जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १४. रिसोड ते परभणी

Submitted by मार्गी on 27 December, 2018 - 08:20

जे सत्य सुंदर सर्वथा....: १४. रिसोड ते परभणी

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१. चाकण ते केडगांव चौफुला

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):२. केडगांव चौफुला ते इंदापूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):३. इंदापूर ते पंढरपूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):४. पंढरपूर ते बार्शी

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):५. बार्शी ते बीड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):६. बीड ते अंबेजोगाई

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):७. अंबेजोगाई ते हसेगांव (लातूर)

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):८. हसेगांव (लातूर) ते अहमदपूर

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):९. अहमदपूर ते नांदेड

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१०. नांदेड ते कळमनुरी

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):११. कळमनुरी ते वाशिम

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१२. वाशिम ते अकोला

जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव):१३. अकोला ते रिसोड

२५ नोव्हेंबरची पहाट! ह्या मोहीमेचा शेवटचा दिवस. आज परभणीत समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. ह्या सायकल मोहीमेत कधी एकदा शेवटचा दिवस येतो, अशी अधीरता वाटली नाही. पण एक थरार मात्र नक्की जाणवतो. आणि तो रोमांच आजही सुरू राहील. कारण आज काही अंतरापर्यंत मला आधी कधीच न बघितलेला रस्ता लागणार आहे. आणि मध्ये मध्ये तुलनेने कमी दर्जाचा रस्ता लागेल व त्यामुळे वेळ थोडा जास्त लागेल. रिसोड ग्रामीण रुग्णालयातल्या निखाडे सरांकडे चहा घेऊन निघालो. काल सरांनी सांगितलं होतं की, एके काळी रिसोड अकोला जिल्ह्यात होतं, तेव्हा इथलं पोस्टिंग हे पनिशमेंट समजलं जायचं! कारण रिसोड एका अर्थाने अगदी आतमधलं दूरवरचं गांव आहे. उजाडल्यावर निघालो. रिसोडवरून साखरा व हत्ता गावावरून जाणा-या रस्त्याने येलदरीला पोहचेन. सुरुवातीला लोणारकडे जाणारा रस्ता आहे. पण काय आसमंत आहे! अगदी निर्जन रस्ता, बराच वेळाने एखादं वाहन मिळतंय, सगळीकडे शेतं व निसर्ग! काही किलोमीटरपर्यंत चांगला रस्ता असेल. खरी मजा नंतर सुरू होईल!

साखरा गांव जवळ येत गेलं तसा रस्ता साधा होत गेला. हा मुख्य शहरांना जोडणारा रस्ता नाहीय. अगदी आतली गावं जोडणारा रस्ता आहे. आरामात पुढे जात राहिलो. मध्ये मध्ये मस्त नजारे लागत आहेत, फोटो घ्यावेसे वाटत आहेत. वाटेत एक किलोमीटर अगदी उखडलेला रस्ता लागला. काळजीपूर्वक व हळु जात राहिलो. ह्या प्रवासात किमान तीन वेळेस असा रस्ता लागला असल्यामुळे काहीच त्रास वाटला नाही. एका किलोमीटरनंतर रस्ता परत चांगला होत गेला. रस्तासाखराला पोहचल्यानंतर बीच बीच में अच्छे नजारे भी मिल रहे हैं, जिससे फोटो लेने का मन कर रहा है| साखराला पोहचल्यावर चहा- बिस्कीट चिप्स घेतले. सोबत चिक्की आहेच. आता येलदरी किंवा जिंतूरपर्यंत थांबायचं नाही आहे. हत्ता गावामध्ये पोहचल्यावर सेनगांव- जिंतूर रस्ता आला. इथे तीन जिल्ह्यांच्या सीमा अगदी जवळ आहेत- वाशिम, हिंगोली आणि परभणी. इथून येलदरी फक्त नऊ किलोमीटर राहिलं. मी पूर्वी सायकलीवर येलदरीला आलो होतो, त्यामुळे येलदरीकडे येणं मला घरी आल्यासारखंच वाटतंय. इथे मस्त धरणाचा नजारा आहे. मस्त दृश्ये दिसत आहेत! शिवाय डोंगरातून चढणारा- उतरणारा रस्ता! परभणीपासून तसं जवळच असूनही इथे कधी आलो नव्हतो! थोडं घाटासारखं वाटतंय! दूरवरून दिसणारं धरणाचं बॅकवॉटर! फारच एंजॉय केला हा पॅच. आरामात फोटो घेत घेत जात राहिलो.

