Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24
ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00
त्यावर चर्चा करायला हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरूपेक्षा आपल्यालाच तिच्या
अरूपेक्षा आपल्यालाच तिच्या आईची काळजी!
कितीवेळा इथे तसे लिहून झाले आहे.
इथून दुसरे लग्न करून ती आशूच्या घरी जाईल. तिथे नव्या सासूची सेवा करत जुन्या सासूला नाष्ता-जेवनाचे डब्बे पाठवेल पण माहेरी काही जाणार नाही.
हाहाहा, सही. आईला बिचारीला
हाहाहा, सही. आईला बिचारीला वाटत राहील, आपण अरुची आई उगाच झालो, सासू व्हायला हवं होतं.
ते भले बुरे एकदम कोणती
ते भले बुरे एकदम कोणती function at() { [native code] }अ तरी बोअर आंटी ऐन वेळी मंगला श्टके लांबवत म्हणत बसते तसे आहे खरेतर. >>>>>> आशूच्या फोनमध्ये का? मला तरी अरुच गाण आवडल. छान गायली.
मुलगे असे एम सी पी आणि जावई एकदम स्त्रीवादी >>>>>>> अविनाशही आहे स्त्रीवादी, पण ह्याला पुढे काय दाखवणार आहेत? सदगुणी की जुगार खेळणारा हे डायरेक्टवर अवलम्बून आहे.
यश नाही वाटत एम सी पी. जो मुलगा आईला स्वत: च्या पायावर उभ राहण्यासाठी प्रोत्साहन देतो तो एम सी पी कसा?
त्यावर तू, केदार सारखा भाऊ, विशाखा सारखी नणंद, आईअप्पांसारखे सासरे भाग्याने मिळाले ; असं अरुंधती म्हणाली. पण नवऱ्याचं काय? >>>>> ते तिच दुर्भाग्य!
आजी तबक ताम्हण कोण घास्णार् म्हणते. >>>>>>>> पुन्हा हिचा सासू मोड ऑन झाला.
कट टू आशू डुइन्ग म्युझिक टीचर प्लानिन्ग ऑन फोन. इथे यश ला काम मिळायची शक्यता दिसत आहे. >>>>>>>>> नाही. अरुला काम मिळेल.
काल अरुंधती फराळ घेऊन आल्यावर संजनाला ती उधळपट्टी वाटली. त्यापेक्षा विनोदी म्हणजे तिने अनिरुद्ध आता कमवत नाही म्हणत त्याच्या वर्मावर बोट ठेवलं.
पण ही स्वतःही काही कमवत नाही हे विसरली. आता बहुतेक कायम नवऱ्याच्या जिवावर उड्या मारणार आहे.
तिला कॉफीपण आयती हातात देणारी फुल टाइम मेड हवीच आहे. >>>>>>>> अगदी अगदी शेखर धड कमवत नाही ह्याच कारणासाठी तिने सोडल होत हयाला. आता कदाचित अनिरुद्दचा नम्बर.
मृणाल कुलकर्णीला रिटायर करायची गरज नव्हती. >>>>>> ती तर अनुवेद साबणाची जाहिरात करते. पवित्र स्नान म्हणे!
अरुंधतीच्या ऑफिसात टेबलावर
अरुंधतीच्या ऑफिसात टेबलावर मॉनिटर आणि कीबोर्ड आहेत.
सीपीयूचा डब्बा नाही. टेबलाखाली कप्प्यात असावा असंही वाटत नाही
ती टर्मिनल्स असणं शक्य नाही.
खुर्च्या गेल्या शतकातल्या आहेत.
दिवाळी बोनस मधून अरुंधतीने एक ॉ. ऑफिस बॅग घ्यावी.
संजनाने कैकयीचा वर मागून घेतला तरी अनिरुद्धला दशरथ व्हायची गरज नाही.
