तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

Submitted by किल्ली on 28 May, 2019 - 03:32

आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!

येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्‍याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.

असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.

तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

चला तर मग करा सुरुवात!

विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.

कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ली, शीर्षक बदल.
तुम्हाला मायबोलीवरच्या कोणत्या आयडीला प्रत्यक्षात भेटायला आवडेल असं कर Happy

मी एकट्यानेच एका उन्हाळ्याच्या सुट्टीत एक हस्तलिखित तयार केलेलं आणि त्यावर लेखक आणि कवी- हर्षद पेंडसे असे लिहिलेले आणि त्यावरून घरचा आहेर मिळालेला>> >>> Lol
मी पण एक वही थातुरमातुर चारोळ्यानी भरली होती. तेव्हा चारोळ्या इन होत्या. प्रेमचारोळ्या जास्तकरुन Happy

एक वाचक म्हणून मला आवडणार्‍या अनेक मायबोलीकर लेखकांना प्रत्यक्ष भेटायला मिळाले आहे .

त्या व्यतिरिक्त ज्यांना भेटायला आवडेल अशा मंडळीत हाब, भारतीताई, चैतन्य रासकर, स्वप्ना राज ई. लोकांचा समावेश असेल.

डोक्यात मायबोली, ऐसी अक्शरे,मिपा ,उपक्रम या वरील नेटकर्‍यांच्या आयडींचे फार गोंधळ झालेत त्यामुळे काही सुधरत नाही. स्मरणपटलावर आयड्या वेगाने आदळतात व काळाच्या ओघात विस्मरणात जातात. त्या त्यावेळी त्यांचे लेखन अतिशय अपील झालेले असते.

काय?? आपण भेटलो होतो? कधी? कुठे? केव्हा? माफ करा पण मला आठवत नाही आपण भेटल्याचं. आणि असं महान वैगरे माझ्या नावाआधी जोडून मला लाजवू नका : लाजणारी बाहुली :

बादवे
ऐसा क्या हुआ था उस वक्त --
जे आता परत कुणाला भेटावंस वाटत नाही.. #मी२#
बोकलत Lol

बेफिकीर
दाद
कवठीचाफा
कौतुक शिरोडकर
विशाल कुलकर्णी
चैतन्य रासकर
ऋन्मेष
फार एंड
मुग्धमानसी
किल्ली

मी बेफिकीरना भेटलो आहे, त्यांच्या घरी सुद्धा जाऊन आलो आहे
मी त्यांच्या लिखाणासाठी माबोवर आलेलो त्यामुळे मजा वाटली

या व्यतिरिक्त ट्रेकिंग वर लिहिणारे सगळे दिगग्ज तर एकत्र भेटत असतोच नेहमी, माबोबाहेर आमचा एक ग्रुप आहे त्यात अलमोस्ट रोज गप्पाटप्पा होतात त्यात जिप्सी, यो रॉक्स असे आहेत

अन्य साहसी लोकांत हार्पेन च्या घरी जाणं झालं आहे, केदार जाधव आणि अन्य हौशी सायकलपटू माबोवर राईड ला गेलो होतो
मार्गी पण लांबून येऊन भेटला होता आणि अजूनही संपर्कात आहे

भेटावे वाटते आशा लेखक लोकांत

स्वप्ना राज - तिचे पंने फार सुरेख असतात, ती एरवी पण अशीच खोलवर बघत असेल का असे कुतूहल आहे
रुन्मेष - हाच आयडी तुमचा अभिषेक असेल तर त्याला भेटून पाठीत धपाटा हाणायचा आहे, एकेकाळी इतकं सुंदर कातील लिहिणारा हा आपला माकड का करून घेत आहे असे विचारायचं आहे

शाली याना नुसते भेटायचे नाही तर त्यांच्या घरी जायचं आहे आणि जमल्यास हरिश्चंद्रगडाला जायचं आहे त्यांच्या सोबत

टण्या ला भेटून त्याला वारी चा पुढचा भाग लिहिण्यासाठी काय करावं लागेल हे विचारायचं आहे

स्पार्टाकस लाही भेटायचं होत खूप, भारी होता
याखेरीज नंदिनी - यांची शब्द ही कथा अजूनही मनात घर करून आहे

किल्ली, हायझेनबर्ग आणि ऋन्मेष हे माझे प्रेरणास्थान असल्यामुळे त्या तिघांना भेटायला आवडेल। माबो वर आणखी दर्जेदार धागे कसे काढता येतील याच्यावर चर्चा करायला आवडेल।

बादवे
ऐसा क्या हुआ था उस वक्त --
जे आता परत कुणाला भेटावंस वाटत नाही.. #मी२#>> तु तुझ्या कामाशी काम ठेव मुर्ख माणसा.. Very cheap thinking #shame on u

अरे वा! मला भेटायला उत्सुक एवढे लोक्स आहेत? ते मोरपिस वालं की काय ते तसं फिलींग आलं एकदम! बाकी माझ्या घरचेही मला भेटायला फारसे काही उत्सुक नसतात म्हणे... Happy

धन्यवाद जनहो! भेटायचा योग आला की भेटू नक्की!

