स्वागत करुया जैर बोल्सोनारोंचे

Submitted by भरत. on 21 January, 2020 - 23:43

यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे आपले पाहुणे आहेत ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो.

भ्रष्टाचार्‍यांना तुरुंगात पाठवण्याची अति परिचित घोषणा देऊन गेल्याच वर्षी ते सत्तेत आले.

ते येण्याआधीच त्यांची कीर्ती इथ वर ये ऊन ठेपली आणि त्यांची काही वक्तव्ये वाचून मन गदगदून गेले.

ब्राझिलमध्ये तुरुंगांच्या नावाखाली टॉर्चर सेंटर चालत. - (कैद्यांना /आरोपींना) टॉर्चर करण्याला माझे पूर्ण समर्थन आहे. आणि जनतेचेही.

बोल्सोनारो माजी लष्कर प्रमुख आहेत. - आपली संसद काही उपयोगाची नाही. मी संसद बरखास्त केली तर किमान ९०% लोक आनंद साजरा करतील. सरळ सरळ हुकुमशाही यायला हवी.

निवडणुकांमुळे या देशात काहीही बदलत नाही. देशात जेव्हा यादवी युद्ध होईल आणि तीसेक हजार लोक मरतील तेव्हाच काहीतरी बदलेल.
अर्थात यात काही निरपरा ध लोकही मरतील म्हणा. पण तसंही प्रत्येक युद्धात निरपराध लोक मरतातच. माझ्यासोबत असे ३०, ००० लोक मरणार असतील तर मी स्वतः मरायला आनंदाने तयार आहे.

ब्राझिलमध्येही आफ्रिकी वंशाच्या लोकांना गुलाम म्हणून ठेवले जाई. त्यांच्या पुढल्या पिढ्या वेगळ्या वस्त्यात राहतात. अशा एका वस्तीला भेट दिल्यावर - " तिथला सगळ्यात कृश माणूस २३० पौंड वजनाचा होता. हे लोक का ही ही करत नाहीत. अगदी पोरं काढायच्याही लायकीचे नाहीत.|

अमेझॉनच्या खोर्‍यातल्या आगींबद्दल आपण कदाचित ऐकलं असेल. विकासाचा ध्यास घेत तिथल्या सरकारने निर्वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

" मूलनिवासी लोकांसाठी आरक्षित केलेला प्रत्येक भूभाग हा 'देवीच्या व्रणासारखा आहे."

माझा मुलगा समलैंगिक निपजला तर मला त्याच्याबद्दल प्रेम वाटणं शक्य नाही. कुण्या बाप्याबरोबर घरी येण्यापेक्षा असा मुलगा अपघातात गेलेला बरा.

मला पाच मुलं आहेत. पाचव्या अपत्याच्या वेळी मी जरा कमी पडलो आणि मुलगी जन्माला आली.

विरोधी पक्षाच्या एका लोक प्रतिनिधीबद्दल - ती इतकी कुरूप आहे की बलात्कार करायच्याही लायकीची नाही.

आपल्या देशाच्या या अतिथीचं स्वागत करूया.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> उजवीकडे आणि डावीकडे आमची राजमाता आणि युवराज आणि मध्ये बाहुला (देशाचा पंतप्रधान) आणि आमची भाटगिरी करून फुकटची सोय हेच बघून डोळे पाणावलेले होतेना तुमचे.
तुमच्या व्यथा कळतात हो भारतीयांना आता. >>>

Rofl

फक्त त्यांच्या स्त्रीविषयक विचारांतही इथल्या स्त्री आयडींना काही खटकलं नाही, याचं किंचित नवल वाटलं. अर्थात रॅडिकलायझेशन किती झालं आहे, हे समजून घेण्यात मीच कमी पडलो.>>

हे मिसलं होतं. कोणी , कोणत्या स्त्रीआयडींनी केलंय समर्थन? कोणाला रॅडिकल म्हणताय तुम्ही?