हा रस्ता मला फारच आवडला. ह्या मोहीमेत अशा अगदी आतल्या व कमी दर्जाच्या रस्त्यांसोबत मैत्रीच झाली आहे. इथे चालवण्याची वेगळी मजा येते आहे. अजिबात गर्दी, ट्रॅफिक नाही, निसर्गाच्या जवळ जाण्याचा अनुभव व रमणीय नजारे! हायवेवर सायकल चालवण्याहून हे खूपच वेगळं आहे. आणि असं फिरताना जाणवतं की, मी जरा नवीन ठिकाणी आलो आहे. शिवाय अनेकदा आपलं मन सायकलिंगलाही एक टारगेटचं स्वरूप देतं- इतका वेग पाहिजे, इतकं टायमिंग पाहिजे. असेही‌ विचार अशा निर्जन पण रमणीय परिसरात बाजूला पडतात. आणि निसर्ग व स्वत:बरोबर मस्त संवाद होतो. ...येलदरी गावापर्यंत हिंगोली जिल्हा आहे. इथे मस्त रस्ता आहे. पण येलदरी ओलांडल्यावर लगेचच रस्त्याचा दर्जा कमी झाला. इथे धरणाच्या पाण्यावरचा एक मस्त ब्रिज आहे. त्या ब्रिजला काहीच कठडे नाहीत! अगदी बारीकसा रस्ता, कठडे नाहीत आणि खाली खोल तलावासारखं पाणी! एक क्षण भिती वाटून गेली, पण लगेचच तो ओलांडला. तेव्हा लहानपणीच्या एका सहलीची आठवण आली. लहानपणी बाबांच्या 'अक्षरयात्री' ग्रूपसोबत इथे सहलीला आलो होतो. तेव्हासुद्धा हा ब्रिज असाच भितीदायक होता आणि आजही तसाच आहे! आणि त्यावरून बससुद्धा जातात! इथे काही सायकलवाले भेटले जे साधी सायकलही चढाच्या रस्त्यावर मस्त चालवत होते. थोड्या वेळाने येलदरीच्या त्या ठिकाणी पोहचलो जिथे मी पाच वर्षांपूर्वी सायकलीवर आलो होतो. माझं पहिलं शतक ह्या येलदरीच्या रोडवरच झालं होतं! वा! आता फक्त औपचारिकता बाकी आहे. अजून ५५ किलोमीटर बाकी आहेत व फक्त ४८ किलोमीटर झाले आहेत. पण बाकीचा प्रवास तरंगत तरंगत होणार आता. इथेही रस्ता थोडा खराब झालेला आहे. त्यामुळे वेग घेता येत नाहीय. हळु हळु डोंगर मागे राहिले व दूरवरचा सपाट परिसर नजरेच्या कक्षेत आला.

