स्वागत करुया जैर बोल्सोनारोंचे

Submitted by भरत. on 21 January, 2020 - 23:43

यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे आपले पाहुणे आहेत ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो.

भ्रष्टाचार्‍यांना तुरुंगात पाठवण्याची अति परिचित घोषणा देऊन गेल्याच वर्षी ते सत्तेत आले.

ते येण्याआधीच त्यांची कीर्ती इथ वर ये ऊन ठेपली आणि त्यांची काही वक्तव्ये वाचून मन गदगदून गेले.

ब्राझिलमध्ये तुरुंगांच्या नावाखाली टॉर्चर सेंटर चालत. - (कैद्यांना /आरोपींना) टॉर्चर करण्याला माझे पूर्ण समर्थन आहे. आणि जनतेचेही.

बोल्सोनारो माजी लष्कर प्रमुख आहेत. - आपली संसद काही उपयोगाची नाही. मी संसद बरखास्त केली तर किमान ९०% लोक आनंद साजरा करतील. सरळ सरळ हुकुमशाही यायला हवी.

निवडणुकांमुळे या देशात काहीही बदलत नाही. देशात जेव्हा यादवी युद्ध होईल आणि तीसेक हजार लोक मरतील तेव्हाच काहीतरी बदलेल.
अर्थात यात काही निरपरा ध लोकही मरतील म्हणा. पण तसंही प्रत्येक युद्धात निरपराध लोक मरतातच. माझ्यासोबत असे ३०, ००० लोक मरणार असतील तर मी स्वतः मरायला आनंदाने तयार आहे.

ब्राझिलमध्येही आफ्रिकी वंशाच्या लोकांना गुलाम म्हणून ठेवले जाई. त्यांच्या पुढल्या पिढ्या वेगळ्या वस्त्यात राहतात. अशा एका वस्तीला भेट दिल्यावर - " तिथला सगळ्यात कृश माणूस २३० पौंड वजनाचा होता. हे लोक का ही ही करत नाहीत. अगदी पोरं काढायच्याही लायकीचे नाहीत.|

अमेझॉनच्या खोर्‍यातल्या आगींबद्दल आपण कदाचित ऐकलं असेल. विकासाचा ध्यास घेत तिथल्या सरकारने निर्वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

" मूलनिवासी लोकांसाठी आरक्षित केलेला प्रत्येक भूभाग हा 'देवीच्या व्रणासारखा आहे."

माझा मुलगा समलैंगिक निपजला तर मला त्याच्याबद्दल प्रेम वाटणं शक्य नाही. कुण्या बाप्याबरोबर घरी येण्यापेक्षा असा मुलगा अपघातात गेलेला बरा.

मला पाच मुलं आहेत. पाचव्या अपत्याच्या वेळी मी जरा कमी पडलो आणि मुलगी जन्माला आली.

विरोधी पक्षाच्या एका लोक प्रतिनिधीबद्दल - ती इतकी कुरूप आहे की बलात्कार करायच्याही लायकीची नाही.

आपल्या देशाच्या या अतिथीचं स्वागत करूया.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त उजवी विचारसरणी नव्हे, ते अख्खं पॅकेज काय आहे, हे या नेत्याच्या रूपाने अगदी ठळकपणे समोर आलं. म्हणून लिहिलंय.

त्यांची वर दिलेली एकत्रित वक्तव्यं या विचारसरणीचा सारांश ठरावीत.

मी या पाहुण्यांना बोलावले याचे समर्थन करत नाही, पण यांना समविचारी म्हणुन बोलावले आहे या निष्कर्षाचेही समर्थन करू इच्छित नाही.
व्यापार, राजनैतिक संबंध सुधारवण्यास हे निमंत्रण सुद्धा निष्प्रभ ठरू शकेल किंवा नाही ही.

या महाशयांची अचंबीत करणारी वक्तव्ये आधीच वाचली आहेत, निषेधार्ह आहेतच.

या भेटीतून काय निष्पन्न होते ते बघावे लागेल.

Submitted by मानव पृथ्वीकर on 22 January, 2020 - 21:03>>>
धन्यवाद मानव, मी तेच म्हणतोय तुम्ही समर्पक शब्दात लिहिलेत.

अन्य देशातल्या का होईना पण जनतेने बहुमताने निवडून दिलेल्या नेत्याला हलकट म्हणून तुम्ही फारच मोठं काम केलंय. धन्यवाद.

हीच गोष्ट श्री मोदींना दूषणें देताना आपण लक्षात ठेवावी एवढीच विनंती आहे.

आणि हो ते स्वदेशाचे पंतप्रधान आहेत परदेशाचे नव्हेत.