तुम्ही ज्या काँग्रेस पक्षाचे प्रचारक आहात तो स्त्रियांना समान नागरी कायदा नाकारणारा, शाहबानो प्रकरणात साक्षात सुप्रीम कोर्टाचा प्रोग्रेसिव्ह निर्णय बदलून मध्ययुगीन प्रथा कायम ठेवणारा पक्ष आहे. हलाला, बहुपत्नीत्व याला लीगल मान्यता देणारा पक्ष आहे. हे विचार तुम्हाला 'रॅडिकल' वाटत नाहीत. प्रोग्रेसिव्हच वाटत आहेत. पण बाईने स्वतःचं मत व्यक्त केलं, समान अधिकारांची भाषा केली की लगेच ती 'रॅडिकलाईझ' झाली!

तुम्ही ज्या काँग्रेस पक्षाचे प्रचारक आहात >> एव्हढं सत्य म्हणजे एरंडेलच हो. त्यांची पोटं ते प्राशन करून पण तट्ट फुगलेली आहेत.
बाकी तुमची पोस्ट त्यांना पचनी पडणार नाही. कारण सत्याचे प्रयोग हे फक्त त्यांना वंदनीय आहेत ... आचरणात ते कधीच आणणार नाहीत.

@ भरत
तुमच्याकडून इतकी भंपक चर्चा अपेक्षित नव्हती.

तुम्ही दिलेली वक्तव्ये सत्य आहेत का तेवढे सांगा म्हणजे मी त्यांच्या विचारसरणीला हलकट म्हणतो ते सिद्ध होईल. (सकृतदर्शनी ती वक्तव्ये सत्य आहेत हे मी मानून चाललो आहे)
एखादा माणूस विरोधक स्त्रीवर बलात्कार करण्याची अत्यंत हलकट भाषा बोलतो ""विरोधी पक्षाच्या एका लोक प्रतिनिधीबद्दल - ती इतकी कुरूप आहे की बलात्कार करायच्याही लायकीची नाही."
त्याची विचारसरणी उच्च आहे की हलकट हे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ असताना तुम्ही ब्लॅक कॅट सारखा लोचट पणा करून तोच तोच प्रश्न परत परत विचारून आपली पातळी दाखवून दिली आहे.

श्री मोदी यांचे असे हीन वक्तव्य आपल्याला दाखवत येईल का?

उलट त्यांनाच नीच, चोर खून का दलाल (चहावाला हे फारच सौम्य विशेषण झाले) संबोधणार्या काँग्रेसची तळी उचलून धरत आपण मलाच उलट प्रश्न विचारताय?

यापुढे आपल्याशी चर्चा करणे मला शक्य नाही.

आपले भले होवो ही सदिच्छा

ब्राझील हा BRICS पैकी महत्वाचा देश असल्यामुळे त्या देशाशी चांगले संबंध ठेवणे हे पीएम म्हणून मोदींचं कर्तव्य आहे. मोदींनी पर्सनल मित्रकिंवा खाजगी बिझनेस पार्टनर म्हणून कोणाला बोलावलं नाहीये.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भरत आणि तमाम पुरोगाम्यांनी भरपूर टीका केलेली आहे. या ट्रम्प यांचा पुण्यात प्रोजेक्ट आहे. पंचशील - चोरडिया फॅमिली. यात सुप्रिया सुळे पार्टनर म्हणून जोडल्या गेल्या. ही एक 2016 ची न्यूज बघा:
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार २ नोव्हेंबरला वॉशिंग्टनला रवाना होणार आहेत. या दौऱ्यात ते रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना भेटणार आहेत. तेथील भारतीयांसोबतही त्यांच्या बैठकी आयोजित करण्यात आल्या आहेत.
शरद पवार ७ नोव्हेंबरपर्यंत अमेरिकेत राहतील. ट्रम्प यांचे भारतातील व्यावसायिक भागीदार आणि पुण्यातील पंचशील रिअॅलिटीजचे अध्यक्ष अतुल चोरडिया यांच्या पुढाकाराने पवार-ट्रम्प बैठक आयोजित करण्यात आली आहे. या दौऱ्यात हिलरी यांच्याशी भेटीची शक्यता नसल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

महाविकासआघाडीचा आणि पवार साहेबांचा विजय असो.

