स्वागत करुया जैर बोल्सोनारोंचे

Submitted by भरत. on 21 January, 2020 - 23:43

यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे आपले पाहुणे आहेत ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो.

भ्रष्टाचार्‍यांना तुरुंगात पाठवण्याची अति परिचित घोषणा देऊन गेल्याच वर्षी ते सत्तेत आले.

ते येण्याआधीच त्यांची कीर्ती इथ वर ये ऊन ठेपली आणि त्यांची काही वक्तव्ये वाचून मन गदगदून गेले.

ब्राझिलमध्ये तुरुंगांच्या नावाखाली टॉर्चर सेंटर चालत. - (कैद्यांना /आरोपींना) टॉर्चर करण्याला माझे पूर्ण समर्थन आहे. आणि जनतेचेही.

बोल्सोनारो माजी लष्कर प्रमुख आहेत. - आपली संसद काही उपयोगाची नाही. मी संसद बरखास्त केली तर किमान ९०% लोक आनंद साजरा करतील. सरळ सरळ हुकुमशाही यायला हवी.

निवडणुकांमुळे या देशात काहीही बदलत नाही. देशात जेव्हा यादवी युद्ध होईल आणि तीसेक हजार लोक मरतील तेव्हाच काहीतरी बदलेल.
अर्थात यात काही निरपरा ध लोकही मरतील म्हणा. पण तसंही प्रत्येक युद्धात निरपराध लोक मरतातच. माझ्यासोबत असे ३०, ००० लोक मरणार असतील तर मी स्वतः मरायला आनंदाने तयार आहे.

ब्राझिलमध्येही आफ्रिकी वंशाच्या लोकांना गुलाम म्हणून ठेवले जाई. त्यांच्या पुढल्या पिढ्या वेगळ्या वस्त्यात राहतात. अशा एका वस्तीला भेट दिल्यावर - " तिथला सगळ्यात कृश माणूस २३० पौंड वजनाचा होता. हे लोक का ही ही करत नाहीत. अगदी पोरं काढायच्याही लायकीचे नाहीत.|

अमेझॉनच्या खोर्‍यातल्या आगींबद्दल आपण कदाचित ऐकलं असेल. विकासाचा ध्यास घेत तिथल्या सरकारने निर्वनीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.

" मूलनिवासी लोकांसाठी आरक्षित केलेला प्रत्येक भूभाग हा 'देवीच्या व्रणासारखा आहे."

माझा मुलगा समलैंगिक निपजला तर मला त्याच्याबद्दल प्रेम वाटणं शक्य नाही. कुण्या बाप्याबरोबर घरी येण्यापेक्षा असा मुलगा अपघातात गेलेला बरा.

मला पाच मुलं आहेत. पाचव्या अपत्याच्या वेळी मी जरा कमी पडलो आणि मुलगी जन्माला आली.

विरोधी पक्षाच्या एका लोक प्रतिनिधीबद्दल - ती इतकी कुरूप आहे की बलात्कार करायच्याही लायकीची नाही.

आपल्या देशाच्या या अतिथीचं स्वागत करूया.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे भयंकर आहे हे.
पण तिथल्या लोकांना भ्रष्ट डिल्मा व सिल्वा या डाव्यांपेक्षा ते जवळचे वाटतात. सगळीकडेच झोका अतिउदारीकरणाच्या राजकारणापासून दूर उजवीकडे जात आहे याचेच ते एक प्रतिनिधी.

बहुतेक मोदिला आता ब्राझिलला फिरायला जायचे असावे म्हणुन मागचा-पुढचा विचार न करता यांना बोलावले असेल. तशीही विचारधारा सेम दिसते आहेच म्हणा. Wink

जनरल मुशर्रफ किंवा झिया उल हक किंवा माओ झे डाँग यांची काय लायकी होती की आपण त्यांना बोलवावे?
हा राजनैतिक विषय आहे ज्यात सर्वात हलकट माणसाशी सुद्धा आपण सर्वात जवळच मित्र असल्यासारखे वागावे लागते.
वाईट वाटून घ्यायचे नसते.

राजदूत-- व्याख्या
स्वदेशाच्या हितासाठी परदेशात खोटं बोलणारा प्रामाणिक मनुष्य.

बाकी बॉल्सनारो हा माणूस अव्वल दर्जाचा हलकट आणि नालायक माणूस आहे.

परंतु तुम्हाला ब्राझील बरोबर व्यापार वाढवून आपला फायदा करून घ्यायचा आहे त्यामुळे अशा नालायक माणसांची दाढी धरावी लागते आहे हे दुर्दैव.

खरे सरांचा मुद्दा पटला. भरत सरांनी असं लिहिलंय जसं काय मोदींना अमेझॉन जंगलात ऍनाकोंडा पकडायला जायचं आहे म्हणून बोलावताहेत.

