स्वागत करुया जैर बोल्सोनारोंचे

Submitted by भरत. on 21 January, 2020 - 23:43

यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे आपले पाहुणे आहेत ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो.

भ्रष्टाचार्‍यांना तुरुंगात पाठवण्याची अति परिचित घोषणा देऊन गेल्याच वर्षी ते सत्तेत आले.

ते येण्याआधीच त्यांची कीर्ती इथ वर ये ऊन ठेपली आणि त्यांची काही वक्तव्ये वाचून मन गदगदून गेले.

ब्राझिलमध्ये तुरुंगांच्या नावाखाली टॉर्चर सेंटर चालत. - (कैद्यांना /आरोपींना) टॉर्चर करण्याला माझे पूर्ण समर्थन आहे. आणि जनतेचेही.

बोल्सोनारो माजी लष्कर प्रमुख आहेत. - आपली संसद काही उपयोगाची नाही. मी संसद बरखास्त केली तर किमान ९०% लोक आनंद साजरा करतील. सरळ सरळ हुकुमशाही यायला हवी.

निवडणुकांमुळे या देशात काहीही बदलत नाही. देशात जेव्हा यादवी युद्ध होईल आणि तीसेक हजार लोक मरतील तेव्हाच काहीतरी बदलेल.
अर्थात यात काही निरपरा ध लोकही मरतील म्हणा. पण तसंही प्रत्येक युद्धात निरपराध लोक मरतातच. माझ्यासोबत असे ३०, ००० लोक मरणार असतील तर मी स्वतः मरायला आनंदाने तयार आहे.

ब्राझिलमध्येही आफ्रिकी वंशाच्या लोकांना गुलाम म्हणून ठेवले जाई. त्यांच्या पुढल्या पिढ्या वेगळ्या वस्त्यात राहतात. अशा एका वस्तीला भेट दिल्यावर - " तिथला सगळ्यात कृश माणूस २३० पौंड वजनाचा होता. हे लोक का ही ही करत नाहीत. अगदी पोरं काढायच्याही लायकीचे नाहीत.|

अमेझॉनच्या खोर्‍यातल्या आगींबद्दल आपण कदाचित ऐकलं असेल. विकासाचा ध्यास घेत तिथल्या सरकारने निर्वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

" मूलनिवासी लोकांसाठी आरक्षित केलेला प्रत्येक भूभाग हा 'देवीच्या व्रणासारखा आहे."

माझा मुलगा समलैंगिक निपजला तर मला त्याच्याबद्दल प्रेम वाटणं शक्य नाही. कुण्या बाप्याबरोबर घरी येण्यापेक्षा असा मुलगा अपघातात गेलेला बरा.

मला पाच मुलं आहेत. पाचव्या अपत्याच्या वेळी मी जरा कमी पडलो आणि मुलगी जन्माला आली.

विरोधी पक्षाच्या एका लोक प्रतिनिधीबद्दल - ती इतकी कुरूप आहे की बलात्कार करायच्याही लायकीची नाही.

आपल्या देशाच्या या अतिथीचं स्वागत करूया.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयंकर आहेत या माणसाचे विचार. पण हा ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष झालाच कसा? म्हणजे लोकशाही मार्गाने की सरळसरळ लष्करी उठावाद्वारे?

धुरकटलेल्या लाल हिरव्या चष्म्यातून पाहण्याचे व्यसन असलेल्यांना भेटीमागील हेतू समजणार नाहीत>>≥>>>

सगळे समजत असते पण .......

इथे विषयांतर होतेय तरीही आठवले म्हणून...
काँग्रेस नेते सिब्बल यांनी 'CAA राज्यात लागू करणार नाही असा स्टॅण्ड घेणे घटनेविरोधी आहे' असे वक्तव्य नुकतेच केले. तरीही राज्यीय काँग्रेस नेते 'आम्ही लागू करणार नाहीच' असे बोलताहेत. आता या सगळ्यांना सगळे कळते, कोणी दुधखुळे नाही. तरीही बोलावे लागतेच ना.

इथे माबोवर पण तसेच आहे.

ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष झालाच कसा? म्हणजे लोकशाही मार्गाने की सरळसरळ लष्करी उठावाद्वारे?>>>>

गुगल करा की. मलाही हा बीबी वाचून असा माणूस आहे हे कळले व गुगळुन माहिती मिळाली.

1988 पासून हा राजकारणात आहे, मिलिटरी तेव्हाच सोडली.

शि जिनपिंग यांनी 10 लाख उईगुर मुसलमानांना छळ छावणीत(संस्कार वर्गात) पाठवलेले आहे तरी सुद्धा भारत आणि इस्रायल च्या मध्ये असलेले सर्व इस्लामी देश त्यांचे भरभक्कम स्वागतच का करतात?
एकंदर कम्युनिस्ट राजवटींनी गेल्या शतकात आपल्याच 11 कोटी बांधवाना स्वर्गाचा दरवाजा दाखवला तेंव्हा त्यांच्या नेत्यांना भारतात बोलावण्या बद्दल वाममार्गी लोकांनी त्याबद्दल कोणतेही आक्षेप घेतल्याचे वाचले/ऐकले नाही.

शि जिनपिंग यांनी 10 लाख उईगुर मुसलमानांना छळ छावणीत(संस्कार वर्गात) पाठवलेले आहे तरी सुद्धा भारत आणि इस्रायल च्या मध्ये असलेले सर्व इस्लामी देश त्यांचे भरभक्कम स्वागतच का करतात>>>>

भारतीय काश्मिरी मुस्लिमांचा तारणहार पाकिस्तान चीनच्या या कृत्याबद्दल अवाक्षर काढत नाही. असो, गंदा है पर धंदा है...

1988 पासून हा राजकारणात आहे, मिलिटरी तेव्हाच सोडली.>>>> धन्यवाद ! ही व्यक्ती लोकशाही पध्दतीने निवडून आलेली आहे. म्हणजे त्याला त्याच्या देशातील जनतेचा पाठिंबा आहे. आता तो असा आहे हे माहित असून त्याला जनतेने का बरे निवडून दिले असेल हा प्रश्न मला पडलाय. त्याच्या या वक्तव्यामुळे किती देशांनी ब्राझिलसोबतचे संबंध तोडले हा सुध्दा.

एकंदर कम्युनिस्ट राजवटींनी गेल्या शतकात आपल्याच 11 कोटी बांधवाना स्वर्गाचा दरवाजा दाखवला तेंव्हा त्यांच्या नेत्यांना भारतात बोलावण्या बद्दल वाममार्गी लोकांनी त्याबद्दल कोणतेही आक्षेप घेतल्याचे वाचले/ऐकले नाही.>>>>> भारतातील डाव्या विचारांच्या गुंडांनी पश्चिम बंगाल, केरळ आणि इतर राज्यात दुसरे अजून काय केले. त्यांच्यासाठी कम्युनिस्ट नेते म्हणजे देवासमान, यांचे आदर्श स्टॅलिन आणि माओ.

असं कसं असं कसं

बीजिंग मॉस्को मध्ये पाऊस पडत असेल तर हे वाममार्गी लोक कलकत्त्यात छत्री उघडत असत.

त्यांच्या निष्ठेबद्दल शंका?

लाहोल विला कुवत

आता तो असा आहे हे माहित असून त्याला जनतेने का बरे निवडून दिले असेल हा प्रश्न मला पडलाय.>>>

ते त्या जनतेलाच जास्त चांगले माहीत. जगाला काय आक्षेपार्ह वाटते यापेक्षा त्यांना काय वाटते यावर मते गेली असणार.
हा इकॉनॉमि सुधरवणार आहे असे त्यांना वाटतेय म्हणे, त्या जोरावर निवडून आलाय. आत्ता कुठे एक वर्ष झालेय. काहीतरी सुरवात केली असेल. नाहीतर पुढच्या निवडणुकीत दरवाजा दाखवतील.

