तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

Submitted by किल्ली on 28 May, 2019 - 03:32

आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!

येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्‍याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.

असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.

तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

चला तर मग करा सुरुवात!

विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.

कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वरील प्रतिसादातील popular लेखकांना facebook live येणे जमेल का? सध्या ज्यांना वेळ असेल त्यांनी पुढाकार घ्यावा ही विनंती Happy

अरे देवा माझे पण नाव आहे कि ह्या यादीत. पण मै शायर बदनाम. मी नाय येणार ब्वा लाइव वगैरे.

बायदवे बेफिकीर यांचा वरती बोका म्हणून उल्लेख आलाय त्यांच्यासाठी. बेफि म्हणजे भूषण कटककर हे त्यांनी स्वत:च एका धाग्यात सांगितले आहे. भला मनुष्य आहे हा. नक्की भेटा त्यांना. त्यांच्या गजलांचे व्हिडीओ सुद्धा आहेत तूनळी वर. नाईस गाय हि इज.

आवडत्या लेखकाला किंवा सेलिब्रिटीला भेटू नये, आपेक्षाभंग होतो - बाळासाहेब ठाकरे.
पांचट लेखक आणि पांचट सेलिब्रिटीजना तर अजिबात भेटू नये - बाळासाहेब ढेरपोटे.

राहिले ड्यु आय. त्यांना मी भेटायला तयार आहे. त्यांनी संपर्कातून आपापले फोन नंबर्स आणि फोटो माझ्याकडे पाठवावेत. गुप्तता राखली जाईल याची पूर्ण खात्री.
भेटण्याचे ठिकाण - रेल्वे फाटकाच्या मागे, मिरज रेल्वे स्टेशन, महाराष्ट्र.

माझ्या सारख्या अत्यंत लोकप्रिय लेखकांना काही समाजकंटक प्रवृत्तींपासून धोका आहे. भेटायला येण्याच्या ठिकाणी संयोजक आमच्या सुरक्षिततेची कोणती काळजी घेणार आहेत? धातुसंसूचक (मेटल डिटेक्टर) यंत्रणा, सुरक्षारक्षक वगैरे सगळे असणार आहे का? अन्यथा आम्ही कुणीही सुरक्षेच्या कारणास्तव भेटू शकणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

विशाल कुलकर्णी, कौतुक शिरोडकर, कवठीचाफा, अज्ञातवासी, नंदिनी, हायझेनबर्ग, हजारो ख्वाहिशें ऐसी, Urmila Mhatre, किल्ली, सायो, जव्हेरगंज , सध्या हेच आठवतात..

खर तर कोणिही चालेल Lol
पण उत्कंठावर्धक भेटी या च्रप्स , ज्येष्ठागौरी , ऋनिल , मी- अस्मिता इ. ( लिस्ट फिक्स नव्हती राव म्हणून 'इ.' घालाव लागल Wink )

शलाका माळगावकर ( दाद ) नावात गोंधळ असू शकतो. मी खुप दिवसांनी मायबोलीवर परत आलोय.

आणि एक कळकळून विनंति किल्ली तुम्हांस
तुम्ही विचारले माबो वर कुणाला भेटायला आवडेल

"वैभव जोशी" ची भेट म्हणजे माझ्यासाठी सोहळा...देवाने भक्ताला दर्शन देण्याचा सोहळा (मकरंद बुवा रामदासींच्या किर्तनात नाही का त्यांनी सांगितलय "हनुमानाने समर्थांना रामप्रभुंकडून अनुग्रह देववीला") तसच काहीस होईल हे Happy आता यातलं राम, हनुमान आणि रामदास कोण हे तुम्हाला कळेलच की लगेच Happy )
पण देवाचा माबो आय.डी. बंंद आहे. म्हणून त्या यादीत हे नाव नव्हतं.
त्याच्या लेखनखुणा जमवायचा प्रयत्न करतोय...बघू...कितपत यश येईल... 11 वर्ष उशीर...

