या व अशा घटना #MeToo च्या उलट प्रकारच्या आहेत का?

Submitted by Parichit on 14 December, 2018 - 04:37

आयुष्यात काही घटना अशा घडतात कि त्यांचे स्पष्टीकरण मिळत नाही. पुढे काही काळ जातो. आपण वयानुसार परिपक्व होत जातो. आपल्याला अजून काही माहिती मिळत जाते. किंवा आसपास अजून काही घटना घडतात. आणि मग कदाचित पूर्वी घडलेल्या 'त्या' अनाकलनीय घटनांचे अर्थ लागतात. बर, आता जास्त फुटेज खात नाही सरळ मुद्द्यावर येतो. माझ्या आयुष्यात पूर्वी ह्या घटना घडल्या आहेत. ह्यातली प्रत्येक घटना म्हणजे स्वतंत्र लेख होईल. पण विस्तारभयास्तव इथे कमीत कमी शब्दात मांडत आहे:

१. कॉलेजमध्ये इंजिनीअरिंगला असताना कोणत्याही मुलाशी फारसे न बोलणाऱ्या एका अतिशय सुंदर मुलीशी योगायोगाने माझी मैत्री झाली होती. एक दिवस तिचा प्रोजेक्ट करण्यासाठी माझी मदत हवी म्हणून आपण रोज तास दोनतास तिच्या फ्ल्याटवर जाऊया असे ती म्हणाली. घरी तिचा डेस्कटॉप प्रिंटर वगैरे सगळा सेटप होता (तेंव्हा आतासारखे प्रत्येकाकडे लॅपटॉप नव्हते). तिच्या घरी कुणीही नसायचे. तरीही दोन तास सभ्यपणे चांगल्या मित्रासारखे तिच्यासोबत घालवायचो. असे काही दिवस गेले. खुशीचे दिवस होते. अचानक काय झाले माहित नाही. "बाकी राहिलेला प्रोजेक्ट माझा मी करते" असे सांगून तिने माझे येणे बंद केले. आश्चर्य म्हणजे पुढे तिने संबंधसुद्धा तोंडून टाकले. समोरून आली तरी ओळख दाखवायची नाही. पूर्णपणे इग्नोर करू लागली. त्यानंतर आजतागायत तिचा संपर्क नाही.

२. कॉलेजात असतानाच एका वर्गमैत्रिणीने (जी माझी खूप चांगली मैत्रीण झाली होती) एकदा घरी बोलवले होते. ती सर्वांशी फ्रेंडली होती पण कुणालाही घरी मात्र कधीच बोलवत नसे. मी गेलो तेंव्हा घरी ती एकटीच होती. नुकतीच अंघोळ करून बाहेर आलेली. गाऊनवरच होती. आम्ही खूप वेळ गप्पा मारल्या. सभ्यपणे चांगल्या मित्रांसारखे. तो दिवस अजूनही स्वच्छ आठवतो. पण पुढे काय झाले माहित नाही. या मैत्रिणीने मला पुन्हा कधीच घरी बोलावले नाही. इतकेच काय हळू हळू मैत्री सुद्धा कमी केली. औपचारिक संबंध फक्त ठेवले. कारण कधीच कळले नाही. (नंतर तिची अन्य एका मुलाशी घनिष्ट मैत्री झाली वगैरे ऐकायला मिळाले. खरेखोटे माहित नाही)

३. एक दिवस ऑफिसमध्ये एका मुलीची इमेल मला आली. विचारपूस केल्यावर कळले कि ती माझ्याच कॉलेजमधून नुकतीच पासआउट झालेली एक ज्युनियर मुलगी होती व नुकतीच तिथे जॉईन झाली होती. कंपनी एक असली तरी तिचे ऑफिस माझ्या ऑफिसपासून खूप लांब होते. म्हणून भेट अजून झालीच नव्हती. मग आम्ही नियमित चाट करू लागलो. एका वीकएंडला लंच साठी बाहेर भेटायचे ठरवले व भेटलो. भेटून दोघांनाही आनंद झाला. लंच झाल्यावर सहज तिला विचारले लॉंग ड्राईवला जाऊया का. मला अपेक्षा नव्हती पण ती हो म्हणाली. झाले. आम्ही गप्पा मारत मारत शहराबाहेर खूप दूर आलो. रस्ता व तो भाग एकदम निर्मनुष्य. एका विनोदावरून विषय निघाला आणि तिने अप्रत्यक्षपणे चावट कोमेंट केली. मी फक्त तिच्याकडे पाहिले आणि त्या एकांतवासात गप्पांची गाडी भलतीकडे वळून मैत्रीवर परिणाम होऊ नये म्हणून विषयच बदलला. तसेच थोडे अंतर पुढे गेल्यावर ती अचानक परत जाऊया म्हणू लागली. तिचा मूड बदलला होता हे कळून येत होते. मला आश्चर्य वाटले. आणि आम्ही तिथेच यूटर्न घेऊन परत आलो. येताना फार उत्साही वाटत नव्हती. शहरात आल्यावर उतरून पाठमोरी निघून गेली. बाय सुद्धा म्हणाली नाही. पुढे तिने इमेल अथवा चाट वर प्रतिसाद देणे बंद केले ते कायमचेच.

