तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

Submitted by किल्ली on 28 May, 2019 - 03:32

आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!

येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्‍याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.

असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.

तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

चला तर मग करा सुरुवात!

विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.

कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे एका स्त्री आयडीवर होणारी चिखलफेक बघून, चारित्र्यहननाचा प्रकारही असूनही बाकीच्या स्त्रीवादी आय डीना त्याविषयी काहीही बोलावसं वाटत नाही
>>> अहो इथे अर्धे स्त्री आयडी खरं तर पुरुष असतात.

इथे प्रतिसाद द्यायचा राहूनच गेला होता Happy
मला या लेखकांना भेटायला आवडेल-
आदिसिद्धी
किल्ली तै
बेफिकीर जी
मामी
मुग्धमानसी जी
शालीकाका
हायझेनबर्ग जी
पंडितजी (mr pandit)
डाॅ सुरेश शिंदे
अज्ञातवासी
आनंद. दादा
कवठीचाफा जी
चैतन्य रासकर दादा

आताच प्रतिसाद वाचले. सर्वांच्या लिस्टी भारीयेत Happy

माझं नाव आठवलं त्यांना धन्स. Happy या कधी इकडे, गटग करु Happy

चैतन्य रासकर
अज्ञातवासी
शाली
फारेण्ड
नन्दिनी
के श्रद्धा

तसेच - भन्नाट भास्कर, ऋन्मेष , अर्चना सरकार या तिघांना एकत्र भेटायला आवडेल.
>>>
तुमचा अभिषेक राहिला का यात?
जोक्स द अपार्ट, भन्नाट भास्कर हा आयडी मीच मागे मजेखातर काढलेला. तो आता वापरायचे बंद केले आहे. तुमचा अभिषेक यांना मलाही भेटायला आवडेल. अर्चना सरकार हल्ली दिसत नाहीत का?

च्रप्स ☺️, मलाही आवडेल तुम्हाला भेटायला , तुमचे स्पष्ट प्रतिसाद आवडतात.

मी माबोवरच्या एका आयडी ला भेटली आहे, बाकीच्यांना देखील भेटायला नक्की आवडेल, पण लिस्ट अशी नाहीये, बघू किल्ली जर गटग ठरवतात अन तेव्हा जमत असेल तर नक्की येईन मी☺️

भरत
हेला
Black cat
बाबा कामदेव
किरणुद्दीन
Dj
.....
.......
........
.......
यांना मला

कधीही भेटायला आवडणार नाही.

बेफिकीर
डॉ. सुहास म्हात्रे (प्रवासवर्णन)
जागू (fish recipes)
मामी
स्पार्टाकस

आणि मला अतिशय जुन्या मायबोलीकरांना भेटायचे आहे. जे आफ्रिकेतील देशात राहातात. मी नाव विसरले त्यांचे. ते आता मायबोलीवर नाही. कोणी तयांचे नाव सांगेल काय?

@शक्तीराम
अगदी बरोबर. ते आता का नसतात मायबोलीवर ?
या शिवाय डॉ. सुहास म्हात्रे यांची प्रवासवर्णन कुठे आणि कशी वाचायला मिळतील? ते हल्ली लिहीत नाहीत का प्रवासवर्णन ? त्यांच्या बरोबर एकदा प्रवास करायचा आहे.

दिनेश दा यांना छळण्यात आल्यानं त्यांनी इकडे संन्यास घेतला आहे. त्यांचा ब्लॉग सुरु आहे.

कुणाला भेटायला आवडेल? अवघड प्रश्न आहे ब्वॉ. खुप मोठी यादी आहे.