सुबोध खरे, धन्यवाद. लेखाचं शीर्षक ठळक टाइपात का लिहिलं असले प्रश्न विचारणा र्‍या व्यक्तीने मला भंपक म्हणावं हा माझा बहुमान समजतो.

गेल्या काही दिवसांत एक पॅटर्न लक्षात आला. एका प्रतिसादा च्या उत्तरार्थ काही लिहिलं की त्यातलं अर्ध काहीतरी उचलून दुसराच आयडी पुढचे धागे होडायला येतो.

जननेत्याचा मान ठेवा हा सुबोध खरेंचा आग्रह. त्याबद्दल त्यांना विचारलं तर तो मुद्दा घेऊन दुसरं कोणी माझ्या वर उलटलं. त्याच आयडीच्या प्रतिसादातले फुकट लिहायला मिळतंय इत्यादी शब्द वाचून विरोध, वेगळं मत सहन न होण्याचा , तसं मत मांडणार्‍याला लिहूच द्यायचं नाही, असा प्रयत्न सतत होताना दिसतो हे पुन्हा एकदा नोंदवतो. लेखाचं शीर्षक ठळक अक्षरां त का हाही त्यातलाच प्रकार.

>>> उजवीकडे आणि डावीकडे आमची राजमाता आणि युवराज आणि मध्ये बाहुला (देशाचा पंतप्रधान) आणि आमची भाटगिरी करून फुकटची सोय हेच बघून डोळे पाणावलेले होतेना तुमचे.
तुमच्या व्यथा कळतात हो भारतीयांना आता. >>>

Rofl

१९८७ मध्ये इराणचा धर्मांध नराधम खोमेनी गचकल्यानंतर राजीव गांधींनी सार्वजनिक दुखवटा जाहीर करून सुटी जाहीर केली होती>>>> खूप वाईट वाटलं वाचून. अजूनही धक्क्यातून सावरलो नाही. माझ्यासाठी प्रार्थना करा.

@ भरत

यापुढे आपल्याशी चर्चा करणे मला शक्य नाही.

आपले भले होवो ही सदिच्छा

@ भरत
>>>>यापुढे आपल्याशी चर्चा करणे मला शक्य नाही.आपले भले होवो ही सदिच्छा
लवकर सुबुध्दी झाली तर...! किती दिवस दगडांवर डोके आपटून घेताय हे पहात होतो. Proud

माझं मत.
बोल्सोनारो या व्यक्तीला हे आमंत्रण नसून ब्राझिल देशाला आहे. देशाचा प्रथम नागरिक म्हणून बोल्सोनारो ना बोलावलं आहे. ते पदावर नसते तर कधीही अशा समारंभाला बोलावले नसतं असं मला वाटतं.

स्वच्छ सुर्यप्रकाश वगैरे... वगैरे असे प्रतिसाद आहेत धागाकर्त्यांचे म्हणून त्यांच्यासाठी एक म्हण.

कळतंय पण वळत नाही.

>>बोल्सोनारो या व्यक्तीला हे आमंत्रण नसून ब्राझिल देशाला आहे. देशाचा प्रथम नागरिक म्हणून बोल्सोनारो ना बोलावलं आहे. ते पदावर नसते तर कधीही अशा समारंभाला बोलावले नसतं असं मला वाटतं.<< +१

आता हे महाशय (जाइर बोल्सनारु) मोदिंबरोबर झोपाळ्यावर बसले तर आभाळ कोसळेल असं मला वाटतंय... Proud

ससा का पाठीवर झाडाचं पान पडल्यावर आभाळ कोसळलं अशी बोंब ठोकतोय. ते समजण्याच्या पलिकडे आहे.
कळलं. Proud

