तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

Submitted by किल्ली on 28 May, 2019 - 03:32

आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!

येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्‍याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.

असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.

तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?

चला तर मग करा सुरुवात!

विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.

कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप खूप धन्यवाद सर. कोणत्या विभागात काढायचा ते सांगा आता. Wink
>>>
आपली मायबोली
मी तर सारी मायबोलीच आपली मायबोली समजून हाताला लागेल तिथे काढतो. त्यामुळे मला विचारू नका Happy

Yayyyyyy okay
काढतो या विकेंड लाच Happy

वरील प्रतिसादातील popular लेखकांना facebook live (किंवा इतर पर्याय असतील तर,such as zoom, google meet वापरून गटग) येणे जमेल का? सध्या ज्यांना वेळ असेल त्यांनी पुढाकार घ्यावा ही विनंती Happy
लोकडोवन,करोना ह्यामुळे पसरलेल्या नकारात्मक उर्जेला कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो.

एखादा talk ठेवू शकतो, कुणीतरी बोला वाचकांशी, हवं तर video off ठेवा

मी ऑनाइनल मीट करू शकतो.
रोज चार पाच लेक्चर्स ऑनलाईन होत आहेतच
रविवार आणि शनिवार फ्री मिळतो फक्त तेव्हाच अरेंज कराल का?

माझ्याबाबतीत बोलायचं झालं तर ज्यांना इच्छा, वेळ व गप्पा मारण्यात interst आहे त्यांनी .संपर्कातून e mail करा , gmail id वरून.
Grp discussion सारखं करू काहीतरी, google meet वापरून
नेमकं काय व कधी ते सुचत नाहीये

तुमचं बरोबर आहे.
त्यासाठी सगळ्याचे ( इच्छूक लोकांचे ) मेल आय डी लागतील.
Vaa टल्यास mi Google forms tayar करतो
आणि एक धागा करून त्यावर लिंक टाकतो
म्हणजे लोकांचे आय डी येतील
आणि मग Db nusar सगळ्यांना मेल करेन

प्रगल्भ तुझा उत्साह दांडगा आहे , तो तसाच राहू देत. Happy
पण मला असं वाटतं की थोडा वेळ वाट पाहू, बघूया कोण कोण इच्छुक आहे .. Happy
मलाही माबो लेखकांना भेटायचं आहे.
(पण माझ्या यादीतल्या लोकांना मला भेटायचं आहे का? Proud )
मी अनु ह्यांचा पहिला क्रमांक आहे माझ्या यादीत, such a cool person she is!

चालेल की मी फॉर्म्स तरी तयार करून ठेवतो
मागे एकदा तुळजापूर तालुक्यातील एका गावातल्या शाळेकरता एडमिशन फॉर्म्स तयार करून दिले होते.
फक्त इच्छूक लोक कळले की मला कळवा
GN

आधी लिहिलंय या धाग्यावर.. त्यात सुटले असल्यास पुन्हा लिहितो,
अर्निका, दाद, बेफिकीर, शाली, भरत, च्रप्स, अँमी, आणि नवी ऍडिशन मृणालिनी (धामापूरकर) अजून बरेच असतील आधीच्या प्रतिसादात.
आशुचॅम्प, आ रा रा, शाली, बेफिकीर यांच्यासोबत बसायचे आहे एकदा. अभिषेक ला चकणा खायला बोलावू

एक बावीस वर्ष जुनी स्कॉच आहे माझ्याकडे - भेटलो की ओपन करू....
हा मेसेज मी मागे टाकला होता तेंव्हापासून कोणाला भेटायचे मधे माझे नाव सगळेच घेत आहेत... Wink

>>>एक बावीस वर्ष जुनी स्कॉच आहे माझ्याकडे - भेटलो की ओपन करू....
हा मेसेज मी मागे टाकला होता तेंव्हापासून कोणाला भेटायचे मधे माझे नाव सगळेच घेत आहेत... Wink<<<

@ च्रप्स Biggrin

मला लक्षात ठेवल्याबद्द्ल धन्यवाद मंडळी Happy __/\__

मला ऑनलाईन मीट करायला आवडेल किल्ली Happy
पण शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी असेल तर बरे होईल. ऑफिस असते.

तेंव्हापासून कोणाला भेटायचे मधे माझे नाव सगळेच घेत आहेत...>>> बस काय राव! स्कॉच नाही उघडली तरी चालेल, म्हाताऱ्या साधूंचा आशीर्वाद घेऊ आपण.. ठरवा फक्त.

बेफींची कथा वाचताना माबोशी ओळख झाली. त्यामुळे पहिले बेफिकीर
Onlynit
दक्षिणा
अंजू
चैतन्य रासकर
स्वप्ना राज
किल्ली, विनिता झकास, रुन्मेष, सामो, मी अस्मिता, बोकलत , रश्मी

ते स्कॉच सोबत चिकन फिश फ्राय तंदूरी लॉलीपॉप वगैरे चखण्याला असेल तर त्या स्कॉच गटगमध्ये मलाही मोजा
जोपर्यंत माझ्या पोटात काहीतरी पडत राहील तोपर्यंत मी कोणा पिणारयाच्या मध्ये लुडबुड करायला येणार नाही.

मला परिचित यांना भेटायला आवडेल .
बाई दवे हे भन्नाट भास्कर कोण ?

Submitted by कटप्पा on 16 May, 2020 - 01:11>>>>>> परत ऋन्मेष ? ऋन्मेष तू पहाटेपर्यंत माबोवर असतोस, मग कटप्पा बनुन यु एस टाईमलाईन मॅच करणे सोपे नाही का?

मला पण 'मी_अनु' ला भेटायचं आहे .. तिचे लेख आणि प्रतिसाद कमाल असतात. तिच्या ब्लॉग वर मायबोली ची लिंक सापडली होती .
मी_अस्मिता, किल्ली,च्रप्स, बोकलत,भरत,बिपीन सांगळे,फारएंड
खरंतर इथे येऊन व्यक्त होणाऱ्या सगळ्यांनाच भेटायला आवडेल Happy

तो माखणचोर आणि मी एक चखनाचोर.>>>>>
आम्ही हॉस्टेल ला अशा चखना चोरांना रात्र झाली की डोक्यावर चादर टाकून चांगली पडी द्यायचो त्याची आठवण झाली
Happy

वर्णिता मी एकही धागा काढलेला नाहीये, मी लेखक वगैरे नाही. इथे तिथे पोस्ट टाकते, लुडबुड करते एवढंच. पण तरी तू कधीही अशीच भेटायला ये मला, मी डोंबिवलीत राहते.

Pages