राजनैतिक संबंध, राज्यकर्त्यांना त्यांच्या विचारधारेशी सहमत असणारे लोक एकत्र आणायला कायमच आवडते >>>>>>>>>>>
विविध उदाहरणे देऊन माझे हे वाक्य सिद्ध केल्या बद्दल धन्यवाद .

बॉल्सनारो हा आजकालच्या ड्युतेरो पंथातील बडबड करणाऱ्या देशाप्रमुखांपैकी एक.
भरत सिम्बा यांचा कळवळा प्रामाणिक मोदी विरोधी असला तरी यात विषयात खरेच दम आहे का? एक तर आंतरराष्ट्रीय पाहुणा, त्याला बोलावण्याची 50 कारणे असतील.
दुसरे म्हणजे यापूर्वी तुमच्या लाडक्या सरकारांनी दुधासारखे स्वच्छ नेतेच बोलावले होते का? जुने सोविएत रक्तलांच्छित नेते सोडून देऊ. 2009मध्ये नूरसुल्तान नाझरबेव्हना बोलावले होते. कझाखस्तान स्वतंत्र झाल्यापासून आता 30वर्षे हे देशाचे प्रमुख आहेत (गेले 1 वर्ष नामधारी प्रमुख वेगळा आहे पण पडदयमागे हेच). यांच्यावर विरोधकांचे पर्जिंग, टोकाचा भ्रष्टाचार , दमनशाही , प्रेसची मुस्कटदाबी असे बहुरंगी आरोप आहेत. बॉल्सनारोसारख्या बडबड बाळ्यापेक्षा हे कैक पटींनी क्रुर आणि रक्ताने माखलेले सत्ताधारी आहेत.

बॉल्सनारो वंदनीय नाहीतच. पण मुद्दा ज्या पद्धतीने व उद्देशाने मांडला आहे तो डिफेन्ड करण्यासारखा आहे का?

बहुतेक प्रतिसाद अपेक्षेप्रमाणेच आहेत. सध्याच्या घडामोडींची तुलना भूतकाळातल्या काही घटनांशी करून, चालतंय त्यात नवं काही नाही, असं म्हणून सोडून द्यावं का?

पहिल्याच विक्रमसिंह यांच्या प्रतिसादात सध्याच्या जागतिक स्थितीचे थोडक्यात पण समर्पक वर्णन आले आहे.

ब्राझिलच्या जनतेने यांना बहुमताने निवडून दिले. यांना ट्रंप ऑफ द ट्रॉपिक्स म्हणून ओळखले जाते.

देशोदेशीच्या जनता अशा उजव्या विचारांच्या , बहुसंख्यांकवादी , भेदभावाचं आणि द्वेषाचं राजकारण करणार्‍या , पुरुषसत्ताक विचारांच्या, भ्रष्टाचार विरोध आणि विकासाचे आर्थिक वृद्धीचे मुखवटे धारण केलेल्या नेत्यांच्या मागे जात आहेत. अशा नेत्यांना पाठिंबा देणार्‍यांना त्यात काही वावगे वाटू नये याचे नवल वाटण्याचे दिवस कधीच गेले.

*फक्त त्यांच्या स्त्रीविषयक विचारांतही इथल्या स्त्री आयडींना काही खटकलं नाही, याचं किंचित नवल वाटलं. अर्थात रॅडिकलायझेशन किती झालं आहे, हे समजून घेण्यात मीच कमी पडलो.

हे नेतेही एकमेकांना धरून राहणारच. मोदींना प्रजासत्ताक दिनी ट्रंप पाहुणे हवे होते. ते नाही मिळाले तर हे आहेतच.

अगदी आतापर्यंत पाठ्यपुस्तकात श्री म माटें यांचा देशोदेशीचे ज्ञानेश्वर हा पाठ होता. मानव जात टिकली तर पुढेमागे देशोदेशीचे हिटलर असा पाठ असू शकेल. (हिटलरलाही जनतेनेच निवडून दिले होते)

* वाढवलेले वाक्य.

