आई कुठे काय करते!

Submitted by sonalisl on 27 January, 2020 - 10:24

ही गोष्ट आहे अरुंधती देशमुखची. गेली 25 वर्षे संसाराचा गाडा ती अगदी मनापासून हाकतेय. मुलांचं संगोपन, सासु-सासऱ्यांची सेवा आणि नवऱ्याच्या कामाच्या वेळा सांभळताना स्वत:ला मात्र ती पूर्णपणे हरवून बसलीय. इतकं सगळं करुनही आई कुठे काय करते? हा प्रश्न मात्र तिला अनेकदा विचारला जातो. तमाम गृहिणींचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या अरुंधतीच्या त्यागाचं मोल ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेतून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणार आहे. यासोबतच मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले अशी दमदार स्टारकास्ट या मालिकेत आहे.......
ही माहिती एका संकेत स्थळावर वाचली आणि मालिका पाहायला सुरूवात केली. चांगली वाटली.
स्टार प्रवाह वाहिनी वर वेळ संध्या. 7:30 ते 8:00

त्यावर चर्चा करायला हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिंदी त अनुपमा मधे फार छान रंगवला कालचा एपिसोड. अनुज खूपच छान काम करतो. दिसतो ही अगदी गोड. हिरा आहे हिरा...!!

तिथे अनुपमा म्हणते.... दोस्ती से ज्यादा और प्यार से कम...अपना ये रिश्ता होगा.....जिसका कोइ नाम नही....कन्हाजी ,आप और मै....... ये जानते है. .........इतना काफी है...!!
छान संवाद, अनुज चा छान अभिनय!!

अरु च्या जीवनात अशी वेळ कधी येईल कोण जाणे ! ..त्या आशुतोष मधे तर काही दम दिसत नाही मला.. अरु ला पटवायचा...!!!

अनुज खुपच छान आहे. ही सिरीयल अनुपमाच्या कितीतरी आधी सुरू झाली तरी स्टोरी एवढी मागे कशी पडली याची?

आशुतोष मधे तर काही दम दिसत नाही मला.. अरु ला
पटवायचा...!!!>>> मुळात कोणात कितीही दम असला नसला तरी अरु
आज्जी पटल्या पाहिजेत न?? त्या फक्त सासु सासऱ्यांनाच पटल्यात Lol Wink आणि ते तसंच राहील कायम .

मीही पाहीला कालचा भाग अनुपमाचा, छान झालाय तो सीन, आणि अनुपमानेही चांगली ॲक्टींग केलीये.

आज तिला गाण्याची ऑफर मिळतेय.
बाकी काही नाही तरी अनिरुद्ध संजना जळून खाक होणार आहेत.
कांचनला मध्ये त़गडं घालायला, हे आणि कशाला, करायला वाव

दोस्ती से ज्यादा प्यारसे कम म्हणजे नेमकं कसं?>>> म्हणजे त्याच्याकडून कायमची फूल दोस्ती आणि हिच्याकडून नो प्यार ॲटॲाल Happy
म्हणजे समोरच्याला धड होकारही द्यायचा नाही आणि दूरही जाऊ द्यायचे नाही.

It is called being friend zoned. Guys waste their entire lives on such stupid deals.

हिंदीत लग्न झालं दोन अनुचं. तर इथेही होईल आशु अरुचं.

ही सिरीयल अनुपमाच्या कितीतरी आधी सुरू झाली तरी स्टोरी एवढी मागे कशी पडली याची? >>> हिंदी आधी सुरु झालेलीना, ही नंतर बहुतेक. बंगाली सिरीयलवरुन या दोन आहेत ना. लो़कं लिहीतात ना खाली कमेंटस त्या वाचून सांगतेय.

हो,कॉन्सेप्ट बंगाली च आहे. हिंदी आणि रिजनल भाषेत स्टार हिट फाॅरमूला सगळीकडे फिरवतोय.
>>> मराठीत दळतायत दळण अजून.

आता गौरीला भरपूर गिल्ट येणार>> हो. ती कामासाठी गेली होती तरी यश किती बडबडत होता! याच्या मनासारखे नाही झाले तर खूप बोलतो तिला.
आधी एकदा ती बोलली होती त्याला कि तू तुझ्या बाबांसारखा दुसरीकडचा राग माझ्यावर काढत जाऊ नको. मी ऐकून घेणार नाही. तेव्हापासून जरा शांत झाला होता.

आताच अनुपमाचा - लेटेस्ट भाग पाहिला. विकिपेज वाचलं टिपिकल आहे. सासू वि सून आहे.
मराठी बरीच सेन्सिबल आहे.
हिंदीत अभिच्या आयुष्यात अनघा नाही वाटतं. इथे डॉक्टर मुलगी होती (अंकिता?) , तशाच कॅरॅक्टरशी लग्न केलंय आणि ते दोघे ्् आईच्या विरोधात आहे.
तिथल्या गौरीच्या पात्राला एक्स हजबंड आहे.
तिकडे अरुंधती, यश आणि गौरीची डान्स अकादमी आहे आणि
अरुंधतीची फॅक्टरी की कॅफे पण आहे. हे जास्त मानबासारखं आहे. फक्त राधिका प्रचंड असह्य होती.

