स्वागत करुया जैर बोल्सोनारोंचे

Submitted by भरत. on 21 January, 2020 - 23:43

यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे आपले पाहुणे आहेत ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो.

भ्रष्टाचार्‍यांना तुरुंगात पाठवण्याची अति परिचित घोषणा देऊन गेल्याच वर्षी ते सत्तेत आले.

ते येण्याआधीच त्यांची कीर्ती इथ वर ये ऊन ठेपली आणि त्यांची काही वक्तव्ये वाचून मन गदगदून गेले.

ब्राझिलमध्ये तुरुंगांच्या नावाखाली टॉर्चर सेंटर चालत. - (कैद्यांना /आरोपींना) टॉर्चर करण्याला माझे पूर्ण समर्थन आहे. आणि जनतेचेही.

बोल्सोनारो माजी लष्कर प्रमुख आहेत. - आपली संसद काही उपयोगाची नाही. मी संसद बरखास्त केली तर किमान ९०% लोक आनंद साजरा करतील. सरळ सरळ हुकुमशाही यायला हवी.

निवडणुकांमुळे या देशात काहीही बदलत नाही. देशात जेव्हा यादवी युद्ध होईल आणि तीसेक हजार लोक मरतील तेव्हाच काहीतरी बदलेल.
अर्थात यात काही निरपरा ध लोकही मरतील म्हणा. पण तसंही प्रत्येक युद्धात निरपराध लोक मरतातच. माझ्यासोबत असे ३०, ००० लोक मरणार असतील तर मी स्वतः मरायला आनंदाने तयार आहे.

ब्राझिलमध्येही आफ्रिकी वंशाच्या लोकांना गुलाम म्हणून ठेवले जाई. त्यांच्या पुढल्या पिढ्या वेगळ्या वस्त्यात राहतात. अशा एका वस्तीला भेट दिल्यावर - " तिथला सगळ्यात कृश माणूस २३० पौंड वजनाचा होता. हे लोक का ही ही करत नाहीत. अगदी पोरं काढायच्याही लायकीचे नाहीत.|

अमेझॉनच्या खोर्‍यातल्या आगींबद्दल आपण कदाचित ऐकलं असेल. विकासाचा ध्यास घेत तिथल्या सरकारने निर्वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

" मूलनिवासी लोकांसाठी आरक्षित केलेला प्रत्येक भूभाग हा 'देवीच्या व्रणासारखा आहे."

माझा मुलगा समलैंगिक निपजला तर मला त्याच्याबद्दल प्रेम वाटणं शक्य नाही. कुण्या बाप्याबरोबर घरी येण्यापेक्षा असा मुलगा अपघातात गेलेला बरा.

मला पाच मुलं आहेत. पाचव्या अपत्याच्या वेळी मी जरा कमी पडलो आणि मुलगी जन्माला आली.

विरोधी पक्षाच्या एका लोक प्रतिनिधीबद्दल - ती इतकी कुरूप आहे की बलात्कार करायच्याही लायकीची नाही.

आपल्या देशाच्या या अतिथीचं स्वागत करूया.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Simba तुम्हाला काय म्हणायचे आहे ते मला तरी समजत नाही. भारत सरकारचे प्रजासत्ताक दिनाचे अतिथी आणि सरकार-अतिथी वैचारीक जवळीकीचा संबंध नाही असे मी सोदाहरण दिले आहे. तसेच गेल्या 6 वर्षात उजव्या विचरासारणीच्या अतिथींना बोलावण्याचे प्रमाण वाढले आहे या तुमच्या विधानाला पुष्टी देणारा पुरावा दिसत नाही.

त्यानंतरची तुमची पुतिन व आबे बद्दलची पोस्ट माझ्याच म्हणण्याला पुष्टी देते ना?

पण मी काय म्हणतो, खुद्द धागाकर्ताच म्हणताहेत की स्वागत करुया. तरी एव्हडी खडाजंगी कशासाठी मग? Proud

मला पाच मुलं आहेत. पाचव्या अपत्याच्या वेळी मी जरा कमी पडलो आणि मुलगी जन्माला आली Lol Lol

मी पहिल्या प्रयत्नात कमी पडलो... एका मुलीचा बाप झालो... हैराणझालो.. परेशान झालो..
मग निर्धार करून एका सकाळी उठलो.. जिमात जाऊन वायाम केला, घाम गाळला, रात्री वेलदोडा घातलेले दूध प्यायालो आणि मुलगा जन्माला आणला Lol