दुसरे म्हणजे यापूर्वी तुमच्या लाडक्या सरकारांनी दुधासारखे स्वच्छ नेतेच बोलावले होते का? >> ज्यांना मे- २०१४ ला स्वातंत्र्य मिळण्या आधीची पारतंत्र्यातली सरकारे आवडत/पटत नव्हती त्यांनी तेव्हा हा मुद्दा उचलायला पाहिजे होता Happy (व्हॉट अबाउटरी फक्त राष्ट्रवादी लोकांनीच का करायची? Wink )

आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही कायमस्वरूपी मित्र व शत्रू नसतात. नीतिमत्ता व तत्वे यांना स्थान नसते. फक्त देशाचे हित महत्त्वाचे असते.

२-३ वर्षांपूर्वी दुबईच्या सत्ताधारी शेखची मुलगी बापाच्या मनाविरूद्ध एका गोऱ्याबरोबर नावेतून पळाली. खाडीतील इतर देश आपल्याला पकडून बापाच्या स्वाधीन करतील हे ओळखून तिने नाव भारताच्या दिशेने हाकली. काही वेळाने मुलगी प्रियकराबरोबर पळाल्याचे बापाला समजले. ती कशी पळाली हे सुद्धा समजले. तिची नाव दुबईपासून बरीच दूर होती व ती भारताच्या दिशेने जात होती हे सुद्धा समजले. त्याने तिला पकडायला तातडीने एक वेगवान जहाज पाठवले व तिला भारताच्या हद्दीत आल्यानंतर पकडून आपल्या हवाली करण्याची विनंती केली. व्यक्तिश: भारताने तिला मदत करायला हवी होती. परंतु मागील काही वर्षात भारत-दुबईचे संबंध बरेच सुधारले आहेत. दुबईत लपलेल्या काही गुन्हेगारांना दुबईने भारताच्या हवाली केले आहे. तिला भारताने आश्रय दिला असता तर हे संबंध बिघडण्याची व त्यामुळे देशाचे नुकसान होण्याची शक्यता होती. त्यामुळे भारताने तिला पकडून दुबईच्या हवाली केले. ही कृती नैतिकदृष्ट्या चुकीची असू शकेल. परंतु यामुळे देशहिताला बाध आला नाही.

अजून एक उदाहरण म्हणजे हिटलर या नराधमाला दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर मोहनदास गांधींनी लिहिलेली दोन पत्रे. या पत्रांची सुरूवात Dear Adolf अशी केली होती.

भरत, काळा बोका यांनी इथं आपटत राहण्यापेक्षा न्यूज चॅनलवर, मोर्चा काढून आपलं मत व्यक्त करावं. हे उजवं उजवं म्हणतात पण उजवेपणा का वाढलाय हे यांना कळत नाही. भुमीपुत्रांना जेव्हा उपरे डोईजड होतात तेव्हा राष्ट्रवादी लोक पेटून उठतात.
चव्हाण बोलला तसं मुसलमानांसाठी शिवसेनेबरोबर युती केली यातुन मुसलमानांना असुरक्षित करुन समाजात तेढ वाढवण्याचा संदेश जातो. कॉंगी हेच करत आहेत.

मे 2014 च्या आधी सरकार कोणाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावणार आहे यावरून राजकारण करणारे विरोधी नव्हते एव्हढंच.
नावडतीचे मीठ अळणी या म्हणीला सार्थ ठरवणारे वर्तन आत्ताचे सरकार विरोधी करत आहेत.

ब्राझिलियन ट्रंपला बो लवण्यात आणि त्याच्या वक्तव्यांत काही वावगं नाही हे एकदा ठरवल्यावर इतरांच्या वर्तनाचे दाखले तेही खोटे, अर्धवट द्यायची गरज का पडावी.
हो, आम्हांला ट्रंप, बोल्सोनारो सारखे नेते आवडतात, असं छातीठोकपणे म्हणा की. यासाठी लाजायचं कधीचंच सोडून झालंय.

गांधी- हिटलर बद्दल अर्धवट माहिती लिहून ज्यांना याबा बत माहिती नाही त्यांची दिशाभूल होऊ शकते, म्हणून त्या पत्रांच्या संदर्भात हा लेख
https://time.com/5685122/gandhi-hitler-letter/

गांधींचं दुसरं पत्र आजच्या काळातही समर्पक ठरतंय. त्यामुळे त्या पत्राचा उल्लेख केल्याबद्दल आभार.

