चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राखी पौर्णिमा कशी ओळखली??>> अरे नाही काल आपल्या इथे होती ना. ? जोक होता तो.>>> सही.

मला पौर्णिमा चर्चा आवडली, रात बन गयी.

ह्या सीनला लेड झेपलीन गृपचे द इमिग्रं ट साँग हे गाणे घेतले आहे व अगदी चपखल बसले आहे. हा सीन नक्की बघा. मस्त जमला आहे. -> माझा एकदम आवडता सीन आहे तो..स्पेशली बॅकग्राउन्ड सॉन्ग मुळे.. बाकी मूव्ही पण टाईमपास आहे..कितीदाही बघू शकते मी!

पृथ्वीराज नलवडे यांचा भुज रिव्ह्यु भयानक आहे. हसून वाट लागली.

मला आत्ताच लागलेला ‘डोंट ब्रीद २‘ व्हायलन्स असला तरी आवडला. AMC Theatres मधे मेंबरशीप सुरु केली त्यामुळे रतीब चालु झाला.

डायल १०० बघितला. ठीक ठाक वाटला. सर्वांची कामे चांगली झालीत. मनोज वाजपेयीला समोर ठेवून ह्या चित्रपटाची कथा लिहीली असावी.

पोलिस ऑफिसरचा मुलगा ड्रग्ज विकत असतो आणि त्याच्यावर आधीपण काही कारवाई झाली नसते हे पटले नाही.

साउथच्या चित्रपटाचे चाहते असाल, फुल्ल कॉमेडी, अ‍ॅक्शन, ड्रामा, ईमोशन तर हा जरूर बघा

MCA Action Hindi Dubbed Full Movie | Nani, Sai Pallavi, Bhumika Chawla, Vijay Varma, Rajeev
https://www.youtube.com/watch?v=Pf2hwLxU0zQ

अर्धा पिक्चर पाहिल्यावर मला आठवले की सुरुवातीला हिरोच्या अचाट स्मरणशक्तीचा जो शॉट आहे त्याचा चित्रपटाशी काहीही संबंध दिसत नाही. चुकून दुसर्‍या पिक्चरची क्लिप मिक्स झाली असावी असे वाटले. मग क्लामॅक्स आला आणि बस्स... पण मस्त आहे, कुठेच ईतकुसाही बोअर नाही झालो. महिन्याभराने पुन्हा बघू शकतो.

Cruella हा चित्रपट हॉटस्टारवर पाहिला. एकदम मस्त कॉमेडी चित्रपट आहे. एमा स्टोन आणि एमा थॉमसन यांचा अभिनय जबरदस्त.

लहान मुलांसाठीच चित्रपट आहे त्यामुळे सर्वांबरोबर बघू शकता.

मिमि पाहिला विकेंडला नेटफ्लिक्स वर. छान आहे. विषय गंभीर आहे, पण सादरीकरण थोडं हलकं फुलकं ठेवूनही कुठे विषयाशी फारकत घेत नाही सिनेमा. क्रिती सनॉन ने भुमिकेसाठी कष्ट घेतले आहेत. सई ताम्हणकर, पंकज त्रिपाठी, मनोज पहावा, सुप्रिया पाठक सगळ्यांची कामं सुंदर आहेत.

प्राईम व्हिडिओवर #Home हा मल्याळी चित्रपट पाहिला. आवडला. आपल्या मुलांशी कनेक्ट होण्याची धडपड करणाऱ्या वडिलाची कथा छान दाखविली आहे.

हो कालच पहिला
फार सुंदर घेतलाय
आणि उगाच इमोशनल नाही, हलका फुलका आहे

मी हि पाहिला होम.
आवडला.. छानच आहे..
मी आतापर्यंत पाहिलेल्या मल्याळम सिनेमांचे एक वैशिष्ट्ये, निसर्ग फार सुंदर दाखवतात अगदी एका घरात फक्त सिनेमा असेल तरी आजुबाजची हिरवाई असतेच असते, बघायला फार मस्त वाटते.