तरी एव्हडी खडाजंगी कशासाठी मग? Proud

Submitted by योग on 24 January, 2020 - 20:20

अगं बाई सासूबाई आणि माझ्या नवर्‍याची बायकोसारख्या सिरियल्स मन लावून पाहणे, त्याचे मीम्स शोधणे हेच जग असेल तर मग प्रजासत्ताक दिनाचं आमंत्रण आणि मराठी सिरियलमधलं संक्रांतीचं हळदीकुंकू हे सारखंच वाटू लागलं असेल. किचन कॅबिनेटसारखं किचन पॉलिटिक्स. नुस्तीच धुसफूस नी हॉर्मोनल चिडचिड Biggrin

या यादीवरून उजव्या विचारसरणीच्या आपल्या जवळच्या लोकांना बोलावले जात आहे हा निष्कर्ष कसा काढला?

2005 ते 14 या काळात पुतीन, नाझरबेयव्ह, आबे हे आमंत्रीतात आहेत. मग ते सरकार हुकूमशाही प्रवृत्तीचे होते असे म्हणणार का? नक्कीच नाही>>>>

टवणे सर, तुम्ही डेटा हातात घेऊन चर्चा करताय. इथल्या ज्या आईडींचे प्रश्न तुम्ही सोडवताय त्यांना उत्तरे नकोयत. ते फक्त प्रश्न विचारून नंतर डोळे टिपणार.... त्यांचा त्रास वेगळा आहे.

Happy

सनव काकू, तुमचं डायग्नोसिस चुकलंय. ते धागे मन लावून वाचता म्हणजे कळलंच असेल मी झी मराठी चॅनेल अनसब्स्राइब केलेलं आहे नेटवर मालिका पहात नाही. आणि मीम्स शोधावे लागत नाहीत हो. दिसतात आपोआप.

बाकी तुम्ही मंडळी माझ्यावर पर्सनल कमेंट्स करण्यापलीकडे जाऊन मुद्दे मांडायला शिकण्याची शक्यता अगदीच धूसर आहे.

स्ट्रॉमन आर्ग्युमेंट्स आणि व्हॉट अबाउट्रीला मुद्दे मांडणे म्हणत नाहीत.

जर बोलशील नाऱ्या दिसायला स्मार्ट आहे म्हणतात. मराठीच असावेत ते. पूर्वीच्या काळी ब्राझीलला गेले असतील त्यांचे पूर्वज.

भरत च्या पणजोबांची त्यांच्या पणजोबांशी दुश्मनी होती. ते ब्राझील ला गेले अन् श्रीमंत बनले, भरत म्हणून रागवेल ह्ये बोकलत भावा.

तुम्हाला अनेकांनी मुद्देसूद प्रश्न विचारून झाले. तुमच्याकडे उत्तरं नाहीत. तिकडे CAA बद्दल काँग्रेस पक्षाची नेमकी भूमिका काय विचारलं त्याचंही उत्तर नाही. स्त्री आयडीजवरती पर्सनल आरोप करणं ही नेहमीची स्ट्रॅटेजी मागच्या पानावर तुमची वापरून झाली आहे. (ते बरोबर आहे- बायकांनी तोंड उघडलं की त्रास होणारच- बाईने शाहबानोसारखं आगाऊ असू नये!).

बोल्सेनारो सारख्या व्यक्तीच्या समर्थनार्थ उतरणार्‍या स्त्री आयड्यांचं कौतु क करावं तेवढं थोडंच.

फक्त मी काहीतरी लिहिलंय म्हणजे त्याच्या विरोधातच आपण लिहिलं पाहिजे असं ठरवून तुम्ही मैदानात उतरलेल्या पाहून नवल वाटत नाही.

असो. तुमचा vicious पणा चालू द्या.

बोल्सेनारो सारख्या व्यक्तीच्या समर्थनार्थ उतरणार्‍या स्त्री आयड्यांचं कौतु क करावं तेवढं थोडंच.

फक्त मी काहीतरी लिहिलंय म्हणजे त्याच्या विरोधातच आपण लिहिलं पाहिजे असं ठरवून तुम्ही मैदानात उतरलेल्या पाहून नवल वाटत नाही.>>>>

स्वतःला हवे ते अर्थ काढण्याच्या तुमच्या कसबाचे प्रचंड कौतुक. तुम्हाला कितीही तिरस्कार वाटत असला तरी तुम्हाला हे कसब लाभण्यामागे मोदींचा हात आहे. त्यांच्याप्रती वाटत असलेल्या कमालीच्या तिरस्कारामुळे तुम्ही हे कसब कमावले. आता मोदींचा यामागे हात आहे म्हणून तुम्ही हे कसब झुगारून तर देणार नाही ना???