खरे साहेब, खरी गोम तीच आहे. कारण एक गोष्ट अशी सांगता येत नाही की ही विधाने पहा आणि भारताचे पंतप्रधान यांचे या विधानाशी साम्य पहा.
फक्त गरळ ओकून दिशाभूल करणे हाच हेतू आहे. नाहीतर महिलावर्गाला साद घालण्याचे काही कारणच उरत नाही.

बघा हं. क्ष देशातल्या बहुमताने निवडून आलेल्या नेत्याला तुम्हीच हलकट म्हणताय.
आणि य देशातल्या नेत्याबद्दल बोलू नका असंही तुम्हीच म्हणताय.

क्ष देशातल्या नेत्याचे आणि य देशातल्या नेत्याचे साधर्म्य दाखवा.
परत ताकाला जाऊन भांड लपवण्यात काय हशील.

क्ष देशातल्या बहुमताने निवडून आलेल्या नेत्याला तुम्हीच हलकट म्हणताय

त्यांच्या बद्दल ची विधाने या लेखात तुम्हीच लिहिलेली आहेत

ती जर खरी असतील तर त्यांना काय म्हणायचे ते तुम्हीच सांगा

आणि

ती विधाने खोटी असतील तर तुम्हाला काय विशेषण लावून संबोधायचे हेही तुम्हीच सांगा.

Heads I win
Tails you loose

Take your choice.

मानव, नेत्याने स्वत. मा़डलेली मते आणि त्यांच्या सरकारचे , पक्षाचे निर्णय, पक्षातील नेत्यांची, पाठिराख्यांची वक्तव्ये आणि कृती यांचा ताळमेळ घालून पहा.
बोल्सोनारोंची भाषा भारतातले अनेकजण सोशल मीडियाचा काय, प्रत्यक्ष सभांमधून वापरत असतात.
त्यांच्या निष्ठा कुठे वाहिलेल्या आहेत?
Why are so many of them claim to be proudly followed by Mr. X?

मग तुम्हाला त्रास का आहे?
देशातील जनताच ठरवते ना लोकशाहीत? आधीचे सरकार कसोटीवर खरी उतरली नाहीत. नविन सरकार निवडलं.
कित्येक राज्यात भाजपा पराभूत झाली किंवा सत्तेत आली नाही यासाठी तुमच्या आनंदाला पारावार उरत नाही.
मग आता बिनसलं काय?

देशातल्या नेत्याचे आणि य देशातल्या नेत्याचे साधर्म्य दाखवा.
परत ताकाला जाऊन भांड लपवण्यात काय हशील.

Submitted by जिंदादिल. on 22 January, 2020 - 21:27>>> साधर्म्य दाखवा.
संपादन (4 hours left)

मला कसला त्रास?
जनतेला अशा विचारांचे नेते आवडू लागलं आहेत, असं म्हटलं तर काय बिघडलं?

सुबोध खरे, बहुमताने निवडून आलेल्या नेत्याला दूषणे देणं तुम्हां मंडळींना अमान्य आहे, असा माझा समज झाला आहे. तो चुकीचा आहे का?

या माणसाची मतं योग्य नाहीत. पण राजनैतिक संबंधात प्रत्येक देशात आपला moral compass लावू शकू इतके आपण पॉवरफुल नाही.
स्त्री म्हणून सर्व गल्फ इस्लामी देशातील कायदे मला खटकतात. तिथली स्त्रियांची परिस्थिती खूपच वाईट आहे. पण तरी या देशांशी भारताला राजनैतिक संबंध ठेवावेच लागतात- मग सरकार कोणाचंही असो. 50 बायकांचा जनानखाना बाळगणाऱ्याअरब सुलतान लोकांना भारतात राजनैतिक व्हिजिट्सवर सन्मानानेच वागवलं जातं.
(आपल्या देशात तरी सर्व धर्माच्या स्त्रियांना समान व पुरुषांच्या बरोबरीने अधिकार असावेत म्हणून तथाकथित पुरोगामी कुठे कधी आवाज उठवतात!)

याआधीही - मोदी सरकारच्या आधीही - आक्षेपार्ह विचार/कल्चर /कृत्ये असलेल्या लोकांना भारतात अधिकृतपणे मानाने बोलवण्यात आले आहे/ इतर पध्द्तीने acknowledge करण्यात आले आहे. खोमेनी असो वा स्टॅलिन.

बलात्कारपीडित महिलांना शिक्षा करावी व तत्सम आक्षेपार्ह मतं असणारा अबू आझमी खटकत नाही (महाविकासआघाडीत आहे हं तो!), देशावर खरीखुरी हुकूमशाही लादणारी काँग्रेस पार्टी पूजनीय वाटते आणि कोणातरी ब्राझीलच्या नेत्याच्या विचारासाठी जीवाची घालमेल होते हे हास्यास्पद आहे. Selective and convenient outrage.