प्रगल्भ तुम्ही नेहमीच इतके उत्कटतेने इमोट करता का? नाही म्हणजे अ‍ॅट द एन्ड ऑफ द डे ... ड्रेन्ड वाटत नाही का?
देव काय, राम काय, दादा, सर ..... एकंदर खूपच सकारात्मक आहात.
चालू द्या.

@सामो 'कर्क' रास आहे शेवटी... जे काही येत ते आतून येत... आणि लिहीत जातो... बाकी ड्रेन्ड चा अर्थ नाही कळाला... गुगल केलं पण तरिही
अर्थ नाही दिसला गुगल वर...

रच्याक दादा-ताई संबोधणे बंद केलय... आपल्या सूचने नंतर

Happy प्रगल्भ धन्यवाद.
माझीही रास कर्कच आहे. Happy
drained ..... मानसिक थकवा
____________
बाय द वे, तुम्हाला काही कसदार वाचायचे असल्यास तेंडुलकर स्मृतीदिन लेखमाला जरुर वाचा.
https://www.maayboli.com/tendulkar

ड्रेन्ड चं स्पेलिंग काय लिहिलं होतं गूगलवर? Drained असं टाकून बघा.
सामो, तुमचा प्रतिसाद नंतर पाहिला Happy

"Drained" ---> सेम टाकलं होत ओ पण सोलापूरी गुगल प्रगत नाहीये बहुतेक ... त्याने मला 'Trend' चा अर्थ दाखवला आय स्विअर Lol

नो मी Drend टाकल होतं ... आठवल... बा़की वरील वाक्य जोक म्हणून घेण्यात यावे ही विनंती Wink

लिंक बद्दल खूप खूप धन्यवाद सामो ... बुकमार्क करून ठेवलाय ...
खाली जाऊन काही तरी खाऊन येतो... मग वाचतो
परवा परवा पर्यंत विजय तेंडुलकर म्हटले की व्यंकटेश माडगुळकरांचा फोटो डोळ्यांसमोर येत होता...
अज्ञान म्हटल तरी चालेल कारण तेंडुलकरांंच कोणत च साहित्य वाचनात नाही आलय...

Happy प्रगल्भ धन्यवाद.
माझीही रास कर्कच आहे. Happy
>>>>

आणि मी तिसरा कर्क
एक धागा काढूया का विकेंडला? अशी रास जगात नाहीये Happy

देव काय, राम काय, दादा, सर .. >>>> सामो, मी आताच दुसऱ्या धाग्यावर याला सखाराम गटणेचा भाऊबंद म्हटलं, तर इथे अगदी प्रुव्ह केलं.
पुलं - गटणे
वैभव जोशी - प्रगल्भ

@ऋन्मेऽऽष कर्क साठींचा धागा
प्लीज मला काढायला द्याल का :")
तुम्ही अगणित धाग्यांचे मालक आहात
वाटल्यास माझ्या ईमेल आय डी
वर सगळ्यांच्या कुंडल्या मागवू शहानिशा करण्यासाठी
Lol

@मीरा हे वैभव जोशी च श्रेय
कविता/ गझला अश्या काही करायच्या की एखाद्याला आपलं वेड लागलं पाहिजे.

@ऋन्मेऽऽष कर्क साठींचा धागा
प्लीज मला काढायला द्याल का :")
>>>>>

काढा की
मला हल्ली धागा काढावासा तर वाटतो पण फार मोठी पोस्ट लिहायला बोर होते.
धागा निघावा ही ईच्छा आहे. तुम्ही पुर्ण केली तर उत्तमच

" काढा की " --> खूप खूप धन्यवाद सर. कोणत्या विभागात काढायचा ते सांगा आता. Wink

मला तर अननस,ऋन्मेऽऽष,अज्ञातवासी, भरत आणि किल्ली ह्या लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल

Pages