भरत.. Lol
अनुपमा ची मोठी सून , किंजल, तिची अगदी निस्सीम चाहती आहे..विरोधात नाही! अनघा सारखीच.
आणि यश गौरी तर आहेतच तिच्या बाजूने. फक्त मोठा मुलगा, वनराज आणि काव्या, आई..इतके विरोधात आहेत....

अनुज आता रागारागाने सिंदूर भरताना दाखविला आहे.... Happy

हिंदीत लग्न झालं? कधी? >>> ओहह सॉरी. आधी जर लिहायला विसरले, मी बघत नाही म्हणून माहिती नाही लग्न झालं की नाहीते. जर हिंदीत लग्न झालं तर इथेही होईल अस लिहायचं होतं.

भाग ५११:

नित्या व आशू आत येतात. अरू यश ची दृ ष्ट काढत आहे त्यामुळे तो अवघडतो. हे अभीची ओळख झाल्यावर लगेच तू परदेशी का नाही गेलास शिकायला विचारतात. तो ही उत्तर देतो. व संजना हा अरुचाच पोरगा दलिंदर असे व्हाइभ देते पण आशू हे बरोबर आहे रॅट रेस मध्ये पडायलाच पाहिजे असे नाही असे म्हणतो.

अरूने घरी बनवलेला फराळ येतो व त्याचे कौतूक होते. नित्या खादाड आहे. आशू ही अरु चीच प्रति कृती आहे. त्यामुळे कायम सुविचार सोडत आहे. संजना आत्ताच घर विकायचा विष य काढू असे अन्याला टोचते पण तो तिला गप्प करतो. अन्या संजना बघत आहेत. आजी आजोबा घराबद्दल बोलतात संजना घर विकायचा वि शय पुढे करते. ही आशूला आठवण करून देत आहे. आजी लाडावलेली बाळ असल्याने बिल्डरला मला घर विकाअय्चे नाही म्हणून क्लिअर करते. संजना परत भेटुन बोलु म्हणते.

आशू आपले संगीतातले प्लान व इंटरेस्ट ह्यावर पाच दहा मिनिटे बोलतो. आजी फार पर्सनल प्रश्न विचारते लग्न झले का घरी कोण आहे.
आजी एकदम स्थळ शोधायलाच लागते. अरु शी नीट वागा अशी सूचना देते. स्थळ सारखी माहिती मागते आजी.

हे निघायला बघतात व आशू अरूला अल्बम मधे गायची खुल्ली ऑफर देतो.

जनरल हलका फुलका भाग आहे.

प्रोमो मध्ये अन्या खडूस पणे मग काय गाणार का अल्ब म मध्ये वि चारतो. ती मी काही पण करेन तुला का सांगू म्हणून तोडते.

म्हणजे एखादी व्यक्ती फक्त बोलते वागते नं सारखे दर वेळी आतले रॅशनेल उलग्डून कुठे सांगते ? ते ही कॅजुअल ओळखीच्या ठिकाणी?! विचार प्रक्रिया तर समजावुन सांगणे अवघडच असते.

Happy हो ना.... यांना थोडक्या वेळात आशुतोष ची व्यक्तीरेखा अधिकाधिक फुलवायची आहे..म्हणून मग असे शॉर्टकट्स आणि उपदेश!
अन्याला जळफळाट होण्यासारखे काये ?

अरुंधतीचे फराळाचे कधीच काही बिघडत नाही का? आणि द्रौपदीच्या अक्षय पात्रा सारखा फराळ संपतही नाही? करते तरी किती? नेहमी किती तो पर्फेक्ट पणा दाखवायचा....!!!!!!!!!!!!!!

आई- कान्चन सतत त्या खुर्चित बसुन उबत नाहि का? सतत सगळा नटटापट्टा करुन तिथेच असते
अनिरुद्धच आम्ही एकदम अनोळखी लोकाशी इनफॉर्मल होत नाही वाक्य एकून "वा रे भारिच सोज्वळ ह तु" अस झाल.
त्या यशला हे घरी सोडायला येतात तर हे कोणी पटकन त्याना घरात या का म्हणत नाहित् , यशला अपघात झालाय पण भन्जाळल्यासारखी अरु वागत होती.

गाण्याची ऑफर ऐकून अरुंधती मोठा मानसिक आघात झाल्यासारखं करत होती.

आशुतोष कडक डाएट कॉंशस आहे. अरुंधतीच्या हातचा फराळ असूनही त्याने हातही लावला नाही. तो फक्त तिच्या गाण्यासाठी तिच्यामागे आहे.

पण तो अजिबातच तिचा classmate वाटत नाही.....आणि मुख्य म्हणजे तिच्या प्रेमात बुडालेला ही वाटत नाही...हे फार वाईट आहे!!
तो परवाच्या एपिसोड मध्ये म्हणाला देखील...की अरुंधती च्या प्रेमात मी अगदी ठार वेडा झालो होतो असे काही नव्हते.....!!!!
सच प्रॅक्टिकल थिंकिंग!!!!