४. बऱ्याच वर्षांनी मी दुसरी एक कंपनी जॉईन केली. तिथे पूर्वीच्या एका कंपनी मधली एक कलीग आधीपासूनच आहे असे कळले. ती सुद्धा शहराच्या दुसऱ्या भागात असलेल्या ऑफिसात होती. पण पूर्वीची ओळख असल्याने आम्ही क्वचित चाट वगैरे करू लागलो. असेच काही दिवस गेले. एक दिवस एक विचित्र घटना घडली (तपशिलात सांगत नाही). त्यासंबंधी चाटवर बोलताना तिने सांगितले कि तिचे काही वरिष्ठ सहकाऱ्यांशी संबंध निर्माण झाले होते. ते ऐकून मी थक्क झालो. मग मात्र खुलेपणाने तिच्याशी चाटवर चर्चा होऊ लागली. एकदा मी तिला भेटायची इच्छा व्यक्त केली. खूप वर्षांनी तू आता कशी दिसतेस ते पाहायचेय म्हणालो. तिने होकार दिला. पुढे एकदा कामानिमित्त माझ्या ऑफिसमध्ये ती आली तेंव्हा तिने मला लिफ्टजवळ बोलवले. मी गेलो. तिला खूप वर्षांनी पाहून आनंद झाला. फार बदलली नव्हती. तिने नवीन कार घेतली होती ती पार्किंगमध्ये पाहायला जाऊ म्हणाली. लिफ्ट आली. लिफ्टमध्ये आम्ही दोघेच होतो. तर हिने अचानक अंगावरचा जर्किन काढून मला विचारले "पहायचे होते ना मला. सांग आता कशी दिसते मी?" मी चाट पडलो. छान दिसतेस इतकेच कसेबसे बोललो. खाली पार्किंगमध्ये गेल्यावर तिच्या नवीन कारजवळ आलो. मात्र ती अचानक म्हणाली मला मेसेज आलाय महत्वाचा. काम आहे. मी जाते. आणि निघून पण गेली. पुन्हा तिने माझ्याशी फार संपर्क ठेवला नाही तो नाहीच.

अजून एकदोन अशाच घटना आहेत. सध्या #MeToo मुव्हमेंटने माध्यमांतून चांगलाच जोर धरला आहे. एकांताचा किंवा शारीरिक जवळीकीचा गैरफायदा घेणाऱ्याविरोधात मुली/स्त्रिया बोलत आहेत. या पार्श्वभूमीवर माझ्या या घटना मात्र याच्या बरोबर उलट प्रकारे घडल्या आहेत असे जाणवू लागले आहे. काहीही गैर प्रकार झाले नसतानासुद्धा त्या त्या मुलींनी माझ्याशी संबंध तोडले आहेत.

स्त्रीची वा मुलीची इच्छा असताना समोरच्या पुरुषाने त्याला नकारात्मक प्रतिसाद देणे हेदेखील रिव्हर्स पण मीटूच आहे का?
(मला जे विचारायचे आहे तो हा नेमका प्रश्न. अॅमी यांच्या प्रतिक्रियेतून साभार)

तुमच्या आयुष्यात असे प्रसंग घडलेत का? मला वाटतंय प्रत्येकाच्या आयुष्यात घडले असावेत. तुमचे मत काय आहे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमचे स्वच्छ वागणे पाहून त्यांनी " रहने दे भाई, तुमसे ना हो पयेगा" असे मनोमन ताडले असेल,
आणि पुढे संपर्क ठेवला नसेल,