संजनाने कैकयीचा वर मागून
संजनाने कैकयीचा वर मागून घेतला तरी अनिरुद्धला दशरथ व्हायची गरज नाही.>> त्याला तर तिचा नवराही व्हायचे नव्हते. पण तिने केलाच
भाग ५०७: ओपन होतो तेव्हा
भाग ५०७: ओपन होतो तेव्हा देविका व अरू कॉफी घेत आहेत पार्कात बेंचवर अशी कुठे कॉफी मिळते? पण सू अरू मजे साठी स्टार बक्स मध्ये कशी जाईल? देविका कान उघाडणी करते जरा स्वतःचा विचार कर. तिथू न बाहेर नीघ. पण ही आई अप्पा साठी रहिली आहे म्हणे. मनाने पूर्ण सुटू शकत नाही कारण मुले आहेत. हिला सासू बद्दलच प्रेम आहे जास्त. ही मी सर्वांना घेउन बाहेर पडले असते म्हणते. स्वतःचे जीवन स्वतः जगायचे ही कलपनाच नाही बहुतेक सु अरूटाइप्स पब्लिकला, हिचे आई अप्पा चालूच आहे.
ती गेट टुगेदर चे सांगते तर सु अरूला फार इंतरेस्ट नाही. हे बराच वेळ चालू आहे. ही त्याला आशू बिशू म्हणू नकोस असे सांगते हे सर्व भागाची तेरा मिनिटे होउन गेली तरी चालूच आहे. हे सर्व ज्ञान स्वतःचे स्वतःलाच यायला हवे पण इथे मैत्रीणीच्या थ्रू वदवले आहे. डोकेबंद झापडबंद बाई.
ही चक्क दहा मिनिटे पार्कात एकटी शांत बसली आहे.
घरी गौरी उद्या बाहेर गावी जाणार आहे यश येइल तेव्हा ती नसेल काम महत्वाचे आहे जा म्हणते अरू. आता भाउबिजेला ती नाही व यश पण नाही म्हणून अरू खट्टू होते. ( प्रोमो मध्ये हा परत आलेला दिसतो आहे)
मग ही समोर जाउन दिवाळी बोनस चे पाकीट आप्पा समोर ठेवते व देवासमोर ठेवते व दोघांचे आशीर्वाद घेते. मग दही लावायला किचन मध्ये जाते व अप्पाच आहेत असे समजून मला कायकाय नवीन करायचे आहे वगैरे बोलत असते पण मागे अन्या असतो. व तिचे स्व गत बोलुन झाल्याव र त्यावर पाणी ओततो. किती सडू आहे. तिला उत्तेजन पण देत नाही. कमी शब्दात खडूस बोलुन तिचा हुरूप घालवायचे काम करतो.
शी इज मेकिन्ग मनी. ( विमल ला पगा रा वर पगार देणार् आहे व घर गहाण टाकलेले सोडवणार. सच डिफरंट गोल्स.) कलेचा व्यवसाय करणे ह्या वयात नव्याने काय शिकणार तू फार स्पर्धा आहे व्गैरे बोलतो व मग शेवटी माझाकडेच मदत मागावी लागेल असे बोलतो. तुम्ही जॉबलेसच आहात की असे ती म्हणते. प्रयत्न तर करूच शकतो असे ती म्हणते. तुझा जॉब फार छोटा आहे असे अन्या हिणवतो. सच अ सेल्फ इम्पोर्टंट क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष
इशाचे लाडे लाडे चालू आहे. विशाखा व ती यश ची आठवण काढत आहेत. त्या अवी निलीमा बद्दल गॉसिप करतात. तेव्हा संजना दोन मिनिट दारामागून ऐकत आहे व येउन काहीतरी खट् टे बोलत असे व विशाखाला काहीतरी सुनवायला जाते तर ती गप्प बस माझ्या समोर बोट उचलून बोलायचे नाही म्हणते. संजनाला बोटाचे काय करायचे समजत नाही मग.
अवी काय उद्या येत नाही वगैरे नाट लावते संजना.
ह्या भांडणाव र भाग संपतो.
प्र्मो मध्ये सर्व जेवाय ला बसताना अवी ची वाट बघतात व यश आलेला आहे. आता त्याचे स्वागत करायला गौरी नाही म्हणून तो चिडेल कॉय?
