एक धागा किश्श्यांचा

Submitted by अरूण on 17 April, 2009 - 00:48

आपल्या पैकी बरेच जण गप्पा मारताना असंख्य किस्से सांगतात. पण ते बहुदा वाहून जाणार्‍या पानावर असल्यामुळे सगळ्यांनाच याचा आनंद घेता येत नाही. म्हणून हा धागा सुरु करत आहे.

तरी आपण सर्वांनी आपापले किस्से इथे लिहावेत, म्हणजे सगळ्यांना ते वाचता येतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटू नसला म्हणून काय झालं...?
"ते" हत्त्यार मी अटीतटीच्या लढाईत वापरतो(च) ना Happy हमखास माझ्या बाजूने तहं होतो मग Proud

योग्या, नशिबवान हेस लेका! Happy
एकतर असे प्रवास विमानाचे वगैरे अन भरीला असे "सख्खे शेजारी"! मजा हे अन काय!
(साला आमच नशिबच खोट! आयुश्यातली इतकी वर्षे एसटी, लोकल, ट्रेनने प्रवास केला, पण कधी शेजारी एक धड बाब आली नाही! प्रवासात शेजारी काय काय येऊ नये याचेच किस्से जास्त हेत!)

>प्रवासात शेजारी काय काय येऊ नये याचेच किस्से जास्त हेत
लिहूनच टाक ना मग.. Happy

प्रवासात शेजारी काय काय येऊ नये याचेच किस्से जास्त हेत!>> Lol

आजच वाचले. एकाहून एक भारी भारी किस्से आहेत की. Happy

माझे फजितीचेच किस्से जास्त आहेत. तर, लिहावे की नाही विचार करतोय.. Proud

--
रस्त्यात सारखा हॉर्न वाजविण्यात काहीच मर्दूमकी नाही..
जगाला आपले कर्तृत्व दाखविण्याचे इतर अनेक चांगले मार्ग आहेत. Happy

विचार वगैरे काही करू नकोस... लिहून टाक.. इथे मित्रांमधे आपणच शिवाजी अन आपणच मावळे कसं Proud

सर्वाची जागा आता टँड स्कीन>>
योग अरे तशीच आहे ती. चित्रपटामधे गोरी करत होते तिला. मी दगडुशेठपाशी बघीतली होती सावळीच आहे. दिया मिर्झा बद्दल मात्र तुझा हेवा वाटतो. Happy पांशामधे बरेच काही.

माझ्या कंपनीतील फ्रेंच माणसे सुद्धा कधी एअर फ्रांस ने जात नसत. त्यांचे डायरेक्ट फ्लाईट होते तरिही. त्या ऐवजी स्विस एअर ची तीन फ्लाईट्स पकडून ते पारि ( पक्षी पॅरिस ) ला जात.
ब्रिटिश एअरवेज च्या बाया पण अश्याच. पण थाई, सिंगापोर, गल्फ, एमिरेट्स, लुफ्तांसा, कॅथे आणि स्विस ( आता बंद झालीय ) अतिशय उत्तम सेवा देतात.

मी मुंबईला नोकरीनिमित्त रहात होते तेव्हाचा हा किस्सा:-
शाळा संपून साधारण ८-९ वर्ष झालेली होती. शाळेतले मित्रमैत्रिणी कधीच पांगले होते. अश्यातच अचानक शाळेतला, वर्गातला एक मुलगा अचानक भेटला पार्ल्यात- पार्लेश्वराच्या देवळात. मी त्याला आधी पटकन ओळखलं नाही. त्या काळी मी प्रचंड होमसिक होत असे, कारण पुणं सोडून प्रथमच रहात होते. सहाजिकच अचानक कोणी थोड्या जरी ओळखीचं भेटलं की खूप गप्पा माराव्याश्या वाटत. त्याने आणि मी तश्याच बर्‍याच गप्पा मारल्या. मुंबईत कसे, कोणाकडे, नोकरी, त्याचे मित्र, माझ्या मैत्रिणी, हा आठवतो/ते का, पुढे काय? अमेरिकेला गेलेत बरेच जण, वगैरे बरंच. त्यानंतर त्याने अचानकच मला विचारलं, "काय मग, तुझ्या लग्नाचं बघत असतील ना आता?" या गूगलीनंतरही मला काहीही खटकलं नाही.. मी आपलं खरंखरं सांगितलं, "तसं काही नाही, नुकतीच नोकरीला सुरूवात झालीये, बघू हळूहळू.." यावर कडी!- पुढे तो स्वतःच म्हणाला, "पण माझं बघत आहेत. घरच्यांनी सांगितलंय, लवकर केलं तरी हरकत नाही.."- हे थेट माझ्याकडे पहात वगैरे.. हे तो बोलला आणि एक विचित्र पॉज घेतलान..