यापुढे असे प्रसंग घडल्यास 'म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला' हे नक्की विचारा.तसा अर्थ नसेल तर मुलगी चिडून क्लियर करेल.तसा अर्थ असेल आणि मुलगी स्पष्ट सांगत असेल तर आम्ही येतोच लाडू जेवायला ☺️☺️
तसा अर्थ असेल आणि स्पष्ट सांगत नसेल, 'मुलांकडून येऊ दे' असेल आणि तुमची इच्छा नसेल तर हुरर म्हणून पुढे चला.
तसा अर्थ असेल, तुमची पण रिलेशन पुढे न्यायाची इच्छा असेल आणि मुलीचे 'पहिले तुझ्याकडून येऊ दे बोलणं' सिग्नल खात्रीचे असतील तर येऊ दे बोलणं.
(कोड कव्हरेज पूर्ण.सर्व इफ इल्स केस कव्हर केल्या)

मी कव्हरेज चा माणूस.कोड लॉजिक चे प्रश्न संबंधित उत्तरे सोल्युशन आर्किटेक्ट देईल ☺️☺️मी फक्त टेस्ट केसेस लिहिल्यात.

या व अशा घटना #MeToo च्या उलट प्रकारच्या आहेत का?>>>>
संक्षिप्त उत्तर - 'हो'
अधिक अचूक उत्तर -
या व अशा घटना #FaTToo प्रकारच्या आहेत

१ आणि २ #MeToo नाहीय.

३ आणि ४ होऊ शकतो जर समोरच्याचे बोलणे &/ वागणे तुम्हाला अनकम्फर्टेबल करत असेल तर. पण तुम्ही तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटले का हे सांगितलंच नाहीय. तुम्ही जे सांगताय ते - 'त्या बाईने मला सिड्यूस करायचा प्रयत्न केला' असा माझा अंदाज आहे. पण तो अंदाजच असल्याने मी सभ्य पुरुषासारखे वागलो. - असे काहीतरी आहे.
तर ३ आणि ४ सारखा प्रसंग परत आला तर अनुने तिच्या पहिल्या प्रतिसादात सांगितले आहे त्या मार्गाने जा.

===
बादवे अनु, लाडू जेवायला कुठे जाणार? परिचीत आधीच विवाहित आहेत Proud

अरर
म्हणजे संपलाच विषय ☺️☺️
ताई, चल तिकडे भरपूर लोक आहेत तिथे जाऊन गप्पा मारुया म्हणायाचे अन दुसरे काय.. गेले ते(लाईन मारायचे) दिवस.

हे वाचा.
{माझ्या एका धाग्यात व्यक्त केलेल्या मतांशी/तपशिलाशी माझ्या अन्य धाग्यातील मते/तपशील जुळतीलच असे नाही. कृपया आपापली मते ज्या त्या धाग्यापुरती मांडावीत हि विनंती.}

इथे ते अविवाहित आहेत.

जर्किन हा शब्द बर्याच दिवसांनी ऐकला.
कुठून आला हा शब्द? इंग्लिशमध्ये तर असा कुठलाही शब्द नाहिये.
(कुणाला कशाचं....)

वाईट वाटून घेऊ नका.
जे काही वाईट विचार आहेत ते त्या मुलींच्या मनात आले आहेत.
अर्थात त्यातही काही वाईट नाही. ते विचार नैसर्गिकच होते. पण आपल्याकडे असे विचार करणारया मुली वाईट समजल्या जातात.
म्हणून त्या मुलींनी कच खाल्ली आणि मोठ्या कष्टाने आपल्या हृदयावर दगड ठेवून स्वत:ला तुमच्यापासून दूर लोटले.

पण सूक्ष्मपरीक्षण आणि आत्मनिरीक्षण केल्यास लक्षात येईल की याच कारणास्तव बहुतांश मुलींना बिनधास्त मुले आवडतात. कारण ते पुढाकार घेतात. त्यामुळे मुलींना वाटते की जो पुढाकार घेतोय तो जबाबदारीही घेईन, आणि जो पुढाकार घ्यायलाच कचरतोय तो जबाबदारी काय घेणार...

अधिक माहितीसाठी छोटी छोटीसी बात बघा. शेवटपर्यंत अमोल पालेकर बनून राहण्यात काही अर्थ नाही !

पुरुष पुढाकार घ्यायला इतके का कचरतात , म्हणून गुगलबाबाला साकडं घातलं तर त्याने हे पाठवलंय -
https://www.youtube.com/watch?v=zY9TVpgqf_I

बघा बुवा, तुमचं असंच होतं का ते ?

< काहीही गैर प्रकार झाले नसतानासुद्धा त्या त्या मुलींनी माझ्याशी संबंध तोडले आहेत. >
------ त्यांच्यापैकी एकीलाही 'बोलण्या-चालण्याचे संबंध अचानक का तोडले ?' विचारावे असे तुम्हाला वाटले नाही ? एव्हढे वर्षे मनात कशाला ओझे बाळगले ?