जिंतूरमध्ये एनर्जालचे पॅकेटस घेतले. इथे परत ब्रेक घेऊन नाश्ता केला. जिंतूरच्या पुढे तर अनेकदा आलेलो आहे, त्यामुळे अगदी घरात आल्यासारखं वाटतंय. आता ऊन वाढतंय. सकाळचे अकरा वाजत आहेत. इथून फक्त ४५ किलोमीटर बाकी आहेत आणि मध्ये मध्ये थोडा उतार लागणार आहे. पण त्याबरोबरच नऊ किलोमीटर उखडलेला रस्ताही लागणार आहे. त्यामुळे नक्की किती वाजता पोहचेन, हे सांगता येत नाहीय. परभणीतला कार्यक्रम तीन वाजता ठेवला आहे. माझं स्वागतही केलं जाईल. त्यामुळे माझं लोकेशन शेअर करून ठेवलं. आज ऊन जास्त असल्यामुळे थोडा त्रास होतोय. पण न थांबता पुढे जात राहिलो. हळु हळु परभणी जवळ येत गेलं. जर येलदरीच्या पुढे चांगला रस्ता असता, तर एक वाजता परभणीत पोहचू शकलो असतो. पण रस्ता साधारणच होता व मध्ये मध्ये तर कमी दर्जाचाच होता. त्यामुळे सायकल हळु चालवतो आहे. बोरी व झरी गावांच्या मध्ये नऊ किलोमीटरचा रस्ता उखडलेला आहे! पण बाजूला मातीवरून सायकल चालवता येते. त्यामुळे अगदीच हळु जायची गरज नाही पडली. आणि झरीनंतर तुलनेने बरा रस्ता मिळाला व एक पन्नासला परभणीला पोहचलो. परभणीच्या पाच किलोमीटर अलीकडे काही जण सायकलवर माझ्या स्वागताला आले. माझी बहीण अदिती व तिचे काही मित्र होते. त्यांना सांगितलं की, ऊन खूप आहे, त्यामुळे पाणी पीत राहा. ते तिथे भेटल्यामुळे शेवटचा टप्पाही कठीण गेला नाही.

ह्या प्रवासात आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारे माझं स्वागत केलं‌ गेलं होतं. काही वेळेस मी‌ लवकर जाऊन पोचायचो, कुठे मी रस्ता शोधत पोहचायचो. जगात जर्मनी, भारतात परभणी माझं गाव! तेव्हा इथे नक्कीच 'खास' स्वागत झालं! स्वागताच्या जागी पोहचल्यानंतर मला फोटोसाठी परत वापस यायला लावलं! त्याचं खूप हसू आलं! पण इथल्या स्वप्नभूमी‌ संस्थेतले काही सायकलिस्ट भेटले. त्यांनी सायकलवर अगदी मस्त से एचआयव्ही एड्सचा मॅसेज देणारे बोर्डस लावले होते. ह्या पूर्ण मोहीमेचं समन्वयन करणा-या रिलीफ फाउंडेशनचेही सदस्य स्वागताला आले. थोडा आराम करून कार्यक्रमासाठी तयार झालो.

परभणीमध्ये स्वप्नभूमी संस्था एचआयव्हीवर काम करते. प्रत्येक ठिकाणी होत होती, तशी चर्चा इथेही झाली. रिलीफ फाउंडेशनच्या सदस्यांनी त्यांची भुमिका सांगितली. माझी बायको आशाने ह्या मोहीमेचा उद्देश व स्वरूप ह्याविषयी माहिती दिली. स्वप्नभूमी संस्थेचीही माहिती दिली गेली. स्वप्नभूमी संस्था अनेक सामाजिक विषयांवर काम करते. ग्राम विकास, आरोग्य, एचआयव्हीपासून अगदी बाल अधिकारांवरही काम करते. मीसुद्धा माझे अनुभव मांडले. काही पत्रकार आले होते, त्यांच्यासमोर दोन मिनिटात माझे अनुभवही सांगितले. डॉ. पवन चांडकसुद्धा स्वप्नभूमी संस्थेला मदत मिळवून देतात. ते सायकल प्रवासात असल्यामुळे ह्या कार्यक्रमात येऊ शकले नाहीत. एचआयव्हीशी संबंधित असलेल्या अनेक गटांच्या व्यक्तींनी कार्यक्रमात विचार मांडले. त्यामध्ये समलिंगी व्यक्ती, सेक्स वर्कर्स, डॉक्टर्स ह्या सगळ्यांचा सहभाग राहिला. एचआयव्हीवर जे लोक काम करतात, त्यांनाही 'कलंकाच्या' नजरांचा सामना करावा लागतो. आपल्या समाजाची विचार करण्याची वृत्ती इतकी चुकीची असते की, एखाद्या गोष्टीचा उल्लेख आला किंवा फक्त नाव जरी घेतलं‌ गेलं, तरी आपल्या मनात एकच विचार येतो. आपण त्याच 'नजरेने' त्या गोष्टीकडे बघतो. बुधवार पेठेमध्ये राहतात त्यांना त्यामुळे सांगावं लागतं की, ते कसबा पेठेत राहतात. तसंच समाजात अनेक गैरसमज अजूनही पसरलेले आहेत. डास चावल्याने एड्स होतो किंवा सोबत खाल्ल्यामुळे एड्स होतो असे गैरसमज अजूनही आहेत. कार्यक्रमात ह्या सगळ्यांवर चर्चा झाली. एचआयव्ही असणारे लोक अनेकदा समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेरच्या व्यक्ती असतात- जसे व्यसनाधीन लोक, अशिक्षित किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंधित लोक. त्यामुळेही त्यांच्यासोबत काम करणं कार्यकर्त्यांना कठीण असतं. ही चर्चा बराच वेळ चालली. एचआयव्ही क्षेत्रात काम करणारे दिग्गज तज्ज्ञ दीपक निकमही ह्या कार्यक्रमाला आले होते. सध्याच्या काळात एचआयव्हीसंबंधित इंटरव्हेंशन्समध्ये येणारे बदल, आगामी वाटचाल, तंत्रज्ञानामुळे होणारे चांगले बदल ह्यावर त्यांनी व आशाने विचार मांडले. रिलीफ फाउंडेशनचे अध्यक्ष अनील बोरकरसुद्धा ह्या कार्यक्रमाला आले व विशेष म्हणजे ते सायकल चालवत कार्यक्रम स्थळी आले!