अरुंधतीची प्रत्येक गोष्ट
अरुंधतीची प्रत्येक गोष्ट संजनाला हवी असते.
आधी नवरा. मग घर. सासू सासरे, मुलं पण हवी होती. पण ती तिखट लागली.
आता तिचा नसलेला मित्र पण हवाय.
संजनाने लग्नानंतर या घरी राहायची हट्ट धरला नसता तर complications कमी झाली असती.
तिला अनिरुद्धला घेऊन गौरीकडे राहता आलं असतं.
अरुंधती इथेच राहिली असती.
पण मालिकेत रोज खटके दाखवता आले नसते.
एकुणात आज काहीच विशेष नाही!
एकुणात आज काहीच विशेष नाही! मला देविकाही आवडत नाही..... function at() { [native code] } function at() { [native code] }ईच
अगदीच भडक् पणा करते....ती अभिनेत्री पण नाही आवडत !
हे फंक्शन अॅट नेटिव्ह कोड... कसं घालवायचं? काय आहे हे?
अ/आ नंतर त टाइप केलं की येतं
अ/आ नंतर त टाइप केलं की येतं ते.
हो का..? नोन बग आहे म्हणजे
हो का..?
नोन बग आहे म्हणजे !
मी अतिरेकी शब्द टाइप करत होते..मग बरोबर आहे!!
आत
अत
Devika was asking all the
Devika was asking all the right questions. She must be on maayboli
यश अप्पांना पाच लाख रुपये देणार आहे.
त्यांचे २५ लाख रुपये जमलेच मग.
अनिरुद्ध ची प्रतिक्रिया काय असेल? मुलांबद्दल अभिमान की आपल्याशिवाय जमवलं म्हणून frustration?
संजना यशाने पैसे चोरून आणले का विचारेल. मग त्याच्याशी सुद्धा गोड बोलेल.
अरुंधतीला उद्या दोन बादल्या टिपं गाळता येतील.
त्यात overacting चं दुकान अविनाश आला तर चार बादल्या भरतील.
Devika was asking all the
Devika was asking all the right questions. She must be on maayboli >>> हा हा. मग तिने अरूला सांगायला हवे होते कि जरा स्वत:च्या आईकडे पण लक्ष दे.
ही त्याला आशू बिशू म्हणू नकोस
ही त्याला आशू बिशू म्हणू नकोस असे सांगते >>>>>>> हिची काय जबरदस्ती आहे का? देविका त्याला आशू म्हणेल किव्वा काहीही म्हणेल. हिला काय करायचय? काय तर म्हणे आपण अन्तर राखून वागाव. देविका काय सोळा वर्षाची तरुणी आहे का उपदेश दयायला. ' तुला नाही ना करायचीये मैत्री आशुतोषशी, मग नको करु, देविकावर बन्धने कशाला घालते?' खरच देविकाला बोरिन्ग मैत्रीण मिळालीये.
मला देविकाही आवडत नाही. अगदीच भडक् पणा करते.. >>>>>> मला आवडते ती. निदान सन्जना आणि अरुपेक्षा कितीतरी पटीने बरी आहे. सेल्फ डिपेण्डट आहे. मस्त एकटीने आयुष्य जगते.
किती सडू आहे. तिला उत्तेजन पण देत नाही. कमी शब्दात खडूस बोलुन तिचा हुरूप घालवायचे काम करतो.
शी इज मेकिन्ग मनी. ( विमल ला पगा रा वर पगार देणार् आहे व घर गहाण टाकलेले सोडवणार. सच डिफरंट गोल्स.) कलेचा व्यवसाय करणे ह्या वयात नव्याने काय शिकणार तू फार स्पर्धा आहे व्गैरे बोलतो >>>>>>>> अगदी अगदी. आता अरुने अनिरुद्दच हे चॅलेन्ज नक्कीच स्विकाराव. खडूस कुठला!
' तुला नाही ना करायचीये
' तुला नाही ना करायचीये मैत्री आशुतोषशी, मग नको करु, देविकावर बन्धने कशाला घालते?' >>> हो ना. देविकाने ह्या काकुबाईला सुनवायला हवं होतं.
