

प्रॉब्लेम हा आहे की माणसाचे (खर्‍या) नाव घेऊन त्यात खोट्या गोष्टी दाखवल्या आहेत.
>>>>
ये बात भी सही है.. अश्या केसमध्ये ती खरी नावाची व्यक्ती वा ती जिवंत नसल्यास तिचे वारस नक्कीच आक्षेप घेऊ शकतात.
यावरून आठवले. काल अम्मांचा थलैवी पाहिला. त्यात कित्येक राजकारण्यांची नावे खरीच होती. जे दाखवले ते सारे खरेच होते का हा आता प्रश्न पडलाय.

रवि आमलेंनी, ज्यांनी अक्षरनामातील परिक्षण लिहिले आहे, मराठीत "रॉ" या संस्थेच्या इतिहासावरील पुस्तक लिहिले आहे. हे बहुतेक पत्रकार असावेत. मी पुस्तक वाचलेले नाही

पण हे मुद्दे यतुट्युब वर आलेले होते

खर्‍या माणसांची नावे घेऊन फिक्शनल चित्रपट, टीव्ही शोजची भारतात, अमेरिकेत, इंग्लंडात... सगळीकडे परंपरा आहे की! आणि वारसांना काय कामंधंदे नसतातच. आपले पेशवे (म्हणजे आयडी न्हवे Proud ) गेलेलेना बाजीराव- काशीबाईला नाचवली म्हणून. त्यांचं काय इतकं मनावर घ्यायचं! बाकी याने काळ सोकावतो, इतिहास बदलला जातो असं म्हणायचं असेल तर मग गंमतच आहे. आपल्याकडे व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्डने ही इतिहास बदलतो असा आपला ठिसूळ इतिहास!

अरे हो, बाजीराव काशीबाई यांचीही खरी नावेच वापरली जातातच की..

किंबहुना माझ्याही डोक्यात मगाशी ते तान्हाजी आलेले. लिहायचे राहिले. तानाजींच्या नावावर काय स्पेशल ईफेक्टवाला बंडल सिनेमा बनवलेला. त्यांचा चित्रपट असा बाहुबलीछाप बनवणे मलाही तेव्हा त्यांचा अपमानच वाटलेला. पण आजूबाजूचे सारे आवडीने ती ॲक्शन एंजॉय करत होते म्हणून मग सोडून दिले.

मला तसा आवडला होता तान्हाजी(तानाजी).आईला पण आवडला.
पण झिपलाईन करणारा तान्हाजी बघून अंमळ गंमत वाटलीच. अजय देवगण रोलच्या दृष्टींने थोडा वयस्क दिसतो हेही वाटलं.पण बरोबर नेलेल्या लहान मुलांना खूप आवडला.

Pages