मी इतक्या वेळ सहजपणे गप्पा मारत होते, अचानक इतकी कॉन्शस झाले की बास! सुमारे ३ सेकंदांनी मला उलगडलं की is this kind of a proposal or what?????? यानंतर जी पॅनिक झाले!!!!! 'ऑल द बेस्ट, चल जाते आता, उशीर झाला..' वगैरे बडबड करत मी सटकलेच तिकडून!

कदाचित त्याच्या मनात काही नसेलही, सहज बोलत असेल, पण त्याने अचानक विचारलेला प्रश्न, मग थांबणं, ती विचित्र तणावपूर्ण शांतता.... असली वातावरणनिर्मिती झाली होती, की त्या क्षणी मला काही सुचेचना Happy

पुढे त्याचं लग्न कधी झालं, कोणाशी झालं, काही समजलं नाही, कारण त्यानंतरही तो कधीही भेटला नाही! Happy

तेव्हा दिया मिरझा चा आग्रह टाळाण्याचं घोर पाप माझ्या हातून घडलं.. >> योग... RHTDM चित्रपटात शुध्द शास्त्र्याने हे पाप रडत-हसत का होईना पदरात पाडून घेतलं होतं... चक्क मासांहर केला होता तिच्यासाठी.... आणि तू... छ्य्या....

बिजनेस क्लास मे दिया तेरे साथ मे... खयालो मे... loyal.gif

पूनम शाळेत कधी तरी विकेट काढली असशील त्याची. त्याचा बदला घेत असेल तो.. तुझी अशी काढून!

हे हे हे.. मला तिथे असायला आवडलं असते नुसता तुझा चेहरा बघायला! हे हे हे ! Proud

हा किस्सा पण विमान प्रवासातलाच. गल्फ एअर चे विमान, नैरोबी ते दुबई असे मी पकडले होते. नैरोबीहून उडाल्यावर घोषणा झाली कि आपण किलिमांजारो ला उतरणार आहोत. विमान जवळपास रिकामेच होते त्यामुळे शिटा भरण्यासाठी प्याशिंजरं घ्यायची असावीत. माझ्या शेजारी एक झांजिबारी बाई येऊन बसली, किलिमांजारोला.

तिचे बाळ अतिशय गोड होते. माझी विंडो सीट असल्याने, मी त्याला बोलावल्याबरोबर ते आले. मी एव्हीएमएल वाला असल्याने माझे जेवण आधी आले. त्यावेळी बाळ जरा नाखुषीनेच तिच्याकडे गेले. माझे जेवण झाल्यावर तिचे जेवण आले, मग परत ते बाळ माझ्याकडे. तिला बर्‍यापैकि हिंदी येत होते. नवरा ओमानी होता तिचा आणि मस्कतला चालली होती ती. किलिमांजारोहुन उडल्यावर आपण अबुधाबीला चाललोत अशी घोषणा झाली. बराच वेळ लागणार होता. रात्र झाल्यामुळे बाहेर बघण्यासारखे काहि नव्हते.
आमच्या गप्पा चालल्या होत्या. ओमानच्या झांजिबारी व्हिसा ऑफिसात तिने मला बघितल्याचे तिने मला सांगितले. ( तिथे ते काम एका खाजगी ऑफिसात होत असे आणि तिथे मी ऑडिटर म्हणुन जात असे, पण मला काहि ती आठवत नव्हती )

मग मला म्हणाली तिला झोप येतेय. बाळ माझ्या कुशीतच. तिने एअर होस्टेस कडुन खास पट्टा मागवुन त्या बाळाला माझ्याशी जखडून ठेवले होते. बाळ मात्र मजेत होते. मलाही डुलकी लागली आणि जाग आली ती थेट अबुधाबी ला उतरण्याची तयारी होत असताना. शेजारी बघितले तर बाई गायब !! बाळ माझ्याचकडे !!