बाय द वे त्या आशुला भयानक चश्मा फ्रेम दिलीय, तो वयापेक्षा जास्त दिसावा म्हणून असेल, अजिबात शोभत नाही त्याला ती. एक फोटो बघितला त्यात समजलं. हिंदीतला अनुज कसला हीरो दिसतो, आहाहा.
देविका आणि आशु ची जोडी जमेल
देविका आणि आशु ची जोडी जमेल कि क्काय. बरय मग अरु ला .
आशूला स्मार्ट देविकापेक्षा
आशूला स्मार्ट देविकापेक्षा काकूबाई अरूच आवडणार. त्याशिवाय मालिका पुढे (म्हणजे नक्की कुठे काय माहित) कशी जाणार.
देविका आणि आशु ची जोडी जमेल
देविका आणि आशु ची जोडी जमेल कि क्काय. बरय मग अरु ला . >>>>>>>> आशूची देविकाबरोबरची केमिस्ट्री छान आहे. मलाही त्यान्चच जुळाव अस वाटतय.
देविकाने अरुंधतीला काय काय
देविकाने अरुंधतीला काय काय सल्ले दिले. तसंच अरुंधतीने देविकाला त्याला आशु म्हणून नको सांगितलं. मैत्रिणींत चालतं असं.
आपल्या मदतीशिवाय या लोकांनी २५ लाख उभे केले हे पाहून अनिरुद्धचा जळफळाट झालाय.
आता तो घर विकायच्या मागे लागलाय.
तिकडे आशुतोषला अरुंधतीची इच्छा कळल्यावर प्रोजेक्टसुद्धा scrap करेल.
..प्रोजेक्टसुद्धा scrap करेल.
..प्रोजेक्टसुद्धा scrap करेल.>> मग तर संजना खूपच चिडेल तिच्यावर.
असा आजकाल एपिसोडचा रिपोर्ट
असा आजकाल एपिसोडचा रिपोर्ट लिहीत नाहीत? All well?
आजच्या भागाच्या शेवटी मला स्कूटर वरून नीट जा हे इतक्या वेगवेगळ्या प्रकारे आणि कारणे देऊन सांगितलं की त्याला अपघात होणार हे चाणाक्षच काय झोपलेल्या प्रेक्षकांनीही ओळखलं असतं.
अपघाताचं निमित्त साधून आशुतोष , देशमुखांच्या घरी पोचणार
भरत..अगदी.. !!
भरत..अगदी.. !!
माझ्याही लक्षात आलं....
संजना चा निळा ड्रेस छान होता.
अनिरुद्ध आता पूर्णच संजना च्या बाजूने आहे.
यश ने आणलेली खोकी रिकामी जाणवत होती....
अरुंधती वजन कमी करते आहे असे
अरुंधती वजन कमी करते आहे असे वाटतेय.....
देविकाने अरुंधतीला काय काय
देविकाने अरुंधतीला काय काय सल्ले दिले. तसंच अरुंधतीने देविकाला त्याला आशु म्हणून नको सांगितलं. मैत्रिणींत चालतं असं. . >>>>>>> अरुन्धतीचा काकूबाई स्वभाव पाहता नाही पटल हे. कैच्याके सल्ला होता हिचा. देविकाचा स्वभाव मोकळाढाकळा आहे हे मुळात अरुला कळायला हव . मित्राला एकेरी नावाने हाक मारणे कॉमन आहे. हि अरुन्धती अठराव्या शतकात जगते सो दुसर्यान्नी सुद्दा तसच जगाव अस तिला वाटतय. आधुनिक विचार तिच्या सोयीने स्विकारते. देविकाने दिलेले सल्ले हि ऐकणार नाही मग देविकाने तरी हिच का ऐकाव?
All well?>> अहो धन्यवाद. पण
All well?>> अहो धन्यवाद. पण सीरीअल फारच प्रे डिक्टेबल होत चालली आहे लिहायचा उत्साहच गेला.
तुम्ही तुमच्या मनाने
तुम्ही तुमच्या मनाने unpredictable plot कंसात लिहीत चला
शुभ प्रभातः
शुभ प्रभातः
भाग ५१०: आज वीकान्त टीपी एपि सोड आहे.