मला कसला त्रास?
जनतेला अशा विचारांचे नेते आवडू लागलं आहेत, असं म्हटलं तर काय बिघडलं? >>>
तुम्हीच धागा काढला ना? त्यावरील चर्चा झडत असताना वेळोवेळी भाग घेता.
मग वरील प्रतिसाद का?

>>> भरत, खरा हेतू उघड का करत नाहीत, हा प्रश्न अजून आहे. >>>

मोदींच्या प्रत्येक निर्णयाला आपला धुरकटलेला कॉंग्रेसी लाल हिरवा चष्मा घालून कडाडून विरोध करणे हाच आणि फक्त हाच हेतू आहे. याच माणसाला त्यांच्या लाडक्या कॉंग्रेसने बोलवले असते तर हेच भरत मयेकर कार्निवल साजरा करत नाचले असते.

>>> भारी पाहुणा निवडलाय सरकारने. >>>

खरं आहे. त्याऐवजी राहुलशेठ किंवा महाराष्ट्रातील आधुनिक चाणक्याला बोलवायला हवे होते.

भरत जी
क्ष देशातल्या बहुमताने निवडून आलेल्या नेत्याला तुम्हीच हलकट म्हणताय

त्यांच्या बद्दल ची विधाने या लेखात तुम्हीच लिहिलेली आहेत

ती जर खरी असतील तर त्यांना काय म्हणायचे ते तुम्हीच सांगा

आणि

ती विधाने खोटी असतील तर तुम्हाला काय विशेषण लावून संबोधायचे हेही तुम्हीच सांगा

याचं उत्तर येऊ द्या मग पुढची चर्चा करू या!

लोकांना बुबुडा विपुमा उधवि ( बुद्धीवादी बुद्धीप्रामाण्यवादी डावे विवेकवादी पुरोगामी मानवतावादी उदारमतवादी धर्मनिरपेक्ष विचारवंत)

लोकांचा उबग आला आहे ही वस्तुस्थिती का झाली याचे वस्तुनिष्ठ निरीक्षण त्यांनी केले पाहिजे. तसे न करता फक्त बहुसंख्याक लोकांनीच त्याग करत राहिला पाहिजे असे गेले 100 वर्षे हे लोक ओरडत राहिले त्याला अशी जगभर प्रतिक्रिया होत आहे
पण आत्मपरीक्षण न करता फक्त आम्हीच बरोबर म्हणत राहतात.>>>>>

पूर्णपणे सहमत.

सुबोध खरे, बहुमताने निवडून आलेल्या नेत्याला दूषणे देणं तुम्हां मंडळींना अमान्य आहे, असा माझा समज आहे. तो चुकीचा आहे का?

त्या नेत्याला हलकट म्हणून तुमच्याच नियमाप्रमाणे तुम्ही ब्राझिलच्या जनतेचा अपमान करत नाही का?
कसाही असला तरी जननेत्याचा मान ठेवलाच पाहिजे. नाही का?
शिवाय ते आपल्या देशाचे विशेष अतिथी आहेत.
त्यांना हलकट म्हणणे हा त्यांना बोलवणाऱ्याचाही अपमान नाही का?

फक्त त्यांच्या स्त्रीविषयक विचारांतही इथल्या स्त्री आयडींना काही खटकलं नाही, याचं किंचित नवल वाटलं. अर्थात रॅडिकलायझेशन किती झालं आहे, हे समजून घेण्यात मीच कमी पडलो.>>

महिलावर्गाला काय करायचे हे तो वर्ग ठरवेल, त्यांना काय खटकायचे हे त्या पाहतील. तुम्ही खोटी काळजी करू नका.

तुम्ही तुमचे रॅडिकलायझेशन किती झालेय ते पाहा असे मी म्हणणार नाही, तुमचे तुम्ही काय ते बघा.

कसाही असला तरी जननेत्याचा मान ठेवलाच पाहिजे. नाही का?>>>

बरोबर. तुम्हाला इतके कळते तरी अजून वळत नाही याबद्दल काही बोलावेसे वाटत नाही पण माबोवर फुकट जागा मिळालीय म्हणून आपली टंकुन मोकळी झाले.

उजवीकडे मोदीं, मध्ये पाहुणा, डावीकडे शहा हे द्रुश्य पहाण्यास आतुर. >>> उजवीकडे आणि डावीकडे आमची राजमाता आणि युवराज आणि मध्ये बाहुला (देशाचा पंतप्रधान) आणि आमची भाटगिरी करून फुकटची सोय हेच बघून डोळे पाणावलेले होतेना तुमचे.
तुमच्या व्यथा कळतात हो भारतीयांना आता.

उजवीकडे आणि डावीकडे आमची राजमाता आणि युवराज आणि मध्ये बाहुला (देशाचा पंतप्रधान) आणि आमची भाटगिरी करून फुकटची सोय हेच बघून डोळे पाणावलेले होतेना तुमचे.))))) आताचा बोलका बाहुला आहे Happy

Pages