विमान उतरले तरी तिचा पत्ता नाही. बाळ गाढ झोपेत. प्रवासी उतरायला लागले. मला दुबईला जायचे असल्याने मला उतरायचे नव्हते. अक्षरशः घाम फुटला मला !!!

अबुधाबी चे प्रवासी उतरल्यावर, परत साफसफाई होत असताना बाई आल्या. आम्ही दोघे झोपलोत ते बघून बाई मेकप वगैरे उरकुन आल्या होत्या !!!

पंचवीस वेळा तरी शुक्रन, शुक्रन ( पक्षी अरबी भाषेत शुक्रिया ) म्हणाली असेल !!!

पूनम, मजेदार किस्सा. मला पण असाच एक अनुभव इथे UBS मधे आला. माझ्या आधीच्या कंपनीत मी आणि काही मुलं/मुली एकाच दिवशी रुजु झालो. पहिल्या दिवशी ओळख झाली तेव्हढीच. नंतर ३ वर्षांनी त्यातला एक मुलगा इथे पँट्रीत भेटला. मी ओळखलं नाही त्याला. त्यानेच ओळख काढली आणि लगेचच, "तू इथे एकटीच रहातेस का ?" हायला, मी उडालेच. मग मी त्याला म्हणाले, "मी एकटी रहायला लागले तर माझ्या नवर्‍याला पण एकट्याने रहावे लागेल त्यामुळे नाही, मी एकटी नाही रहात."

पूनम तोवर मायबोलीवर यायला लागली होतीस का? ('इकडून' तुझी परिक्षा घ्यायला त्याला पाठवला असण्याची शक्यता आहे.) Proud

शेजारी बघितले तर बाई गायब !! बाळ माझ्याचकडे !!
>>>
दिनेशदा Happy भारी आहे किस्सा..

०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

अनेक वर्षांपूर्वी माझी एक मैत्रिण शिक्षणासाठी पुण्याहून मॉस्कोला निघाली होती. त्यानंतर काही दिवसानी मीही पुणं सोडून बाहेर पडणार होतो. आम्ही काही ४-५ मित्रानी तिच्यासाठी एक छोटी पार्टी केली होती. "विशिष्ठ शहरातला" नसलो तरी तिथे राहिल्यामुळे तिथले "गुण" मला चांगलेच लागले होते. खवचटपणे मी तिला म्हटलं " आता आपली भेट परत कधी आयुष्यात होईल असं वाटत नाही. अर्थात त्यामुळे काही फारसा फरक पडणार नाही म्हणा आपल्या आयुष्यात. तेंव्हा आमचा रामराम घ्या कायमचा !"

सध्या ती कुठं आहे?

हिंदू धर्मात सांगितलेलं खरं असेल तर आणखी फक्त ६ जन्म बरोबर काढायचे आहेत. Happy

अजय Lol
-------------------------
सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला...

>>>> तर आणखी फक्त ६ जन्म बरोबर काढायचे आहेत. Lol LOL

दिनेश, मला तर वाटल की आता पुढच्या एखाद्या जीटीजी ला तु एखाद्या वाढलेल्या बाळाला घेऊन येशिल अन म्हणशील की हेच ते बाळ, विमानात मिळालेल Lol

हेच ते बाळ, विमानात मिळालेल
>>>> लिंबुभाउ Lol Lol Lol Lol Lol

०---------------------------------०
आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो...

