चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिमी पाहिला
बराय
पाहिला नाहीतरी आयुष्यात फरक पडत नाही Lol

मिमी पाहिला
बराय
>>> हो बरा बराच आहे.

कासगंज - छान सस्पेन्स थ्रिलर आहे. वकार शेखला पंचवीस वर्षांत पहिल्यांदाच इतकी महत्वाची पूर्ण लांबीची भूमिका करताना पाहिलं आहे. हेतल गदा (क्राईम पेट्रोल आणि धनक फेम) व सरगुण कौर लुथ्रा या मुलींनीही उत्तम काम केलं आहे.

सिनेमा म्हणण्यापेक्षा इन हाऊस नाटक आहे. त्यामुळे संवाद भरपूर आहेत आणि प्रत्यकाच्या अभिनयाला चांगलाच वाव आहे. थिएटरच्या तालमीत घडविल्याप्रमाणे सर्व सातही कलाकारांनी पुरेपुर न्याय दिला आहे.

काल हॉटस्टारवर 'निरोप' नावाचा सचिन कुंडलकर दिग्दर्शित चित्रपट पाहिला. (पाहण्याचं कारण- त्याला २००७ चं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचं राष्ट्रीय पारितोषिक आहे. म्हणून नवऱ्याला वाटलं होतं की चांगला असेल) पण काहीच्या काही आहे! काय सांगायचंय तेच कळत नाही, अनेक असंबद्ध दृश्यं आहेत. काही काही पात्रं आणि घटना त्यात का आहेत तेच कळत नाही! बटबटीतपणा आहेच.
(नंतर २००७ सालचे इतर मराठी चित्रपट कुठले आहेत ते बघितलं तर चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'कदाचित' दिसला. तो सोडून याला का नॅशनल अवॉर्ड दिलं ते कळलं नाही.)

जाऊद्याना बाळासाहेब या चित्रपटाचा ट्रेलर आत्ता पाहिला . ट्रेलरवरुन इंटरेस्टींग वाटतोय. कुणी पाहिलाय का? कसा आहे?

संदीप अँड पिंकी फरार इतक्या दिवसांनी बघितला. मला खूप आवडला. २ तास खिळवून ठेवले.

का फ्लॉप झाला हा चित्रपट ? फालतू टिपिकल मूवी गाजतात. मग असे विषय व हाताळणी असलेले सिनेमे जर फ्लॉप होत असतील तर मग बॉलीवूडला दोष देण्यात अर्थ नाही.

ऍमेझॉन प्राईम वर peanut butter falcon नावाचा सिनेमा पाहिला. कथेचा जीव छोटा आहे, सर्व कलाकारांची कामे उत्तम आहेत. कोणताच अभिनिवेश नाही, सामाजिक प्रश्नावर भाष्य नाही, दुःख नाही आणि आनंद नाही. तरीही खूप काही देऊन गेला हा चित्रपट. जरूर पहा Happy

अर्जुन कपूर चा पिक्चर बघायचा या कल्पनेने घाबरले होते.शिवाय नावावरून उगीच काही अंदाज बांधले जातात.थिएटर ला म्हणून तर पाहिला गेला नाही.
पण चांगला होता.ट्रेलर आणि नावं कशी दिशाभूल कायुन एखाद्या अत्यंत टुकार पिक्चर ला इंटरेस्टिंग दाखवतात, आणि ट्रेलर बघून एखादा चांगला पिक्चर अगदी नेहमीचा टिपिकल असेल म्हणून बघायचा बाजूला ठेवला जातो.

नेफ्लि व्वर फिल्स लाईक इश्क नावाचा सिनेमा पाहिला... ४वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम हा सगळ्या गोष्टीतला बेस. स्टार होस्ट आणि क्वारंटाईन क्रश मस्त आहेत. हलक्याफुलक्या.

१४ फेरे पाहिला हलका फुलका आहे फक्त शेवट जमला नाही.
पण पाहिला तरी बोर नाही विक्रान्त मासी आणि क्रिती खरबंदा दोघे फ्रेश आहेत आणि काम छान करतात!

शेरशाह पाहिला काल‌. चांगलाय. लव्ह स्टोरी पण आहे पण नंतर युध्दाच्या प्रसंगापासून सिनेमा पकड घेतो. कॅप्टन विक्रम बत्रांची कामगिरी आणि सिध्दार्थ मल्होत्राकरता वन टाईम वॉच नक्की आहे.

ट्रेलर मध्ये ती लव्ह स्टोरी, कियारा चा आता स्टीरिओटाईप रोल, किसिंग सिन आणि करणं जोहर निर्माता बघून इच्छाच मेली बघायची
आणि सिद्धार्थ मल्होत्रा सारखा अभिनयसम्राट

नाही, त्याचाही ट्रेलर बघितला फक्त
आणि तो शेरशहा पेक्षा भयानक वाटला
जुबा केसरी, सोबत सोनाक्षी सिन्हा आणि प्रगऐतिहासिक काळातील ग्राफिक्स

Pages