वर कुणीतरी म्हटलंय की सोमिवरची व्यक्ती आणि प्रत्यक्षातली व्यक्ती यात खुप फरक असतो. अगदी मान्य. फक्त माबोवर मला भेटलेल्या व्यक्तींविषयी बोलतो. येथे भेटलेल्या व्यक्ती मला वाटत होत्या त्यापेक्षा प्रत्यक्षात कितीतरी भारी निघाल्या. निग ग्रुपचच पाहु. जागुताई नुसती नावाला अन्नपुर्णा नाही तर खाऊ घालायच्या बाबतीतही अन्नपुर्णा आहे. मी अमुक मासा खाल्ला नाही कधी हे तिला सांगीतलं तर पुढच्या भेटीत जागुताईने ती डिश आवर्जुन बनवली आणि खाऊ घातली. आणि तिच्या मिस्टरांविषयी काय लिहू? या मानसाबरोबर मी रात्रभर फक्त पुस्तके आणि लेखक यावर गप्पा मारु शकतो. उत्तम श्रोता. अतिशय निगर्वी मानुस. साधनाताई इतकी बोलते की विचारु नका. स्पष्ट आणि अतिशय निर्मळ मनाची मैत्रीण. आज्जीच म्हणतो आम्ही तिला. योगी म्हणजे जिप्सी. डोंगर दऱ्यात भटकणारा हा मानूस इतका गोड आहे ना की विचारु नका. उजू माबोवर फारशी नसते पण डेंजर बाई. बोलता बोलता कधी पाठीत धपाटा घालेल सांगता येत नाही. कांचनही अगदी प्रेमळ. पलक तर काय, भारीचे. निरु. अगदी संयत व्यक्तिमत्व. कोणत्या विषयात रस नाही, कुठल्या विषयाची माहिती नाही असं नाहीच. गझल्स, शेर, कविता, फोटोग्राफी, वाचन आणि काय काय. या मानसाकडुन शिकण्यासारखं खुप काही आहे. उत्तम मित्र. नितिन लिहित नाही आता माबोवर. दिसतही नाही. काय वल्ली आहे! कधी काय बोलुन कसे हससवेल सांगता येणार नाही. फार छान मानुस. शशांक पुरदंरे, शांकली, दत्तात्रय साळूंके यांची भेट होता होता राहीली. पण संपर्कात रोज असतो. सौ भेटली आहे शशांकदा व शांकलीताईंना पण माझा काही योग आला नाही. मोठी मानसे आहेत ही. टीनाला भेटने असेच राहुन गेले पण संपर्कात रोज असतो. ही पोरगी म्हणजे एक वल्ली आहे. दिनेशदा माबोवर नसतात पण संपर्कात असतात. त्यांनी आठवणीने सेशल्सवरुन आणलेले शंख अजुन साधनाताईने पोहचवले नाहीत माझ्याकडे पण त्याचे कौतुक आहे. नाट्यगितांचा खजिना आहेत दिनेशदा म्हणजे. सामीलाही भेटायचे राहीलेच. सायुची फक्त नागपुरची संत्रा बर्फीच पहोचली पण तिचीही भेट नाही होऊ शकली. यो रॉक्स आणि इंद्रधनुष्य भेटता राहीले. किल्लीचीही भेट माझ्या आळशीपणामुळे राहुन गेली. आज दुपारीच आसाला भेटलो. त्याला माझ्या शेतातला गावठी लसुन पोहचवायचा होता. अगदी मातितला माणूस. अजुन काही नावे आहेत पण असो. भाग्याने मिळावी अशी मित्रमंडळी या मायबोलीने मला दिली.

मला भेटायला येथे फारजण उत्सुक दिसले. भारीच वाटलं. मला आवडते माणसात रमायला. पहा, तुम्हा सगळ्यांची वेळ कधी जुळतेय ते आणि मला सांगा. माझ्या गावी मस्त गटग करुयात. फक्त मला ते भातुकलीतले गटग आवडत नाही. म्हणजे एखाद्या हॉटेलमधे भेटायचे, चार टेबल अडवायची, काहीतरी खायचे आणि दोन तासात पळायचे. तसे नको. मस्त पौर्णिमा पहा आणि या माझ्या गावी. एखादा स्थानिक मेन्यु करु, मस्त जेवू, आणि चांदण्यात पहाटतारा उगवेपर्यंत गप्पा मारु. ठरवा दिवस आणि या. बाकी नियोजन माझे.

Shalida mla vatat tumhich tharva .. bhetuch ekda srv... Pls arrange something Ani aamhla karnyasarkhi kam astil ti pn sanga.. don't hesitate to give orders.. everyone is welcome

एखादा स्थानिक मेन्यु करु, मस्त जेवू, आणि चांदण्यात पहाटतारा उगवेपर्यंत गप्पा मारु. ठरवा दिवस आणि या. बाकी नियोजन माझे. Shalida +11111 niyojanat kahi help havi asel tr ts jrur sanga plSsss

जुई, गटग करायचे असेल तर मी पहिल्यांदा येणार तुझ्याकडे. पण अगोदर आईला विचार बरं तू. Happy Happy >> अरे वा! नक्की या! स्वागत आहे. Happy Happy Happy विचारते आईला Happy

मायबोली वर्षाविहार जुलैत 'रिझॉट'मध्ये असायचा. कुठे स्वस्त जागेत ठेवत नाहीत. पब्लिक ट्रानसपोर्टनेही सहज येता येईल अशी जागा हवी. खेळ वगैरे नकोच.

लोणावळा स्टेशनात दोन तास भेटायचे, ओळख करून घ्यायची आणि मग कुणाला कुठे कुणाबरोबर गप्पा मारत जायचे तिथे जावे. Keep it simple and short.
यासाठी फिक्सिंग, organisation, subscriptions काही ओवरहेड्स लागत नाही. ज्यांना पुन्हा भेटावे वाटते ते भेटतीलच.
मुंबई- पुणे दोन्हीकडच्यांना मध्यभागी आणि सोयीचे.

Pages