स्वागत करुया जैर बोल्सोनारोंचे

Submitted by भरत. on 21 January, 2020 - 23:43

यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे आपले पाहुणे आहेत ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो.

भ्रष्टाचार्‍यांना तुरुंगात पाठवण्याची अति परिचित घोषणा देऊन गेल्याच वर्षी ते सत्तेत आले.

ते येण्याआधीच त्यांची कीर्ती इथ वर ये ऊन ठेपली आणि त्यांची काही वक्तव्ये वाचून मन गदगदून गेले.

ब्राझिलमध्ये तुरुंगांच्या नावाखाली टॉर्चर सेंटर चालत. - (कैद्यांना /आरोपींना) टॉर्चर करण्याला माझे पूर्ण समर्थन आहे. आणि जनतेचेही.

बोल्सोनारो माजी लष्कर प्रमुख आहेत. - आपली संसद काही उपयोगाची नाही. मी संसद बरखास्त केली तर किमान ९०% लोक आनंद साजरा करतील. सरळ सरळ हुकुमशाही यायला हवी.

निवडणुकांमुळे या देशात काहीही बदलत नाही. देशात जेव्हा यादवी युद्ध होईल आणि तीसेक हजार लोक मरतील तेव्हाच काहीतरी बदलेल.
अर्थात यात काही निरपरा ध लोकही मरतील म्हणा. पण तसंही प्रत्येक युद्धात निरपराध लोक मरतातच. माझ्यासोबत असे ३०, ००० लोक मरणार असतील तर मी स्वतः मरायला आनंदाने तयार आहे.

ब्राझिलमध्येही आफ्रिकी वंशाच्या लोकांना गुलाम म्हणून ठेवले जाई. त्यांच्या पुढल्या पिढ्या वेगळ्या वस्त्यात राहतात. अशा एका वस्तीला भेट दिल्यावर - " तिथला सगळ्यात कृश माणूस २३० पौंड वजनाचा होता. हे लोक का ही ही करत नाहीत. अगदी पोरं काढायच्याही लायकीचे नाहीत.|

अमेझॉनच्या खोर्‍यातल्या आगींबद्दल आपण कदाचित ऐकलं असेल. विकासाचा ध्यास घेत तिथल्या सरकारने निर्वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

" मूलनिवासी लोकांसाठी आरक्षित केलेला प्रत्येक भूभाग हा 'देवीच्या व्रणासारखा आहे."

माझा मुलगा समलैंगिक निपजला तर मला त्याच्याबद्दल प्रेम वाटणं शक्य नाही. कुण्या बाप्याबरोबर घरी येण्यापेक्षा असा मुलगा अपघातात गेलेला बरा.

मला पाच मुलं आहेत. पाचव्या अपत्याच्या वेळी मी जरा कमी पडलो आणि मुलगी जन्माला आली.

विरोधी पक्षाच्या एका लोक प्रतिनिधीबद्दल - ती इतकी कुरूप आहे की बलात्कार करायच्याही लायकीची नाही.

आपल्या देशाच्या या अतिथीचं स्वागत करूया.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाई बाई बाई,
भरत तुमचे मोदी झाले की हो,
तुमच्या विरोधात इतके सारे लोक एकत्र बोंबा ठोकत आहेत म्हणजे तुम्ही नक्की काहीतरी बरोबर करताय,

तसेही झुंडीने हल्ला करायची सवय लोकांना प्रत्यक्ष आयुष्यात लागली आहेच, त्याचेच हे माबो व्हर्जन दिसतेय.

शेर एकेला आता है, झुंड मैं तो कुत्ते आते है Lol

पण बाकी त्या बोलसोनारो चे कौतुक हो, बलात्कार करायच्या लायकीची नाही म्हणून सोडून दिले त्या बाई ला,
बलात्कार करून, भावाला पिटुन, बापाला ठार करून, गाडीला अपघात करून ( आणि आता तर उपचार करणाऱ्या डॉक्टर चा संशयास्पद मृत्यू झालाय) तिला आयुष्यातून उठवले तर नाही

भरत तुमचे मोदी झाले की हो,
तुमच्या विरोधात इतके सारे लोक एकत्र बोंबा ठोकत आहेत म्हणजे तुम्ही नक्की काहीतरी बरोबर करता
>> म्हणजे मोदी करतात ते बरोबर हे मान्य आहे म्हणायचं.