धाग्याचा विषय ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे पाहुणे आहेत, हा नाही. ते निमित्त झालं. त्यामुळे बोल्सेनारोंबद्दल माहिती कळली.

देशोदेशीच्या जनता असे लोक नेता म्हणून निवडते आहे ; जनतेचा ही अशा विचारां ना पाठिंबा आहे (बोल्सेनारो तेच म्हणताहेत) , हे नोंदवणे हा उद्देश आहे.

मग असे नेते लोकशाहीत जनता का निवडते असा धागा काढायचा होता. आणि कोणत्या देशातील जनतेने ते सुध्दा सप्रमाण सिध्द करून.
ताकाला जाऊन भांड लपवण्यात काय फायदा.

सुर्यप्रकाश दिसत असला तरी तो आहे हे सिद्ध करायचं?

जनतेला ते नेते रुचताहेत हे लिहिलंय की. का निवडते हे त्या जनतेलाच ठाऊक. जनतेतही असेच बहुसंख्यांकवादी, पुरुषव र्चस्ववादी, दुबळ्या - शो षितांबद्दल तु च्छतेचे , इ.इ विचार असतील . फरक इतकाच की तसे विचार असण्यात आता काही वावगं राहिलेलं नाही.

मला जे लिहायचंय ते पुरेशा स्पष्टपणे लिहिलेलं आहे.

लोकांना बुबुडा विपुमा उधवि ( बुद्धीवादी बुद्धीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी उदारमतवादी धर्मनिरपेक्ष विचारवंत)

लोकांचा उबग आला आहे ही वस्तुस्थिती का झाली याचे वस्तुनिष्ठ निरीक्षण त्यांनी केले पाहिजे. तसे न करता फक्त बहुसंख्याक लोकांनीच त्याग करत राहिला पाहिजे असे गेले 100 वर्षे हे लोक ओरडत राहिले त्याला अशी जगभर प्रतिक्रिया होत आहे
पण आत्मपरीक्षण न करता फक्त आम्हीच बरोबर म्हणत राहतात.

जर दहशतवाद्यांची हे लोक साथ देऊ लागले तर उदारमतवाद हा चूकच आहे अशीच लोकांची विचारसरणी होणार यात काय शंका?

त्यात अतिशयोक्ती मूळे लंबक दुसऱ्या टोकाला गेला आहे हे दुर्दैव आहे पण याची जबाबदारी याच उदारमतवादी लोकांची आहे.

१९८७ मध्ये इराणचा धर्मांध नराधम खोमेनी गचकल्यानंतर राजीव गांधींनी सार्वजनिक दुखवटा जाहीर करून सुटी जाहीर केली होती>>> देवा हे काय वाचतोय मी. देवा असं काही वाचण्यापूर्वी मी आंधळा का नाही झालो.

मी "आम्हीच बरोबर" हे म्हणत नाही. जे होतंय आणि होईल त्याची जबाबदारी या नेत्यांच्या पाठिराख्यांवर आहे.

स्वागत करुया जैर बोल्सोनारोंचे

हे ठळक टायपात शीर्षक देऊन तुम्ही मोदी द्वेषा पोटी काहीही करू हेच दाखवून दिलं आहे आणि डबक्यात हात घातला आहे

अन्यथा हा माणूस कोण आहे कशाला आला होता याचे सामान्य जनतेला काहीही घेणं देणं नाही.

जर ब्राझील शी व्यापार वाढून आपल्या उद्योगांना आणि शेतीला फायदा झाला असता तर ते आपल्याला हवंच आहे.

माझी खात्री आहे कि ९०% (कदाचित ९९%) मायबोलीकरांना या हलकटाचे नावही माहिती नव्हते.

पण तुम्ही मोठा लेख पाडून त्या माणसाला फुकट प्रसिद्धी दिली आहे.