भरत मयेकर, तुम्ही कधीकाळी खूप चांगले मुद्दे घेऊन चर्चा करायचात. केवळ मोदींबद्दलच्या व्यक्तिगत द्वेषापाई तुम्ही इथे माबोवर उलटसुलट उड्या मारत बसता, तुमच्या हातून वाचनीय असे काही लिहिले गेले असते ते सर्व आता गेले. याचे एक वाचक म्हणून वाईट वाटते. असो.

बाकी स्त्री ही कायम वेगळीच राहणार आहे का? व्यक्ती म्हणून तिला काहीही किंमत नसणार? तिची मते देतानाही तिने ती स्त्री आहे ह्या भूमिकेतून मते द्यावीत? ती मते वाचणारे 'ही एका स्त्रीची मते आहेत, म्हणजेच ही समस्त स्त्रियांची मते आहेत' हा चष्मा लावूनच वाचणार? अजून किती काळ हे असेच चालणार?

मला तरी या धाग्यावर झालेल्या चर्चेत कोणत्याही सदस्याने बोल्सेनारोचे समर्थन केलेले दिसत नाही.
पण मनी ज्याच्या द्वेष वसे, त्यास दिवसासुध्दा रात्र भासे अशी भरत यांची मनस्थिती झाली आहे.

फार वर्षांपूर्वी रमेश देव सीमा देव जोडीचा एक सिनेमा पाहिला होता. त्यात रमेश - सीमा एका श्रीमंत महिलेला फसवायचं ठरवतात. रमेशने त्या श्रीमंत महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी लग्न करायचं आणि नंतर तिची संपत्ती बळकावून तिला ठार मारायचं व त्यानंतर पुन्हा सीमाशी लग्न करायचं अशी काहीशी त्यांची योजना असते. पुढे त्या श्रीमंत महिलेशी लग्न झाल्यावर रमेश खरोखरच तिच्या प्रेमात पडतो. तिला ठार मारण्याचा विचार रद्द करतो. मग सीमा त्याला ब्लॅकमेल करते की तू तिला ठार मार नाहीतर मी तिला सांगेन की तू काय योजना आखून तिच्याशी लग्न केलं ते. पण रमेश सीमाच्या धमकीला घाबरत नाही तर सीमा स्वतःच त्या महिलेला ठार मारायचे ठरवते तर रमेश तिचा डाव उधळून लावतो. शेवटच्या सीनमध्ये रमेश सीमाला चोपत असतो तेव्हा ती श्रीमंत महिला (रमेशची पत्नी) रमेशला आवरते त्यावेळचा संवाद फार छान आहे. पन्नास वर्षे झाली तरी अजून माझ्या लक्षात आहे. ती रमेशला म्हणते, "मेलेल्याला का मारता?"

तीनच शब्द पण किती प्रभावी.

आता भरत. या आयडीला प्रत्युत्तरे देणार्‍यांविषयी देखील हेच तीन शब्द मी वापरु इच्छितो.

साधारण सहा वर्षांपूर्वी मी मायबोलीवर आलो तेव्हा दोन मुख्य गट या ठिकाणी असल्याचे जाणवले. माझ्या विचारसरणीच्या विरुद्ध गटात असलेले भरत. आणि साती हे दोन आयडी मुद्देसूद लिहिणारे आणि संयमी होते. भरत. हे तेव्हा भरत मयेकर असे पूर्ण नाव लावलेला आयडी वापरायचे. तेव्हा भरत यांना सारे जण अगदी त्यांच्या विचारसरणीच्या विरोधी गटातले देखील शक्यतो मयेकर अथवा मयेकर साहेब / सर असे संबोधत. त्यात आदराचा भाग होता आणि त्यांचे लेखनही त्या आदराला खरोखरच पात्र होते. त्या आठवणीने अजूनही काही जण त्यांचा मयेकर असा उल्लेख करतात तर त्यांच्याकडून लगेच नाराजी व्यक्त होते. ते स्वतः इतरांचा काकू, बाळ, आजोबा असा उल्लेख करतात या गोष्टीचा त्यांना सोयीस्कर रीत्या विसर पडतो. गेल्या दोन वर्षांत भरत. यांच्या लेखनाची पातळी प्रचंड खालावली आहे. या आयडीकडून विरोधकांचा आदर मिळण्यासारखे लेखन घडत असेल यावर या दोन वर्षांत आलेल्या सदस्यांचा विश्वास बसणे कठीण भासावे अशी स्थिती आहे. विरोधी गटाचे कित्येक आयडी भरत. यांचा एकेरी उल्लेख करतात कधीतर त्यांना शेलकी विशेषणे देखील बहाल करतात तेव्हा मनापासून खेद वाटतो.