भक्त लॉजिक प्रमाणे हो,
ते शेर अकेला... पण भक्त फॉरवर्ड मधूनच आलंय
ते तुम्हाला पटले की नाही?

त्या ब्राझिल च्या अध्यक्षाची माहिती इंटर नेट वर सुधा नाही .
भरत ला कुठे मिळाली .
जसे वर्णन केले आहे तसे ते आहेत ह्या विषयी काही लिंक ध्या.
उगाच हवेत गोळीबार कशाला.

देशोदेशीच्या जनता अशा उजव्या विचारांच्या , बहुसंख्यांकवादी , भेदभावाचं आणि द्वेषाचं राजकारण करणार्‍या , पुरुषसत्ताक विचारांच्या, भ्रष्टाचार विरोध आणि विकासाचे आर्थिक वृद्धीचे मुखवटे धारण केलेल्या नेत्यांच्या मागे जात आहेत. अशा नेत्यांना पाठिंबा देणार्‍यांना त्यात काही वावगे वाटू नये याचे नवल वाटण्याचे दिवस कधीच गेले.
>> भ्रष्टाचार विरोध आणि विकासाचे आर्थिक वृद्धीचे मुखवटे हे या आधीही होतेच, आठवतात पंचवार्षिक योजना? नवल मलाही वाटत नाही . दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी गुडविलच्या ५०% सेलच्या रांगेत दुकान उघडण्याच्या पाऊण तास आधी उभं राहीले की कारणं अवतीभवती दिसतात. गप्पांतून अजूनच उलगडतात. असे नेते तारणहार म्हणून निवडायची वेळ सामान्य नागरीकांवर आली याचा खेदही वाटतो. मात्र त्याचवेळी आत्मसन्मानाने जगता येईल अशी आशा निर्माण करण्यात दुसरी बाजू कमी पडली हे कधीतरी मान्य करायलाच हवे.

>>*फक्त त्यांच्या स्त्रीविषयक विचारांतही इथल्या स्त्री आयडींना काही खटकलं नाही, याचं किंचित नवल वाटलं. अर्थात रॅडिकलायझेशन किती झालं आहे, हे समजून घेण्यात मीच कमी पडलो.>>
नैतिक दृष्ट्या चुकीचे विचार हे एक व्यक्ती म्हणून खटकतात , त्यात स्त्री-पुरुष असा भेद नसतो. केवळ स्त्री असल्याने विचार खटकणार असतील तर पुन्हा काहीतरी चुकतेय.
इथे मायबोलीवर तुमच्या धाग्यावर लिहिले नाही म्हणजे रॅडिकलायझेशन झाले आहे असा निष्कर्श काढलात ते बघून हसूच आले. स्त्री आयडींनी इथे काय लिहिणे अपेक्षित होते? उत्तर अमेरीकेतील मंडळींना ना तुमचे पाहूणे नवीन आहेत, ना त्यांची मुक्ताफळे. लोकशाही मूल्यांची जपणूक व्हावी म्हणून जो तो आपापला खारीचा वाटा उचलत असतो. त्यासाठी याच धाग्यावर लिहिले पाहिजे असे थोडेच आहे. त्यातून एक सार्वभौम देश राजनैतिक डावपेचाचा भाग म्हणून इतर देशाच्या नेत्यांना आमंत्रित करतो, बोलणी करतो तेव्हा ते आमंत्रण त्या पदाला असते. पदावर असाल , संबंधातून फायदा असेल तर पायघड्या आणि पदभार गेला, संबंध ठेवणे अडचणीत आणणारे असेल तर विसा अ‍ॅप्लिकेशनवर नकाराची मोहर, विसा आवश्यक नसेल तर ही ट्रिप खाजगी आहे, आमचे सरकारी आमंत्रण नाही असे सावध पत्रक, असा सगळा रोखठोक मामला. यात कुणीच कुणाचा मित्र नाही, असतो तो व्यवहार आणि तोही फेअर गेम नाहीच. का बोलावले याचे विश्लेषण अभ्यासू मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून करत आहेतच . तुमच्या लेखाचा सूर बघता इथे तुम्हाला तसे विश्लेषण अपेक्षित नाही. अशावेळी सामान्य मायबोलीकर म्हणून धाग्यावर काय प्रतिक्रिया अपेक्षित होती? 'अ' देश, 'ब' देशाचा नेता पाहूणा म्हणून बोलावतो , त्यावर 'क' देशाची नागरीक म्हणून माझे विचार -'माझ्या देशासाठी यात काय आहे? आणि माझ्या माहेरच्या देशासाठी काय आहे ? बोलणी कशी होतायत, काय करार होतायत ते बघायला हवे.' बस्स!