शुभ प्रभातः

भाग ५१२: आशू व नित्या गाडी भोवती पक डा पकडी खेळत आहेत. अरू डबे फराळाचे घेउन येते व ते एकद म उभे राहून डबे घेतात. ती डबे पर त करायला सांगते. व अमचा जीव कस्या कशाfunction at() { [native code] }अ त अडकला आहे ते तुम्हाला कसे कळेल असे बोलते.

अन्या आता आत चल गेले तुझे मित्र म्हण तो तर . तुझी आईच म्हणते पाव्हणे जाईपरेन्त बघत राहावे. मग अन्या तिला घेउन आत जातो. मुले उत्साहात आहेत आईला नवी ऑफर आली म्हणून. आजी आबा आशूचे स्थळ कसे आहे विचार करत आहेत. आजी जाम उत्साहात आहे . कोण तरी राजाभाउची पुत णी टाइप मुलीसाठी स्थळ आले म्हणून आजी खू श आहे.

संजना अन्या रूम मध्ये. घरात सर्व मॅड आहेत असे ती म्हणते. आशू पुढे फार पुढे पुढे करत होतीस म्ह ण तो. ती तिचे टॉवर ड्रीम सांगते. आशुतोस शी चांगले वाग असे संजना म्हणते. अन्या वैतागलेला आहे. व जेलस आहे. तो आपल्या स्वप्नांकडे ने णा रा रस्ता आहे असे संजना क्लीअर करते.

आता यश व इशा आईला गायला भरीस पाडत आहेत. हिला गायचे नाहीच आहे. ( कायम दलिंदर राहायचे आहे.) किंवा भाव खात आहे.
नित्या व आशू लग्ना वरून बोलत आहे. हा आशूला ती त्या घरात का राहते विचारतो. हा तिच्या गाण्यावर फिदा आहे व तिला एक संधी देउ इच्छितो.

अरू आज ऑफिसला दांडी. आई कडे जाईन म्हणते. व फराळ पण द्यायचा आहे. अन्या तिथेच बसला आहे व आशू मित्र प्रकरणा बद्दल टोकून बघत आहे. अरू किती प्लेन सामान्य मुलगी पन त्याच्या लक्षात राहिली. अन्या एक संधी सोडत नाही. गाणार का विचारतो. मला कळव म्हणतो. तुम्हाला कशा पाई सांगू म्हणते झाशीची राणी.

खंग्री मॅन फॉर्मात आहे.

नित्या व आशूची मिटीन्ग कॅन्सल झाले आहे म्हणून नित्या फराळ खात आहे. व परत कौतूक. व त्यावर भांडत आहेत. पोरकट पणा.
ते आहेत ते घर सुरेख सजवलेले आहे. परत फराळाचे कौतूक. अरु च्या हाताला चव आहे ह्याव अन त्याव. नित्या. आता आशू खातो व परत वोव घरगुती चव आहे. वगैरे चालू झाले आहे. नित्या जुन्या आठवणी काढत आहे. दिवाळीचा किल्ला चाळीतली दिवाळी. परत तिथेच जाउन राहावे.
आशू अमेरिकेतुन आल्यामुळे मोठी फॅमिली मिस करत आहे.

नित्याचा मुलगा आजकालचाच आहे त्यामुळे दिवाळीचे त्याला फारसे कौतूक नाही. नित्या ती घरच्यां साठी अजूनही किती करते असे विचारतो व डिस्कशन होते तिला त्रास होत असेल म्हणतो.

आशू एकर कमी अरूचे कौतूक करायच्याच मोड मध्ये आहे. तिला काही तिचे आतले टॅलेंट समजत नाही आहे. व ती एक स्ट्रॉन्ग इंडिपें ड्ट स्त्री आहे पण टॅलेंटला का कमी समजते कळत नाही. तिचे गायन छान आहे फक्त एक संधी आहे. ब्ला ब्ला ओके वी गेट इट.

प्रोमो : संजना व अन्या नित्या व अशूशी बोलायला जात आहेत. व अरुला पण यायचा आग्रह करतात. ती नाही म्हण ते. पण मीटिन्ग चालू असताना झोळी सुती साडी अवतारातच ऑफिसात टपकते. आशूचे एकदम टिंग टाँ ग होणार. नित्या चकलीच्या बदल्यात घर शाबूत ठेवणार

गोंधळलेल्या की निरागस एक्सप्रेशनन्स दाखवायच्या नादात झाशीच्या राणीं उसासे टाकायला विसरल्यात एक-दोन भागात..

मला वाट्ते ते फराळाचे डबे हपिसातले न विकले गेलेले उरलेले आणून घरी ओतले असतील. म्हणोन उत्साहात वाटावाटी चालू हय. मला हे जुन्याकाळ ची दिवाळी उसासे पोस्टी वाचोन वैताग आला आहे. काळ आपल्या गतीनेच जातो. अन हे पब्लिक उसासे टाकत बसते.

Pages