ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - १

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 22:59

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादा तरी नवीन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पहिल्या तीन दिवसांसाठी विषय आहे: चित्रपट
यामध्ये मंडळ एक चित्रपटातल्या दृष्यांचा फोटो देईल त्या फोटोवरून आपण ते कोणत्या चित्रपटातले दृष्य आहे हे ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल (म्हणजे पुढचा फोटो अपलोड करेल) आणि हा खेळ पुढे चालू राहील.

फोटो देवू शकत नसाल तर तुम्ही केवळ वर्णनानुसार एखादा प्रसंग उभा करू शकता.
फोटो हा फक्त मराठी आणि हिंदी चित्रपटातलाच हवा.
फोटोमध्ये शक्यतो ओळखता येण्याजोग्या पात्रांचा/घटनांचा/स्थानांचा समावेश असावा.

उदाहरणार्थ:
images.jpeg

उत्तर: छोटीसी बात

आवडला हा खेळ?
चला तर मग करुया सुरुवात:

ओळखा पाहू:
Gurss1.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रसंग
माझी आवडती अभिनेत्री (संदली सिन्हा) अगदी आनंदात आहे. मस्त हिमवृष्टी होतेय आणि तिला हिमवृष्टी आवडत असल्याने, ती दोन्ही हात पसरून वर पाहुन गोल फिरतेय आणि आपल्या चेहर्यावर आणि हातांवर बर्फ झेलतेय...

तुम्ही विचारा ना भरत...

तुम्ही परवानगी दिलीय म्हणून तुमचे कोडे येईपर्यंत एक कोडे..

वरचं चित्र सांगत्ये ऐका या चित्रपटातलं.
बुगडीची लावणी.

पुढला प्रश्न :
जेवणाची पंगत बसलीय आणि नायकाच्या शेजारी एक कुत्रा आहे.
प्रतीकं वापरणाऱ्या दिग्दर्शकाचा चित्रपट.

जेवणाची पंगत बसलीय आणि नायकाच्या शेजारी एक कुत्रा आहे.
प्रतीकं वापरणाऱ्या दिग्दर्शकाचा चित्रपट.

चित्रपटाचे नाव : पिंजरा

Pages