आपण शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं याच उदारमतवादी डाव्या लोकांच्या वृत्तीचा जगभरातील जनतेला उबग आला आहे. त्यामुळे यांच्या विरोधात बोल्सोनारों सारखा महा हलकट उभा राहिला तरी तो निवडून येतो.

मग श्री मोदींसारखा सामान्य माणसातून वर आलेल्या माणसाला जनता दोन वेळेस पूर्ण बहुमताने निवडून देईल यात शंका कोणती?

तुम लगे रहो और मोदीजी को तिसरी बार जिताओ

जनता तुम्हारे पीछे है!

मागे वळून पाहू मात्र नका. कारण जनता हातात जोडे घेऊन तुमच्या मागे (लागली) आहे.

मायबोली वर कोणत्याही लेखाचं शीर्षक बाय डिफॉल्ट ठळक टाइपातच येतं. तुमचे स्वतःचे लेख उघडून बघा. द्वेषामुळे तुम्हांला हे लक्षात आलं नसेल.

अन्य देशातल्या का होईना पण जनतेने बहुमताने निवडून दिलेल्या नेत्याला हलकट म्हणून तुम्ही फारच मोठं काम केलंय. धन्यवाद.

व्हॉट अबाउटरी फक्त राष्ट्रवादी लोकांनीच का करायची?
>>
मनीष तुमचा युक्तिवाद चुकतोय. मी तत्कालिन सरकारच्या निर्णयाला विरोध करत नाहीये. धगकर्ते मात्र सद्य सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आहेत असा माझा समज झाला म्हणून ते उदाहरण दिले. सिम्बनी सध्याच्या सरकारचा मुद्दा आणला त्याला देखील हे उत्तर दिले आहे.

आता भरत यांनी स्पष्टीकरण दिले आहे की जगभर वाढत चाललेल्या उजव्या विचारसरणीच्या वर्चस्वाबद्दल त्यांना मत नोंदवायचे आहे. तसे असेल तर धाग्यातून ते स्पष्ट होत नाही.
या विषयावर गेली 4 5 वर्षे जागतिक दर्जाच्या नियतकालिकात सातत्याने लिहिले जात आहे. विशेषतः इकॉनॉमिस्ट साप्ताहिकात ब्रेक्झिट, बोरिस जॉन्सन, ट्रम्प, ड्युटरते, मोदी, व्हिक्टर ओरबान इत्यादींच्या निवडणुका व विजयाच्या घटनांच्या वेळी कव्हर स्टोरी लिहिलेल्या आहेत. त्यात अजून भर घालण्यासारखे माझ्याकडे तरी काही नाही.

इतर अभ्यासू लोकांनी लिहावे ही अपेक्षा.

काळाचे एक वलय पुर्ण होत आहे असे म्हणूया. बहुसंख्यकांच्या अहिताचा विचार करून अल्पसंख्याकांना गोंजारण्यामुळेच हे जगभर होत आहे. ते सुध्दा सर्वांना समान वागणूक हा खोटा विश्वास दाखवून.
अशिक्षीत जनतेला अंधारात ठेवता येईल असे वाटत होते. पण आता खरं काय ते जनतेला कळतंय. त्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठत आहे. कारण आता चराऊ कुरणं बंद झाली आहेत.
हा धागा काढण्याचा हाच हेतू आहे.

>>> हो, आम्हांला ट्रंप, बोल्सोनारो सारखे नेते आवडतात, असं छातीठोकपणे म्हणा की. यासाठी लाजायचं कधीचंच सोडून झालंय. >>>

कोणाच्या आवडीनिवडीचा कणभरही संबंध नाही. जे देशहिताचे आहे ते केलेच पाहिजे. ते करताना नीतिमत्ता, तत्वे यांना स्थान नसते.

>>> गांधी- हिटलर बद्दल अर्धवट माहिती लिहून ज्यांना याबा बत माहिती नाही त्यांची दिशाभूल होऊ शकते, म्हणून त्या पत्रांच्या संदर्भात हा लेख >>>

या लेखातून मी सांगितलंय त्यालाच दुजोरा मिळालाय. लिंकबद्दल धन्यवाद!

Pages