याआधी आलेल्या किती पाहुण्यांच्या देशांबरोबर व्यापार वाढवून आपला फायदा करु घेतला आहे?
गेल्या 6 वर्षात जे आले त्यातल्या एकाने तर आपल्या भूमीचाच घास घ्यायचा प्रयत्न केला,

26 jan साठी येणाऱ्या पाहुणे = राजनैतिक संबंध सुधारणे/व्यापार सुधारणे वगैरे लोकांना वाटते हे पाहून मन भरून येते

26 jan साठी येणाऱ्या पाहुणे = राजनैतिक संबंध सुधारणे/व्यापार सुधारणे वगैरे लोकांना वाटते हे पाहून मन भरून येते>>>>> मग नक्की कशासाठी बोलावतात? काय फायदा? खरं विचारतेय.

हायला बोल्सोनारो सारखी व्यक्ती भारताची पंतप्रधान झाली तर मग भरत, शिम्बा, डीजे काळबोक्या यांच्या ..वर चांगली शाबासकी मिळेल. अशीच व्यक्ती यावी ही सदिच्छा!!

2014 japan
15 obama
16 होलांडे फ्रांस ( त्यानंतर उठलेला राफेल बवाल अजून शमला नाहीये)
17 UAE
18 ASEAN चे तब्बल 10 स्टेट्स चे मुख्य
19 साऊथ आफ्रिका
20 ब्राझील
* विकी वरून
याच्या आधीचे सुद्धा आहेत , काही काही देशांना 2 3 वेळ सुद्धा बोलावले आहे.

तर सांगायचं मुद्दा, US फ्रांस सारख्या बलिष्ठ देशाच्या नेत्यांना बोलावून आज भारताच्या व्यापाराची अशी अवस्था का?

वरच्या प्रतिसादात राजनैतिक/व्यापार असे म्हंटले आहे त्या बद्दल सॉरी,
खरेतर केवळ व्यापार म्हणायला हवा होता,

राजनैतिक संबंध, राज्यकर्त्यांना त्यांच्या विचारधारेशी सहमत असणारे लोक एकत्र आणायला कायमच आवडते

म्हणजे २०१४ ते २०२० ला बोलावलेले सगळे त्यांच्या विचारधारेशी सहमत लोक आहेत काय?

ह्या जैर नराचे ईचार वाचून फारसे दचकायला झाले नाही. आपल्याकडे पण बरेच गडी अशाच महान परंपरेचे पाईक आहेत. जरा लाजणे बुजणे हळुवार वेगाने होत असल्याने उशिरा जाणवतात गोष्टी इतकाच काय तो फरक. Wink

आणि गेल्या काही वर्षात नव्याने प्राप्त झालेला उद्देश, आपण कसे वेल कनेक्टेड आहोत, महासत्तेच्या नेत्यांना आपन्नकसे पहिल्या नावाने बोलतो अशी आपल्या भाट वर्गाकडून आपली आरती ओवाळून घ्यायची, आणि स्वतः चेच मार्केटिंग करायचे.

प्रत्येक प्रजासत्ताकदिनांनातर फिरू लागलेले मेसेजेस आठवून पहा,

नाही नाही असं कसं? तुमचं दुकतंय तर औषध तुम्हालाच घ्यावं लागेल ना. शहाण्या मुलासारखे वागावं.

आंतरराष्ट्रीय राजकारणात तत्वे, नीतिमत्ता यांना काहीही स्थान नसते. आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणीही कायमस्वरूपी मित्र नसतो किंवा शत्रू नसतो, फक्त देशाचे हित महत्त्वाचे असते. "हिटलरच्या पराभवासाठी सैतानाची मदत लागली तरी ती मी घेईन" असे चर्चिल म्हणाला होता. १९८७ मध्ये इराणचा धर्मांध नराधम खोमेनी गचकल्यानंतर राजीव गांधींनी सार्वजनिक दुखवटा जाहीर करून सुटी जाहीर केली होती ती याच कारणासाठी.

१९८७ मध्ये इराणचा धर्मांध नराधम खोमेनी गचकल्यानंतर राजीव गांधींनी सार्वजनिक दुखवटा जाहीर करून सुटी जाहीर केली होती ती याच कारणासाठी.>>>>>

खरे की काय....

१९८७ मध्ये इराणचा धर्मांध नराधम खोमेनी गचकल्यानंतर राजीव गांधींनी सार्वजनिक दुखवटा जाहीर करून सुटी जाहीर केली होती >>>> नहीSSSSSSSSSS केह दो की ये झुठ है.

>>> नेटवर आपल्याला हव्या तशा बातम्या मिळू शकतात.

https://m.economictimes.com/news/politics-and-nation/india-brazil-to-sig... >>>

अगदी याच कारणांसाठी ही भेट आयोजित केली आहे. परंतु मोदींच्या प्रत्येक निर्णयाकडे कॉंग्रेसच्या धुरकटलेल्या लाल हिरव्या चष्म्यातून पाहण्याचे व्यसन असलेल्यांना भेटीमागील हेतू समजणार नाहीत.

Pages