भरत सरांना,
इथल्या पब्लिकने चांगलाच धुतलाय ह्या धाग्यावर !
--
उजवे-उजवे म्हणताना, डाव्या राज्यकर्त्यांनी इतक्या हत्या (मग त्या राजकिय असो वा नसो) व नरसंहार ह्या जगात केलाय की त्यापुढे उजवे म्हणके "किस झाड की पत्ती". ज्या रशीयाबरोबर कॉंग्रेसने इतकी वर्षे जवळीक साधली त्यांचाच इतिहास उघडून पाहा मग कळेल सर्वाधिक हिंसक डावे आहेत का उजवे.

स्वाती2, खूप सुंदर पोस्ट.


मात्र त्याचवेळी आत्मसन्मानाने जगता येईल अशी आशा निर्माण करण्यात दुसरी बाजू कमी पडली हे कधीतरी मान्य करायलाच हवे

दुसरी बाजू लावून धरणारे लोक हे मान्य तर करत नाहीच उलट उजव्या विचारांविरोधी अधिकाधिक आक्रमक होत जाताहेत हे बघून जगभरातली सामान्य जनता अधिकाधिक उजव्या विचारांच्या मागे जातेय. त्यामुळे हे लोक अजून चवताळताहेत. त्यांनीही कधीतरी शांतपणे असे का झाले, हे उलटवून लावायचे झालेच तर काय उपाय करायला हवे हा विचार करायला हवा... आता असे वाटते की मुळात यांची एवढी कुवत होती/आहे तरी का???

India, Brazil ink 15 pacts in trade, investment, energy; unveil action plan to broaden ties

Major Indian exports to Brazil include agro-chemicals, synthetic yarns, auto components and parts, pharmaceutical and petroleum products.
Brazilian exports to India include crude oil, gold, vegetable oil, sugar and bulk mineral and ores.

https://www.businesstoday.in/current/economy-politics/india-brazil-ink-1...

पेट्रोलियम च्या बाबतीत केवळ आखाती देशांवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने जसे अमेरीकेतून तेल आयात करायला सुरुवात केली आहे तसे ब्राझील कडून आयात केले जाईल
आणि
या तेल आयातीत डॉलर ऐवजी स्थानिक चलनाचा वापर केला जाईल म्हणजेच अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करता येईल.

ज्यांना याचा फायदा समजून घेता येईल त्यांनी घ्यावा आणि ज्यांना केवळ ठणाणा करायचा आहे त्यांना रान मोकळे आहेच

बकवास पोस्ट म्हणून एक पण कमेंट देण्याची गरज नाही
.आता धर्म निरपेक्ष हा शब्द वर बहिष्कार टाका.
फक्त हिंदू ना टार्गेट करणे हा एकमेव हेतू असतो ह्या चलाक लांडग्यानाचा.
ब्राझिल हा खिचडी देश आहे असंख्य जाती आणि परत त्यांचे हायब्रीड बियाणे असा विचित्र प्रकार आहे.
पाकिस्तान
बांगलादेश
Etc
He desh Brazil पेक्षा बकवास आहेत .
पण हे ह्या लबाड लांडग्याना दिसणार नाही.