हे सगळे अनुभव आठवत असताना एक गाणं मनात येतं (उबंटू चित्रपटातील सुंदर गीत)-

हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी,
सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री,
तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

... घरी पोहचलो तेव्हा १०३ किलोमीटर पूर्ण झाले व अगदी योजनेनुसार मोहीमेत ११६५ किलोमीटर पूर्ण झाले! फारच जोरदार झाला हा प्रवास! सायकलने जी साथ दिली, त्याला तर तोड नाही. ह्या चौदा दिवसांच्या प्रवासात ज्यांनी सोबत केली, मदत केली, त्यांच्याबद्दल मनात खूप कृतज्ञता आहे. ह्या प्रवासात खूप काही शिकायला मिळालं, समजून घेता आलं. ही समस्या किती मोठी आहे व त्यावर किती मोठं काम सुरू आहे, हेही समजून घेण्याची संधी मिळाली. आणि सायकलिंगबद्दलही खूप काही शिकायला मिळालं. त्याविषयी व ह्या पूर्ण प्रवासातील इतर अनुभवांविषयी पुढच्या व शेवटच्या लेखामध्ये आपल्यासोबत बोलेन.

पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १५ (अंतिम). मोहीमेचा समारोप

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

Group content visibility: 
Use group defaults

मानवतेसाठी घेतलेले कष्टाचे फळ आपणास मिळो. कुणीतरी या सारख्या आजारांना बळी पडू नये म्हणून आपण व आपले समविचारी लोक नक्कीच चांगला बदल घडवून आणतील.

धन्यवाद @ शशिराम जी! पण फळ मला मिळावे, असे मला काही वाटत नाही. सहज- आवडीच्या गोष्टीला ही फक्त सामाजिक उपक्रमाची जोड आहे.

आज टाइम्स ऑफ इंडिया मध्ये बातमी वाचली की एच.आय.व्ही. बाधित आईने मुलाला मारले आणि मग आत्महत्येचा प्रयत्न केला, तेव्हा नेमका हाच धागा आठवला. सायकल चालवून असे काय समाजप्रबोधन होणार, हा प्रश्न माझ्यासाठी तरी अनुत्तरित आहे.

@ उपाशी बोका. ओह! तुमचा प्रश्न बरोबर आहे. एकट्याने तसं "खूप आउटपुट" असं काही काम होत नाही. पण खारीचा वाटा तर घेता येतो ना? थोडा सहभाग तर घेतला, संवाद तर झाला. आणि तुम्हांला वाटतंय काही होत नाही, तर तुम्हीही सहभाग घेऊच शकता ना! धन्यवाद!