मला शाली, हायझेन्बर्ग, रॉबिनहूड, भरत, फारेन्ण्ड या आयडींना भेटायचेय. बाकी अनेक आहेत ज्यांना मी भेटलेय आधीच.

स्वत: आधी सुधरा श्रद्धा बै
सोशल साइट आहे ही
तुमची पर्सनल मेसेंजर सिस्टिम नाही जे प्रत्येक धाग्यावर रंग उधाळणे सुरुय ते दिसते सुज्ञ लोकांना
हे म्हणजे त्या मांजरा सारखी गत झाली की डोळे मिटून दूध प्यायचे Proud
आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी घडली असेल काही बाहि तर असा गिल्ट येणार मनात कळले का ! मग असे फुकाचे वाग्बाण व्यर्थ समजावे आणि जमल्यास आपले वर्तन सुधारावे... मुर्ख बये !

वीक्ष्य - सोशल साइट आहे हे एकदम मान्य, तिचा वापर कसा असावा हे ज्याने त्याने ठरवावे हे ही खरे. पण आपल्यासारख्या सुज्ञ मानसाकडुन असल्या भाषेची अपेक्षा नव्हती Sad

ड्यु आयडीच्या आडाने बरेच जण काही बाही लिहीतात, मनातील रागाचा निचरा होऊ देतात , मी ही असे केलेय, पण त्यातला फोलपणा माझ्या लक्षात आलाय, म्हणुन मी ते सगळे थांबवले . तुम्ही तसेच वागा असे नाही बोलु शकत पण शांत डोक्याने राग थोडा बाजुला ठेऊन विचार करा. तुम्ही असे नाही आहात असे अजुनही वाटते, म्हणुन हे लिहीलेय क्रुपया गैरसमज नसावा . तुमच्या खास तुमच्या शैलीतील चांगल्या लिखाणा च्या प्रतीक्शेत ___/||\___

सॉरी समाधि
इग्नोर करा ते
मलाही ह्या धाग्यावर अजिबात धूळवड नकोय त्यामुळे माझ्याकडून पूर्णविराम !___/||\___

इथे एका स्त्री आयडीवर होणारी चिखलफेक बघून, चारित्र्यहननाचा प्रकारही असूनही बाकीच्या स्त्रीवादी आय डीना त्याविषयी काहीही बोलावसं वाटत नाही, हे बघून वाईट तर वाटतंय, पण हीच शोकांतिका आहे. अशा प्रवृत्ती, त्यांचे कंपू, त्यावर फिदीफिदी दात काढून हसणारे लोक खूपदा इथेच बघितलेत. जनावराने माणूस म्हणून चढवलेला मुखवटाही इथेच दिसतो.
असो, आपली लढाई आपणच लढायची असते, पण अशी जनावरे अजूनही मायबोलीवर आहेतच त्यांना जमेल तितका विरोधच करेनच.

बादवे
ऐसा क्या हुआ था उस वक्त --
जे आता परत कुणाला भेटावंस वाटत नाही.. #मी२#
>>
अशी कॉमेंट करणे हे एखाद्याच्या जखमेवरील खपली काढण्यासारखे आहे. जरी मेडीया आभासी असला तरी तो वापरणारी माणसं जिवंत हाडामाणसाचे आहेत.

धाग्याविषयी म्हणायचं झालं तर आता कुणाच्याही लिखाणावरून भाळून त्यामागचा माणूस जाणून न घेता त्याला भेटायची चूक करणार नाही.
आभासी जगतातले सुंदर, गोंडस रंगवलेले चेहरे जवळून बघताना फारच विद्रुप भासतात.

मी तर बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख या तुकारामांच्या उक्तीचा अनुभव घेतला आहे. फार सोज्वळ प्रतिमा निर्माण करणारे प्रत्यक्षात फार किळसवाणे असतात.

हायझेनबर्ग
चैतन्य रासकर
बेफिकीर
जव्हेरगंज
र|हुल
मयुरी चवाथे-शिंदे
कवठीचाफा
कौतुक शिरोडकर
विशाल कुलकर्णी
फुल

@ mahashweta ji... +11111
इथे एका स्त्री आयडीवर होणारी चिखलफेक बघून, चारित्र्यहननाचा प्रकारही असूनही बाकीच्या स्त्रीवादी आय डीना त्याविषयी काहीही बोलावसं वाटत नाही, हे बघून वाईट तर वाटतंय, पण हीच शोकांतिका आहे. अशा प्रवृत्ती, त्यांचे कंपू, त्यावर फिदीफिदी दात काढून हसणारे लोक खूपदा इथेच बघितलेत. जनावराने माणूस म्हणून चढवलेला मुखवटाही इथेच दिसतो.
असो, आपली लढाई आपणच लढायची असते, पण अशी जनावरे अजूनही मायबोलीवर आहेतच त्यांना जमेल तितका विरोधच करेनच..... Aavdla pratisad

मी बऱ्याच जणांना भेटलोय अलरेदी.
सस्मित , बोकलत, अज्ञातवासी, आनंद, VB , द्वादशांगुला, मामी यांना भेटायला आवडेल.
तसेच - भन्नाट भास्कर, ऋन्मेष , अर्चना सरकार या तिघांना एकत्र भेटायला आवडेल.

Pages