अमेरिकेचे प्रेसिडंट असलेल्या ट्रम्प यांचा हेटाळणीपूर्ण उल्लेख करत मायबोलीवर ट्रम्पवर टीका करणार्‍यांना ट्रम्प व पवार यांची खाजगी बिझनेस पार्टनरशिप मात्र खटकत नाही. पवार यांचा विधानसभेला इमानेइतबारे प्रचार केला गेला इथे!
महिलांसाठी प्रचंड oppressive कायदे असलेल्या मुस्लिम देशांशी काँग्रेस-भाजप दोन्ही काळात ठेवण्यात आलेले सलोख्याचे संबंध कधी खटकले नाहीत.
फक्त डबल स्टँडर्ड्स हीच आमची एकमेव पहचान आहे.

https://www.economist.com/leaders/2020/01/23/narendra-modi-stokes-divisi...

मी आधीच्या प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे इकॉनॉमिस्ट साप्ताहिकात उजव्या विचारसरणीच्या नेत्यांविरुद्ध सातत्याने कव्हर स्टोरी येत आहेत गेली 5 6 वर्षे. या मालिकेतील अजून एक कव्हर स्टोरी या आठवड्यातील

मज्जा चालू आहे इकडे,

एका राजकीय नेत्यांनी मुक्ताफळे नोंदवून ,याचे देशात स्वागत करूया इतकेच म्हंटले आहे मूळ लेखात.
ठराविक id शेपटावर पाय पडल्यासारखे चवताळले आहेत.

पुढे मी म्हंटले "प्रत्येक" सरकार आपल्या विचारांशी सहानुभूती असणाऱ्या लोकांशी जवळीक वाढवायला पहाते,
त्याला परत सेलेक्टिव्ह रिडींग करून , तेव्हा -आत्ताची तुलना,

भक्त सटिया गये है.....

परत ते पाहुणे बोलावून आर्थिक संबंध मजबूत करायचे विधान, पुरावा* मागितल्यावर नोटबंदीच्या काळ्या पैशाच्या कारणासारखे दुर्लक्षित ठेवायचे.

*पुरावा म्हणजे , ब्राझील बरोबर किती हजार करोड चे करार मदार होणार आहेत हे नाही,
या आधी पाहुणे अध्यक्ष आणलेल्या देशांशी किती करार झाले आणि झालेल्या करारांपैकी किती प्रत्यक्षात आले हा आकडा. जिकडे आकडे विचारले जातात तिकडे भक्त शेपूट घालतात.

गुजरात मध्ये झालेल्या MOU पैकी केवळ 17% वर काम झाले असे ऐकून आहे, बाकीचे 83% नुसतीच धूळफेक होती

पुढे मी म्हंटले "प्रत्येक" सरकार आपल्या विचारांशी सहानुभूती असणाऱ्या लोकांशी जवळीक वाढवायला पहाते,

>>

हे विधान जर आंतरराष्ट्रीय संबंधाबाबत असेल तर यासंदर्भातील उदाहरणे देऊ शकाल का? विशेषतः पोस्ट कोल्ड वॉर गेल्या 30 वर्षातील.
त्यापूर्वीसुद्धा दुसऱ्या महायुद्धानंतर हे क्वचित काही ठिकाणी लागू पडेल (रशिया क्युबा, चीन उत्तर कोरिया) पण या उदाहरणातदेखील वैचारिक जवळीकीपेक्षा अमेरिकेला पाचर ठेवणे हा मुख्य उद्देश होता.

सॅम्युएल हंटिंगटनने संस्कृतींचा समूह (clash of civilization) ही देशांनी जवळ येण्याची संकल्पना मांडली. त्याला 90 ते 2010या काळात प्रचंड लोकप्रियता लाभली. निओकॉन्स (वुलफोविट्झ वगैरे) त्या पंथातले.

यापुढचा काळ clash of personalities असू शकतो (दुडा ओरबान बोरिस जॉन्सन, ट्रम्प जॉन्सन, मोदी एर्दोआन एमबीएस ड्युटरते Proud ). पण अजूनपर्यंत तरी तुम्ही म्हणता तसे आंतरराष्ट्रीय जवळीकी झालेल्या नाहीत

लोकांशी जवळीक ≠ देशांशी जवळीक
गेल्या 6 वर्षांत बोलावलेल्या लोकांची यादी दिली आहे, त्यात उजव्या विचारसरणीचे लोकांचे प्रमाण जास्त वाटते.