आशू व मित्र कार मध्ये गप्पा मारत आहेत. तो अरु बद्दल आपल्या भावना व्यक्त करत आहे. पुराने आशिक. मध्येच मित्र गाडी थांबवून आशूला देवळात नेतो सर्व इच्छा पूर्ण होतील अशी हमी.
इकडे आशू गौरी लव्हर्स टिफ. फुकट उखडला आहे त्यामुळे डोके फिरले आहे. व आईचा फोन आल्याने आधी वैतागला आहे. त्यात छोटा अपघात होतो. हा इथेच मेला अस्ता तर? मुंबईत असे किती मरतात पन स्क्रिप्ट रायटर इज बिगर दॅन गॉड म्हणून वाचतो बिचारा व अरूला अजुन उसासे युक्क्त टीपे गाळायची सोय आहे.
त्याला आशू व मित्र वाचवतात व मेडिकल ट्रीटमेंट पक्षी एक बॅ ड एड पेक्षा लहान चिकटप ट्टी कपाळी लावून त्याला घरी आणतात. ह्यात मध्ये अजा ण ता फोन करतात अरूच्या नंब रावर कळवायला की मुलगा ला अपघात झाला आहे तर अरू लगेच ओक्साबोक्षी रडून आई मोड मध्ये जाते मग अन्या फोन घेउन मी येतो पिक अप करायला म्हणतो पन हे बोलतात की नो नीड आम्हीच सोडतो. मग घरचे सर्व गप्प बसून वाट बघत बस्तात. सर्व चौकशी करतात म्हणून अन्या कावतो.
कट टू हे कार प्रकरण घरी येते. अरू रडत आहे. पण आशू ला बघून यश ला बघून आनंद होतो. तो ठीक आहे. मग सर्व त्यांना ओळखतात
व कॉलेजचे गप्पा प्रकरण चालू होते. संजना ओळख देते तर तो गुजराती मित्र मी नाही तुला ओळखत म्हणतो. आशू बीइन्ग व्हेरी व्हेरी गुड बॉय.
आता उसासे युक्त रडू माझ्या लेकाला सुरक्षित ठेव वगैरे चालू आहे दळण.
तसेच यश मागे बसून धुं दीत गौरी शी प्रेमालाप चालू आहे. हे नित्या व आशू ऐकून हसत आहेत.
यश चे एकदम मै कहां हू. होते.
यश घरी पोहोचल्यावर अरू एक एक बॉडी पार्ट तपासून घेते. आजी बरा आहेस ना बाबा म्हणते.
मग तो मला ह्यांनी वाचवले म्हणून आशू क्डे बोट दाखिवतओ. एकदम हिरो गिरी चालू आहे. आशू तिला गाण्याची एक ऑफर देतो. ( हे प्रोमो मध्ये आहे)
अन्या हे सर्व बघत आहे.
नावांची गडबड झाली आहे.
नावांची गडबड झाली आहे.
कालच्या भागात अनिरुद्धने अरुंधतीला काही व्यवहारज्ञान नाही हा पाणउतारा केला. तिला काही न येण्याला तोही जबाबदार आहे. तिचे शिक्षण पूर्ण व्हायच्या आत लग्न झाले. मग लगेच मुलं. व्यवहार् शिकवायची जबाबदारी याचीच होती.
कर्जाच्या लफड्यातून अविनाश आपसूक सुटला हा संजनाचा पॉइंट बरोबर होता.
अरुंधतीने घराचा अर्धा हिस्सा आईच्या नावावर ट्रान्स्फर करण्यात काय पॉइंट आहे?
हिरोने ३-४ वेळा चष्मा बदलला.
हिरोने ३-४ वेळा चष्मा बदलला. आजची फ्रेम नेहमीपेक्षा छोटी होती.
हिरो चाळिशीत आहे अशी कमेंट
हिरो चाळिशीत आहे अशी कमेंट ऐकली कोणाशी तरी बोलताना, त्याच वय फ्रीझ झालं होतं का ?
Pages