रहने दे भाई, तुमसे ना हो पयेगा" असे मनोमन ताडले असेल>>> हेच मनात आलेलं. Happy
तुमच वागण जरा चेक करा, तुम्हीच काहितरी चुकिचे सिग्नलस देत असणार.>>>> +१

या व अशा घटना #FaTToo प्रकारच्या आहेत>>>>>> Lol

सर्वांच्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद.

> तुमचे स्वच्छ वागणे पाहून त्यांनी " रहने दे भाई, तुमसे ना हो पयेगा" असे मनोमन ताडले असेल

"वेगळे" वागून पूर्वी एक चांगली मैत्रीण गमावली आहे. तेंव्हापासून ताकसुद्धा फुंकून पितो.

> या व अशा घटना #FaTToo प्रकारच्या आहेत

म्हणजे एक तर #MeToo नाहीतर #FaTToo असे का? #MeToo मध्ये नाव न आलेल्या नामवंतांचे #FaTToo झाले असेल म्हणावे का?

> Submitted by mi_anu on 14 December, 2018 - 19:13

अल्गोरिदम चांगला आहे पण व्यवहारिक नाही Happy

> Submitted by भरत. on 14 December, 2018 - 20:43

भरत आपले धन्यवाद. बायदवे यातल्या काही घटनांमध्ये मी विवाहित तर काहींमध्ये अविवाहित होतो. अशा घटनांमध्ये त्या दोघानाही एकमेकांच्या वैवाहिक स्थितीशी काही देणेघेणे असते का?

> तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटले का हे सांगितलंच नाहीय

ह्यातली कुठलीच घटना #MeToo मध्ये येत नाही. तेच तर म्हणतोय. मला अनकम्फर्टेबल कधीच वाटले नाही. मी माझ्याकडून #MeToo म्हणत नाही. मुलींकडून.

> तुमच वागण जरा चेक करा, तुम्हीच काहितरी चुकिचे सिग्नलस देत असणार.

नाही. मी काहीच सिग्नलस देत नव्हतो. त्यांच्या सिग्नलसना रीस्पोंडच करत नव्हतो म्हणून हे घडले.

> जर्किन हा शब्द बर्याच दिवसांनी ऐकला.

शर्टच्या वर घातला होता. फिगर दाखवण्यासाठी काढला. त्याला जर्किनच म्हणतात ना?

> जितेंद्रच्या शरीरात आलोकनाथचा आत्मा

हा हा हा हा

> मुलींना बिनधास्त मुले आवडतात. कारण ते पुढाकार घेतात.

असे करून पूर्वी एक चांगली मैत्रीण गमावली आहे हो. अन्यथा तसा मुळचा मी अमोल पालेकर नाही.

> यांच्यापैकी एकीलाही 'बोलण्या-चालण्याचे संबंध अचानक का तोडले ?' विचारावे असे तुम्हाला वाटले नाही ? एव्हढे वर्षे मनात कशाला ओझे बाळगले ?

पहिल्या घटनेत मला पाहताच इग्नोर करू लागली. एकदोनदा हाक मारली पण तिने थेट दुर्लक्ष केले. वाट अडवून विचारणे माझा पिंड नव्हता. त्याकाळी मोबाईल वगैरे नव्हते. दुसऱ्या घटनेत ती स्मार्ट वागली. संबंध तोडले नाहीत पण पूर्वीइतके जवळीक पण ठेवली नाही. "पूर्वीसारखे पुन्हा एकदा घरी बोलव ना" असे तर मी म्हणून शकत नव्हतो. तिसऱ्या घटनेत मी सांगितले आहेच. तिने इमेल अथवा चाट वर प्रतिसाद देणे बंद केले ते कायमचेच. आणि चौथ्या घटनेत मी नंतर पाठपुरावा केला होता. तर तिने सांगितले "मी आता पूर्वीसारखी राहिली नाही. आता बदलली आहे" (सध्या एका नामांकित कंपनीत ती खूप मोठ्या पदावर हि कार्यरत आहे. माझा संपर्क नाही. असो). यातली प्रत्येक घटना म्हणजे वेगवेगळे मोठाले लेख होतील इतके तपशील आहेत. पण या धाग्यासाठी संक्षेपाने सांगत आहे.

रहने दे भाई, तुमसे ना हो पयेगा" असे मनोमन ताडले असेल>>हेच आलेलं मनात Happy
मला तर आता हा पण ऋ चाच डुआयडी आहे असं वाटायला लागलंय Lol

Pages