अजय,
खरंय, मैत्रिण गमवलीसंच की रे.. Proud

अजय :d

दिनेश, अजय सहीयेत किस्से Happy
केदाराची 'राखी' तर हाईट! Lol

---------------------
*ससुराल गेंदा फूल*

लय भारी किस्से हेत राव ...मजा आली वाचताना..

मला तर वाटल की आता पुढच्या एखाद्या जीटीजी ला तु एखाद्या वाढलेल्या बाळाला घेऊन येशिल अन म्हणशील की हेच ते बाळ, विमानात मिळालेल >>>
Lol

अरे हसताय काय सगळे, जीटीजी ला येतो त्यावेळी सगळी बाळंच असतात कि माझ्यासोबत !!!

हा प्रसंग बरिच वर्षे मनात घर करुन राहिलाय. तिचे नाव लपवायचे काहि कारणच नाही.

मी आर्टिकलशिप करत असताना बँक ऑफ बरोडाच्या फोर्ट शाखेत ऑडीट्साठी जात असे. मी ज्युनियर त्यामुळे आम्हाला ऑडीट मधली व्हाऊचिंग सारखी दुष्काळी कामे दिलेली असत. त्या शाखेत जेनी फर्नान्डिस नावाची क्लार्क होती. सेव्हिंग्ज काऊंटर वर बसायची. अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्वाची. ( मी त्यावेळी १९ वर्षाचा आणि ती २५ ची होती ) मला कामानिमित्त तिच्याशेजारी बसावे लागायचे. सहाजिकच गप्पा व्हायच्या. जेवणहि सोबत व्हायचे. ती शाकाहारी होती.

ऑडीटर्स म्हणजे थोड्या दिवसाचे पाहुणे. पंधरा वीस दिवसात, माझे काम आटपले. तिचा निरोप घेतला.
दोन चार दिवसानी, आमचे बिल घेऊन मी मॅनेजरला भेटायला गेलो. रिपोर्टही दिला. त्यावेळी मी मॅनेजरच्या केबिनमधून बघितले तर जेनीशी कुठल्यातरी ग्राहकाशी खडाजंगी चाललेली. दुसरे ऑफिसर्स पण तिथे जमलेले. मी तिला न भेटताच बाहेर पडलो. ( तिचे हे रुप मला नवे होते )

आणखी दोन दिवसानी, मी आमचा चेक घ्यायला गेलो. चेक घेतला, पण का कुणास ठाऊक मला तिला भेटायला संकोच वाटत होता.
बाहेर पडणार तेवढ्यात जेनीच समोर आली. तिने थेट सवाल केला, परवा आलास तो न भेटता का गेलास ?
मी, त्यादिवशी तुझा मूड ठिक नव्हता, असे बोलुन गेलो.

ती म्हणाली, तू भेटला असतास तर तो नक्कीच सुधारला असता.

मी आजही तिचे हे उदगार विसरु शकत नाही. ( पुढे बरीच वर्षॅ आम्ही संपर्कात होतो )

परवा मी बस मध्ये माझ्या बसमेट कडून निळ्या दातातून गाणं घेण्याचा प्रयत्न करत होते. पण माझा निळा दात काही केल्या त्याच्या मोबाईल मध्ये डिटेक्ट होईना... शेवटी एकदाचा झाला. मग एकदम २/३ गाणी सिलेक्ट करून त्याने ती पाठवायला सुरवात केली...
कनेक्शन मध्येच गेलं.... मी हळहळले.... Sad
तर पठ्ठ्या म्हणतो कसा... हाल की अजून... कनेक्शन जाईल नाहीतर काय होईल? Uhoh

>तर पठ्ठ्या म्हणतो कसा... हाल की अजून... कनेक्शन जाईल नाहीतर काय होईल?
हे विनोदी आहे का काहीच्या काही आहे का विडंबन आहे का सायफाय आहे..? इथं आजकाल काहीही कुठबी लिहीतात म्हणून इचारलं..? बाकी कुणाला कळल्यास तळीराम ला सांगणार काय? Happy

अजय, :d

मस्त किस्से आहेत हो एकेक !
बाय द वे ... नमस्कार मंडळी.
हा मझा पहिलाच दिवस !
Use Linux !!

Pages