उजव्या विचारसरणीचे लोकांचे प्रमाण जास्त वाटते.
ते तर होणारच
जगभर लोक शहाणे झाले आहेत
आणि
वाममार्गी लोकाना आता सत्तेतून हाकलून दिलंय
तेंव्हा त्यांना बोलावणार कोण?
म्हणून तर ते पिसाळल्यासारखे झाले आहेत.

अग्गो बाई,
ते व्यापार संबंध स्पष्ट करणार का?

गेल्या 6 वर्षांत बोलावलेल्या लोकांची यादी दिली आहे, त्यात उजव्या विचारसरणीचे लोकांचे प्रमाण जास्त वाटते.
>>>
Uhoh
2015 बराक ओबामा
2016 फ्रान्सवा ओलांद
2017 uae चा राजपुत्र
2018 लूक ईस्ट पॉलिसी (साऊथ ईस्ट एशियातील 10देशांच्या प्रमुखांना आमंत्रण.)
2019: सिरील रामफोसा
2010: बॉल्सनारो

यात 2018च्या आमंत्रितांपैकी ड्युटरते खास उजव्या विचरासारणीच्या नेत्यांपैकी एक मानता येईल. ते स्वतंत्र बोलावले नसून 10च्या गठ्ठ्यात लूक ईस्ट अंतर्गत बोलावले आहेत.

या यादीवरून उजव्या विचारसरणीच्या आपल्या जवळच्या लोकांना बोलावले जात आहे हा निष्कर्ष कसा काढला?

2005 ते 14 या काळात पुतीन, नाझरबेयव्ह, आबे हे आमंत्रीतात आहेत. मग ते सरकार हुकूमशाही प्रवृत्तीचे होते असे म्हणणार का? नक्कीच नाही.

Abe is a conservative whom political commentators have widely described as a right-wing nationalist.[1][2][3][4] He is a member of Nippon Kaigi and holds revisionist views on Japanese history,[5] including denying the role of government coercion in the recruitment of comfort women during World War II,[6] a position which has created tension with neighboring South Korea.[7][8]

>>>>>Russian politician Boris Nemtsov and commentator Kara-Murza define Putinism in Russia as "a one party system, censorship, a puppet parliament, ending of an independent judiciary, firm centralization of power and finances, and hypertrophied role of special services and bureaucracy, in particular in relation to business".[101]>>>>>

म्यानमार च्या बाईंचे तुम्हाला माहिती असेलच.

>>2005 ते 14 या काळात पुतीन, नाझरबेयव्ह, आबे हे आमंत्रीतात आहेत. मग ते सरकार हुकूमशाही प्रवृत्तीचे होते असे म्हणणार का? नक्कीच नाही.

त्याचं असं आहे की, काही लोकांच्या स्मरणशक्तीचा संदर्भ बींदू २०१४ नंतर अचानक बंद/गायब झाला.. म्हणजे अस की २०१४ च्या पूर्वी भारतात काय काय घडले, कोण कोण सत्तेत होते, कोण ईथले होते, कोण पाहुणे होते, अल्पसंख्यांक, वगैरे असे अनेक मुद्दे अचानक त्यांच्या स्मरणशक्तीच्या सेक्टर मधून फॉर्मॅट केल्यागत नाहीसे झाले. त्यामुळे त्यांना आता फक्त २०१४ नंतरचे च सर्व आठवते. या आजारावर काहीही ईलाज नाही. देवाच्या मनात आले तर ठीक होईल. आपण फक्त प्रार्थना करू शकतो. अगदीच काळजी असेल तर मुन्ना भाई स्टाईल गेट वेल सून म्हणून फुले पाठवा.
अन्यथा दुर्लक्ष करणे ऊत्तम कारण हा आजार एव्हड्यात काही बरा होईल असे दिसत नाही.

Pages