हो मला त्यांचं घर पण अफाट आवडलं
ती बाग, त्या मुलाची खोली, डायनिंग रूम
लाकडी खिडक्या कसलं अप्रतिम आहे
घर एकदम बोलकं आहे

येस्स.
नवा मल्याळम kuruthi पाहिलाय का कुणी?(प्रुथ्वीराज सुकुमरन)
मस्त आहे ..सस्पेन्स, थरारक..एका रात्रीत,आजुबाजुला जंगल असलेल्या एकाच घरात घडणारे थरार नाट्य. सिनेमा संपेपर्यंत जागचं हलु न देणारं कथानक.
(प्राईमवर)

काल Cinderella बघायला सुरुवात केली.
मस्त , मस्त , मस्त movie आहे.

सिंड्रेला ची सावत्र आई वाईट आहे , तिला त्रास देते पण क्रूर नाही.
बहिणी तिच्याशी प्रेमाने वागत नाहीत पण तिचा द्वेष,छळ करत नाहीत. आणि ही सिंड्रेला गरीब बिचारी रडकी अबला नारी नाही. She is witty , smart , ambitious .
एक woman empowerment आणि gender equalityचा tone आहे.
Musical , humorous family entertainment आहे.

She is witty , smart , ambitious .
एक woman empowerment आणि gender equalityचा tone आहे.
>>>>>

अगदी अगदी... मी सुद्धा चार दिवसांपूर्वीच पाहिला. हेच मनात आले. आणि हेच आवडले.. भले सावत्र कुटुंब छळतेय पण लाचार नाही दाखवली.. आणि दिसायलाही किती सुंदर होती Happy छान फिल गूड पिक्चर होता. गाणीही आवडली. शेवटचे स्टेज शोचे रीपीट पाहिले.

अगदी अगदी... मी सुद्धा चार दिवसांपूर्वीच पाहिला. हेच मनात आले.
<<<
४ दिवसांपूर्वी ?? ट्रेलर पाहिलं का तुम्ही ४ दिवसांपूर्वी ?
कारण मुव्ही प्राइम वर ३ सप्टेंबरला रिलिज झालाय.

ओके मग ३ ला पाहिला असेल.. रीलीज झाल्याझाल्या बारानंतर.. हा आठवडा सुट्टीवर आहे रोज दोन तीन पिक्चर बघतोय. त्यामुळे चार पिक्चर आधी पाहिलेला चार दिवस आधी पाहिल्यासारखे वाटले असावे. सारे बायकोच ठरवते आणि लावते. त्यामुळे हा न्यू रिलीज आहे हे सुद्धा मला आताच समजले.

साउथच्या चित्रपटाचे चाहते असाल, फुल्ल कॉमेडी, अ‍ॅक्शन, ड्रामा, ईमोशन तर हा जरूर बघा

MCA Action Hindi Dubbed Full Movie | Nani, Sai Pallavi, Bhumika Chawla, Vijay Varma, Rajeev
https://www.youtube.com/watch?v=Pf2hwLxU0zQ

>>आज पाहिला... छान आहे... तो हिरो आधी ललित प्रभाकर, मुक्ता बर्वे कॅटेगरी वाटत होता, काही एक्सप्रेशन्स दिसतच नव्हते, पण साधारण वीस मिन नंतर मस्त एक्सप्रेशन्स आणि अभिनय...

मला तर साऊथच्या मसालापटातील हिरोंच्या अभिनयापेक्षा त्यांचा स्वॅग जास्त आवडतो. तो दिसला तरच मी पुढे पिक्चर बघतो.

बेटस मोटेल बघते आहे.
आता शेवटचा सिझन चालू आहे.
फ्रेडी हायमोर अतिशय गुणी कलाकार आहे.आणि आईचं काम करणारी व्हेरा फार्मिगा पण.

Pages