मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय लोक्स,
इथे काय काय भन्नाट वेंधळे पणे चाललेत २-३ दिवसात बहरलाय हा बा. फ.
एक से एक औरंगजेब, चंद्रभागा, मेल , फोन, चष्मा, आरसा .... वरच्या तुलनेत माझे वेंधळेपणे काय बी न्हाय
............हम सबको क्या समझ रक्खा है तुमने समू...........हम सब बोले तो तुमको वेंक्यू काँप्लेक्स देनेवाले है.

<<<वरच्या तुलनेत माझे वेंधळेपणे काय बी न्हाय>>>>

समु, हा तुझा विनय आहे........ Rofl
वर्ना, ईस वेन्क्यु के रेस मे आप के सामने कौन टिकनेवाला है??? Biggrin

माझा विनय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! आता हा विनय कोण????????????? Wink , खरतर मी विनयचीच आहे पण तो माझा झाला नाही काय करु Sad Wink

मानुषी, आप लोग तो गुरु हो बॉस Happy

<,माझा विनय!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! आता हा विनय कोण????????????? , खरतर मी विनयचीच आहे पण तो माझा झाला नाही काय करु >>>

लग्नात नवर्‍याचे नाव "विनय" ठेव......... Rofl

समू .......शिष्योत्तमे....तुजप्रत कल्याण असो.
या गुरूपोर्णिमेच्या शुभ दिनी गुरूची आठवण ठेवल्याबद्दल तुला तुझा वेंक्यू असाच बहरत जाओ हा आशिर्वाद!

राचू - नशिब माझे नाहीये. पण हा इंटरकॉमवरून आलेला म्हणजे ऑफिसमधूनच असणार हे त्याच्या नक्की लक्षात आले.

तुमचा बॉसच घाबरला असेल, म्हणला असेल (स्वतःलाच) ह्याला कस कळालं.
Happy

आज तुमच्या ........."वेधळेपणाला" सुट्टी नाही का ?

औरंगजेब Lol

मी लग्नात नवर्‍याच्या कानात उखाणा सांगितला. तसं आम्ही आधीच ठरवलं होतं. पण दुर्दैवाने लोकानी त्याच्या आधी मला उखाणा घ्यायला लावला.

त्याला सांगितलेला उखाणा मी घेऊन टाकला. आता तो काय करणार? सीडीमधे पण माझ्याकडे असा रागाने बघताना दिसतो Happy

माझ्या मेव्हण्याचा एकमेव उखाणा
"महादेवाला वाहतो १०८ बेल
XXX चे नाव घेतो बॅटरीत घालून सेल"

एक्कच एक न चुकता घेतो बिचारा. वेंधळेपणाला वावच नाही काही.

आयला मला म्हणायच होत मी विनयाची (विनयशील :डोमा:) आहे उगी काय बि अर्थ काढतात बा तुम्ही लोक Proud

बॅटरीत घालून सेल>>>

आता बॅटरीतल्या सेलबद्दलच बोलणार ना बिचारा.........इतर कुठल्या सेलबद्दल बोलला, तर पुढचा उखाणा ऐकायला आजुबाजुला बायकाच राहणार नाहित..... Rofl

काल माझा स्वतःचा पर्सनल वाढदिवस होता.... घरी जाताना आईचा फोन आला की केक घेवुन ये म्हणुन

गडबडीत मी केक एगलेस आहे का नाही हे विचारयच विसरलो..... घरी बाबांनी प्रश्न उपस्थित केला (त्यांना एलर्जी आहे म्हणुन)... मी झालो निरुअत्तर..... केक कसा होता देव जाणे.... फक्त संशया पोटी केक अर्धा मी खाल्ला... बाकीचा अजुन तसाच असावा..... Proud

इतर कुठल्या सेलबद्दल बोलला, तर पुढचा उखाणा ऐकायला आजुबाजुला बायकाच राहणार नाहित..>>>>>>>> भ्रमरा Rofl

चिमणराव तुम्हाला तुमच्या पर्सनल वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
बादवे आमचाही वाढदिवस पर्सनलच अस्तो बर्का!(दिवे घेणे)

हा हा.... मानुषी.... धन्स.... तुम्हालाही तुमच्या पर्सनल वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा... जेव्हा केव्हा असेल तेव्हा साठी

चिमणराव वाढदिवसाच्या शुभेच्छा Happy
इथे टायपपायला आज मी अजुन तरी वे.पणा केलेला नाही Happy आज लय ईचारात आहे पुढ्चे २-३ दिस नो वे.पणा ठरवलय Happy

अरे निळ्या .... घरला युस्तर काळा पडतुस चंद्या तु... कसा दिनार केक तुला....