हपापाचा माल गपापा असं माझी आजी म्हणायची. (जुनी म्हण म्हणा)
हा धागा ज्या विशुध्द विचाराने काढलेला आहे, आणि त्या विचारांना छेद देणारे प्रतिसाद आल्यानंतर.... Strawmen Arguements वगैरे वगैरे विचार धागाकर्ता व्यक्त करतोय त्यावरून तरी कळतंय की .... लवकर बरे व्हा.

सुबोध sir
काही लोकांना फक्त बुध्दी भेद करायचा आहे.
देश हित
अर्थ व्यवस्था
आणि कोणत्याच देश हिताच्या गोष्टी शी देणे घेणे नाही.
फक्त हिंदू वरचड आहेतच पण त्याला break lagava म्हणून.
घटना
धर्म निरपेक्ष देश असली बकवास करत असतात.
डॉलर आणि स्थानिक चलन ह्यांचा काय संबंध आहे ह्या विषयी माहिती ह्यांना काही देणे घेणे नाही.

डॉलर कनवर्षण चे पैसे वाचतात , म्हणून ब्राझीलीयन डॉलर वापरावेत हे म्हणजे हिमालयात गेले की उकडत नाही व घरी पोटगी द्यायची कटकट वाचते , म्हणून हिमालयात 35 वर्षे रहाणे फायद्याचे आहे , असे म्हणण्यापैकी आहे.

रिजर्व ब्यांकेतले गांधीछाप नोट साठवता येईना , अन तिथल्या करन्सीची चिंता.

मागेही कोणच्या तरी देशातून तेल घेताना तिथली करन्सी वापरणार होते , इतिहासात सर्वप्रथम मोदिसरकार , वगैरे झाईरात केली होती , झाले का ते सक्सेसफुल ?

काही काळजी करू नका .
देशाची अर्थ व्यवस्था ज्या समूहाच्या हातात आहे .
आणि त्यांनीच निर्माण केलेल्या रोजगार चा फायदा घेवून आरामात जगणाऱ्या लोकांनी मार्ग दर्शन करू नये.

त्या कान्हा ची माझा कट्टा वर मुलाकात बघितली.
ज्या लालू नी बिहारी लोकांना भिकारी बनवलं आणि देश भर पोटा साठी वण वण भटकायला लावले त्याचे समर्थन तो करत होता.
सामाजिक न्यायाच्या नावा वर.
म्हणजे आम्ही तुम्हाला पूर्ण कंगाल करतो आणि तुम्ही फक्त जात जात करून स्वतःचे समाधान करा

यु पी अन बिहारवाले राम अन कृष्णाच्या काळापासून इतर राज्यात फिरत आहेत,

मोदीही गुजरात सोडून वाराणसीत गेले

देशोदेशीच्या जनता अशा उजव्या विचारांच्या , बहुसंख्यांकवादी , भेदभावाचं आणि द्वेषाचं राजकारण करणार्‍या , पुरुषसत्ताक विचारांच्या, भ्रष्टाचार विरोध आणि विकासाचे आर्थिक वृद्धीचे मुखवटे धारण केलेल्या नेत्यांच्या मागे जात आहेत. अशा नेत्यांना पाठिंबा देणार्‍यांना त्यात काही वावगे वाटू नये याचे नवल वाटण्याचे दिवस कधीच गेले.
>>
आख जग मुर्खय!!

जसे अमेरिकेत अपघात घडला की पोलिस-अँब्युलन्स-फायरट्रक एकदमच हजर होतात तसं इथे धाग्यावरती विशिष्ट आयडींना इतरांनी निरुत्तर केल्यानंतर ठराविक आयडी धागा भरकटवायच्या ड्युटीवर हजर होतात.
असो. हळदीकुंकू संपलं असेल तर माबोवरच्या रॅडिकलाईझ्ड बायकांना वाण द्या आणि धागा बंद करा.

धागाकर्ता परागंदा होणार बहुतेक. स्वतःच्याच धाग्यावर अशी नाचक्की होईल असे स्वप्नात सुद्धा वाटले नसेल.

Pages