"कोण होतास तू? काय झालास तू?" अशी या आयडीची अवस्था पाहता साधना, सनव, रश्मी या जुन्याजाणत्या आयडींना एकच विनंती - यांना अडचणीत आणणारे मुद्दे मांडून अजूनच चवताळलायला भाग पाडू नका. ते संतूलन हरवून काहीतरी भरकटलेले चिरखोड अविचारी प्रतिसाद इथे मांडणार आणि नवे आयडी मग त्यांचा अजूनच खालच्या शब्दात उल्लेख करुन त्यांचा पाणउतारा करणार. मेलेल्याला अजून मारु नका हो.

खरंय! मी सुध्दा या व्यक्तीचे दोन वर्षांपासुन विचार बघतोय. अतिशय संतुलीत पण पुर्वग्रहदुषित आहेत हे लक्षात येते. काही धाग्यावर छान माहितीपुर्ण असतात जिथे राजकारणाचे विषय नसतात. पण मोदी हा शब्द आल्याबरोबर मात्र असंतुलित आणि अविवेकी पणाची हद्द ओलांडणारे.
मला त्यांच्या याआधीच्या मायबोलीवरील आयडीबद्दल माहिती नाही त्यामुळे काहीही टंकणे अनुचित आहे.
तरीही लवकर बरे व्हा एवढंच लिहू शकतो.

जली ना ?? Lol
रिपब्लिक डे वर बहिष्कार घाला Lol

भरत, किती खोटं बोलाल? कोणी केलंय समर्थन? माझी पहिलीच पोस्ट आहे ज्यातलं पहिलंच वाक्य आहे- या माणसाची मतं योग्य नाहीत.

त्याच्यापुढे मी लिहिलं-
पण राजनैतिक संबंधात प्रत्येक देशात आपला moral compass लावू शकू इतके आपण पॉवरफुल नाही.
स्त्री म्हणून सर्व गल्फ इस्लामी देशातील कायदे मला खटकतात. तिथली स्त्रियांची परिस्थिती खूपच वाईट आहे. पण तरी या देशांशी भारताला राजनैतिक संबंध ठेवावेच लागतात- मग सरकार कोणाचंही असो. 50 बायकांचा जनानखाना बाळगणाऱ्याअरब सुलतान लोकांना भारतात राजनैतिक व्हिजिट्सवर सन्मानानेच वागवलं जातं.

यात काय समर्थन आहे? मुस्लिम देशात मानवी हक्क पायदळी तुडवले जातात म्हणून तिथून इंधन घ्यायचं नाही असं भारत देश आत्ता करू शकत नाही. ब्रिक्स देशांशीही रिलेशन मेंटेन करायचेच आहेत- ब्राझील असो वा रशिया.

एनिवेज, प्लीज गेट वेल सून.

भरत,
हा लेख व्हाटस अप फाँर्वर्ड करु का? काय भारी पाहुणा शोधुन आणलाय हे लोकांना कळायला हवे.

भरत,
हा लेख व्हाटस अप फाँर्वर्ड करु का? काय भारी पाहुणा शोधुन आणलाय हे लोकांना कळायला हवे.>>>
हायला, नेकी और पुछ पुछ|
बाकी मला नाही वाटत ते तुम्हाला अनुमती नाकारतील.
बाकी हा एव्हढा महान विचार आत्ताच कसा आला?
कसं जमवतात काही माणसं हा विचार, हे मात्र मला, माझे सत्याचे प्रयोग वाचल्यानंतर पुर्णपणे कळला आहे.

मागे राहुलजींंनी 'भारत ही रेप कँपिटल झाली आहें' असे विधान केले होते.

आणी लेखातल्या पाहुणा म्हणुन बोलावलेल्या व्यक्तिचे
हे विधान
विरोधी पक्षाच्या एका लोक प्रतिनिधीबद्दल - ती इतकी कुरूप आहे की बलात्कार करायच्याही लायकीची नाही.
थोडक्यात पाहुणा रेपसमर्थक दिसतोय.

राहुलजींच्या नाकावर टिच्चुन तर ह्या पाहुण्याला बोलवायचा घाट घातला गेला नसेल.

Pages