रच्याकने... आपल्या कामगारसेने ने खाल्ला की राव... ह्याला म्हणतात दाने दाने पे लिखा हय खाने वाले का नाव

आम्ही नविन घरात रहायला आल्यावरही आमचे जुने शेजारी कधी कधी आमच्याकडे येत असत. तर एकदा असाच त्यांचा मुलगा एकटाच आला होता. तो बर्‍याच वर्षांनी आला होता. दरम्यानच्या काळात त्याचं लग्न होउन त्याला जुळ्या मुली झाल्या होत्या. आई त्याच्याशी आधी बोलत होती आणि मग चहा करायला ती आत गेली होती. मला वाटलं आपण पण काहीतरी जाऊन बोललं पाहिजे. म्हणुन मी आतल्या खोलीतून बाहेर आले आणि अगदी मित्रत्वाच्या नात्याने त्याला विचारले, " काय मग, काय म्हणताहेत छोट्या?" (खरंतर तो माझ्यापेक्षा ७-८ वर्षांनी मोठा होता त्यामुळे जेव्हा शेजारी होतो तेव्हाही फारसे बोलायचो नाही.) माझा प्रश्न ऐकून तो खूपच विचित्र नजरेनी माझ्याकडे पाहू लागला... आणि अचानक माझी ट्यूब पेटली. त्यालाच सगळेजण छोटू म्हणायचे. त्यामुळे त्याला बहुधा वाटले कि मी त्याचीच चौकशी करत आहे.... एकदम छोट्या वगैरे म्हणत! ...... "काय रे छोट्या" types!

मला एकदम awkward झालं. दोघांच्यात एक शांतता. मग सावरून घेण्याकरता अणि मी त्याच्या मुलींची चौकशी करत आहे हे त्याला कळावे म्हणुन मी पुढे विचारले, "किति झाल्या त्या मोठया?" अरे देवा, हा प्रश्न आधीच्या प्रश्नाशी एकदम rhyme होत होता.... आता मला लाजेबरोबरच हसूही यायला लागले ... मी सरळ त्याच्या उत्तराची वाट न पाहता आत पळून गेले.

हाही एक प्रकारचा वेंधळेपणाच की!

मामी, यमकी मामी.......... Biggrin

काय रे छोट्या.......... किती झाल्या त्या मोठ्या......... किती त्या कोट्या....... Rofl

चिमण राव पर्सनल बड्डे आवड्ले. माझा वेंक्यू काउंटर पावसात भिजला.

औषधाच्या गोळ्यांची बाट्ली व मधाची बाट्ली साधारण सारख्या दिसतात. परवा मुलीशी बोलत बोलत गोळी घ्यायची म्हणून बाट्ली उघडून हातात गोळी येतेय म्हणून वाट पाहिली तर एकदम चिकट काहीतरी लागले.
खाली पाहिले तर मध! तो शिस्तीत बाट्लीत भरला. हात धुवून गोळी खाल्ली नीट बघून.

नव्या मामी जणू? डायरेक इथेच?

अहो वरीजनल मामीपण आल्या... विथ ब्रॅंड न्यु वेंधळेपणा.... हा हा.....

आणी व वि मध्ये नाव सारख असल्यामुळे मी तुम्ही समजुन दुसर्‍याच एका अश्वीनींना "ह्यु जॅकमन" बद्दल बोलणार होतो.,.... त्यांनी क्लियर करून टाकल की त्या "मामी" नाहीत.
वेळेत कळाल म्हणुन वाचलो....नाही तर त्यांनी धुतलच असत मला.... Biggrin

Pages